कॉलेजात असताना नवेनवेच काही उर्दू शेर माहीत झाले होते.
गृप मधल्या बहुतेक पोराना काहितरी हिंदीत दोन ओळी बोलायचे आणि त्याला शेर मानून त्या सगळ्या शेराना उगाचच वाहवाह देत बसायचे. हे सगळे आंखे दिल इश्क दामन आसू बादल हवा बारीश अशाच विषयावर असायचे.
आम्हाला शेर तयार करायचे नियम म्हणजे यमक वगैरे कोणीतरी सांगितले. त्या महात्म्याने आम्हाला शेर दारु प्रेयसी या हमखास विषयावरच तयार होतात असे सांगितले.
मग आम्ही दवा दिल दर्द जिगर आसूं ... यार असे बरेचसे शब्द गोळा केले.
इंजिनिंरिंग चे असल्यामुळे की काय पण आम्हाला शेरांचे घाऊक प्रॉडक्षन करायचे होते. एखादा प्रोग्राम लिहायचा.
रॅम्डमली यमक जुळवीत दोन शब्द सिलेक्ट करायचे आणि त्याच्या आजूबाजूला आणखी काही शब्द बसवायचे असे एक लॉजीक तयार केले
उदा हवा: दवा
उनके घरसे चली हवा
दर्द गायब ;बिना दवा.
किंवा दिलः बिल
जब से हमने दुया उनको दिल
बढता गय अकॅन्टीन का बिल
जिगर :फिगर
हमने खो दी जबसे जिगर
गिरता गया हमारा फिगर
यारः बार
जब मिल बैठेंगे तीन यार
रंग लायेगा कोई भी बार
हे असले पावशेर करताना आम्ही एक पथ्य मात्र पाळायचो. शेराला अर्थ नसला तरी चालेल पण यमक विसरायचे नाही
एकदा चाहत या शब्दाला यमक सापडत नव्हते. बरे शब्द हिंदीच असायला हवा हे बंधन आमच्यावर नव्हते त्याला कारण सगळ्यांचेच हिंदी यथातथाच होते त्यामुळे त्याला पोहत हे यमक लावले गेले
त्यामुळे तो शेर
मुझे मार देगी तुम्हारी चाहत
ठंडे होने के लिये बैठो तलाब मे पोहत
असा काहीसा झाला होता.
आमच्या गृपने अजून एक पथ्य पाळले होते. कसाही असला तरी शेर साम्गितल्यावर वाहवा म्हणायचेच.
कोणाच्या डोचक्यातून आली माहीत नाही पण एकदा उर्दू मराठी संस्कृतीचा संगम करायचे ठरले.
शेराची पहीली ओळ नेहमी प्रमाणे
पण दुसरी ओळ मराठी श्लोक्/अभंगा प्रमाणे करायची ठरले.
अक्षरशः लागण झाल्या सारखे झाले.अन वाहवा च्या जागी हा हा उरले.
त्यात जन्मलेले काही पावशेर असे......
उल्फत ए नूर... तू मेरी नूर
किती किती क्रूर
दुर्योधन बाई
उल्फत ए नीलम
लवकर पकड झेलम
अन जा घरी
तेरे प्यार ने मुझे कुत्ता बना दिया
यकीन न आये तो
भो भो
तुम्हारी आखों ने दिवाना बना दिया
वेटर वेटर...
सर आया आया
वाचने
4194
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाहवा....
हा हा हा
पावशेर मारून
त्याची गरज पडत नाही. लो टिळक
हाहा!
+१
In reply to हाहा! by पैसा
एक माझ्याकडुन बालशेर एक होता
अरारा!
In reply to एक माझ्याकडुन बालशेर एक होता by ५० फक्त
बादरायण संबंध
In reply to अरारा! by आनंदी गोपाळ
एक तुही तो शेर है......
इथे बघा
In reply to एक तुही तो शेर है...... by अमृत
धन्यवाद
In reply to इथे बघा by सुहास झेले
खूप आवडले विजुभाऊ.. हे पहा..
हा हा हा ... लैच भारी
In reply to खूप आवडले विजुभाऊ.. हे पहा.. by गवि
मी कुटं म्हनल हि माजी हे म्हून पण हाये ........
आलं आलं आलं कोण बरं आलं अहो