Skip to main content

काही सुधाराव्याशा वाटणार्‍या ( प्रसिद्ध) सिनेमांच्या कथा...

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 21/05/2008 02:56 या दिवशी प्रकाशित केले.
१. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे तो दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे १९९५ ऑक्टोबर ला आल्यापासून मग अनेक वर्षे की काय तो एका थिएटराला चालला... आम्ही १९९५ मध्ये सुट्टीत पाहिल्यानन्तर पुन्हा कॉलेज ग्रुपबरोबर परत पाहिला... इतरांना जाम आवडला... पण कथेच्या दृष्टीने दोन तीन घटना तर अजिबात डोक्यात गेल्या... माझ्या माहितीप्रमाणे लग्नघरातल्या वधूवर डोळा ठेवून तिथे स्वतःचे लग्न तिच्याशी लावण्यासाठी उपस्थित राहण्याची फ्याशन या सिनेमाने सुरू केली...जी पुढे कुकुहोहै, जप्याकिहोहै सारख्या अनेक सिनेमांमध्ये सुद्धा दिसली. ते जाऊदे... आणि ती हिरॉईन तरी कसली हो... अहाहा......म्हणजे बापाला वाईट वाटू नये म्हणून त्या दुसर्‍या नवर्‍याच्या फ्यामिलीची आणि त्या नवर्‍याचीच वाट लावायची, आणि त्यांच्या नकळत प्रियकराबरोबर गुण उधळायचे, प्रेमगाणी गात शेतांमध्ये हिंडायचे...च्यायला टू टायमिंग करणारी , शुद्ध फसवणूक करणारी (आणि त्याचे उदात्तीकरण करणारी) ही हिरॉईन.... प्रेमं करायची अक्कल आहे पण ते बापाला सांगायची, त्याला ते पटवून द्यायची अक्कल नाही, त्यासाठी जे काही सहन करावे लागेल , त्रास भोगावा लागेल त्याची भीती वाटते म्हणून ही बापाने ठरवलेल्या भारतातल्या मुलाशी लग्न करायला परवानगी देते ...आणि आपला यार आला की मग लपून छपून करा मज्जा... तिची आई त्यातल्या त्यात बरी, की ती म्हणते " पळून जा बाबा इथून या पोरीला घेऊन " पण हा हीरो तरी काय हो, तिच्या आईला वर तोंड करून सांगतो की " जगात अडचणी आल्या की सोपे आणि कमी कष्टाचे मार्ग असतात पण ते चुकीचे असतात "वगैरे वगैरे , म्हणजे तात्पर्य काय की हा तिच्या बापाला आपल्या चांगल्या वागण्याने जिंकून घेईल... आणि त्याच्याकडूनच लग्नाला परवानगी मिळवेल... ... ठीक आहे, आता कथा इथपर्यंत चढवत नेलीय ना, तर शेवटी काहीतरी अजबच घडते.... -------------ती रेल्वे स्टेशनातली मारामारी घडते मग हा आपल्या बापाला म्हणतो की चला परत जाऊ...गाडीत चढतो , गाडी स्पीड पकडते आणि मग तिचा बाप तिचा घट्ट धरलेला हात सोडून देतो आणि म्हणतो जा...मग ती पळत जाऊन गाडी पकडते वगैरे... ----------------------- पण इथे मुख्य प्रश्न हा की बापाने तिला जायची परवानगी का दिली असेल?? आमचा अंदाज ...........त्या १५ २० सेकंदातले अमरीश पुरीचे स्वगत " याला आधीच चांगला पिटून काढला बरे झाले....ही ही पोरगी पण एक नंबरची अडाणी...आमच्या या मूर्ख पोरीने इतके गुण उधळले आहेत की सगळ्या गावात आता बदनामी झाली आहे.... कोण बोंबलायला आता हिच्याशी लग्न करणार आहे देव जाणे... आणि हा भडवा तर बापाबरोबर चालला...ह्याच्यायला ह्याच्या... हा कसला जातोय? हा थांबणार... थांबायलाच पाहिजे यानं... अरे महिनाभर बोंबलत इथे रंगढंग केलेस ना आमच्या नकळत ? तुला भाड्या आता जबाबदारी नको घ्यायला ? खुशाल हिला अशीच टाकून जातोस ? काय की... अरे गाडी सुटली की रे...उतर रे उतर...चाललाच वाटतं...जरासा वेडझवाच दिसतो हा ... हं.... किंवा भलताच पोचलेला आहे ... साल्याला माझी गोची कळलीय वाटतं... खरंतर असल्या मूर्ख, नालायक, वेंधळ्या आणि फ़सवणूक करणार्या या माणसाची अजिबात लायकी नाही...पण आता आपल्या मूर्ख आणि बदनाम पोरीला तरी कोण मिळणार याच्यापेक्षा बरा?? खोटारडा असला तरी पैसेवाला एकुलता एक लंडनचा आहे... आता सोडावं झालं पोरीला...".... जा बाई जा... म्हणजे आता काय झालं ? मुलाचा चांगुलपणा, हुशारी, सचोटी , मेहनती वृत्ती , प्रामाणिकपणा वगैरे आवडून बाप प्रभावित झाला नाही तर " माझ्या बदनाम पोरीशी लग्न करायला कोण येणार आता?" या भावनेने नाईलाजाने तो यांच्या लग्नाला तयार झाला असे वाटते... मग हीरोने हिरॊईनच्या आईपुढे मारलेले डायलॊग सगळे गेले ना बाराच्या भावात... मग सिनेमाचा संपूर्ण दुसरा भाग ज्या गोष्टीसाठी बिल्ड अप केला आहे त्याचीच वाट लागली... आणि आम्हाला येडा का बनवले? महिलांनी चिडण्याच्या आत हे सांगू इच्छितो की आमचा आक्षेप हीरॊईनच्या ( इंटर्वलच्या आधीच्या ) उदात्त वगैरे प्रेमावर नसून तिच्या फ़सवाफ़सवीच्या वर्तनावर आहे... कोणावर कसे ( मानसिक आणि शारिरिक वगैरे ) प्रेम करायचे हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु तिला बापाची भीती वाटते म्हणून एका संपूर्ण कुटुंबाची तिने फ़सवणूक करावी हे अगदीच वाईट... ( अवांतर : माझ्या कॊलेजातील ओळखीच्या एका मुलाच्या साखरपुड्यानंतर लग्नाच्या आधी काही दिवस ती मुलगी तिच्या प्रियकराबरोबर घरातून पळून गेली...या प्रचंड मनस्तापाला कोण जबाबदार ? दिदुलेजा या सिनेमात हीरॊईनचे काही चुकले नाही असे मानणारी ती पोरगी असावी )..

वाचने 50303
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

In reply to by छोट्या

>> आणि भावनांचं म्हणाल तर त्या 'पिक्चर' सारख्या फुटकळ गोष्टीत लावुन त्यांचा अपमान नाही करायचा =)) पण हे मात्र मान्य की मास्तरांमुळेच जाम करमणूक झाली. येऊ द्या. (टुकार सिनेमांची चाहती) अदिती

आयला, मीपण असाच वैतागलो होतो 'हम दिल दे चुके सनम' पाहून>>>>> अहो असे म्हणा: "हम दिल देके चुके सनम"

मला या ठिकाणी एक नमूद करवेसे वाटते कि चित्रपट पाहताना असल्या तार्किक गोंष्टिंचा विचार करून चित्रपटाची मजा घालवू नये. व.पु. च्या कुठल्याश्या कथेमध्ये वाचले होते...चित्रपट म्हणजे ३ तासांचे एक सुन्दर स्वप्न. त्यामध्ये हे असेच का, ते तसेच का असे प्रश्न विचारून त्या स्वप्नाची मजा घालवू नये. जर चित्रपटात असे दाखवले कि नायक राकेलच्या रांगेत उभा आहे, तर कसे वाटेल. असे चित्रपट आपण बघु का? अरे आपल्या रोजच्याच जीवनातल्या समस्या पडद्यावर दाखवल्यातर ते पाहण्यासाठि कोण येइल? आणि मुख्य म्हणजे आपल्याला ते आवडेल का? तसेहि माणसाची प्रव्रुत्ती असते कि त्याला दुसर्‍याच्या पायात काय अडकले आहे ते बघण्याची उत्सुकता. आणि त्यात गैर काहि नाहि. तेवढेच निवांत क्षण/विरंगुळा आपल्या रोजच्या दगदगीतून आणि कटकटीतून. स्वप्नात काहिहि घडू शकते राव. त्याचा त्रास नाहि करुन घ्यायचा. त्यामुळे "रजनीकांत"चे चित्रपट पाहताना सुद्धा मी ऍंजाय करतो. (रजानीकांत केवळ मराठी आहे म्हणून मी तमिळ भाषेतील चित्रपट पाहण्याचे धाडस केले, आणि आपण एक स्वप्न पाहत आहोत एव्हढा एकच द्रुष्टीकोन असल्यामुळे त्याचे चित्रपट आवडले. त्यावेळी "हा असा काय हवेत उडतो" म्हणून मनाला त्रास करून नाही घेतला.) पण मला, भडकमकर मास्तरांनी लिहिलेले आमरस पुरि चे स्वगत आवडले....स्वप्न पाहण्याचा आणखी एक द्रुष्टिकोन. प्रत्येकाने आपापल्या द्रुष्टिने स्वप्न पाहावे अशा मताचा मी आहे. एखाद्या चित्रपटाचे/स्वप्नाचे अशा रितीने काथ्याकूट करणे मलाहि आवडेल.

In reply to by मध्यमवर्गीय

एखाद्या चित्रपटाचे/स्वप्नाचे अशा रितीने काथ्याकूट करणे मलाहि आवडेल. लिहा.. मग मीही त्यावर लिहीन की असल्या तार्किक गोंष्टिंचा विचार करून चित्रपटाची मजा घालवू नये ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

एकदम आवडला :) मला या चित्रपटातील गाणी आणि बराच भाग आवडतो, पण हा शेवटचा भाग अजिबात आवडला नव्हता. त्या परमजीत ची काहीही चूक नसताना (मला नीट आठवत नाही) त्याचा उगाचच पचका केलेला आहे.

मस्त हाणामारी, चिरफाड केलीय... आणि DDLJ मला अजिबात न पचलेल्या पिक्चरपैकी एक आहे.. बाकी आपल्याला रजनीकांतचे पिक्चर आवडतात. डोकं शिणून दमतं आणि हलकं वाटतं बघा...

जी पुढे कुकुहोहै, जप्याकिहोहै सारख्या अनेक सिनेमांमध्ये सुद्धा दिसली. चो चो (पक्षी चोरी चोरी) जप्याकिहोहैच्या आधिचा सिनेमा आहे. त्यातसुध्दा लग्नाच्या मांडवातुन नायीका नायकाबरोबर पळुन जाते. ही परंपरा या सिनेमाने सुरू केली आअहे असे म्हणले तर????????

In reply to by चिंतामणी

त्यातसुध्दा लग्नाच्या मांडवातुन नायीका नायकाबरोबर पळुन जाते. मुद्दा अमान्य कारण चोरीचोरीमध्ये ती नायकाबरोबर पळून जात नाही तर नुसतीच पळून जाते आणि त्यानंतर तिला बसमध्ये नायक भेटतो...

In reply to by भडकमकर मास्तर

मास्तर ब्याक इन फॉर्म! :-D मास्तर, आणखी कोणत्या पिच्चरची मापं काढा की! लै दिवस झाले तुमच्या लेखणीतून काही दमदार धागा आल्याला!

:-))

मिपावर कधीकाळी संयतपणे बहुरंगी चर्चा (कोणत्याही संपादकीय हस्तक्षेपाशिवाय) चाललेली पाहून ड्वाले पाणावले.. ;)