माझिया प्रियाला प्रीत कळेना
लेखनविषय (Tags)
तुझी नी माझी भेट ही
क्षणोक्षणी का आठवे
आधी कधी ना वाटले
काहीतरी होते नवे
सांगु कशा मी, तुल सख्या रे
माझ्या ह्या भावना
माझिया प्रियाला प्रीत कळेना!
खरं सांगु तर हे गाणं तीने खास त्याच्यासाठीच म्हंटलं असणार. दोन अगदी वेगळ्या स्वभावाची माणसं लग्न होऊन एकत्र आली ना की हेच म्हणावं लागतं ना!
आता हेच बघा ना! ती अगदी हळवी, इमोशनल आणि तो एकदम प्रॅक्टिकल आणि रो़खठोक. ती तिच्याच सुंदर स्वप्नवत जगात जगणारी आणि तो मात्र त्याचं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी धडपड करणारा. अगदी टिपीकल दाखवण्याचा कार्यक्रम होउन ठरलेले लग्न.पहिल्याच नजरेत तिला तो खूप आवडला. लग्न ठरलं तेव्हा तिचा आनंद गगनात मावत नव्हता. मैत्रिणींचे फोन आले कि ती नेहेमी सांगायची की " आमचं ना, अरेंज्ड कम लव्ह मॅरेज आहे" म्हणून. पण तो मात्र अगदीच नॉर्मल होता. कुणी लग्नाबद्दल विचारलं तर सांगायचा " घरातल्या सगळ्यांनी पसंत केलीये. मलाही आवडली." लग्न ठरवताना दोघं एकमेकांना अनुरूप आहेत की नाहीत ते बघतात. पण दोघांच्या आवडीनिवडी, मतं, सवयी, राहणीमान आणि हो, महत्वाचं म्हण्जे स्वभाव हे जर अगदी भिन्न असतील तर..............
तर हे दोघंही लग्नाआधी एकत्र फिरायला बाहेर जाणार होते. फिरायला कसलं, असंच एखाद्या हॉटेलमधे जाउ असं एकमत (?) झालं. ठरल्याप्रमाणे दोघंही भेटले. तिला वाटलं, हा आता आपल्याला एखाद्या छानशा हॉटेलमधे नेईल. आसपास जास्त वर्दळ नसेल. फक्त तो आणि ती. त्याने हळूच तिचा हात हातात घ्यावा. तिच्या नजरेचा ठाव घ्यावा. "आज खूप छान दिसते आहेस." अशी एक कॉम्प्लीमेंट द्यावी. असं स्वप्नरंजन चालू असताना चालता चालता तिला ठेच लागते.
तो : अगं नीट चाल, नीट चाल जरा. लक्षं कुठाय तुझं?
ती भानावर येते. दोघंही समोरच्या एका हॉटेलात जातात. हॉटेल पण एकदम साधंसंच. तो समोर बसलेला असतो. इकडच्या तिकडच्या गप्पा मारतो. आता हॉटेलमधे आलोच आहोत तर तु खा काहितरी, असं म्हणतो. तिच्या चेहेर्यावर आश्चर्य, राग, सर्व मिश्र भावना. ती विचारते, " तू काहिच खाणार नाहीस?" तो म्हणतो, " नाही, मी बाहेर जास्त काही खात नाही." मग ती मात्र मागवलेला बिचारा उतप्पा एकटीच खात बसते. मनातली स्वप्नं फक्त स्वप्नंच बनून राहतात. खूप राग येतो तिला स्वतः चा. तिला थेट कॉलेजमधले दिवस आठवतात. सर्व मित्रमैत्रीणीबरोबर हॉटेलमधे जाणे, त्यातल्या कपल्सची चालणारी मस्करी, तेव्हा तिला वाटायचं आपलं लग्न ठरलं की आपल्याही आयुष्यात असे क्षण येतील. तेव्हापासून जपून ठेवलेलं स्वप्न आता तिच्या स्वप्नांचा राजकुमार भेटल्यावरही पूर्ण होत नाही.
ऊन्हाने तापलेली जमीन जशी पावसाच्या पहिल्या सरींनी सुगंधित होते, तशी बी. एम. सी. चा नळ फुटल्यावर थोडीच होते? तिला हवा असतो तिच्या मनातलं जाणणारा, तिची साथ देणारा साथीदार, अन त्याला हवी असते गृहकर्तव्यदक्ष, मनमिळावू बायको.
लग्नानंतर, एक दिवस जेव्हा तो रात्री कामावरून निघताना तिला फोन करतो. दिवस बुधवारचा.
तो: " आज काय मच्छी आहे घरी?"
ती पटकन कीचनमधे येते. पॅनमधले मासे बघते. तिला काय ते ओळखता येत नाहीत.
ती: " एक मिनीट, आईंना विचारून सांगते."
तो : अगं बघ नीट. गोल्ड्फीश असेल, नाहीतर डिस्कस असेल, नाहीतर फायटर फीश असेल.
ती खूद्कन हसते. कधीच मासे न खाणारी ती, त्याच्यासारख्या अट्टल मासे खाणार्याबरोबर संसार करेल तर असंच होणार ना!
आता मात्र चित्रं थोडंसं बदलेलं आहे. त्या दोघांच्या विश्वात एक कन्यारत्न आलंय. पण वाद मात्र कायम आहे.
तो : हिचं नाक एकदम चपटं आहे, अगदि तुझ्यासारखं.
ती : असू दे. मी तिला माझ्यासारखंच बनवणार आहे.
तो: नाही हं. दिसायला तुझ्यासारखी असली म्हणून काय झालं? तिला मी माझ्यासारखंच बनवणार.
म्हणूनच ती नेहेमी म्हणते " माझिया प्रियाला प्रीत कळेना"
प्रतिक्रिया
वा
बोंब!:)
डांबिस काकांशी सहमत. नव्या
छान! पुलेशु
उन्हान तापलेली जमिन
छ्या बिएमसिचा नळ फुटल्यावर
मस्त
''"ठरवून" लग्न करायचं आणि
कथेत काहीच घडलेले नाही. एका
जाहिर निषेध!
गेली २ वर्षे मिपाची नियमीत
गेली २ वर्षे मिपाची नियमीत
लेखापेक्षा प्रतिसादासाठी
निषेध करावा तेवढा थोडा आहे
नविन आयडींना लिखाणासाठी
ऊन्हाने तापलेली जमीन जशी
काही जणांना विहिरीचे पाणी
मायला तो इंटेश.. हिरीच पाणी
फारच छान