पुण्यात मनपामध्ये जो राडा झाला, त्याबद्दल काय प्रतीक्रीया द्यावी , हे लोक काहीतरी निर्णय घेतात आणि आपण फक्त "प्रतीक्रीयावादी" बनुन प्रतीक्रीया द्यायच्या आणि परत आपासतात वाद घालायचा, हे कुठपर्यंत चालणार ? महाराष्ट्रात हे जातीपातीचे, जातीयद्वेषाचे टोकाला पोहोचलेले राजकारण कधी संपणार ? हे न संपणारे प्रश्न आहेत. आपापसात वैचारीक मतभेत जरुर असतील परंतु त्यात जो द्वेष आणि कडवटपणा येतो आहे त्याला जबाबदार कोण ?
पुणे महापालीकेने केवळ संख्याबळाच्या आधारावर जो तुघलकी निर्णय घेतला आणि एखाद्या अतिरेक्याला जेरबंद करावे तसे प्रचंड पोलीस बंदोबस्तात रात्रीच्या अंधारात घाईघाइने हे कर्म्र केले त्याला "कुकर्म" नाहीतर काय म्हणावे ?
इतिहास "इतिहासजमा" करण्याचा हा प्रयत्न निषेधार्ह आहेच आहे परंतु स्वराज्याच्या उभारणीत त्याकाळी त्यांचे काहीतरी योगदान असेलच ना त्या योगदानालाही यांनी मातीमोल केले. अनादीकलापासुन ब्राम्हणांनी विद्यादानाचे आणि क्षत्रीयांनी राष्ट्रनिर्माणाचे कार्य केले, पुर्वी राजे-महाराजे आपल्या राजपुत्रांना विवीध प्रकारच्या विद्या मिळवण्यासाठी आश्रमात पाठवत असत मग याच बाबतीत हा वाद का ? हा फक्त जातीय द्वेष नाही का ? ब्राम्हण जातीविषयी इतका कडवट जातीय द्वेष करुन खुपच मन:शांती आणि जग जिंकल्याचे समाधान मिळाले का ? आणि मिळत असेल तर आपले मनापासुन अभिनंदन ! पुणे महापालीकेने पुण्यातील बाकी सर्व प्रश्न बाजुला सारुन सर्वात महत्वाचा असणारा हा प्रश्न तातडीने सोडवण्याची जी तत्परता दाखवली व एका रात्रीत पुणे शहराचे सर्वच प्रश्न सोडवले त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन !!
वाचने
2420
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्रिवार अभिनंदन !!
गोब्राम्हणप्रतिपालक,
सहमत आहे. सदर धागा संपादित
In reply to गोब्राम्हणप्रतिपालक, by परिकथेतील राजकुमार
सहमत
In reply to गोब्राम्हणप्रतिपालक, by परिकथेतील राजकुमार
+१११११ n
लक्ष विचलित..
पुण्यात जल्लोष चालु आहे