कोणे एके काळी, मिपावर जेव्हा काहीशे सदस्यच होते, तेव्हा आम्हाला कोणालाही हापिसामधे काहीच काम नसायचं. परा (परिकथेतील राजकुमार) हा आधी नव्हताच आणि आला तेव्हा नवा होता, टिंगीचा टिंग्या झाला असला तरी तेव्हा तो "दुशली ब" मधे नव्हता. आनंदयात्री, धमाल मुलगा, छोटा डॉन, मेघना भुस्कुटे, ब्रिटिश टिंग्या, ऋचा (ही पार गायबच झाली आहे), मी असे आम्ही निरुद्योगी लोकं मिपाच्या खरडफळ्यावर पडीक असायचो. अधूनमधून कोणी मैत्री किडे यायचे, स्त्री आयडींना खरडी टाकायचे आणि त्यावर इनोबा म्हणे, टिंग्या, बिपिन वगैरे लोकं "माझ्याशी पण मैत्री करणार का?" असा 'लष्कर-ए-खरडा'चा हल्ला करायचे. "कुठून या स्त्री आयडींना खरडी टाकल्या", असं त्या किड्यांना होत असेल. तर थोडक्यात काय, त्या काळात मिपा म्हणजे, आई सांगायची त्या जुन्या ठाण्यासारखं होतं, संध्याकाळनंतर घंटाळी मंदिराकडे एकट्याला जायला भीती वाटेल एवढं छोटं. तेव्हा आम्ही खरडफळ्यावर शाळेत असल्यासारखं बोलायचो. म्हणजे मुलींनी मुलांना आणि मुलांनी मुलींना आडनावाने हाक मारायची, "ए भुस्कुटे", "ए मुळे" अशी!
तर मुख्य मुद्दा असा की गेल्या आठ दहा महिन्यात काही महान मिपाकरांना भेटण्याची संधी मिळाली. एकमेकांशी बोलताना, अर्थातच लिखाण वाचून, माणूस कसा असेल याचे अंदाज घेतले होते; प्रत्यक्ष भेटीनंतर ते कितपत योग्य ठरले याचीही मनात उजळणी झाली. यथावकाश चांगली ओळख झाल्यावर एकमेकांबद्दलच्या या मतांची देवाणघेवाणही झाली. माझी स्वतः आणि इतरांबद्दलची मतं इथे देत आहे. तुम्हीही तुमची स्वतः आणि इतरांबद्दलची मतं सांगा. नेहेमीप्रमाणे कोणालाही व्यक्तीगत, टोचेल असं न बोलण्याची खबरदारी घ्यावी ही विनंती.
सुरूवात हुशार विद्यार्थ्यांपासून करावी.
धनंजय - हा वर्गातल्या सर्वात हुशार विद्यार्थ्यांपैकी एक. पण वर्गात पहिला नंबर क्वचितच, नंबर साधारण पहिल्या पाचात येतो, पण पैकीच्या पैकी मार्कांचा अजिबात सोस नाही. वर्गात नेहेमी शेवटच्या बाकड्यावर बसणार, टवाळक्या, भाषणं, वाचन अशा अभ्यासेतर गोष्टींमधे लक्ष. मुळात चौफेर विद्यार्थीच, पण खोड्या काढण्यातही तेवढाच रस. तरीही वर्गातला बराचसा वेळ शेवटच्या बाकावर बसून इतर पुस्तकं वाचणे, काहीतरी प्रयोग करणे ... 'शाळा'तला चित्र्या.
नंदन - हा पण अतिशय हुशार मुलगा. पण हा कायम पहिल्या, अगदीच उशीर झाला तर दुसर्या बाकावर बसणारा. याचा नंबरही पहिल्या पाचातच. वर्गात बसून नेहेमी शिक्षकांकडे लक्ष देणारा, अगदी रटाळ तासांमधेही शिकवण्याकडेच लक्ष देणारा आणि टवाळक्या, उनाडक्या फक्त पी.टीच्याच तासाला. चित्रकलेच्या तासालाही नंदन मराठीचं पुस्तक काढून त्याचं इंग्लिशमधे भाषांतर करायचा प्रयत्न करतो असं धम्या मला सांगत होता.
धम्या - धमाल मुलगा हा प्राणी सतत वेगवेगळ्या गोटांमधून बदली करून घेत असतो. कधी मुलींचा ग्रूप, कधी मुलांचा तर कधी मुला-मुलींचा ग्रूप. सतत बदल्या करायच्या आणि सगळ्यांच्या डब्यातला खाऊ खायचा हाच याचा उद्योग. तास सुरू असताना कुठल्या कोपर्यातून थालिपीठाचा घमघमाट सुटला की धम्या तिथे बसला आहे हे समजावं. अभ्यास वगैरे गोष्टींशी याचं काहीही घेणं देणं नाही. परीक्षा आल्या की वर्गातली सगळी मुलं-मुली मित्रकर्म म्हणून याला नोट्स आणून देतात. त्यातसुद्धा छोटा डॉन, नंदनसारखी वेळच्या वेळी अभ्यास करणारी मुलं परीक्षेच्या आधी धम्याची उजळणी घेऊन देतात, असुर, मेघवेडा याला आपल्या पेप्रातून कॉपी करू देतात आणि धम्या बर्यापैकी मार्कांनी पास होतो.
छोटा डॉन - हा शाळेत नेहेमीच उशीरा येतो. त्यामुळे याची ठरलेली जागा नाही, जागा मिळेल तिथे हा बसतो. खरंतर याला गप्पा मारायची हौस लै दांडगी आहे. पण हा काय बोलतो कुणालाच कळत नाही, त्यामुळे सगळे नुस्ते हो ला हो करतात. खरंतर हा मुलगा तसा स्वभावाने एकदम गरीब आहे, त्यामुळे "शांतपणे बोल रे" असं त्याला सांगायलाही थोडं विचित्र वाटतं. गणित, विज्ञान वगैरे विषयात याला फार अभ्यास न करताही निदान ९९% मिळतात. पण तरीही हा कधी पहिल्या पाचात नसतो. भाषा विषयात मार खातो, पण त्याला काही त्याचं वाटत नाही. स्वभावाने शांत वगैरे असल्यामुळे भाषा शिक्षकांनाही त्याचा राग येत नाही.
मेघवेडा - हा नावाप्रमाणेच थोडा वेडा आहे. साधारणतः मधल्या बाकांवर बसतो. तसा शांत विद्यार्थी आहे, पण मधल्या सुट्टीत हा फार आवाज करतो. आपल्या मोठ्या आवाजात हाकाट्या मारायच्या, कोणालातरी चावी मारून गाणी म्हणवून घ्यायची, कोणाची मारामारी लावून द्यायची आणि नंतर धम्याबरोबर जाऊन ती सोडवायची हा याचा आवडता उद्योग. तासाला कधी लक्ष द्यायचं, कधी कंटाळला तर रेघोट्या मारायच्या, कधी चुपचाप फुली-गोळा खेळायचं हा याचा उद्योग. आणि यात याचा accomplice आहे असुर.
असुर - हा वर्गात किती दिवस असतो असा प्रश्नच पडतो. सतत आजारपण, घरची लग्न कार्य, असल्या काय काय कारणांमुळे हा विद्यार्थी वर्गात कमीच दिसतो. पण हा सुद्धा तसा हुशार विद्यार्थीच आहे. वर्गात असतो तेव्हा मेव्यासोबत हा नेहेमी दिसतो. दिसायला तसा शांत आहे, पण सगळा दंगा करतो. गणेशोत्सव मंडळाचा हा खंदा कार्यकर्ता आहे. विज्ञान आणि गणित हे याचेही आवडते विषय.
मस्त कलन्दर - हिला खरंतर मागच्या बाकड्यांवरच बसायला आवडतं; पण अगदीच बुटुकबैंगण असल्यामुळे हिला सगळे शिक्षक पुढेच बसवतात. अगदीच नाईलाजाने ही मधल्या बाकांवर बसते. एकीकडे चित्र काढायची, शाळेत येताना रस्त्यातून गोळा केलेली फुलं इतरांकडे पाठवायची आणि इतरांना छळायचं हा हिचा प्रमुख उद्योग. वर्गात तास सुरू असताना सतत कमेंट्स करायच्या आणि इतरांचं लक्ष वेधून घ्यायचं यात हिचा हातखंडा आहे. तरीही मॉनिटर होण्याची हिची प्रचंड इच्छा आहे.
परिकथेतील राजकुमार - कुठल्याही बेंचवर बसला तरी पर्याला खिडकीच हवी असते आणि सगळं लक्ष खिडकीबाहेरच. पर्या, धम्या, मेव्या, डॉन्या आणि असुर असा हा एक छोटा ग्रुप आहे. डॉन्या हा त्यांचा अभ्यासातला म्होरक्या आहे, तो या सगळ्यांचा बुडलेला अभ्यास घेतो. पर्याला याच गोष्टीमुळे डॉन्या आवडत नाही, पण पास झाला नाही तर घरून फटके पडतील म्हणून तो डॉन्याला सहन करतो. शिवाय डॉन्या त्याला मुलींशी कसं बोलायचं या विषयात 'मानतो' त्यामुळे या दोघांचं गुरू-शिष्य हे नातं थोडं काँप्लिकेटेड आहे.
निखिल देशपांडे - याला वर्गात कोणीही निखिल किंवा देशपांडे म्हणत नाहीत. एकतर पूर्ण नाव निखिल देशपांडे किंवा निदे. अगदीच थोडी धम्या वगैरे हूड मुलं त्याला निख्या म्हणतात, पण तो अपवादच. याचा ओढा मध्यममार्गाकडेच. शांतपणे मधल्या बाकांवर बसायचं आणि मागच्या मुलांचा दंगा ऐकायचा हा यांचा छंद. शिवाय निदे आकाराने मोठा, उंच वगैरे असल्यामुळे त्याच्यामागे वर्गातली बारकी पण उनाड मुलं बरोब्बर लपतात. त्या पोरांमधे हा एकदम आवडता आहे, पण निदेला त्याचं काही नसतं. मी बरा आणि माझा अभ्यास बरा, यात तो खूष असतो.
मुक्तसुनीत - वर्गातल्या नवीन मुलांना हा मुलगा फार शांत, अभ्यासू वाटतो. अभ्यासात यांचा काही प्रश्न नाहीच, पण ओळख झाल्यानंतर हा मुलगा अजिबात शांत नाही हे समजतं. नेहेमी शेवटून दुसर्या बाकावर बसणार आणि सगळं लक्ष मागच्या बाकावरच्या अदिती, धनंजय आणि राजेश या टवाळांकडे. घरून सायन्सला जाण्याचा आग्रह होतो म्हणून हा विज्ञानाच्या तासाला लक्ष देतो, पण मुळात आवड भाषा विषयांची. ग्रंथालयातली कवितांची पुस्तकं शाळेतल्या मराठीच्या शिक्षकांनी वाचली नसतील पण याने वाचलेली असतात आणि ते सगळं त्याला समजतंही. खेळाच्या तासालाही हा कवितांचा 'आस्वाद' घेत बसतो. घरच्यांच्या धाकामुळे तरी का होईना, हा पण पहिल्या पाचातलाच.
बिपिन कार्यकर्ते - हा वर्गाचा एक मॉनिटर. वर्गात फार दंगा नाही, सगळ्यांशी प्रेमाने बोलतो, वर्गात आलेल्या नवीन मुलांशीही प्रेमाने बोलतो त्यामुळे शिक्षकांनाही हा मुलगा आवडतो. तसा अभ्यासाला फार हुशार नाही, फार वाईटही नाही. सगळ्यांशी संवाद साधता यावा म्हणून हा मधल्या बाकांवर बसतो. मनातून त्याला नंदन, जंतू यांच्यासारखं पहिल्या बाकावरचं 'आदरणीय' विद्यार्थी व्हावं असं वाटतं, पण मुक्तसुनीत, राजेश, धनंजय यांच्यासारखा दंगा करावा असंही त्याला वाटतं. थोडा कन्फ्यूज्ड.
राजेश घासकडवी - धनंजय आणि राजेश एकाच बाकावर बसतात आणि गंमत म्हणून कसल्याही पैजा, शर्यती लावतात; उदा: ठराविक आकाराच्या कागदाला कमीतकमी घड्या घालून बनवलेलं कोणाचं विमान जास्त चांगलं उडेल, असं काहीसं. विज्ञान असो वा भाषा विषय, याला सगळं जमतं. याचाही नंबर पहिल्या पाचात, बहुतेकदा तीनातच. धनंजयचे वर्गात कसले कसले प्रयोग सुरू असतात तेव्हा त्याला त्रास देण्याच्या मिषाने काही ना काही सुचवत रहायचं हा याचा उद्योग; पण धनंजयला यामुळे नवनवीन कल्पना सुचत रहातात आणि मग दोघांच्या वादात इतर बॅक बेंचर्सची मस्त, अभ्यासपूर्ण करमणूक होते.
चिंतातुर जंतू - नुकताच परगावातून या शाळेत आलेला, जाड चष्मा, सतत वाचन, लेखनामुळे किंचित झुकलेले खांदे आणि सतत कसला ना कसला विचार नाहीतर प्रश्न असा एकदम हुशार आणि शिक्षकप्रिय विद्यार्थी. विज्ञान, गणित, भाषा, इतिहास, चित्रकला, सगळ्या विषयात एकदम हुशार. वर्गात सगळ्या तासांना लक्ष देऊनच याचा बर्याचदा पहिला नंबर येतो, पण शारीरिक शिक्षण विषयात कसंबसं पास करावं लागतं. हा वर्गात आपणहून नंदन आणि धनंजय सोडून कोणाशीही बोलत नाही. शाळेत असल्यापासून विविध मासिक, नियतकालिकांमधे याचं लिखाण छापून येत असल्यामुळे इतर सगळ्यांना याच्याशी बोलण्याची इच्छा असते; पण हा वर्गातल्या नंदन आणि धनंजय सोडून फक्त ठराविक मुलांशीच बोलतो; ज्यांच्याशी तो बोलत नाही त्यांना याचं फार वाईट वाटतं.
श्रावण मोडक - एन.सी.सी आणि स्काऊट दोन्ही गोष्टींमधे असणारा वर्गातलाच काय शाळेतला पहिला विद्यार्थी. या सगळ्या समाजसेवेमुळे त्याची वर्गातली उपस्थिती कमी असते. मधल्या बेंचवरचं या विद्यार्थ्याचं अस्तित्त्व दिसत रहातं. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र वगैरे विषयात यांचा अभ्यास दांडगा आहे आणि नागरिकशास्त्राच्या नोट्सतर जंतू, धनंजय यांच्यासारखे हुशार विद्यार्थीही मोडककडून घेतात. वर्गातल्या मुलीच नव्हे तर मुलंसुद्धा याला आडनावानेच हाक मारतात अशी याची ख्याती आहे.
सहज - या विद्यार्थ्याचा बाक ठरलेला नसतो. सहजला प्रत्येकाच्या मनात प्रत्येक क्षणी काय चाललेले आहे याचे विलक्षण कुतूहल असल्यामुळे तो बाका-बाकामधून, टेबलाखालून, फळ्यामागून सरपटत हिंडत असतो. वर्गात लक्ष द्यायचं असेल तरीही,एकदा हजेरी घेऊन झाल्यावर, तो स्वतःचं दप्तर ठेवलेलं असतं त्या बाकाच्या खालीच बसलेला असतो. एकदा एक संपूर्ण परीक्षाही त्याने टेबलाखाली बसून दिली होती असा जंतूने लिहीलेल्या एका निबंधाचा अर्थ आहे असा नंदनचा सिद्धांत आहे.
३_१४ विक्षिप्त अदिती - शाळेच्या वेळेच्या दहा-पंधरा मिनीटं तरी निदान पोहोचायचं म्हणजे मागचं बाकडं निश्चित मिळतं. शिक्षक चांगले असतील तर कोणत्याही विषयाचं वावडं नाही, पण स्वतः काहीही कष्ट घ्यायचे नाहीत. पीटीच्या तासाला आबाधोबी, सायकलवरून पाडापाडी वगैरे खेळ खेळण्यात रस. रटाळ तासांना स्वतः टिवल्या बावल्या करायच्या आणि इतरांनाही त्रास द्यायचा, खोड्या काढायच्या, माकडचाळे करून आजूबाजूच्या लोकांची करमणूक करायची. अगदीच ओरडा बसत असेल तर निखिल देशपांडे, मुक्तसुनीत या मुलांच्या मागच्या बाकड्यावर बसून झोपा काढायच्या. या असल्या उद्योगांमुळे हुशार पण टवाळ मुलांच्या गुडबुकात जाऊन त्यांच्याबरोबर परीक्षेच्या काळात अभ्यास करता येतो आणि बरे मार्क मिळतात.
"वर्गा"तल्या इतर मुलांचं स्वतः आणि इतरांबद्दल काय मत आहे हे वाचायला मला आवडेल. तर मग होऊन जाऊ द्या.
(कालानुक्रमे) श्रेयअव्हेर: जंतू, राजेश, मुक्तसुनीत
वाचने
21616
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
विदर्भ, खान्देश
In reply to त्यांना आपलं म्हणा! by ३_१४ विक्षिप्त अदिती
आता तुम्हाला कळलंच असेल, ३_१४
In reply to विदर्भ, खान्देश by वपाडाव
पण...
In reply to आता तुम्हाला कळलंच असेल, ३_१४ by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हा हा
In reply to पण... by विकास
सहजला प्रत्येकाच्या मनात
मस्त. अभिज्ञ.
हॅ हॅ हॅ
अरे विचारायचेच राहीले. यशोधरा
कंपु लोकांणी कंपुतल्या
काहीतरी जळल्याचा वास येतोय
In reply to कंपु लोकांणी कंपुतल्या by बबलु
घ्या.... हे अजून एक. यांचं
In reply to काहीतरी जळल्याचा वास येतोय by कवितानागेश
हा हा
In reply to घ्या.... हे अजून एक. यांचं by बबलु
हू हू
In reply to हा हा by कवितानागेश
बरं लिहिलंय!
ह्म्म..
In reply to बरं लिहिलंय! by बिपिन कार्यकर्ते
बरं
मिपाची शाळा... फंडा आवडला...
अवांतर आणि इतरेतर
खिक्क
In reply to अवांतर आणि इतरेतर by ३_१४ विक्षिप्त अदिती
लेख वाचल्या गेला नाही , परंतु
एका तासात
शाळेतली पोरं आजकाल औषध पिऊन
वा!
X
आणखी काही
हा गडी नाईलाजाने पहिल्या
In reply to आणखी काही by राजेश घासकडवी
+१
In reply to हा गडी नाईलाजाने पहिल्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
आले लगेच मॉनिटर, मुलांच्या
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
छान
अभिनंदन