Skip to main content

गणपतीची आरती

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 01/09/2011 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
Ganesh गणपतीची आरती जय गणेश, श्री गणेश, नमो श्रीगणेशा आरती स्वीकार करा, वंदितो परेशा ॥धृ॥ वक्रतुंड,तिलकउटी, दंत कर्ण न्यारी कमळ,शंख,फ़रशी करी, मूषावरी स्वारी खंड तिन्ही मुकुटमणी, समर्था नरेशा ॥१॥ पर्णजुडी हरळीची, रुची मोदकाची नारिकेल कलशाला, आम्र तोरणाची रिद्धिसिद्धी पायावरी लोळती हमेशा ॥२॥ तूच बाप,माय तुचि, आम्ही तुझी लेक एक आस जीवनास, पंथ दावी नेक अभयहस्त पाठीवरी, ठेवुनि सर्वेशा ॥३॥ गंगाधर मुटे ................................................
लेखनविषय:

वाचने 3097
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

आरती चांगली गेय जमली आहे पण काही शब्द खटकले. नरेश हा शब्द गणपतीसाठी वापरावा की नाही? नरेश हा शब्द आपण राजा या अर्थी वापरतो. शिवाय "आम्ही तुझी लेक" हे वृत्तासाठी केले आहे का? आम्ही तुझी लेकरे चांगले वाटले असते.

छान आहे आरती... बाप्पा खुष होतील ऐकुन :) अर्धवटराव

नगरीनिरंजनजी आणि अपर्णाजी, तुमच्या सुचना योग्य आहेत. पण ही आरती माझ्या रानमेवा या काव्यंसग्रहात प्रकाशीत झाल्याने आता बदल करू शकणार नाही. प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद. :)

सध्या कुठेय, पत्ता द्या. ;) -दिलीप बिरुटे