Skip to main content

पावशेर

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 08/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजात असताना नवेनवेच काही उर्दू शेर माहीत झाले होते. गृप मधल्या बहुतेक पोराना काहितरी हिंदीत दोन ओळी बोलायचे आणि त्याला शेर मानून त्या सगळ्या शेराना उगाचच वाहवाह देत बसायचे. हे सगळे आंखे दिल इश्क दामन आसू बादल हवा बारीश अशाच विषयावर असायचे. आम्हाला शेर तयार करायचे नियम म्हणजे यमक वगैरे कोणीतरी सांगितले. त्या महात्म्याने आम्हाला शेर दारु प्रेयसी या हमखास विषयावरच तयार होतात असे सांगितले. मग आम्ही दवा दिल दर्द जिगर आसूं ... यार असे बरेचसे शब्द गोळा केले. इंजिनिंरिंग चे असल्यामुळे की काय पण आम्हाला शेरांचे घाऊक प्रॉडक्षन करायचे होते. एखादा प्रोग्राम लिहायचा. रॅम्डमली यमक जुळवीत दोन शब्द सिलेक्ट करायचे आणि त्याच्या आजूबाजूला आणखी काही शब्द बसवायचे असे एक लॉजीक तयार केले उदा हवा: दवा उनके घरसे चली हवा दर्द गायब ;बिना दवा. किंवा दिलः बिल जब से हमने दुया उनको दिल बढता गय अकॅन्टीन का बिल जिगर :फिगर हमने खो दी जबसे जिगर गिरता गया हमारा फिगर यारः बार जब मिल बैठेंगे तीन यार रंग लायेगा कोई भी बार हे असले पावशेर करताना आम्ही एक पथ्य मात्र पाळायचो. शेराला अर्थ नसला तरी चालेल पण यमक विसरायचे नाही एकदा चाहत या शब्दाला यमक सापडत नव्हते. बरे शब्द हिंदीच असायला हवा हे बंधन आमच्यावर नव्हते त्याला कारण सगळ्यांचेच हिंदी यथातथाच होते त्यामुळे त्याला पोहत हे यमक लावले गेले त्यामुळे तो शेर मुझे मार देगी तुम्हारी चाहत ठंडे होने के लिये बैठो तलाब मे पोहत असा काहीसा झाला होता. आमच्या गृपने अजून एक पथ्य पाळले होते. कसाही असला तरी शेर साम्गितल्यावर वाहवा म्हणायचेच. कोणाच्या डोचक्यातून आली माहीत नाही पण एकदा उर्दू मराठी संस्कृतीचा संगम करायचे ठरले. शेराची पहीली ओळ नेहमी प्रमाणे पण दुसरी ओळ मराठी श्लोक्/अभंगा प्रमाणे करायची ठरले. अक्षरशः लागण झाल्या सारखे झाले.अन वाहवा च्या जागी हा हा उरले. त्यात जन्मलेले काही पावशेर असे...... उल्फत ए नूर... तू मेरी नूर किती किती क्रूर दुर्योधन बाई उल्फत ए नीलम लवकर पकड झेलम अन जा घरी तेरे प्यार ने मुझे कुत्ता बना दिया यकीन न आये तो भो भो तुम्हारी आखों ने दिवाना बना दिया वेटर वेटर... सर आया आया
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4194
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

वाहवा. -हे म्हणायचे असते हे तुम्हीच लिहिले आहेत. हे घ्या आम्चे दोनः- तेरि गली में रोज आउंगा... तेरि गली में रोज आउंगा... बेल बजाकर भाग जाउंगा..... अजून एकः- ऐ गालि़ब अपनी कब्र क्यों खोद रहा है| ऐ गालि़ब अपनी कब्र क्यों खोद रहा है| . . इधर ला , फावडा मुझे दे!!

मस्त. मनोबाही फॉर्मात.

त्याची गरज पडत नाही. लो टिळक म्हणाले होते दिडकीची भांग घेतली की कल्पना सूचतात. इथे मिपावर आम्हाला तर त्याचीही गरज भासत नाही. अपनी ही मस्ती मे जीते है प्यांट फटी तो...सुई धागे से सीते है

बरे आहेत पावशेर!

In reply to by पैसा

असेच म्हणते!

एक माझ्याकडुन बालशेर एक होता ऋषी त्याला आली मिशी मिशीला लावलं तुप मिशी झाली खुप. खरंतर ही रचना माझ्या पोराला तुप खाण्याची सवय लागावं म्हणुन केलेली होती,

In reply to by आनंदी गोपाळ

मग त्याचा इथे काय संबंध? :O ५०रावांनी काय आता चार्वाकाकडे पाठवायचे का त्यांच्या मुलाला? प्रतिक्रिया टंकायची म्हणून कुठेही टंकावी काय? जरा काहीतरी परस्परसंबंध असुदेत की; बादरायण संबंध कशाला?

बस पुछ लगानेकि देर है..... एका चतकोर शेराची आणखी भर.... :-) टिप : इथे निरनिराळे स्माइली कसे टाकतात? कुणी मार्गदर्शन करु शकेल काय? अमृत

In reply to by सुहास झेले

:cool: :bigsmile: आता जालवर...तोन्डभरून हसता येइल..... :D :-D :lol: अमृत

खूप आवडले विजुभाऊ.. हे पहा.. मी तुमच्या प्रेरणेने केलं.. चार्पाच ओळी आहेत, बाकीच्यांनी वाढवाव्यात ही विनंती. उत्तमात उत्तम यमके आणि जास्तीत जास्त असंबद्धता असलेल्या विजेत्याला पारितोषिक.. घेऊन थर्मास भोगत कर्मास अर्थहीन पण यमक फर्मास डिस्कव्हरीवर स्टीफन हॉकिंग्ज एफटीव्हीवर पिवळी स्टॉकिंग्ज

ससा ससा दिसतो कसा कापूस पिंजून ठेवलाय जसा लाल लाल डोळे छान लहान शेपूट मोठे कान पाला खाऊन फुगतो टुम्म चाहूल लागताच पळतो धुम्म

आलं आलं आलं कोण बरं आलं अहो कोणी नाही आलं त्याचं नावच मुळी आलं. हे गाणं शाळेत असताना वारंवार म्हणायचो इतकं आठवतंय.