गणपतीची आरती
जय गणेश, श्री गणेश, नमो श्रीगणेशा
आरती स्वीकार करा, वंदितो परेशा ॥धृ॥
वक्रतुंड,तिलकउटी, दंत कर्ण न्यारी
कमळ,शंख,फ़रशी करी, मूषावरी स्वारी
खंड तिन्ही मुकुटमणी, समर्था नरेशा ॥१॥
पर्णजुडी हरळीची, रुची मोदकाची
नारिकेल कलशाला, आम्र तोरणाची
रिद्धिसिद्धी पायावरी लोळती हमेशा ॥२॥
तूच बाप,माय तुचि, आम्ही तुझी लेक
एक आस जीवनास, पंथ दावी नेक
अभयहस्त पाठीवरी, ठेवुनि सर्वेशा ॥३॥
गंगाधर मुटे
................................................| लेखनविषय: |
|---|
वाचने
3097
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह छान !
आरती चांगली गेय जमली आहे पण
सुंदर आरती !!
पर्णजुडी हरळीची ?? तृण्जुडी
नगरीनिरंजनजी आणि
गणपती बाप्पा मोरया :)
मंगलमुर्ती मोरया :)
In reply to गणपती बाप्पा मोरया :) by गंगाधर मुटे
गणपती बाप्पा मोरया !
छान...!