बापुजींच्या चेहर्‍यावरील हास्य मावळणार..?

डावखुरा's picture
डावखुरा in जनातलं, मनातलं
17 Jun 2012 - 10:44 pm

नोटांवरची गांधींची मक्तेदारी आता संपण्याची चिन्ह दिसतायंत..
आणि बर्याच वर्षांनी रिजर्व बँकेलाही पटलंय की बापुंव्यतिरिक्तही महापुरुषांनी भारतात जन्म घेतला होता आणि त्यामुळेच शिवाजी महाराज आणि आंबेडकरांनापण राष्ट्रीय चलनावर झळकण्याची संधी मिळतेय पण ....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
त्याबरोबर सोबत अजुन दोन गांधी आहेतच,

.
.

जाउद्या उशिराने सुचले तरी ते शहाणपणच म्हणवेल निर्णयाबद्दल खुद्द आम्ही रिजर्व ब्यांकेचे ऋणी राहु...

धोरणप्रकटनशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

डावखुरा's picture

17 Jun 2012 - 10:45 pm | डावखुरा

हा दुवा सदरात डकवुन पण का दिसत नाहीये?

http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-ambedaker-may-replace-gandhi...

चिरोटा's picture

17 Jun 2012 - 11:01 pm | चिरोटा

वरील व्यक्तींना नोटेवर आणले की बाजारात रुपयाची पत वाढेल असे रिजर्व बँकेला वाटतेय की काय ? चला तेवढाच जरा टाईमपास. आता प्रत्येक राज्यातले राजकारणी आमचा महान नेताही नोटेवर हवा अशी मागणी करतील.बिजु पटनाईक्,एम्.जी.आर.,जयप्रकाश नारायण्,ज्योति बसुना नोटेवर आणायची मागणी नक्की होणार.

ते माहीत नाही..पण गांधीजींचे मक्तेदारी संपणार..हे नक्की..

आणि काय फरक पडणार आहे..प्रत्येक राज्यातील चांग्ले नेते नोटेवर आले तरी..असेही कॉईन वर विविध प्रकारचे नेते किन्व सरकारी योजना..नाहीतर राष्ट्रीय दिन असे बरेच प्रकार असतातच की छाप्याच्या बाजुवर..

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jun 2012 - 11:26 pm | अत्रुप्त आत्मा

व्वा! रिझर्व ब्यांकेचा हा निर्णय धमाल उडवणार बहुतेक

तिथे प्रत्यक्षात ढमाल उडणार की नाही ही दुरची गोष्ट आहे..पण ईथे नक्केच सुर्वात झालीय.. ;)

दादा कोंडके's picture

17 Jun 2012 - 11:42 pm | दादा कोंडके

चला आर्थिक आरिष्ठ्यावर काहीतरी उपाय सापडला रिझर्व बँकेला! :)

अवांतरः एक क्रिएटिवीटी अ‍ॅट इट्स बेस्ट असा सब्जेक्ट असलेला फोरवर्ड फिरतोय. त्यात एका नोटेवरच्या गांधिंना समर आणि विंटर स्पेशल म्हणून एकदम 'यो बॉय' लूक दिला आहे एका व्रात्य चित्रकाराने!

डावखुरा's picture

18 Jun 2012 - 10:07 am | डावखुरा

हे सर्व नोटेचे अवतार पाहिलेत..चेपुवर...

नोटांचे रुपडे पालटणार आता...

श्रीरंग_जोशी's picture

17 Jun 2012 - 11:36 pm | श्रीरंग_जोशी

गांधीजींखेरीज इतरही महान व्यक्तींचे (महापुरुष जाणूनच म्हणत नाहीये कारण महान स्त्रियांना का वगळले जावे? ) चित्र छापले जाईल म्हणून त्यांचे हसू मावळले असे (अलंकृतरीत्याही) का म्हणावे? एक तर त्यांचे चित्र छापणे बंद तर होणार नाहीये ना? अन इतरांचे सुरू झाले म्हणून त्या महान आत्म्याला नक्कीच आनंद होईल.

व्यक्तिशः मला हे धोरण जरा धोकादायक वाटते. आजही चलनी नाण्यांवर इतरांच्या प्रतिमा आहेतच. यात (माझ्या माहितीप्रमाणे) केवळ १ रुपयाचा समावेश होतो.

नोटांवर असे करताना जर कुणी आक्षेप घेतला की आम्ही मानतो त्यांचे चित्र १० रु च्या नोटेवर अन इतर लोक ज्यांना मानतात त्यांचे चित्र ५० च्या नोटेवर तर ते अवघड जागेचे दुखणे होऊन बसेल.

डावखुरा's picture

18 Jun 2012 - 10:05 am | डावखुरा

नोटांवर असे करताना जर कुणी आक्षेप घेतला की आम्ही मानतो त्यांचे चित्र १० रु च्या नोटेवर अन इतर लोक ज्यांना मानतात त्यांचे चित्र ५० च्या नोटेवर तर ते अवघड जागेचे दुखणे होऊन बसेल...

हा मुद्दा माझ्यापण डोक्यात आदळला होता..पण म्हट्लं शुभ कार्यात कशाला असे विघ्न घाला...

आणि पुरुषांप्रमाणे स्त्रियांनापण मान मिळायला पाहिजे...हे मत पटलंय म्हणून ईंदिरा गांधी पण आहेत की लिस्ट मध्ये..

गांधीजी प्रत्येक नोटेवर एका बाजूला रहातीलच, दुसर्‍या बाजूला बाकीचे, असे तर नसेल ?

डावखुरा's picture

18 Jun 2012 - 10:08 am | डावखुरा

असे नसेल बहुतेक...

तिमा's picture

18 Jun 2012 - 9:30 am | तिमा

रुपयाखालची नाणी परत चालू करा व त्यावर राज्यातल्या नेत्यांची चित्रे छापा. म्हणजे एक 'चवन्नी' च्या ऐवजी एक 'छगन्नी" आणि एक 'अठन्नी' च्या ऐवजी एक 'आठवन्नी' असेही म्हणता येईल.

डावखुरा's picture

18 Jun 2012 - 10:10 am | डावखुरा

असे का म्हणताय तिमा काका?
म्हणजे काय बाकीच्यांना काहीच किंमत नाही का आपल्यालेखी?

तिमा's picture

18 Jun 2012 - 7:33 pm | तिमा

काही सन्माननीय अपवाद सोडले तर , सध्याच्या राजकारण्यांची किंमत माझ्या लेखी शून्य आहे. त्यांना फक्त उपद्रवमूल्य आहे.

डावखुरा's picture

20 Jun 2012 - 10:25 am | डावखुरा

उदा.

तिमा's picture

20 Jun 2012 - 11:57 am | तिमा

'मधु दंडवते'

च्यायला,
अता खोट्या नोटा ओळखणे आजुनच जिकिरीचे होउन बसणार.....
कुठल्याही महान व्यक्तीचे फोटो नोटेवर छापण्याच्या व्यक्तीशः मी विरोधी आहे. त्या पेक्षा प्राणी , पक्षी, ताजमहाल, गेट्-वे-ऑफ इंडिया छापावा असे वाटते.... त्यामुळे जोषीबोवा म्हणतात तशी भांडणे पण होणार नाहीत.

कुणाच्या पुतळे, फोटो, स्मारक यामुळे जर खरच स्फूर्ती मिळत असती तर आज समाजात एवधे गुन्हेगार नसते.
या निर्णयामुळे जातियवादी शक्तीच्या हातात आयते कोलित मिळुन देश अजुन विभागला जाउ शकतो.

एम.जी.'s picture

18 Jun 2012 - 12:18 pm | एम.जी.

सगळ्यांचा एक ग्रुप फोटो टाकावा...

आनंदी गोपाळ's picture

18 Jun 2012 - 1:13 pm | आनंदी गोपाळ

हेच म्हणायला आलो होतो.

ग्रूप फोटो ही बेस्ट आयडिया आहे.

डावखुरा's picture

20 Jun 2012 - 10:30 am | डावखुरा

ग्रुप फोटोत सावरकर आणि गांधीजी शेजारी शेजारी आले तर?

मृत्युन्जय's picture

20 Jun 2012 - 10:31 am | मृत्युन्जय

तर??????????

खटासि खट's picture

18 Jun 2012 - 1:06 pm | खटासि खट

रिझर्व बँकेने स्वा. सावरकर, प. पू हेडगेवार, गोळवलकर गुरुजी यांचेही छायाचित्र लावावे आणि ही चिडचिड थांबवावी.

गांधीजीना नोटेवरुन हटवले हे समजल्यावर काही लोकानी पेढे वाटले असतील नै??

गांधीजीना नोटेवरुन हटवले

जागेपणी स्वप्न पाहु नयेत म्हणे. ;)

डावखुरा's picture

20 Jun 2012 - 10:26 am | डावखुरा

सहमत..

गोंधळी's picture

18 Jun 2012 - 2:18 pm | गोंधळी

आयला काय फाल्तुगिरि आहे.
चित्र टाकुन काय होनार आहे.

जाउदे आपलि लोकशाहि(?) हिच एक फाल्तुगिरि आहे.
(Don't take seriously).......

तर्री's picture

18 Jun 2012 - 3:11 pm | तर्री

ग्रुप फोटो चे कल्पना वाचून पानवाला आठवला.

रमताराम's picture

18 Jun 2012 - 3:37 pm | रमताराम

तसेही यापुढे आता कोणाचे फोटो लावायचे याच्यावरून राजकारण एवढे होईल की बापूजींच्या फोटोप्रमाणेच कुणी निप्पाणीचे समाजसेवक शिवाप्पा वणकुद्रे यांनी केलेल्या 'समाजसेवे'चा आदर करून त्यांचा फोटो/चित्र असणारी नोट काढावी अन्यथा भारत बंद पुकारला जाईल असे फ्लेक्स तरुण नेते बसवप्पा शिवप्पा यांच्यातर्फे लावण्यात येतील. सगळ्यांना जागा करून देता देता पानवाल्याच्या करामतीचीच आठवण होणार आहे. मज्जाच मज्जा.

अवांतरः
पूर्वी लहान पोरे सिगरेटची पाकिटे, स्टँप वगैरे जमा करत तसे आता नोटा जमा करतील काय? म्हणजे 'तुझ्याकडे दोन मुकेश अंबानी आहेत त्यातला एक मला दिलास तर मी तुला दोन सुब्रतो रॉय देईन' अशा चर्चा मुलांमधे ऐकू येतील काय? की ब्लडी देसी नोटाच शेवटी लिंकनच्या किंवा वॉशिंग्टनचा फोटो असलेल्या डालरची सर त्यांना कशी येणार असे तुच्छतेने म्हणून त्या नोटा देऊन मॅक्डीचा बर्गर खरेदी करतील?

=))
चित्रच डोल्या म्होरं हुबं र्‍हायलं.

रमताराम's picture

18 Jun 2012 - 3:38 pm | रमताराम

प्रकाटाआ

डावखुरा's picture

20 Jun 2012 - 10:31 am | डावखुरा

पानवाला?

नाना चेंगट's picture

18 Jun 2012 - 6:43 pm | नाना चेंगट

हे असले नेत्यांचे वगैरे फोटो नोटेवर अजिबात छापू नये असे आमचे वैयक्तिक मत आहे.

भले जर कुणा माणसाचाच फटू छापायचाच असेल तर समस्त भारतीय जनतेचा प्रतिनीधी म्हणून आमचा फटू लावावा.

(तसेही आमचे मित्र आम्हाला असा न तसा थुक्का लावत असतातच, फटू छापल्यावर अख्खी भारतीय जनता थुक्का लावेल. :) )

डावखुरा's picture

20 Jun 2012 - 10:34 am | डावखुरा

ओ नाना..नाहीतर आरके चा कॉमन मॅन चालन का[तुमचा प्रतिनिधी म्हणुन]? आमच्याकडे तुमचा फोटुच नाहीये..

रमताराम's picture

20 Jun 2012 - 1:45 pm | रमताराम

नाना अरे तुझा फोटो असलेला श्टांप काढायचाय ना. आता हे नोटेचे मधेच कुठे काढलंस?

अवांतरः नोटा ठेवण्याच्या विशिष्ट जागांकडे नजर ठेवून तर हा प्रस्ताव दिलेला नाहीस? ;)

नाना चेंगट's picture

20 Jun 2012 - 2:01 pm | नाना चेंगट

>>>अवांतरः नोटा ठेवण्याच्या विशिष्ट जागांकडे नजर ठेवून तर हा प्रस्ताव दिलेला नाहीस?

शिव शिव शिव !!!

स्टांप ला जास्त थुका लावतात लोकं ;)

.

यामुळे भारतातली गरीबी नष्ट होईल. आणी डॉलर आत्महत्या करेल

विकास's picture

18 Jun 2012 - 7:23 pm | विकास

गांधीजी, शिवाजी, आंबेडकर आदींची चित्रे नोटावर छापून जर त्या टेबलाखालून पाकीटातून सरकवण्यासाठीच वापरल्या जाणार असल्या तर अशा विभुतींचा सन्मान आहे की जनतेने पाळलेला आदर? त्यापेक्षा नकोच ना ते! नाहीतरी चेक फाडताना त्यावर कुठे चित्र लागते? :)

मृत्युन्जय's picture

20 Jun 2012 - 10:30 am | मृत्युन्जय

भले शाब्बास. म्हणजे बापूंचा अपमान झालेला चालतो तुम्हाला?

मी तर म्हणतो चेकवर पण महापुरुषांचे फोटो आलेच पाहिजेत.

अहो पण रिश्वतखोर चेक स्वीकारत नाहीत ना..

आणि बाकी नेत्यांचाही अपमान व्हाव म्हणुन तर तुम्ही ह्या निर्णयाचे स्वागात करीत नाहीयेत ना?

मृत्युन्जय's picture

20 Jun 2012 - 11:17 am | मृत्युन्जय

लाच दिल्या घेतल्यामुळे नेत्यांचा अपमान होतो. नोटा म्हणजे लक्ष्मी. लाच दिल्या घेतल्यामुळे देवीचा अपमान होतो? आणि होतो तर मग बापूंचा अपमान झालेला चालतो तुम्हाला?

रमताराम's picture

20 Jun 2012 - 1:50 pm | रमताराम

हल्ली चालतो. अर्ध्या चड्डीतली पोरं सुद्धा हल्ली गांधीबाबाचा अपमान करू शकतात. गोबेल्स काय फक्त जर्मनीत असतात? काही वर्षांनी गांधीजी हे इंग्रजांचेच हस्तक होते हे 'सत्य' सर्वमान्य होऊन जाईल, आहात कुठं? नि स्वातंत्र्यलढ्याचे श्रेय त्यावेळी अस्तित्वातही नसलेले - म्हणजे आजच्या इतिहासाच्या मान्यतेप्रमाणे, तेव्हाचा इतिहास वेगळा असणार हे उघड आहेच - लोक घेऊन जातील. पाकिस्तानात आता 'भारतीय शास्त्रीय संगीता'ला निर्लज्जपणे 'पाकिस्तानी क्लासिकल' म्हणतात तसे. चालायचेच. हातात दंड असला की इतिहास हवा तसा बदलून घेता येतो साहेब.

डावखुरा's picture

20 Jun 2012 - 3:13 pm | डावखुरा

फारच डीप प्रतिक्रिया...पण सत्याच्या बाबतीत अजुन फार कन्फ्युजन आहे मनात..जर ते तुम्हाला खरं माहीत असेल तर वेगळ्या येणार्‍या धाग्याचे मनापासुन स्वागत आहे..

डावखुरा's picture

20 Jun 2012 - 3:13 pm | डावखुरा

फारच डीप प्रतिक्रिया...पण सत्याच्या बाबतीत अजुन फार कन्फ्युजन आहे मनात..जर ते तुम्हाला खरं माहीत असेल तर वेगळ्या येणार्‍या धाग्याचे मनापासुन स्वागत आहे..

विकास's picture

20 Jun 2012 - 6:47 pm | विकास

अर्धेच काहीतरी वाचून पिंका टाकण्यापेक्षा चड्डी परवडली की हो! ;)

आणि हो, अर्धी पँट घालणारी (ज्याला माझ्या माहितीप्रमाणे चड्डी म्हणतात) घालणारे माहीत आहेत, पण, अर्धी चड्डी नक्की कोण घालते? :-)

रमताराम's picture

21 Jun 2012 - 12:29 am | रमताराम

सारा प्रतिसादच अवांतरः
माझा प्रतिसाद तुम्हाला उपप्रतिसाद नाही. सबब, तुम्हाला उद्देशून काहीही लिहिलेले नाही. गांधीबाबाचा अपमान ही फारशी मनाला लावून घेण्याची गोष्ट राहिलेली नाही एवढा प्रतिसाद मृत्युंजय यांना दिलेला आहे. सबब इतरांनी बळंच मधे घुसू नये. क. लो. अ.

(पूर्ण चड्डी ऊर्फ पँट वापरणारा) रमताराम

विकास's picture

20 Jun 2012 - 6:46 pm | विकास

भले शाब्बास. म्हणजे बापूंचा अपमान झालेला चालतो तुम्हाला?

माझा प्रतिसाद नक्की वाचूनच प्रतिसाद दिलात का? कारण माझे वाक्य (आणि त्याची सुरवात) पहा:

गांधीजी, शिवाजी, आंबेडकर आदींची चित्रे नोटावर छापून जर त्या टेबलाखालून पाकीटातून सरकवण्यासाठीच वापरल्या जाणार असल्या तर अशा विभुतींचा सन्मान आहे की जनतेने पाळलेला आदर?

आता यात गांधीजी पहीलेच असताना तुम्हाला प्रश्न कसा पडला? का गांधीजी आणि बापू हे वेगळे वाटतात? यावर बाकी पण कोणी न वाचता दिलेल्या प्रतिक्रीया पाहून आश्चर्य वाटले. असो.

स्वतन्त्र's picture

18 Jun 2012 - 7:48 pm | स्वतन्त्र

सर्व काही सुरळीत गेले तर ठीक...नाहीतर व्यंग चित्रांप्रमाणे नोटेचीत्रे पण हद्दपार होतील !

डावखुरा's picture

20 Jun 2012 - 10:55 am | डावखुरा

तसेच व्हायला हवे..मस्त नवीन डिझाईन च्या नोटा..

डावखुरा's picture

20 Jun 2012 - 11:01 am | डावखुरा

सरळ रुपयाचा नवीन सिम्बॉल वापरावा..कोण्त्याही नेत्याचे चित्र वापरण्या ऐवजी...