Skip to main content

बेंचमार्क

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 10/03/2011 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
कोणे एके काळी, मिपावर जेव्हा काहीशे सदस्यच होते, तेव्हा आम्हाला कोणालाही हापिसामधे काहीच काम नसायचं. परा (परिकथेतील राजकुमार) हा आधी नव्हताच आणि आला तेव्हा नवा होता, टिंगीचा टिंग्या झाला असला तरी तेव्हा तो "दुशली ब" मधे नव्हता. आनंदयात्री, धमाल मुलगा, छोटा डॉन, मेघना भुस्कुटे, ब्रिटिश टिंग्या, ऋचा (ही पार गायबच झाली आहे), मी असे आम्ही निरुद्योगी लोकं मिपाच्या खरडफळ्यावर पडीक असायचो. अधूनमधून कोणी मैत्री किडे यायचे, स्त्री आयडींना खरडी टाकायचे आणि त्यावर इनोबा म्हणे, टिंग्या, बिपिन वगैरे लोकं "माझ्याशी पण मैत्री करणार का?" असा 'लष्कर-ए-खरडा'चा हल्ला करायचे. "कुठून या स्त्री आयडींना खरडी टाकल्या", असं त्या किड्यांना होत असेल. तर थोडक्यात काय, त्या काळात मिपा म्हणजे, आई सांगायची त्या जुन्या ठाण्यासारखं होतं, संध्याकाळनंतर घंटाळी मंदिराकडे एकट्याला जायला भीती वाटेल एवढं छोटं. तेव्हा आम्ही खरडफळ्यावर शाळेत असल्यासारखं बोलायचो. म्हणजे मुलींनी मुलांना आणि मुलांनी मुलींना आडनावाने हाक मारायची, "ए भुस्कुटे", "ए मुळे" अशी! तर मुख्य मुद्दा असा की गेल्या आठ दहा महिन्यात काही महान मिपाकरांना भेटण्याची संधी मिळाली. एकमेकांशी बोलताना, अर्थातच लिखाण वाचून, माणूस कसा असेल याचे अंदाज घेतले होते; प्रत्यक्ष भेटीनंतर ते कितपत योग्य ठरले याचीही मनात उजळणी झाली. यथावकाश चांगली ओळख झाल्यावर एकमेकांबद्दलच्या या मतांची देवाणघेवाणही झाली. माझी स्वतः आणि इतरांबद्दलची मतं इथे देत आहे. तुम्हीही तुमची स्वतः आणि इतरांबद्दलची मतं सांगा. नेहेमीप्रमाणे कोणालाही व्यक्तीगत, टोचेल असं न बोलण्याची खबरदारी घ्यावी ही विनंती. सुरूवात हुशार विद्यार्थ्यांपासून करावी. धनंजय - हा वर्गातल्या सर्वात हुशार विद्यार्थ्यांपैकी एक. पण वर्गात पहिला नंबर क्वचितच, नंबर साधारण पहिल्या पाचात येतो, पण पैकीच्या पैकी मार्कांचा अजिबात सोस नाही. वर्गात नेहेमी शेवटच्या बाकड्यावर बसणार, टवाळक्या, भाषणं, वाचन अशा अभ्यासेतर गोष्टींमधे लक्ष. मुळात चौफेर विद्यार्थीच, पण खोड्या काढण्यातही तेवढाच रस. तरीही वर्गातला बराचसा वेळ शेवटच्या बाकावर बसून इतर पुस्तकं वाचणे, काहीतरी प्रयोग करणे ... 'शाळा'तला चित्र्या. नंदन - हा पण अतिशय हुशार मुलगा. पण हा कायम पहिल्या, अगदीच उशीर झाला तर दुसर्‍या बाकावर बसणारा. याचा नंबरही पहिल्या पाचातच. वर्गात बसून नेहेमी शिक्षकांकडे लक्ष देणारा, अगदी रटाळ तासांमधेही शिकवण्याकडेच लक्ष देणारा आणि टवाळक्या, उनाडक्या फक्त पी.टीच्याच तासाला. चित्रकलेच्या तासालाही नंदन मराठीचं पुस्तक काढून त्याचं इंग्लिशमधे भाषांतर करायचा प्रयत्न करतो असं धम्या मला सांगत होता. धम्या - धमाल मुलगा हा प्राणी सतत वेगवेगळ्या गोटांमधून बदली करून घेत असतो. कधी मुलींचा ग्रूप, कधी मुलांचा तर कधी मुला-मुलींचा ग्रूप. सतत बदल्या करायच्या आणि सगळ्यांच्या डब्यातला खाऊ खायचा हाच याचा उद्योग. तास सुरू असताना कुठल्या कोपर्‍यातून थालिपीठाचा घमघमाट सुटला की धम्या तिथे बसला आहे हे समजावं. अभ्यास वगैरे गोष्टींशी याचं काहीही घेणं देणं नाही. परीक्षा आल्या की वर्गातली सगळी मुलं-मुली मित्रकर्म म्हणून याला नोट्स आणून देतात. त्यातसुद्धा छोटा डॉन, नंदनसारखी वेळच्या वेळी अभ्यास करणारी मुलं परीक्षेच्या आधी धम्याची उजळणी घेऊन देतात, असुर, मेघवेडा याला आपल्या पेप्रातून कॉपी करू देतात आणि धम्या बर्‍यापैकी मार्कांनी पास होतो. छोटा डॉन - हा शाळेत नेहेमीच उशीरा येतो. त्यामुळे याची ठरलेली जागा नाही, जागा मिळेल तिथे हा बसतो. खरंतर याला गप्पा मारायची हौस लै दांडगी आहे. पण हा काय बोलतो कुणालाच कळत नाही, त्यामुळे सगळे नुस्ते हो ला हो करतात. खरंतर हा मुलगा तसा स्वभावाने एकदम गरीब आहे, त्यामुळे "शांतपणे बोल रे" असं त्याला सांगायलाही थोडं विचित्र वाटतं. गणित, विज्ञान वगैरे विषयात याला फार अभ्यास न करताही निदान ९९% मिळतात. पण तरीही हा कधी पहिल्या पाचात नसतो. भाषा विषयात मार खातो, पण त्याला काही त्याचं वाटत नाही. स्वभावाने शांत वगैरे असल्यामुळे भाषा शिक्षकांनाही त्याचा राग येत नाही. मेघवेडा - हा नावाप्रमाणेच थोडा वेडा आहे. साधारणतः मधल्या बाकांवर बसतो. तसा शांत विद्यार्थी आहे, पण मधल्या सुट्टीत हा फार आवाज करतो. आपल्या मोठ्या आवाजात हाकाट्या मारायच्या, कोणालातरी चावी मारून गाणी म्हणवून घ्यायची, कोणाची मारामारी लावून द्यायची आणि नंतर धम्याबरोबर जाऊन ती सोडवायची हा याचा आवडता उद्योग. तासाला कधी लक्ष द्यायचं, कधी कंटाळला तर रेघोट्या मारायच्या, कधी चुपचाप फुली-गोळा खेळायचं हा याचा उद्योग. आणि यात याचा accomplice आहे असुर. असुर - हा वर्गात किती दिवस असतो असा प्रश्नच पडतो. सतत आजारपण, घरची लग्न कार्य, असल्या काय काय कारणांमुळे हा विद्यार्थी वर्गात कमीच दिसतो. पण हा सुद्धा तसा हुशार विद्यार्थीच आहे. वर्गात असतो तेव्हा मेव्यासोबत हा नेहेमी दिसतो. दिसायला तसा शांत आहे, पण सगळा दंगा करतो. गणेशोत्सव मंडळाचा हा खंदा कार्यकर्ता आहे. विज्ञान आणि गणित हे याचेही आवडते विषय. मस्त कलन्दर - हिला खरंतर मागच्या बाकड्यांवरच बसायला आवडतं; पण अगदीच बुटुकबैंगण असल्यामुळे हिला सगळे शिक्षक पुढेच बसवतात. अगदीच नाईलाजाने ही मधल्या बाकांवर बसते. एकीकडे चित्र काढायची, शाळेत येताना रस्त्यातून गोळा केलेली फुलं इतरांकडे पाठवायची आणि इतरांना छळायचं हा हिचा प्रमुख उद्योग. वर्गात तास सुरू असताना सतत कमेंट्स करायच्या आणि इतरांचं लक्ष वेधून घ्यायचं यात हिचा हातखंडा आहे. तरीही मॉनिटर होण्याची हिची प्रचंड इच्छा आहे. परिकथेतील राजकुमार - कुठल्याही बेंचवर बसला तरी पर्‍याला खिडकीच हवी असते आणि सगळं लक्ष खिडकीबाहेरच. पर्‍या, धम्या, मेव्या, डॉन्या आणि असुर असा हा एक छोटा ग्रुप आहे. डॉन्या हा त्यांचा अभ्यासातला म्होरक्या आहे, तो या सगळ्यांचा बुडलेला अभ्यास घेतो. पर्‍याला याच गोष्टीमुळे डॉन्या आवडत नाही, पण पास झाला नाही तर घरून फटके पडतील म्हणून तो डॉन्याला सहन करतो. शिवाय डॉन्या त्याला मुलींशी कसं बोलायचं या विषयात 'मानतो' त्यामुळे या दोघांचं गुरू-शिष्य हे नातं थोडं काँप्लिकेटेड आहे. निखिल देशपांडे - याला वर्गात कोणीही निखिल किंवा देशपांडे म्हणत नाहीत. एकतर पूर्ण नाव निखिल देशपांडे किंवा निदे. अगदीच थोडी धम्या वगैरे हूड मुलं त्याला निख्या म्हणतात, पण तो अपवादच. याचा ओढा मध्यममार्गाकडेच. शांतपणे मधल्या बाकांवर बसायचं आणि मागच्या मुलांचा दंगा ऐकायचा हा यांचा छंद. शिवाय निदे आकाराने मोठा, उंच वगैरे असल्यामुळे त्याच्यामागे वर्गातली बारकी पण उनाड मुलं बरोब्बर लपतात. त्या पोरांमधे हा एकदम आवडता आहे, पण निदेला त्याचं काही नसतं. मी बरा आणि माझा अभ्यास बरा, यात तो खूष असतो. मुक्तसुनीत - वर्गातल्या नवीन मुलांना हा मुलगा फार शांत, अभ्यासू वाटतो. अभ्यासात यांचा काही प्रश्न नाहीच, पण ओळख झाल्यानंतर हा मुलगा अजिबात शांत नाही हे समजतं. नेहेमी शेवटून दुसर्‍या बाकावर बसणार आणि सगळं लक्ष मागच्या बाकावरच्या अदिती, धनंजय आणि राजेश या टवाळांकडे. घरून सायन्सला जाण्याचा आग्रह होतो म्हणून हा विज्ञानाच्या तासाला लक्ष देतो, पण मुळात आवड भाषा विषयांची. ग्रंथालयातली कवितांची पुस्तकं शाळेतल्या मराठीच्या शिक्षकांनी वाचली नसतील पण याने वाचलेली असतात आणि ते सगळं त्याला समजतंही. खेळाच्या तासालाही हा कवितांचा 'आस्वाद' घेत बसतो. घरच्यांच्या धाकामुळे तरी का होईना, हा पण पहिल्या पाचातलाच. बिपिन कार्यकर्ते - हा वर्गाचा एक मॉनिटर. वर्गात फार दंगा नाही, सगळ्यांशी प्रेमाने बोलतो, वर्गात आलेल्या नवीन मुलांशीही प्रेमाने बोलतो त्यामुळे शिक्षकांनाही हा मुलगा आवडतो. तसा अभ्यासाला फार हुशार नाही, फार वाईटही नाही. सगळ्यांशी संवाद साधता यावा म्हणून हा मधल्या बाकांवर बसतो. मनातून त्याला नंदन, जंतू यांच्यासारखं पहिल्या बाकावरचं 'आदरणीय' विद्यार्थी व्हावं असं वाटतं, पण मुक्तसुनीत, राजेश, धनंजय यांच्यासारखा दंगा करावा असंही त्याला वाटतं. थोडा कन्फ्यूज्ड. राजेश घासकडवी - धनंजय आणि राजेश एकाच बाकावर बसतात आणि गंमत म्हणून कसल्याही पैजा, शर्यती लावतात; उदा: ठराविक आकाराच्या कागदाला कमीतकमी घड्या घालून बनवलेलं कोणाचं विमान जास्त चांगलं उडेल, असं काहीसं. विज्ञान असो वा भाषा विषय, याला सगळं जमतं. याचाही नंबर पहिल्या पाचात, बहुतेकदा तीनातच. धनंजयचे वर्गात कसले कसले प्रयोग सुरू असतात तेव्हा त्याला त्रास देण्याच्या मिषाने काही ना काही सुचवत रहायचं हा याचा उद्योग; पण धनंजयला यामुळे नवनवीन कल्पना सुचत रहातात आणि मग दोघांच्या वादात इतर बॅक बेंचर्सची मस्त, अभ्यासपूर्ण करमणूक होते. चिंतातुर जंतू - नुकताच परगावातून या शाळेत आलेला, जाड चष्मा, सतत वाचन, लेखनामुळे किंचित झुकलेले खांदे आणि सतत कसला ना कसला विचार नाहीतर प्रश्न असा एकदम हुशार आणि शिक्षकप्रिय विद्यार्थी. विज्ञान, गणित, भाषा, इतिहास, चित्रकला, सगळ्या विषयात एकदम हुशार. वर्गात सगळ्या तासांना लक्ष देऊनच याचा बर्‍याचदा पहिला नंबर येतो, पण शारीरिक शिक्षण विषयात कसंबसं पास करावं लागतं. हा वर्गात आपणहून नंदन आणि धनंजय सोडून कोणाशीही बोलत नाही. शाळेत असल्यापासून विविध मासिक, नियतकालिकांमधे याचं लिखाण छापून येत असल्यामुळे इतर सगळ्यांना याच्याशी बोलण्याची इच्छा असते; पण हा वर्गातल्या नंदन आणि धनंजय सोडून फक्त ठराविक मुलांशीच बोलतो; ज्यांच्याशी तो बोलत नाही त्यांना याचं फार वाईट वाटतं. श्रावण मोडक - एन.सी.सी आणि स्काऊट दोन्ही गोष्टींमधे असणारा वर्गातलाच काय शाळेतला पहिला विद्यार्थी. या सगळ्या समाजसेवेमुळे त्याची वर्गातली उपस्थिती कमी असते. मधल्या बेंचवरचं या विद्यार्थ्याचं अस्तित्त्व दिसत रहातं. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र वगैरे विषयात यांचा अभ्यास दांडगा आहे आणि नागरिकशास्त्राच्या नोट्सतर जंतू, धनंजय यांच्यासारखे हुशार विद्यार्थीही मोडककडून घेतात. वर्गातल्या मुलीच नव्हे तर मुलंसुद्धा याला आडनावानेच हाक मारतात अशी याची ख्याती आहे. सहज - या विद्यार्थ्याचा बाक ठरलेला नसतो. सहजला प्रत्येकाच्या मनात प्रत्येक क्षणी काय चाललेले आहे याचे विलक्षण कुतूहल असल्यामुळे तो बाका-बाकामधून, टेबलाखालून, फळ्यामागून सरपटत हिंडत असतो. वर्गात लक्ष द्यायचं असेल तरीही,एकदा हजेरी घेऊन झाल्यावर, तो स्वतःचं दप्तर ठेवलेलं असतं त्या बाकाच्या खालीच बसलेला असतो. एकदा एक संपूर्ण परीक्षाही त्याने टेबलाखाली बसून दिली होती असा जंतूने लिहीलेल्या एका निबंधाचा अर्थ आहे असा नंदनचा सिद्धांत आहे. ३_१४ विक्षिप्त अदिती - शाळेच्या वेळेच्या दहा-पंधरा मिनीटं तरी निदान पोहोचायचं म्हणजे मागचं बाकडं निश्चित मिळतं. शिक्षक चांगले असतील तर कोणत्याही विषयाचं वावडं नाही, पण स्वतः काहीही कष्ट घ्यायचे नाहीत. पीटीच्या तासाला आबाधोबी, सायकलवरून पाडापाडी वगैरे खेळ खेळण्यात रस. रटाळ तासांना स्वतः टिवल्या बावल्या करायच्या आणि इतरांनाही त्रास द्यायचा, खोड्या काढायच्या, माकडचाळे करून आजूबाजूच्या लोकांची करमणूक करायची. अगदीच ओरडा बसत असेल तर निखिल देशपांडे, मुक्तसुनीत या मुलांच्या मागच्या बाकड्यावर बसून झोपा काढायच्या. या असल्या उद्योगांमुळे हुशार पण टवाळ मुलांच्या गुडबुकात जाऊन त्यांच्याबरोबर परीक्षेच्या काळात अभ्यास करता येतो आणि बरे मार्क मिळतात. "वर्गा"तल्या इतर मुलांचं स्वतः आणि इतरांबद्दल काय मत आहे हे वाचायला मला आवडेल. तर मग होऊन जाऊ द्या. (कालानुक्रमे) श्रेयअव्हेर: जंतू, राजेश, मुक्तसुनीत
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21615
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विदर्भ, खान्देशातील नावे न घेता प्रांतियवाद केल्याबद्दल अदितीबैंचा निषेध..... (मराठवाडा घेतल्याबद्दल अभिणंदण....)

In reply to by वपाडाव

आता तुम्हाला कळलंच असेल, ३_१४ विक्षिप्त अदिती ही विद्यार्थिनी भूगोलात कच्ची आहे ते! मराठवाड्याचं नावही घेतलं नसतं, पण काही संपादकांची अंमळ भीती वाटते. ;-) (भागो, संपादक आया।)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आता तुम्हाला कळलंच असेल, ३_१४ विक्षिप्त अदिती ही विद्यार्थिनी भूगोलात कच्ची आहे ते! पण "खगोल" म्हणजे विस्तृत अर्थी आंतराळातील भूगोलच असतो ना? :-)

In reply to by विकास

कच्ची आहे म्हणून अजून अभ्यास सुरू आहे ना! ;-) (पुढचं पाठ मागचं सपाट) अदिती

सहजला प्रत्येकाच्या मनात प्रत्येक क्षणी काय चाललेले आहे याचे विलक्षण कुतूहल असल्यामुळे तो बाका-बाकामधून, टेबलाखालून, फळ्यामागून सरपटत हिंडत असतो. हाहाहाहाहा...........................लंबर एक. :) -दिलीप बिरुटे

लेख आवडल्या गेला आहे!

अरे विचारायचेच राहीले. यशोधरा , भडकमकर मास्तर , विजुभाऊ ( हो मी स्वतःच). प्रा डॉ बिरुटे ( हा विद्यार्थी पैल्यापासूनच प्राचार्य असे बिरूद परीधान करतो) , पॅठकर काका ( याच्या डब्यात नेहेमी खाऊ असायचा) ,केशवसुमार काका , चतुरंग या होतकरू विद्यार्थ्यांची दुर्बीटणे बैना विसरण झाली. याचा णीषेद सौता प्रीन्सीपॉल त्यात्या चीच विसरण झाली.

कंपु लोकांणी कंपुतल्या लोकाणसाठी काढलेला तद्दन फालतु धागा. (बाकी... मागे एकदा असाच एका फुर्जींनी कुणीतरी फिक्षिप्तबाई अमेरीकेत प्रथमच जाणार म्हणून काढलेला एक अत्यंत mediocre धागा आठवला).

In reply to by कवितानागेश

घ्या.... हे अजून एक. यांचं काहीतरी वेगळंच. (वास काढणार्‍यांच्या योग्य ठिकाणी आवाज काढणारा) बबलु

In reply to by बबलु

जो गरजते है वो बरसते नही! - ( सगळे आवाज चुकवून उंच फळ्याबर बसून रडक्या पोरांना हसणारी) माउ

In reply to by कवितानागेश

फालतु लेखांना गोग्गोड गोग्गोड प्रतिसाद देणार्‍या लाळघोट्यांच्या डोक्यात आम्ही कधीचीच काठी घातलेय. असो. उंच फळ्यावर जाउन बसलात ते बरं केलंत. (संपादित मजकूर) बबलु

In reply to by बिपिन कार्यकर्ते

जरा मोकळेपणानं कौतुक केलं तर बाईंच्या/मास्तरांच्या ब्याडबुकात जातो की काय अशी भिती वाटली की काय रे मॉनिटर? :P

बरं...!

दुर्बिटणेबैंनी केलेली मिपाची शाळा आवडली. सहजकाकांचं वर्णन तर अगदी चपखल केलंय. :-) बाकी, अस्मादिकांबद्दल बोलायचंच तर, मधल्या नाही गं.. मी पहिलीपासून पहिल्याच बाकावरची विद्यार्थिनी आहे. सगळ्यात पुढे बसून टवाळपणा करणं, खाली पडलेले खडू उचलून बरोब्बर नेम धरून (मास्तरांना नव्हे)मारणं, अगदीच बोर झालं तर झक्कपणे झोपा काढणं, उत्तर येत असेल तरीही मुद्दाम मख्खासारखा चेहरा करणं आणि व्यवस्थित उत्तर देऊन मास्तरांचा चेहरा पाडणं(हे अर्थातच शाळेत मास्तर नाहीतर मी नवीन असेपर्यंतच. नंतर आमचे 'गुण' कळायचेच सगळ्यांना)हा आमच्या हातचा मळ!!!
वर्गात तास सुरू असताना सतत कमेंट्स करायच्या आणि इतरांचं लक्ष वेधून घ्यायचं यात हिचा हातखंडा आहे.
हे मात्र अगदी बरोब्बर!!!

सदर लेख, सदर सभासद शाळेत असताना कसे वागायचे याबद्दल नसून सदर सभासद (मराठीत आयडी) मिपा नामक कट्ट्यावर कसे वागतात याबद्दल आहे. अनेक लोकांनी या लेखाबद्दल मागणीवजा तक्रारही केली की वर्गात खूपच कमी मुलं आहेत, मुली तर दोनच आहेत, अमक्या/कीबद्दल का लिहीलं नाही, इ. १. सदर लेख थोडाफार कॅरीकेचर प्रकाराने लिहायचा असल्यामुळे वात्रट लोकांबद्दल लिहीणं सोपं होतं. २. चटकन सुचलं तेवढं लिहीलं, लोकसंख्या, जेंडर इक्वॅलिटी वगैरे सोसापायी पाणी घालायचं नव्हतं. ३. एवढं लिहूनच हात भरून आले त्यामुळे थांबले. "आपणही इतर मिपासभासदांबद्दल लिहावं", असं माझं आवाहन योग्य जागी मारून वर माझ्याकडे माझीच तक्रार करणार्‍या मिपा-प्रतिसादकांचा साफ निषेध.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>"आपणही इतर मिपासभासदांबद्दल लिहावं", असं माझं आवाहन योग्य जागी मारून वर माझ्याकडे माझीच तक्रार करणार्‍या मिपा-प्रतिसादकांचा साफ निषेध. आपल्या खिलाडुवृत्तीचा आदर आहे :)

लेख वाचल्या गेला नाही , परंतु प्रतिसाद वाचल्या गेले . कुठे झिंम्मा फुगडी , कुठे साबण चोळा चोळी , कुठे नाराजी , कुठे ओशाळलेले चेहरे , कुठे आंबट चेहरे .... तर कुठे बेरजेचे राजकारण :) हॅहॅहॅ थोडक्यात असे अणुमाण काढल्या गेले आहे :) अजुन रोचक अशा ग्गोग्गो प्रतिसादांच्या प्रतिक्षेत :) सहजरावांच्या चेहर्‍यावरचे एक्स्प्रेशन टिपल्या आले असते तर किती बरं होतं :) बाकी " नंदु आला .. नंदु आला " हे कपलवाक्य २५ वेळा दिसल्या गेले नाही :) त्यामुळे त्याचे ही एक्स्प्रेशन बघण्यास उस्तुक :) - (१७ नंबर) टारझन

एका तासात पोर्शन संपवलेल्या दिसत आहेत. ;-) क्रमशः विसरलात की काय ?

शाळेतली पोरं आजकाल औषध पिऊन शाळेत येतात आणि बोर्डवर काहीबाही लिहुन जातात.. कधी जास्त झाली तर कौलं देखील दणादण फोडतात! बाकी लेख छानच! - (औषध पिऊन मिपावर येणारा) इंट्या दारुवाला.

छान! चालू द्यात दंगा!

प्रकाटा.

गगनविहारी - हा शाळेत तसा नवीनच आहे. आल्या आल्या पहिल्यांदा त्याने लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे एक भलं मोठ्ठं विमान वर्गात उडवून दाखवून. तेव्हापासून अनेक वेगवेगळ्या विषयांवरच्या गप्पाटप्पांमध्ये रंगलेला दिसतो. याचा बेंच शेवटून दुसरा किंवा तिसरा. हुशार आहे तरी वर्गात नंबर कितवा याची फारशी फिकीर नाही. नगरीनिरंजन - हाही नवीनच. पण वर्गातला हरहुन्नरी विदूषक म्हणून थोड्याच काळात नावारुपाला आलेला आहे. वर्गातल्या मुलांच्या नकला करण्यात हातखंडा. सर्कशीतला विदूषक जसा सर्व बाबतीत कुशल असायला हवा तसा हाही आहे. ऑलराउंडर. वर्गातल्या कुठल्याही बेंचवर बसायची तयारी असली तरी ओढा मागच्या बेंचकडे. इंद्रराज पवार - हा गडी नाईलाजाने पहिल्या बेंचवर बसतो. नाईलाजाने अशासाठी की त्याला त्याहून पुढचा बेंच मिळत नाही. व्यासंग जबरदस्त. निबंध असो, दोन ओळींत उत्तर द्या असो की बहुपर्यायी प्रश्न असो - हा चारशे शब्दांचं संदर्भासहित स्पष्टिकरण देणारच. जातिवंत मॉनिटर. शिल्पा ब - इंद्रराज पवार नाईलाजाने पहिल्या बेंचवर बसतो तशी ही नाईलाजाने शेवटच्या बेंचवर बसते. छोट्या छोट्या कागदांचे अतिशय झपाट्याने बाण करून लोकांना सटाक्कन मारण्यात हिचा हातखंडा. अरे ला ताबडतोब कारे करायला ती बिलकुल घाबरत नाही. विश्वनाथ मेहेंदळे - टोपणनाव म्हणून रारंग ढांगच्या नायकाचं नाव वापरणाऱ्या मुलाचं व्यक्तिमत्वदेखील तसंच धडाडीचं आहे. शिल्पावर देखील बाण मारू धजावणाऱ्या थोड्यांपैकी हा एक. 'अगं - कारे - होकागं - होच्चमुळी - अस्स्स्सं..- न्यायतर कस्स्स्सं...' अशी बाणांची मारामारी मागे वळून बघताना वर्गाचं शिक्षकांकडे लक्ष राहात नाही. हा मागेच बसतो हे वे सां नलगे. नाटक्या - हा मुलगा वर्गात बऱ्याच दिवसांत दिसलेला नसल्यामुळे त्याच्या वडलांची बदली झाली की काय असा संशय यायला लागलेला आहे. एरवीही हो वर्गात दंगा करण्यापेक्षा मित्रांना गोळा करून शाळेसमोर उभ्या असलेल्या सरबतवाल्याकडे निरनिराळ्या रंगांची सरबतं बनवून पिलवण्यात दंग असायचा. बऱ्याच दिवसांत तो न दिसल्यामुळे वर्गमित्र आता सरबतांची तहान पाण्यावर भागवत असतात. बेसनलाडू - हा अभ्यासू आहे, दंगेखोर आहे, चळवळ्या आहे. त्यामुळे कुठल्या एका बाकावर बसत नाही. आत्ता आपण कुठल्या बाकावर आहोत हे तो सहीमध्ये कंसांतून सांगतो. भाषा विषय अतिशय आवडता. त्यात संकेतलिपीवर प्रभुत्व असल्यामुळे वर्गात चोरून चिठ्ठ्या पास करायच्या असल्या की लोकं याचीच मदत घेतात. बबलू - दांडगाई करण्याचा स्वभाव असल्याने विश्वनाथ व शिल्पाच्या शेजारीच बसतो. वर्गातल्या नंबरासारख्या क्षुद्र गोष्टींची बिलकुल फिकीर नसते. घरची कामं असल्यामुळे शाळेत खूप वेळा दिसत नाही. आला की मास्तर लोकं नजर ठेवून असतात. पाषाणभेद - हा पोरगा शाळेत येतो, पण वर्गात काय शिकवतात याकडे त्याचं जराही लक्ष नसतं. स्वप्नाळू, सतत आपल्याच तंद्रीत असणारा गडी वाटतो. डोक्यात सतत काहीतरी कवितांचे शब्द घोळत असतात. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तासाला ढोलकी, तुणतुणं घेऊन लावण्या म्हणणं हा त्याचा आवडता छंद आहे. असो. खूप लोकांविषयी लिहावंसं वाटतं. पण वेळ पुरत नाही, आणि बऱ्याच लोकांबद्दल वरवरची असण्यापेक्षा माहिती नाही. मूळ लेखात देखील याच कारणांनी मर्यादा पडली असावी असं वाटतं. अजूनही लोकांनी इतरांविषयी लिहिलं तर मजा येईल असं वाटतं.

In reply to by राजेश घासकडवी

हा गडी नाईलाजाने पहिल्या बेंचवर बसतो. नाईलाजाने अशासाठी की त्याला त्याहून पुढचा बेंच मिळत नाही.
इंद्रराज पवार हा विद्यार्थी शिक्षक दिनाची वाट पहात नाही. ऑफ तास मिळाला की हाच वर्गाचा शिक्षक होतो आणि इतिहास, भाषा इत्यादी विषय इतर वर्गमित्रांना शिकवतो.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पण हा ना एक नंबर बडबड्या आहे. ऑफ तासाला बोलायला नाही मिळालं की सैरभैर होतो. - (मॉनिटर)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आले लगेच मॉनिटर, मुलांच्या तक्रारी सांगायला. 'हा किन्नई बडबड्याच आहे, .... आणि तो किन्नई...कुच्चु कुच्चु कुच्चुकुच्चु कुच्चुकुच्चु कुच्चु....!' :) -( नाही तिथे बडबड करणारी) आगाउ माउ अवांतरः रडुबाईबद्दल कोण लिहिणार? ;) -आचरट माउ

छान लिहिलय

तिसर्‍या शतकानिमित्त अभिनंदन!