Skip to main content

सरुटॉबानेच्या कट्ट्याचे फायनल डिटेल

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 15/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
http://misalpav.com/node/17534 इथं दिलेल्या आमंत्रणाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल अतिशय धन्यवाद. आतापर्यंत ज्यांनी कनर्फ्म केलंय ते आहेत वल्ली, मनराव, गणॅशा,, टारझन, साधासुधासौरभ, पुण्याचे पेशवे, धमाल मुलगा, छोटा डॉन , वपाडाव,मी,प्यारे१ ,म्रुत्युंजय, आत्मशुन्य. बुकिंग झालेलं आहे, अजुन पण कुणि येणार असेल तर क्रुपया उद्या ११ वाजेपर्यंत कळवा. इथं धाग्यावर वरची लिस्ट च्योप पास्ते करुन त्यातच नावं वाढवलीत तरी चालेल. मला किंवा वल्लीला व्यनि केला तरी चालेल. वरच्या सगळ्यांना व्यनि केलेलाच आहे. मी आणि वल्ली हॉटेल सयाजीच्या लॉबीमध्ये सतराला संध्याकाळी साडेसात वाजता पोहोचु. पावणे आठ पर्यंत सगळ्यांनी यावं ही विनंती. बुकिंग हर्षद छत्रपति या नावानं केलेलं आहे. उद्या ११ वाजेपर्यंत जे कनर्फ्म करतील त्यांच्यासहित बुकिंग फायनल केलं जाईल, रविवार असल्यानं हॉटॅलमध्ये असलेली गर्दी लक्षात घेउन ऐनवेळी काही प्रोब्लेम होउ नयेत म्हणुन ही सुचना.

वाचने 8128
प्रतिक्रिया 50

प्रतिक्रिया

१. येतांना सगळ्यांनी स्वतःचे पैशे सुट्टे घेउन यावे . दुसर्‍याच्या भरोष्यावर येऊ नये ;) २. जास्त उषीर लावु नये . ३. येणार नसल्यास स्पष्ट कळवावे , उगाच येतो येतो म्हणुन टांग देऊ नये . नाही तर त्यांना डॉनरत्न किंवा टिंगीविभुषण दिले जाईल . ४. कट्ट्यात कंपुबाजी करु नये :) ५. एका प्लेट मध्ये एकानेच खावे , दोघांत खाऊन सगळ्यांची शान घालवु नये ६. सहकार्य करावे . :) - मी एक पाटी क्लास

In reply to by टारझन

येतांना सगळ्यांनी स्वतःचे पैशे सुट्टे घेउन यावे . दुसर्‍याच्या भरोष्यावर येऊ नये आणी स्वतचे बील स्वताच द्यावे. मिपाने पैशाच्या व्यवहारापासून दूरच राहावे.

शुभेच्छा..झक्कास होणार कट्टा याची खात्री आहे. सोबत ५० फक्त आहेतच. इतरही नेहमीचे बा.ने. व्हिजिटर्स असतीलच. पण तरीही.. प्रथमच जाणार्‍यांसाठी: बेक्ड पोटॅटो एकदम रेकमेंडेड... :) मश्रूम टिक्काही.. बाकी उगाच पोटाची भरताड करण्यासाठी भराभर गाजर, फ्लॉवर, सिमलामिर्ची असे काहीबाही सपक तुकडे लावलेल्या सळ्या हे वेटर्स टेबलवर आणून देत राहतील. ते तिथल्यातिथे थांबवून खास आवडीचे जिन्नस मागवावे. अन्यथा कोबीफ्लॉवर खाऊन पोट भरल्यावर आवडते कबाब अन टिक्के येऊ लागतील आणि खायला जागा उरणार नाही.

In reply to by गवि

मोलाची माहिती गवि. डेझर्ट मध्ये काय रेकमेंड आहे ते पण सांगा की राव. फिरनी मस्ट हे मागे डॉनरावांनी सांगितले होतेच.

In reply to by प्रचेतस

ते डेझर्ट नेहमी बदलत असल्याने सांगणे कठीण आहे. तीन व्हिजिट्सच्या वेळी फिरनीच फक्त चांगली वाटली. केक्सही असतात आणि त्यातला एखादा बरा असतो. बुफेचे जेवण आणि स्वीटवर फार भर न देता ते सुरुवातीचे सळीवर लावून आणतात त्या पदार्थांवर ताव मारावा. महेंद्र कुलकर्णींनी इथे फार छान लिहिले आहे सयाजी रू टॉ बा ने विषयी. आवर्जून वाचावे सर्वांनी.

In reply to by गवि

गवी नॉनव्हेज चे पण सांगा की जमल्यास.. घासपुस हॉटेलात जावून खाणे जमत नाहि मला.. तरीही उद्या संधाकाळी चाललोय म्हणा आंबरस हाणायला ... २ दिवसात भरपुर कॅलरी वाढवणार आहे .. जावुद्या मरुद्या... आणि तुम्ही पण या की जमल्यास.. वाटल्यास एकत्र माघारी येवु ठाण्याला..

बाकी उगाच पोटाची भरताड करण्यासाठी भराभर गाजर, फ्लॉवर, सिमलामिर्ची असे काहीबाही सपक तुकडे लावलेल्या सळ्या हे वेटर्स टेबलवर आणून देत राहतील. ते तिथल्यातिथे थांबवून खास आवडीचे जिन्नस मागवावे. अन्यथा कोबीफ्लॉवर खाऊन पोट भरल्यावर आवडते कबाब अन टिक्के येऊ लागतील आणि खायला जागा उरणार नाही. परफेक्ट!!! महत्वाचं खा, उगाच पोटाचा पेटारा करुन अडगळ भरु नका!!!! आमच्या पहिल्यावहिल्या बार्बेक्यू नेशन पार्टीची याद येऊन नॉस्टॅल्जिक झालो!! बाकी गवि सकाळपासूनच लोकानला नॉस्टॅल्जिक करुन र्‍हायले! --असुर

@गवि, अतिशय धन्यवाद माहितीसाठी. मला बाने ला जाउन ३-४ वर्षे झाली आता. त्यामुळं काही नीटसं लक्षात नाही. तेंव्हा तिथं झेंड्याची सिस्टिम होती. फार भारी वाटला होता तो प्रकार. @ टारझन, सुचनांचं स्वागत, काय आहे प्रत्येक कार्यात लागतं कुणीतरी मोठं सगळ्यांना एकत्र करुन कार्य सिद्धिस नेणारं, परवा हे काम तझ्याकडं.

In reply to by ५० फक्त

>>>>>काय आहे प्रत्येक कार्यात लागतं कुणीतरी मोठं सगळ्यांना एकत्र करुन कार्य सिद्धिस नेणारं, परवा हे काम तझ्याकडं. लोळून लोळून हसतोय. नेहरु कुर्ता पायजमा जॅकेट टोपी घातलेला टारझन सर्रकन आठवला. ;) :) टार्‍या आईची शप्पथ आहे तुला मला काही केलंस परवा तर..... ;)

In reply to by ५० फक्त

@ टारझन, सुचनांचं स्वागत, काय आहे प्रत्येक कार्यात लागतं कुणीतरी मोठं सगळ्यांना एकत्र करुन कार्य सिद्धिस नेणारं, परवा हे काम तझ्याकडं.
+१, सहमत. टार्‍या हे काम करणार ह्यात काहीच वाद नाही, तुम्ही निर्धास्त र्‍हावा. बाकी आमचे बील टारु भरणार हे त्याने खासगीत कबुल केले आहे ही उगाच अवांतर माहिती :) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

हो आम्ही वाटेल ते काम करुच ! :)
बाकी आमचे बील टारु भरणार हे त्याने खासगीत कबुल केले आहे ही उगाच अवांतर माहिती
हातासरशी हे बील "मिपावरील कुपोषित बालक संगोपन निधी" मधुन भरल्या जाईल . मायबाप मिपाकरांनी ह्या निधीसाठी जमेल तसा पैसा टाकावा. कमित कमी ५० पैसे द्यावेत. १०,२०,२५ पैसे स्विकारले जाणार नाहीत. अजुन कोणाकोणाचे बिल भरायचे आहे ते कळवा . अवांतर : प्यारे१ ला भेटायची इच्छा तिव्र होत चालली आहे. ;)

In reply to by ५० फक्त

@ ५० फक्त. अजूनही तीच झेंडा सिस्टीम आहे. पण झेंडा वर असला की वाढत राहायचे एवढेच ठरलेले आहे. काय वाढायचे हे त्यामुळे कळत नाहीच. तस्मात ते दिलेल्या क्रमाने घासफूसही सारखी सारखी आणून समोरच्या शेगडीत लावतात. मग ती खाल्ली जातेच. झेंडा सिस्टीम आहे छान. इतर एका प्रतिसादात महेंद्रजींच्या अत्यंत माहितीपूर्ण लेखाची लिंक दिली आहे. त्यातील काही माहिती : "कमीत कमी दहा लोकं असतील तर बारमन्स पॅकेज देतात ते लोकं. पण त्या साठी आधी पासुन बुकींग करावे लागते. त्या पॅकेज मधे अनलिमिटेड सिलेक्टेड ड्रिंक्स आणि बार्बेक्यु असतो. स्कॉच मधे ब्लॅक ऍंड व्हाइट , टीचर्स, चा चॉइस होता तसेच बिअर वगैरे पण होत""

In reply to by गवि

झेंडा सिस्टीम तर आहेच आणि सळ्यांवर काय आणायचं हे पण वेटरला सांगता येतं. जर सरसकट व्हेज नको असेल तर तसं वेटरला सांगितल्यावर तो आणत नाही. त्यांच्या ठरलेल्या क्रमात जर आपला आवडता पदार्थ आला नाही तर त्यासाठी विनंती करता येते... असा माझा अनुभव आहे. पुण्याच्या कट्ट्याला शुभेच्छा! कॅमेरा न्यायला विसरू नका :)

In reply to by स्मिता.

जर सरसकट व्हेज नको असेल तर तसं वेटरला सांगितल्यावर तो आणत नाही. तेच आधी सांगा असं म्हटलं. नाही सांगितलं तर बेचव आयटेमही धडाधड आणून ठेवतात आणि वाया जाऊ नये म्हणून खाल्ले जातात. पण सरसकट व्हेज नको असं नाही. उलट नॉनव्हेज बारबेक्यू मला तर एकदम सामान्य / बेचव वाटले. प्रॉन्स / फिश सोडून. व्हेजमधेच खरे टेस्टी आयटेम्स मिळाले. आरवी, पनीर आणि मश्रूम टिक्का, कबाब असे

In reply to by गवि

आरवी... हा कुठला पदार्थ असतो ब्वा? पहिल्यांदाच ऐकतोय.

In reply to by गवि

तेच आधी सांगा असं म्हटलं. नाही सांगितलं तर बेचव आयटेमही धडाधड आणून ठेवतात आणि वाया जाऊ नये म्हणून खाल्ले जातात.
हा टार्‍याचा अपमान आहे हे गविकाकांच्या निदर्शनास (नम्रपणे) आणुन देउ इच्छितो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अरे पर्‍या, गविकाका बहुतेक व्हेज आयटमबद्दल बोलत आहेत, होय ना हो गविकाका ? ;) असो, बाकी सयाजीत सगळेचे आयटम भारी असतात असे सांगु इच्छितो ;) , माझा तो वैयक्तिक अनुभव आहे - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

टार्‍य, व्हेज -नानव्हेज असा भेदभाव करत नाही. त्याला सगळे समानच ;) साधु संत म्हणुनच जन्माला यायचा. पण ऐनवेळी ग्रह फिरले आणि नाडीपट्टी बदलली म्हणुन.

In reply to by परिकथेतील राजकुमार

हो ना राव .. कोण भुरटा माझी नाडीपट्टी घेउन गेला .. :) अवांतर :- खाणे हा बोलण्याचा विषय नाही .. त्या दिवसी मी उपास सोडणार आहे ;)

अजुन एका आगाऊ जळजळ वाढवणार्‍या धाग्याची नांदी या धाग्यात दिसुन राहीली आहे. करा लेको करा मेळावे कारा कट्टे करा. आणि मग त्याची रसभरीत वर्णन करा. ;) तुमच्या कट्ट्याला आमच्या सुबेच्चा.

In reply to by गणपा

काय कराच्चे ते न सांगता करा. इथे आमची उगीच तडफड :) असो. शुभेच्छा - उद्या कट्ट्यापर्यंत कोणी जेवू नका म्हंजे पैशे वसूल करता येतील शिवाय आप्पाल्या बायका/आया/तायांना दुपारी स्वैपाकघरांत सुट्टी !!.

In reply to by गणपा

पियुशाच्या लेखात माझ्या प्रतिसादात जळजळ बरीचशी व्यक्त करून झाली आहे आपल्या न सांगण्याने ते काय फोटो टाकायचे राहणार आहेत का ? माझ्या आख्यानात मी तरी ...... असो मज्जा करा .( हे सांगितले नाही तरी ते करणारच म्हणा .)

आमंत्रणाच्या धाग्यावर दिलेल्याच आहेत पण - इथेही पुणे सरुटॉबानेच्या खादाडी कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा! :-)

आरवी म्हणजे अळकुडी, अळवाचे कंद.

कट्ट्याला शुभेच्छा. कृपया फोटो टाकू नये.उगाच जीव जळायचा बार्बेक्यू मध्ये. आयला हे तर गुडगाव मध्येपण आहे दोन आठवड्यापूर्वी चान्स हुकवला म्हणायचा

आम्ही जातीनं हजर राहू! ह्याउप्पर अधिक काय लिहिणे? ||इति लेखनसीमा||

वल्ली, मनराव, गणॅशा,, टारझन, साधासुधासौरभ, पुण्याचे पेशवे, धमाल मुलगा, छोटा डॉन , वपाडाव,मी,प्यारे१ ,म्रुत्युंजय, आत्मशुन्य. , एवढीच नावं कनर्फ्म आहेत आता पर्यंत. म्हणजे एकुण १३ जण. आत्ताच बुकिंग अपडेट केलं आहे. १-२ ऐनवेळी अ‍ॅडजस्ट करता येईल. तर आता उद्या भेटुयात सरुटॉबानेला संध्याकाळी साडेसात वाजता आणि दंगा करु या. पुन्हा एकदा गवि,स्मिता व असुर, मदत व सल्ल्याबद्दल अतिशय धन्यवाद.

काल जेवण लई भा हा री ही व्हतं :) कट्टा बी झ्याक झाला. फटू येताते वाईच दम धरा. गणेशा : कविता (मराठीतः पोएम) तयार झाली का??

नमस्कार, आज रात्री फोटो व रिपोर्ट दोन्ही टाकण्याची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांच्या प्रतिसादांबद्दल आणि उत्सुकतेबद्द्ल धन्यवाद. थोडी वाट पहावी लागते आहे हे मान्य.. ५० फक्त

अशा प्रकारे धम्याने सप्शेल हात दिलेला आहे... बाकी... वल्ली, सौरभ, टार्‍या, पुपे, प्यारे, गणेशा, आत्मशुन्य्,मनराव, मृत्युंजय या सर्वांचे हबिणंदण.... आन कट्टा घडवुन आणल्याबद्दल हर्षद यांचे सहस्त्र आभार... न आलेल्यांना फटु टाकुन इनोची पुडी सप्रेम भेट देण्यात येइल... अवांतर : डान्रावांना बोल्ण्याची हिंमत नाही अजुनतरी.... --- आपला वपाडाव...

In reply to by वपाडाव

का?? कश्यासाठी??? फोटो पाहून जळजळ होणार हे कश्यावरून???? शितावरून भाताची (म्हणजेच स्वतः वरून सगळ्यांची) परीक्षा करणे नेहमीच बरोबर असते असे नाही.

In reply to by चिंतामणी

ज्यांना जळजळ होईल त्यांच्यासाठी सांगितले होते हे.... आपणांस काळजी नसावी....

नमस्कार, आज रात्री फोटो व रिपोर्ट दोन्ही टाकण्याची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांच्या प्रतिसादांबद्दल आणि उत्सुकतेबद्द्ल धन्यवाद. थोडी वाट पहावी लागते आहे हे मान्य.. या वर दिलेल्या वचनानुसार रिपोर्ट मंडळापुढे ठेवला आहे, प्रतिसाद, शिव्या, कॉतुक काय मिळेल त्यात आनंद आहे. http://misalpav.com/node/17727 ५० फक्त.