Skip to main content

मिपा कट्टा रद्द

लेखक सूड यांनी सोमवार, 25/07/2011 17:53 या दिवशी प्रकाशित केले.

धन्यवाद.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 16347
प्रतिक्रिया 105

प्रतिक्रिया

हा घ्या पहिल्या कट्ट्याचा वृत्तान्त.
https://misalpav.com/node/1207
https://misalpav.com/node/1213
https://misalpav.com/node/1219
https://misalpav.com/node/1232
कोणत्याच अडथळ्याला न जुमानता श्री श्री श्री धमालजी मुलगाजी याणी फस्कल्लास कट्टा जमवला होता.
सामीष , मद्य ,गवत या सर्वांपलीकडे गेली होती मंडळी. उगाच वाद घालताय राव


आमचा मूड बनला तर अचानक हजेरी लावीन.
नाही जमलेच यायला तर मिपा कट्ट्याला आमच्या शुभेच्छा आहेतच. :)

-दिलीप बिरुटे


हाहाहा विजुभाउ तुमची बखर वाचुन कप्पाळात गेल्या वाटतं... =))

मी मक्याच्या कणसाचा एक टेम्पो पाठवतो. व्हऊन जाऊद्या एक शुशा कट्टा. उभ्याउभ्या....


अत्यंत आततायीपणानं घेतलेला, अत्यंत दुर्दैवी निर्णय..इतकंच म्हणेन मी.

असो. कट्ट्यांना शुभेच्छा.


अरेरे अरे ये क्या हुआ?
देव सर्वांना बुंदी देवो. (कट्टा रद्द झाल्याबद्दल)


In reply to by वपाडाव

:D
नायतर त्याच्यावरुन रुसुबाई रुसु होईल हां! :D


कट्टा रद्द झालेला नसून आतल्या गोटातील लोकं व्यवस्थीत भेटणार आहेतच, सध्या सर्वजण व्यनी व फोनद्वारे संपर्कात आहेत असा आमचा आतल्या गोटातला आतला बातमीदार कळवतो ;)

प्रगल्भतेकडे चाललेल्या मिपाला दोन्ही पाय धरुन मागे ओढणारा निर्णय.

असो...


गंमतशीर प्रतिक्रिया वाचुन त्याहुन जास्त गंमत वाटली.
सर्वांना शुभेच्छा :)

- ( आता राहिलो वाचनापुरता ) छोटा डॉन


सूड / स्पा,

धागा न काढता केवळ फोनाफोनी केली तर आपण आधी भेटलेलेच परत भेटू. मग तो कट्टा नसेल. शिवाय मग आपल्याला रात्री बेरात्री इतरांना फोन करून आपण कशी मजा केली हे जड जिभेने ऐकवावे लागेल, ते वेगळे. ;-)

मिपा कट्ट्याचा उद्देश आपण एकमेकांना भेटणे आहे. खाणे, पिणे हे गौण आहे. त्यामुळे तुमची प्रतिक्रिया अनाठायी वाटली. इतरांना काय वाटते यावरून आपण आपले निर्णय घ्यायचे काय? इतर वेळी "सदर प्रतिक्रियेला फाट्यावर मारले आहे" अशी प्रतिक्रिया देतो आपण. जिथे फाट्यावर मारले पाहिजे तिथे का नाही मारत?

वरील चर्चेवर खालील प्रतिक्रिया वाचायला आवडली असती.
"तुम्ही तुम्हाला हवे त्या प्रकारचे कट्टे केले, आम्ही आम्हाला हवे त्या प्रकारचे कट्टे करतो आहोत. आपल्याला एकमेकांची मते/ कृती पटली पाहिजेत असे नाही. एखाद्याला समद्य कट्टा करायचा असेल, तर जरूर करावा, आम्ही तिथेही येऊ. मात्र तुम्ही जसे केलेत तसेच इतरांनी करावेत असा आग्रह केलात तर त्या आग्रहाला योग्य जागा दाखवली जाईल."

इंट्या, हेच बरे ते मागे सांगितलेले प्रतिध्वनी. ऐकतो आहेस ना बाळ ?? ;-)

असो, ३० तारखेला मी ठाण्याला येतो आहे. ज्यांना यायचे असेल त्यांनी यावे. कुणी नाही आले तर मी गविंच्या घरी जाऊन गप्पा मारून येईन. (गवि, घ्याल ना हो घरात?)

वि.मे.


In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

असा पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्युड हवा. जियो विमे.

मिपा कट्ट्याचा उद्देश आपण एकमेकांना भेटणे आहे. खाणे, पिणे हे गौण आहे. त्यामुळे तुमची प्रतिक्रिया अनाठायी वाटली. इतरांना काय वाटते यावरून आपण आपले निर्णय घ्यायचे काय? इतर वेळी "सदर प्रतिक्रियेला फाट्यावर मारले आहे" अशी प्रतिक्रिया देतो आपण. जिथे फाट्यावर मारले पाहिजे तिथे का नाही मारत?

पर्फेक्ट! हेच महत्वाचं. मिपावर रहायचं तर असं गुळुमुळु करुन कसं चालेल?

तुम्ही तुम्हाला हवे त्या प्रकारचे कट्टे केले, आम्ही आम्हाला हवे त्या प्रकारचे कट्टे करतो आहोत. आपल्याला एकमेकांची मते/ कृती पटली पाहिजेत असे नाही. एखाद्याला समद्य कट्टा करायचा असेल, तर जरूर करावा, आम्ही तिथेही येऊ. मात्र तुम्ही जसे केलेत तसेच इतरांनी करावेत असा आग्रह केलात तर त्या आग्रहाला योग्य जागा दाखवली जाईल

गडबड.....बेसिकमध्येच काहीतरी गडबड होतेय असं दिसतंय मित्रांनो.

मुद्दा कोणी ठरवत असलेल्या कट्ट्याला दारु असावी की नसावी ह्याच्या आग्रहाचा नसून सातत्याने कट्ट्याला दारु नसल्याचे आग्रही प्रतिपादन करण्याबद्दल आहे...निदान माझ्याकडून तरी. कुणी त्यातून उमजेनुसार कसे अर्थ काढले त्याची इथं बसून मलातरी कल्पना नाही.

नुसतं, "अमुक एखाद्या ठिकाणी भेटणे ठरले आहे. इतक्या वाजेपर्यंत हजर व्हावे." एव्हढ्यावर जे भागू शकते त्याला दारुच नको, नॉनव्हेजच नको वगैरे अट्टाहासी प्रकार कशाला? ज्यांना ठिकाण माहित असेल त्यांना वेगळं सांगायची गरज नसते, आणि ज्यांना ठाऊक नसतं त्यांना आल्यावर कळतंच की. त्यासाठी एव्हढा 'प्युअरिस्ट' किंवा 'तात्त्विकतेचा आव कशाला ? इतकाच प्रश्न पडला.
तर मग, एव्हढ्या क्षुल्लक गोष्टीचा एव्हढा इश्श्यु का केला जातोय हेही मला कळेना.

मगाशी स्पा ला म्हणालो 'बी रॅशनल' ते एव्हढ्याचसाठी.


काहुन रद्द झाला?
असं नव्हते होयाला पाहीजे होते.
कट्टा करा, गंमत जंमत करा. आम्ही पन एन्जॉय करतो मग तुमचे फोटो बघुन गंमत जंमत वाचुन.