परवा, राजश्री मराठीच्या तुनळीवरील पोतडीत ढुंकुन पाहताना, चित्रपटाची लिंक गवसली.
म्हटले चेपु-चेपु करण्याऐवजी, क्लासिक सिनेमा आहे बघावे दोनेक तास खर्ची घालुन.
_____________________________________________________________
तर मंडळी चित्रपट आहे चांडाळ चौकडी....
चित्र : आंतरजालावरुन साभार...
या चित्रपटाची कथा एका गावातील काही पात्रांच्या अवतीभोवती फिरते. अन्ना देशमुख (निळु फुले) व त्याचे इतर साथीदार यांच्या वाइट वर्तणुकीमुळे (हे साहजिकच) पुर्ण गाव त्यांना चांडाळ चौकडी म्हणुन ओळखुन असतो. सहसा कुणीही त्यांच्या वाट्याला जाण्यास धजावत नसते.
चित्रपटाची सुरुवात होते ती एका गाण्यापासुन, ज्यात चित्रपटाची सहनायिका-अवसा, तिन्ही सांजेला, "बिगी बिगी चला" असे गाणे गात घरी परतत असते. वाटेत तिला अन तिच्या सोबत असलेल्या बायांना अन्नांचा एक माणुस अडवुन संध्याकाळी वाड्यावर येण्याचं अन्नांचं बोलावणं कळवतो. अवसा त्याला नकार देउन झिडकारते. ह्या घटनेचा अन्ना व त्यांच्या साथीदारांना राग येतो. त्याच रात्री अन्ना व सहकारी तिला उचलुन आणुन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्लॅन आखतात व ते यात यशस्वी होतातही.
दुसर्या दिवशी अवसेची आजी बाहेर गेलेली असताना अवसा स्वत:ला पेटवुन घेते. आजी अन काही शेजारी गावच्या पाटलाची मदत मागायला जातात पण व्यर्थ. पाटील शेपुट घालुन बसतो. तालमीतील काही तरणी, जवान मुलं याविरुद्ध आवाज उठवतात पण अन्नाच्या बंदुकीपुढे कुणाचेही चालत नाही. उलटपक्षी अन्नाच ह्या सर्वांना खोट्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खाउ घालतो. तर असा हा अन्ना, वाटेल तेव्हा अन वाटेल तिची अब्रुची लक्तरे वेशीवर टांगत असतो.
अन्ना एकदा शाळेत झेंडा फडकवण्यासाठी गेलेला असतो. तिथे त्याला समुहगान करत असलेली मुलगी (छबु) आवडते. छबु गावातील हरणाबाइची मुलगी असते. अन्ना छबुला दर शन्वारी घरी गाउन दाखवायला बोलावतो. अन तिच्या गाण्याबद्दल मासिक १० रु. शिष्यवृत्ती देण्याचे कबुल करतो. अन्नाच्या घरी छबुचे जाणे-येणे सुरु होते. ती गर्भार झाल्यावर तिचं स्वयंवर दामदुटीने तिच्याच गायन मास्तराशी लावुन देतो.
इतकेच नाही तर अन्ना दबावतंत्र वापरुन लोकांच्या जमिनीही हुसकावत असतो अन त्यांच्या शेतातुन वाटाही बनवतो. त्यातील एक वाट आवडाआक्काच्या शेतातुनही जात असते. अन्नाला आवडाआक्का समजावुन सांगते. पण अन्ना काही ऐकत नाही. मग ह्या दोहोंमध्ये द्वंद्व लागते अन आपसुकच नायकाची एंट्री होते.
(आवडाआक्काचं माहेर शेजारच्या गावी असते, तिचा नवरा हयात नसल्याने ती आपल्या भावाच्या घरी राहत असते. ह्या अन्नाच्या झेंगाटामुळे ती परत गावी येण्याचं ठरवते.)
गावच्या जत्रेचे दिवस जवळ आलेले असतात. पंच व गावकरी, मुलं तुरुंगात असल्याने ह्या वर्षी जत्रा करायला नको या निर्णयाप्रत येतात. पण अन्नाचा ह्याला विरोध असतो. तो सर्वांकडुन अव्वाच्या सव्वा वर्गणी गोळा करुन जत्रेच्या काळात गावभर निव्वळ तमाशाचे फड उभे करवतो. इकडे आवडाक्काच्या शेतातुन बैलगाड्या नेणे सर्रास चालु असते. मग लोहबाजीराव (आवडाक्काचा मुलगा-यशवंत दत्त) व चांडाळ चौकडी नेहमीच एकमेकांना खुन्नस देण्याचा बहाणा शोधत असतात. पण लोहबाजीराव नेहमीच काही न काही क्लृप्त्या काढुन त्यांच्या समोरुन निघुन जातो.
या दरम्यान लोहबाजीराव गावच्या दृष्टीने काही चांगली कामं करतो व गावकर्यांचा विश्वास संपादन करतो. तसेच याच्या घराशेजारी राहणार्या "सुगंधा"सोबत याचे तार जुळत असतात. एके दिवशी लोहबाजीराव बाजारात काही कामानिमित्त फिरत असतो. अचानक एक मारका बैल पळत सुटतो व रेटारेटीत लोहबाजीरावाच्या खांद्यावरील बंदुक निसटून त्यातुन एक गोळी जाउन अन्नाच्या छाताडात घुसते. अन्ना जागीच गतप्राण होतो. त्याच्या इतर तीन मित्रांना हा धक्का सहन होत नाही. अन ते लोहबाजीरावाचा काटा काढण्याचा प्लान बनवतात. इकडे पोलिस लोहबाजीरावाला खुनाच्या बदल्यात अटक करुन नेतात.
आता, लोहबाजीराव तुरुंगातुन सुटुन येतो का? हे तिघे त्यांचा बदला घेण्यात सफल होतात का? सुगंधा अन लोहबाजीराव यांचं मिलन होतं का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवायची असतील तर चांडाळ चौकडी पाहावाच लागेल.
१९७८ च्या मानाने चित्रपट बर्यापैकी गतिवान आहे. सर्व घटना एकानंतर एक घडत असल्याने कुठेच संथ पडत नाही. प्रभाकर नायक यांचं दिग्दर्शन दमदार आहे. गीत-संगीत पुन्हा एकदा जगदीश खेबुडकर व राम कदम या सुपरहिट जोडगोळीचे आहे. साजणा-साजणी नावाचे एक ड्युएट (मराठी ?), कळी गुलाबाची हे प्रेमगीत अन गेला गर्दीत मारुन धक्का ही लावणी एकदम मस्त.
चित्रपटातील गाणी इथे ऐकायला मिळतील. अन संपुर्ण चित्रपट इथे बघायला मिळेल.
तर मग मंडळी पाहणार की नै हा चित्रपट.
-------------------------------------------------------------------------------------------------------
परीक्षण लिहिण्याची पहिलीच वेळ. समीरसुर अन फारएण्ड यांच्या सल्ल्यांच्या प्रतिक्षेत.

वाचने
11824
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
अवसा नै हो हौसा..
मराठीत ड्युएट म्हणजे
छान
म्हंजे??
In reply to छान by निनाद
मिळायला हवी.
In reply to म्हंजे?? by मी-सौरभ
छान लिहीले..
चित्रपट परिक्शण आवडलं.आणि
परिक्षण आवडले रे वप्या.
छान प्रयत्न. जम्याच रे
+१
In reply to छान प्रयत्न. जम्याच रे by अन्या दातार
हे वेगळे हो!! पर्भणीची
In reply to +१ by प्रचेतस
+१
In reply to छान प्रयत्न. जम्याच रे by अन्या दातार
+1
In reply to +१ by स्पा
गावाची आठवण
In reply to +1 by यकु
येथे
In reply to छान प्रयत्न. जम्याच रे by अन्या दातार
चांगले कथाकथन केलेत.
अहो मंतात ना..
In reply to चांगले कथाकथन केलेत. by VINODBANKHELE
काहीतरी करत आहेत ना ..झालं तर
In reply to चांगले कथाकथन केलेत. by VINODBANKHELE
बरा आहे ...
पहिलाच परीक्षणाचा प्रयत्न
वा वा.. भलता मनोरंजक असणार हा
चित्रपट
आठवण करुन दिल्याबद्दल धन्स...
In reply to चित्रपट by चिगो
पहिलाच प्रयत्न स्तुत्य आहे.
बिका, सहमत आहे... थोडंसं अजुन
In reply to पहिलाच प्रयत्न स्तुत्य आहे. by बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद!
In reply to बिका, सहमत आहे... थोडंसं अजुन by वपाडाव
शोध मोहीम सुरु केलीये...
In reply to धन्यवाद! by निनाद
हुम्म्म्म्म... छान
तोहार नाही
In reply to हुम्म्म्म्म... छान by इरसाल
अरे ओ सुडवा भैया.......
In reply to तोहार नाही by सूड
डआकाटा
In reply to तोहार नाही by सूड
परिक्षण छान ! चित्रपट ठिक
परिक्षण वाचून मन आपोआपच
निळु फुलेंना मानाचा मुजरा !!
In reply to परिक्षण वाचून मन आपोआपच by स्वातीविशु
सामना आणि सिंहासन जरुर बघ रे
In reply to निळु फुलेंना मानाचा मुजरा !! by वपाडाव
या २ बद्दल काय बोलावे??
In reply to सामना आणि सिंहासन जरुर बघ रे by प्रचेतस
@सामना आणि सिंहासन जरुर बघ रे
In reply to सामना आणि सिंहासन जरुर बघ रे by प्रचेतस
गारंबीचा बापू अपवाद हो भटजी.
In reply to @सामना आणि सिंहासन जरुर बघ रे by अत्रुप्त आत्मा
@श्री.नां.च्या सुरेख
In reply to गारंबीचा बापू अपवाद हो भटजी. by प्रचेतस
आहे माझ्याकडे, घेऊन येतो.
In reply to @श्री.नां.च्या सुरेख by अत्रुप्त आत्मा
तुम मुझे खून दो, मै तुम्हे
In reply to आहे माझ्याकडे, घेऊन येतो. by प्रचेतस
तुम मुझे घोडी दो,मै तुम्हे
In reply to तुम मुझे खून दो, मै तुम्हे by प्यारे१
छान लिहीलस की रे परीक्षण !!
असेच म्हणते,
परीक्षण मस्त!
..
In reply to परीक्षण मस्त! by पैसा
सौरभशी बाडिस...
In reply to .. by मी-सौरभ
छान
व.प्या . चित्रपट परिक्षण छान
परिक्षण आवडले आहे रे वप्या,
छान परिक्षण
तमाम वाचकांचे आभार...
सामना किंवा सिंहासन यापैकी
In reply to तमाम वाचकांचे आभार... by वपाडाव
..
In reply to सामना किंवा सिंहासन यापैकी by प्रचेतस
" शिवधनुष्य "
In reply to सामना किंवा सिंहासन यापैकी by प्रचेतस
एकट्यानेच पेलले पाहिजे असे
In reply to " शिवधनुष्य " by वपाडाव
अरे मित्रा..
In reply to एकट्यानेच पेलले पाहिजे असे by अन्या दातार