तारे जमीं पर.

गणपा's picture
गणपा in जनातलं, मनातलं
26 Apr 2012 - 12:55 am

काल फोन वर बोलताना लेकीचा मुड छान होता. शक्यतो तिच्या गप्पा ३-४ वाक्यातच संपतात. पण सध्या मे महिन्याच्या सुट्टीचे डोहाळे चालु झालेत. त्यामुळे स्वारी खुशीत होती. शाळेतल्या गमती जमती सांगायला आतुर झाली होती.
परवा म्हणे इंग्रजीच्या तासाला बाई 'अ‍ॅबस्ट्रॅक्ट' आणि 'काँक्रिट' नाउन शिकवत होत्या. तिसरीतल्या मुलांना समजेल अश्या शब्दात समजवण्याची बाईंची कसरत चालु होती. तरी जमेल तितकी व्याख्या सोप्पी करत बाई म्हणाल्या की अ‍ॅबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे ज्या गोष्टीं आपल्याला पहाता येत नाही वा वास घेता येत नाही किंवा स्पर्शही करता येत नाहीत त्या. उदा. ब्युटी, हॅप्पीनेस. आणि काँक्रिट नाउन म्हणजे अ‍ॅबस्ट्रॅक्टच्या विरुद्ध.
इतक्यात बाईंच वर्गातल्या आर्यकडे लक्ष गेल. त्याच्या टिवल्या-बावल्या चालु होत्या. बाईंनी आवाज चढवत त्याला काँक्रिट नाऊनचे उदाहरण देण्यास सांगीतले. बिचारा एकदम भेदरला. पण जरा डोकं खाजवून म्हणाला की 'टिचर सुसु. We can see, it smell it, and touch it.' आणि मग वर्गात एकच हशा पिकला. थोड्या वेळाने सगळं शांत झाल्यावर आमच्या बाईसाहेबांच्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकली. ती (मागील काही अनुभव गाठिशी असल्याने) हळुच बाईंच्या जवळ गेली आणि विचारल 'टिचर आपल्या शरिराच्या आतले भाग (हृदय्,मेंदु,हाडं) अ‍ॅबस्ट्रॅक्ट की काँक्रिट?' बाईंनी 'काँक्रिट' अस उत्तर दिल्यावर पुढचा प्रश्न आलाच. 'पण ते आपल्याला दिसतात कुठे? आपण टच पण करु शकत नाही की स्मेलपण घेउ शकत नाही?' बाईंच्या नशिबाने तेवढ्यात तास संपल्याची घंटा झाली.

असच एकदा वर्गात भुगोलाचा तास चालु होता. बाईंनी 'ऑर्बिट'ची व्याख्या फळ्यावर लिहिली आणि मुलांना उतरवुन घ्यायला सांगीतली. 'The curved path on which Earth rorates around Sun in a circular motion.' तितक्यात बाहेरुन कुणी तरी आल्याने पाचेक मिनिटाचा गॅप पडला. बाई परत फळ्याकडे आल्या. लेकीचा हात वर झालेला पाहुन बाईंनी विचारल काय शंका आहे?
'टिचर रोटेट ऑर रिव्हॉल्व्ह? रोटेट का मतलब अपने और ही घुमना होता है ना?' बाईंनी निमुट आपली चुक मान्य केली आणि तिच कौतुक केल. लेकचीचे विमान एकदम सातवे आसमाँ में. :)

एकदा गणिताच्या तासाला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आकडे लिहिण चालु होतं. बाई पुस्तकात पाहुन आकडे लिहित होत्या. सगळ्या संख्या चार आकडी होत्या. पण पुस्तकातल पाहुन फळ्यावर उतरवताना बाईंनी एका चार आकडी संख्येतला एक आकडा खाउन टाकला. मुलांनी स्वतःची अक्कल लावून ती तिन आकडी संख्या सगळ्यात खाली लिहिली. मुलांचा अभ्यास तपासताना बाईंनी सगळ्या मुलांच उत्तर (पुस्तकातल्या उत्तराला प्रमाण मानुन) चुक दिल. (त्यांनी स्वतः घातलेला घोळ त्यांच्या गावी नव्हता.) पण नेहमी प्रमाणे लेकीला रहावल नाही. बाईंची चुक नजरेस आणुन दिली. म्हणे जर तुम्ही पुस्तकातला प्रश्न दिला असेल तर तुम्ही एक आकडा गाळलाय. आणि जर तुमच्या मनाच गणित घातलं असेल तर आमच उत्तर बरोबर आहे. बाईंनी काही न बोलता पाठ फिरवली आणि त्यांची चुक दुरुस्त केली. बाई साधं थँक्यु पण नाही म्हणाल्या ही तीची खंत तिने मला बोलुन दाखवली. :)

सध्या सगळ्या बाईंच्या चुका काढण्याचा नवा छंदच तिला जडलाय. हिंदीचा तास चालु होता. बाई फळ्यावर एक वाक्य लिहित होत्या 'और उसने डंडा उठाया |' शक्यतो हिंदी मध्ये बरेच वेळा ड खाली टिंब येते अस गेल्या वर्षी व्याकरणात शिकवल होत. ही बया परत उभी राहिली आणि बाईंची शाळा घेतली. हीची ख्याती माहित असल्याने बाईंनी पुस्तक उघडल आणि धडा चाळुन पाहिला. डंडा खाली टिंब दिसत नसल्याची खात्री करुन मग बाईंनी असा काही लुक दिला लेकीला की तिचे सारे तारे जमीं पर आले. ;)

बालकथाविनोदमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

26 Apr 2012 - 1:05 am | पाषाणभेद

लेक घरी येवून तुमचा गृहपाठ घेते की नाही?

चिंतामणी's picture

26 Apr 2012 - 1:06 pm | चिंतामणी

मी गणपाला मागेच सांगीतले आहे की तुझा "डोक्यावर केस आहेत" असा आत्ताचा फोटो काढून ठेव म्हणून.

सहि आहे लेक ..रीअलि शाळेतले दिवस आठवले ..विनाकारन ..एखादा शब्द पकडुन बाईना आनि गुर्जिना त्रास द्यायला जाम आवडायच मलाहि ..;)
तुमच्या लेकिचं नाव कळेल का .....??

माझ्याकडुन खुप खुप शुभेच्छा तीला ....:)

(चौकस बुद्धि पूढे लयि कामि येते मुलिन्च्या :P )

कल शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तिचं लक्ष सतत कोणती गोष्ट वेधून घेते हे पाहणं. हे फक्त मुलांना पैश्याची समज येण्यापूर्वीच होऊ शकतं आणि ती तिसरीत असल्यानं हीच योग्य वेळ आहे.

She has an analytical mind with a great faculty of simplyfying & applying the things learnt & that is very rare.

ती जे आत्मसात करेल त्याचं सोनं करेल, अशी संधी गमावू नका. काहीही हवं असेल तर व्य. नि. करा.

मोदक's picture

26 Apr 2012 - 1:17 am | मोदक

लेक हुशार आहे हो...

बिचार्‍या बाई..! :-)

एकदम सलाम!

(आणि हो, हा जुना शतकी धागाही आठवला.)

विकास's picture

26 Apr 2012 - 8:50 pm | विकास

असेच म्हणतो. मला देखील तोच धागा आठवला पण तुम्ही आधीच दुवा दिला होता! :-)

लेकीचे आणखी किस्से असतील. काही किस्से चेपुवर पाहिले आहेतच.. :)

- पिंगू

शिल्पा ब's picture

26 Apr 2012 - 4:10 am | शिल्पा ब

भारी चौकस पोरगी आहे हो!! किस्से एकदम धमाल आहेत.

स्पंदना's picture

26 Apr 2012 - 5:53 am | स्पंदना

खर सांगु? तुम्हाला आम्हाला तिच कौतुक आहे म्हणुन हुषार, पण त्या बाईंना विचारा, त्या म्हणतील 'ती ना ती गणपाची लेक, फार अक्कल पाजळते'.
या असल्या शेर्‍या पासुन तिने हर्ट होउ नये अशी तिची मनोधारणा बनवा. जेव्हढी हुषार आहे तेव्हढीच मनान दणकट बनवा. मला विचाराल तर पोर अगदी दृष्ट लागण्याएव्हढी तल्लख आहे.

रेवती's picture

26 Apr 2012 - 6:21 am | रेवती

'ती ना ती गणपाची लेक, फार अक्कल पाजळते'.

सहमत आहे.;)
आजकाल मी मुली असणार्‍यांशी फार म्हणजे फार प्रेमानं वागते. त्यांना खूष ठेवते.
काही वर्षांनी हुंड्यात जरा डिस्काऊंट मिळेल म्हणून.;)
बाकी त्या बाईंनी थ्यांक्यू तरी म्हणायला हवं होतं. ते मलाही खटकलं.

रमताराम's picture

26 Apr 2012 - 11:21 am | रमताराम

काय 'दूरदृष्टी ' हो ही.

मदनबाण's picture

26 Apr 2012 - 1:27 pm | मदनबाण

काय 'दूरदृष्टी ' हो ही.
खीखीखी... ख्या ख्या ख्या... ;) आज्जीच ती ! 'दूरदृष्टी ' असायचीच तिच्याकडे ! ;)

आपला मुलगा चांगल्या घरी पडावा असे सगळ्या आईवडीलांना वाटते.;)

आपला मुलगी चांगल्या घरी पडावी असे सगळ्या आईवडीलांना वाटते. ;)
हे असे हवे हो... ;)

रेवती's picture

27 Apr 2012 - 8:13 am | रेवती

दिवस बदलले हो बाणा!

दिवस बदलले हो बाणा!
दिवस तसेच फक्त मुली बदलल्या आहेत ! ;)

पिवळा डांबिस's picture

26 Apr 2012 - 6:24 am | पिवळा डांबिस

पोरांचं काही सांगता येत नाही हल्लीच्या!
कधी टेंपोत बसवतील त्याचा नेम नाही...
:)

शिल्पा ब's picture

26 Apr 2012 - 6:40 am | शिल्पा ब

अगदी!! आमच्यावेळी हे असं नव्हतं!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Apr 2012 - 6:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेक हुशार आहे. अस्संच तिला चौकस ठेवा.

-दिलीप बिरुटे

इरसाल's picture

26 Apr 2012 - 9:41 am | इरसाल

मिर्‍या........गणपाचे डोके....... आमी नाय जा.

बाकी अपर्णाअक्षयशी पूर्णता सहमत.

प्रभाकर पेठकर's picture

26 Apr 2012 - 9:53 am | प्रभाकर पेठकर

व्वा...! पाऊलावर पाऊल का?

म्हणजे लवकरच (माझ्या सत्तर-पंचाहत्तरीत), मिपावर (निदान) संपादक व्हायची तिला फुल्ल संधी आहे.

प्यारे१'s picture

26 Apr 2012 - 10:00 am | प्यारे१

तू ओककाकावाली नाडी बघून नाव ठेवलेलंस का काय मुलीचं...?????

प्रचेतस's picture

26 Apr 2012 - 10:18 am | प्रचेतस

एकदम धमाल.

ऋषिकेश's picture

26 Apr 2012 - 10:21 am | ऋषिकेश

हा हा हा! जबर्‍या!

मृत्युन्जय's picture

26 Apr 2012 - 10:26 am | मृत्युन्जय

गणपाशेठ तुमचे काही खरे नाही. लेक चांगलीच वात आणणार आहे तुम्हाला तुम्ही परतल्यावर :)

सहज's picture

26 Apr 2012 - 10:31 am | सहज

तिला नेहमी चांगले शिक्षक मिळू दे ह्या शुभेच्छा!

रमताराम's picture

26 Apr 2012 - 11:24 am | रमताराम

पोरगी खट आहे एकदम. आपले बरोबर असेल तर मास्तरणीलादेखिल (प्लीज नोट, मास्तर म्हटलेले नाही; देअर इज डिग्री ऑफ डिफरन्स. मास्तर म्हटले तर तीव्रता बरीच कमी होते.) न घाबरता चूक तिच्या पदरात (आय मिन ओढणीत.... जाऊ दे पर्स मधे) घालते म्हणजे लैच शूर आहे राव. तुमचं काही खरं नाही.

सानिकास्वप्निल's picture

26 Apr 2012 - 12:12 pm | सानिकास्वप्निल

भारी हुशार आहे ओ लेक :)

स्मिता.'s picture

26 Apr 2012 - 1:13 pm | स्मिता.

लई भारी पोरगी आहे तुमची लेक!
मागे तो 'आय लव्ह यू' चा किस्सा आणि आता हे... घरात सगळ्यांची शिकवणी घेत असणार :)

छान !!

अवांतर : मास्तरीणी चा फोटो उपलब्ध होवु शकतो का ;)

चिगो's picture

26 Apr 2012 - 1:23 pm | चिगो

तल्लख आणि हुषार तर आहेच तुमची लेक, पण धाडसी पण आहे.. च्यायला, आपल्यात मास्तर/मास्तरणीला अक्कल शिकवायची किंवा काढायची हिम्मत नव्हती.. ( काळ बदललाय म्हणतात तो हाच.. ;-))

आणखी किस्से येऊ द्यात लेकीचे, गणपाभौ..

गणपाला अडचणीत आणण्याचा डाव दिसत आहे हा. ;)

मदनबाण's picture

26 Apr 2012 - 1:25 pm | मदनबाण

खीखीखी :) धमाल अनुभव ! :)

धन्यवाद मंडळी.
आधी म्हटलं टाकु की नको ईथे. उगाच स्वःतच्या लेकीच्या हुशारीची टिमकी वाजवतोय असं वाटायला नको.
पण मग म्हटल असे मजेशीर किस्से आपल्या लोकांत शेयर करायचे नाहीत तर अजुन कुठे. :)

सर्वांचे मनःपुर्वक आभार. लेकीला तुमच्या शुभेच्छा आणि कौतुक कळवतो. :)

मेघवेडा's picture

26 Apr 2012 - 1:41 pm | मेघवेडा

दणकट! एवढ्याश्या वयात इतका चौकसपणा पाहून कौतुक वाटतं.. मास्तरणी टरकून असणार!

भडकमकर मास्तर's picture

26 Apr 2012 - 2:14 pm | भडकमकर मास्तर

बेष्ट...
तिला हा लेख आणि सार्‍या प्रतिक्रिया वाचून दाखवल्यावर तिचा काय प्रतिसाद मिळतो तेही लिही रे... :)

आत्ताच तिला लेख आणि सगळ्या प्रतिक्रिया वाचुन दाखवल्या.
खुश झाली एकदम सगळ्यांच कौतुक ऐकुन.
पण जाता जाता माझी चुक काढलीच तिने.
"बाबा तु पण ना.. मी मुव्ह नव्हते म्हणाले काही. रिव्हॉल्व्ह म्हणाले होते. अर्थ रिव्हॉल्व्ह्ज अराउंड सन."

असो... गपगुमान वर बदल केले आहेत. :(

यकु's picture

26 Apr 2012 - 7:30 pm | यकु

___/\____!!!!

=)) =)) =))

भन्नाट दिसतेय छोटी.

स्पंदना's picture

27 Apr 2012 - 6:36 am | स्पंदना

ह्ये . काढली ना विकेट?

चिगो's picture

27 Apr 2012 - 11:22 am | चिगो

"बाबा तु पण ना.. मी मुव्ह नव्हते म्हणाले काही. रिव्हॉल्व्ह म्हणाले होते. अर्थ रिव्हॉल्व्ह्ज अराउंड सन."

अय्याय गं... मेलो मी. काय भन्नाट छोकरी आहे हो.. माझं नुस्तं कौतूकच नाही, तर सलामही कळवा.. :-)

अमृत's picture

26 Apr 2012 - 2:20 pm | अमृत

'Child is father of man' :-)

अमृत

परिकथेतील राजकुमार's picture

26 Apr 2012 - 3:36 pm | परिकथेतील राजकुमार

येवढी हुशार आहे म्हणजे नक्की आईवरती गेली असणार.

हो की नै रे गंपा ?

हेहेहे पटलं खरच मनापासुन पटलं
आईवरच गेलि असनार ......:)

स्त्री पक्षाचा ( जातीचाहि चालेल :P) विजय असो ;)

सोत्रि's picture

27 Apr 2012 - 8:55 am | सोत्रि

परा,
तु हलकट्ट आहेस.... हा प्रतिसाद मला द्यायचा होता, तु आधिच टाकलास, म्हणून तु हलकट्ट आहेस ;)

- (हलकट) सोकाजी

अवांतरः गणपाभौ, मस्त! लेक नाव काढील हो तुमचे !

इरसाल's picture

26 Apr 2012 - 4:14 pm | इरसाल

बाटली पोचवली नाय वाट्ट ?

चित्रगुप्त's picture

26 Apr 2012 - 6:27 pm | चित्रगुप्त

छान छान छान...
अश्याच आणखी गमती जमती लिहित रहा.

पैसा's picture

26 Apr 2012 - 9:02 pm | पैसा

पोट्टी तुझ्या डोळ्यासमोर तारे चमकवेल कधीतरी! मोठी होईल तसं जास्त लक्ष ठेव रे बाबा!

sneharani's picture

27 Apr 2012 - 12:03 pm | sneharani

मस्त किस्सा! येऊ देत अजुन असे किस्से!! ;)
:)

पिलीयन रायडर's picture

27 Apr 2012 - 12:41 pm | पिलीयन रायडर

हिच्या वेळी हिच्या आईनी काय खाल्ल होतं हो???

अमृत's picture

27 Apr 2012 - 12:52 pm | अमृत

गणपाच्या नविन नविन पाकृ :-)

ह.घ्या.

अमृत

संजय क्षीरसागर's picture

27 Apr 2012 - 12:53 pm | संजय क्षीरसागर

दुसरं काय? म्हणून तर इतकी `अनोखी' झालीये

गणपा's picture

27 Apr 2012 - 1:08 pm | गणपा

;)