Skip to main content

भूमिका बदल

लेखक साधा_सरळ यांनी बुधवार, 27/07/2011 या दिवशी प्रकाशित केले.
छे! बाबांना कितीतरी मुद्दे सांगायचे होते, पण का कोण जाणे, जमतच नव्हतं काही बोलायला... काल त्यांच्या ऑफीसमधले काका अभिनंदन करत होते, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. मी ठरवलंच होतं सरळ त्यांना सांगायचं - तुमची बढती झालीय ना, मग जा तुम्हीच एकटे. मी नाही येणार! पाहिजे तर आईला पण घेऊन जा, मी राहीन इथे आजीबरोबर. हो, जमेल आम्हाला! काय गं आजी? इथे माझे मित्र आहेत, माझी शाळा आहे, मस्त मोकळं मैदान आहे, ह्या वर्षी खो-खो चा कॅप्टन पण होईन मी... हे सगळं व्यवस्थित असताना का येऊ तिथे अनोळखी जागी? तिथं कसे मित्र होणार माझे? शाळा तरी असेल का ह्या शाळेसारखी? छे, का ऐकत नाही ही मोठी माणसं? ************* इतकं मुद्देसूद सांगूनही का ऐकत नाही हे कार्टं? थांब, मीच आवरून देतो पटपट. अरे, काल तर आवडलं होतं ना तुझं नर्सरी स्कूल? आज का इतकं भोकाड? घरी बसून काय करणार मग? नविन फ्रेंड्स, टीचर, युनिफॉर्म - आता न आवडण्यासारखं काय आहे? आणि तू एकटाच जाणार आहेस का? आम्ही नाही गेलो - मी, आई, मावशी - अरे, सगळेच गेलो ना शाळेत... आजोबांची तर सारखी ट्रान्स्फर व्हायची. दर २-३ वर्षांनी नविन शाळा, नवे दोस्त - किती मज्जा! पण ह्याचं आपलं नुसतं 'ए बाबा, शाळा नको'... चला, चला आता. नविन प्रोजेक्टची मीटिंग आहे मला आज. *************
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1962
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

In reply to by गवि

अरेच्चा! मला तर हा एकाच व्यक्तीचा भूमिकाबदल वाटला '(खो-खो चा कॅप्टन होऊ घातलेला) शाळकरी मुलगा -> (नर्सरीमधल्या मुलाचा) पिता' असा. असो. ठीऽऽऽक आहे प्रयत्न. पण जरा संस्थळाच्या नावाला शोभणारे लेखन टाका बुवा. काही तरी गॉसिपमय कौल, जीवनावर 'रोशनी', चटकदार पाकॄ, किमानपक्षी दर तीन वाक्याला एखादी नवी शिवी किंवा स्फोटक/एकांगी विचार असलेल काही... :)

In reply to by रण्गोपा

मला तर हा एकाच व्यक्तीचा भूमिकाबदल वाटला ओक्के. आता सेकंड रीडिंगला मलाही तसंच वाटतंय. माझी समजण्यात चूक झाली. मला वाटले एकाच वेळी मुलगा आणि बापाच्या परस्पर प्रतिक्रिया आहेत एका घटनेविषयी..

In reply to by रण्गोपा

+१........ मलाही एकाच माणसाचा भुमिका बदल झाल्याचा वाटलं............ अवांतर: >>>स्फोटक/एकांगी विचार असलेल काही. तुम्ही बाकि धागे वाचलेले दिसत नाहित............