Skip to main content

काहि मह्त्वाचे

बुधवार, 16/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योत प्रकाश देते बरोबर पण ती अंधार दूर करते हे महत्वाचे. मंदिरात गेल्यावर प्रसन्न वाटते बरोबर पण दर्शन घेतल्यावर देवाचा आशीर्वाद मिळतो हे महत्वाचे. वृक्ष सावली देतो बरोबर पण तो पक्षांचा निवारा आहे हे महत्वाचे. मायबाप आपल्याला वाढवतात बरोबर पण त्यात विधात्याचा हात असतो हे विसरून चालणार नाही हे महत्वाचे.  अक्षरामधून शब्द तयार होतो शब्दातून अर्थ निघतो अर्थामधून आनंद मिळतो  असे अर्थबद्ध शब्द हृदया पर्यंत पोहोचवणे महत्वाचे. सुविचार वाचल्याने आनंद खात्रीने मिळतो पण तो सुविचार अंगी बाणवण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे. संगीत ऐकल्याने श्रवणाचा आनंद तर मिळतोच पण काही क्षण  तरी आपल्याला  दु:खाचा  विसर पडतो हे महत्वाचे सहलीचा आनंद आपण सर्वजण घेतोच पण पर्यावरणाच रक्षण करणं महत्वाच. फुलाचा गंध आनंद देतो बरोबर पण प्रत्येक फुलाचा गंध वेगळा असतो हे महत्वाच लहान मुले आपल्याला आनंद देतात हे बरोबर  पण त्यांच्यावर चांगले संस्कार होणे महत्वाचे. अनिल आपटे
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2143
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

तुमच्या लिखान वाचुन छान वाटले.. पण रिप्लाय देवून आणखिन प्रोत्साहन देणे महत्वाचे म्हणुन हा रिप्लाय.

>>सुविचार वाचल्याने आनंद खात्रीने मिळतो पण तो सुविचार अंगी बाणवण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे>> हं हे पटल बुवा !कळत पण वळत नाही ,काय करणार ?

ज्योत प्रकाश देते बरोबर पण ती अंधार दूर करते हे महत्वाचे. काही कळाले नाही बॉ. प्रकाश देऊन अंधार दूर न करणारी एखादी गोष्त सांगा बरे? गुरुजी बोलतात पण त्यामुळे विद्यार्थ्याना ज्ञान बोध होतो हे महत्वाचे असे काही ल्ह्या की हॉटेलात अगोदर पडदे लावून अंधार करतात मग दिवे लावून उजेड पाडतात

In reply to by विजुभाऊ

> प्रकाश देऊन अंधार दूर न करणारी एखादी गोष्त सांगा बरे? प्रकाश देणारी गोष्ट अंधार दूर करत नाही. अंधार तीथेच असतो. फक्त तो प्रकाशामुळे दिसत नाही. प्रकाश गेल्यावर तो परत दीसु लागतो :) ह.घ्या

>> वृक्ष सावली देतो बरोबर पण तो पक्षांचा निवारा आहे हे महत्वाचे. >> पक्षी त्या अतीव आनंदाप्रीत्यर्थ कधी कधी वरून प्रसाद देखील देतात हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
चित्र साभार - जाल