'आई' या शब्दातच सारं जग सामावले आहे. आईपण मिळण्यासाठी प्रत्येक स्त्री किती आसुसलेली असते.
मी एका private हॉस्पिटलमध्ये assistant customer care म्हणून जॉब करत होते. तिथली माझी सहकारी आणि मैत्रीण कविता. कविताचा नववा महिना संपत आला होता. हॉस्पिटलमध्ये स्त्री कामगारांना insurance policy द्वारे बाळंतपणाचा खर्च मिळत असे. त्यामुळे ती निश्चिंत होती.
त्या दिवशी telephone operator न आल्यामुळे EPBX बोर्ड वर माझी duty होती. आणि त्याच दिवशी कविताला मुलगी झाली. मुलगी अतिशय सुंदर होती. संध्याकाळ झाली तशी कविताचा फोन आला, insurance policy मध्ये नमूद केल्याप्रमाणे जितका खर्च मिळणार होता त्यापेक्षा जास्त खर्च तिच्या बाळंतपणावर झाला होता. आणि जी excess amount आहे ती तिला भरावी लागणार होती पण तेवढे सुद्धा पैसे तिच्याकडे नव्हते. आणि कहर म्हणजे हॉस्पिटल ने तिचे बाळ दुसरीकडे हलवले. जोपर्यंत ती पैसे भरणार नव्हती तोपर्यंत तिचे बाळ तिला मिळणार नव्हते. ती अगदी काकुळतीला आली. तिच्या रूम मधून सारखे फोन येऊ लागले. सगळ्यांशी बोलून झाले पण कोणीच तिची मदत करायला तयार होत नव्हते. तिच्या नवऱ्याने पण सर्वतोपरी प्रयत्न केले. ती हॉस्पिटलची employee असूनसुद्धा तिच्यावर एवढा विश्वास हॉस्पिटलने दाखवू नये?
दुसरया दिवशी माझा ऑफ होता. तिसऱ्या दिवशी कामावर आल्यानंतर तिला फोन करणार लागलीच तिचा फोन आला. ती हसतच सांगू लागली, 'अग चमत्कार झाला. आमचे सगळे बिल भरले आणि आमचे बाळ आम्हाला मिळाले'. मला ऐकून खूप आनंद झाला. ती पुढे सांगू लागली, special ward मधील एका बोर्ही मुल्सिम स्त्रीला मुलगा झाला होता पण ती बाळाला दुध पाजू शकत नव्हती तेव्हा कविताने तिच्या बाळाला आपले दुध पाजले. तिने जे केले ते निस्वार्थीपणे. पण त्या स्त्रीने तिचे हे दुधाचे कर्ज फेडले. तिला कविताची सगळी कर्मकहाणी समजली आणि तिने कविताचे सगळे बिल भरले. कविताचे शेवटचे वाक्य , 'जगात कुठेतरी देव आहे' , मी म्हटलं , 'खरेच!'.........
याद्या
3975
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रसंग टचिंग आहे.. पण
+१
In reply to प्रसंग टचिंग आहे.. पण by गवि
प्रसंग टचिंग आहे पण त्या आधी
In reply to प्रसंग टचिंग आहे.. पण by गवि
का हो असलं काहीतरी लिहिता?
अनुभव टचिंग पण दादा कोंडके
In reply to का हो असलं काहीतरी लिहिता? by दादा कोंडके
+१
In reply to अनुभव टचिंग पण दादा कोंडके by प्रचेतस
डिस्क्लेमर :: कोंडकेजी,
In reply to अनुभव टचिंग पण दादा कोंडके by प्रचेतस
त्या
शेवटी माणुसच माणसाच्या मदतीला
मोहनराव, आपण काही चुकताय
In reply to शेवटी माणुसच माणसाच्या मदतीला by मोहनराव
ए भाऊ, त्यात हसण्यासारखं काय आहे रे वप्या ?
In reply to मोहनराव, आपण काही चुकताय by वपाडाव
+१
In reply to ए भाऊ, त्यात हसण्यासारखं काय आहे रे वप्या ? by वाहीदा
हा जरा गंभीर मुद्दा आहे. इथे
In reply to मोहनराव, आपण काही चुकताय by वपाडाव
छान
हे हॉस्पिटल कुठे आहे ?
बेष्ट ऑफ लक.
In reply to हे हॉस्पिटल कुठे आहे ? by वाहीदा
हे कुठलं हॉस्पिटल.... कळेल
चमत्कारीकच दिसतेय
कळस आहे.स्वतःच्या
/-/
In reply to कळस आहे.स्वतःच्या by किचेन
वपाडाव फारच निरागस आहेत ब्वा.
In reply to /-/ by वपाडाव
जेणेकरून आम्ही तिथे जायचं
In reply to कळस आहे.स्वतःच्या by किचेन
:)
In reply to जेणेकरून आम्ही तिथे जायचं by रेवती
बापरे हे हाँस्पिटल नक्की
विचित्र आहे सगळं ...