Skip to main content

'शोले' चा खास थिएटर शो

डॉ.प्रसाद दाढे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
पंचम मॅजिक पुणे तर्फे रविवार दि. २० मार्च रोजी फिल्म संग्रहालय थिएटरमध्ये 'शोले' चित्रपटाचा खेळ आयोजित केला आहे. वेळः सकाळी १० वाजता. तिकिट रु. ५०/- फक्त. इच्छूकांनी मला व्य.नि द्वारे अथवा मोबाईलवर लवकरात लवकर संपर्क साधावा.
अन्या दातार

डॉ. दाढे, बर्‍याच दिवसांनी लिहित आहेत हे पाहून डोळे सुखावले! पुलेशु!
16/03/2011 - 09:01 Permalink
रेवती

हा शो हाऊसफुल्ल होइल अशी आशा. त्या निमित्ताने अजूनही पूर्वीची 'शोलेची' जादू टिकून आहे कि नाही ते कळेल. या चित्रपटाबद्दल प्रचंड ऐकले होते. साधारण १५ वर्षापूर्वी मैत्रिणीच्या आग्रहावरून पाच भागात हा सिनेमा तिच्या घरी पाहिला आणि फारसा आवडला नाही. तोपर्यंत सिनेमा तंत्र बदलले होते आणि इतरही बर्‍याच बदललेल्या गोष्टींमुळे परिणामकारक वाटला नसावा.
16/03/2011 - 19:07 Permalink
संदीप चित्रे

येता आलं असतं तर नक्की आलो असतो :) आमच्या माहितीतल्या एकाने घरी डीव्हीडी प्लेअर इ. घेण्याआधीच 'शोले'ची डीव्हीडी घेऊन ठेवली होती!
17/03/2011 - 01:29 Permalink
डॉ.प्रसाद दाढे

माझ्या जनरेशनच्या बहुतेक सर्व सिनेशौकिनांनी शोले बर्‍याचवेळा टिव्हीवर वा डिव्हीडीवर पाहिलेला आहे पण थिएटरमध्ये तीनएकशे लोकांसोबत हशा, टाळ्या अन शिट्ट्यांच्या बॅकग्राऊंडवर हा जबरदस्त पिक्चर पाहण्याची धमाल निराळीच आहे. शिवाय सिप्पी बंधूंमधल्या वादामुळे नजिकच्या भविष्यकाळात शोले पुन्हा प्रदर्शित होण्याची चिन्हे दिसत नाहीत. म्हणूनच पंचममॅजिकने फिल्म आर्काईव्हजमध्ये हा खेळ आयोजित केला आहे. खरं म्हणजे ह्या विशेष सोहळ्याला शोलेसाठी बेस्ट एडिटरचे फिल्मफेअर मिळालेले श्री. शिंदे उपस्थित राहणार होते पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकणार नाहीत. ते असते तर आणखी रंगत आली असती तरीही सर्व 'शोले' प्रेमींसाठी रविवारचा दिवस संस्मरणीय ठरेल ह्यात काही वाद नाही.
17/03/2011 - 10:09 Permalink