कामवाल्या बाई आणि आय. टी.
आजकाल बर्याचदा नवरा बायको दोघेही नोकरी करत असतात. अशा वेळी घरातले काम, साफसफाई, धुणीभांडी, स्वयंपाक, मुलांच्याबरोबर वेळ घालविणे, गप्पा मारणे, पेपर वाचणे अशा कितीतरी गोष्टी रोजच्या रोज करायच्या असतात. पण सगळी कामं काही स्वतः घरी करणे शक्य नसते. मग आपण काय करतो तर, जी काही रटाळ, कंटाळवाणी, non-value addition वाली कामं असतात, ज्या कामासाठी खूप expertise लागत नाही, ज्यात थोडंफार इकडं तिकडं झालेलं चालतं ती कामं आपण outsource करतो. I mean त्या कामांसाठी आपण कामवाल्या बाई लावतो. आणि आपला वेळ वाचवून तो आपल्याला आवडणारी कामं करण्यातं किंवा आवडीच्या गोष्टी करण्यात / छंद जोपासण्यात कारणी लावतो.
कधी कधी वाटतं की या धुणीभांडी करणार्या बायकांना कंटाळा येत नसेल का रोज रोज तेच तेच रटाळ काम करून किंवा लोकांची उष्टी-खरकटी काढून. त्यांना वाटतं नसेल का आपण यापेक्षा थोडं चांगलं, वरच्या लेव्हलचं काम करावं. कधीकधी कंटाळा येतही असेल. पण त्यांच्यापुढे काही पर्याय नसेल किंवा त्यांना ते काम करणं सवयीनं आवडतंही असेल किंवा सवयीनं त्याचा कंटाळा येत नसेल. रोजच तेच रटाळ काम करूनही ही मंडळी छान खूष असतात.
-----------------------------------------------------------------------------------------
आणि आय.टी वाले आपणही ओफिसात तेच करतो. युरोपीयन/अमेरिकन लोकांची (किंवा युरोपीयन/अमेरिकन उद्योगधंद्यांची) स्वस्तात धुणीभांडी/केरफरशी करून देतो. so that त्यांना त्यांचा वेळ Quality time म्हणून वापरता यावा महत्वाच्या गोष्टींसाठी. आणि केरफरशी मध्ये त्यांचा वेळ फालतू वाया जाउ नये :-) आणि तीच आपली रोजीरोटी आहे. आपण त्यातच खूष आहे. नुसतचं खूष काय आपण तर आय टी च्या ऐटीतच आहोत.
-----------------------------------------------------------------------------------------
टीपः ह्या लेखात गंमत म्हणून घरकाम व्यवसाय आणी भारतातील आय टी business या दोन व्यवसायांची comparison केली आहे. त्यात कुठेही घरकाम करणे हीन दर्जाचे वगैरे असे मत नाही किंवा कामवाल्या बाईंना कमी लेखणे असा कोणताही उद्देश नाही. इतकचं वाटतं की भारतात एवढं उच्च दर्जांचे मेंदू मुबलक असताना त्याचा वापर फक्त service industry तले स्वस्त मजूर म्हणून न होता त्यांच्या बुद्धिमत्तेचा जास्त चांगला वापर व्हावा आणि मुख्य म्हणजे भारतालाही प्रगत मेंदूचा आणि प्रगत software technology चा उपयोग व्हावा.
कोणाच्याही भावना दुखावण्याचा कोणताही उद्देश नाही. अनावधानाने तसे झाले असल्यास क्षमस्व.
-----------------------------------------------------------------------------------------
अशा प्रकारचा लेख पहिल्यांदाच लिहित असल्याने चूकभूल देणे घेणे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
रोचक धागा. चर्चा वाचण्यास
+१
+२
कोण प्रविन ? भप्कर का ?
कालच्या
हळू हळू
मुद्दा एकदम पटला
+१
लई भारी लेख, कॉलिंग स्पेड अ स्पेड टाईपचा.
झकास!
पूर्ण सहमत (आय्-टी कारकून)
सहमत
ह्यावर रंगरावांची प्रतिक्रिया
टीपः ह्या लेखात गंमत म्हणून
तुलना आवडली . योग्य
चर्चा वाचण्यास उत्सुक. . . एक
सहमत आहे.. सध्यातरी भारतीय
माझ्या सारखचं लोकांचं पण मत
युरोपीयन/अमेरिकन लोक =
चांगली नोकरी/वाईट नोकरी
आय. टी. इंडस्ट्री ही "आय.टी.
निरिच्छेने सहमत !!
अवांतर पण लई महत्वाचा प्रश्न.
धाग्याचा विषय नाहीय खरा
दरी कमी करायला हवी.
उपाय
हॅ हॅ हॅ