✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपा, पुणे कट्टा...अचानक!!!

ध
धमाल मुलगा यांनी
Fri, 04/25/2008 - 14:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16184 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

स
स्वाती राजेश Fri, 04/25/2008 - 15:19 नवीन

भारी...

जळवा लेको.... आम्हाला नुसते फोटो पाहूनच समाधान मानावे लागते.:))) पण अचानक मि.पा.चा कट्टा जबरदस्त झाला आहे. छान वाटले, मि.पा.चे सदस्य एवढ्या आपुलकीने आणि अगत्याने करतात. मस्त.
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 04/25/2008 - 16:45 नवीन

हेच

पण अचानक मि.पा.चा कट्टा जबरदस्त झाला आहे. छान वाटले, मि.पा.चे सदस्य एवढ्या आपुलकीने आणि अगत्याने करतात. मस्त. -- असेच म्हणतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 15:27 नवीन

शाब्बास!

मूढ धमाला.. वर्णन छान संक्षिप्त आटोपशीर आणि मुख्य म्हणजे एकाच भागात केलेस. फोटोही छान आलेत. वाडेश्वरची मिसळ कशी होती ते सांगितलेच नाहीस की!
  • Log in or register to post comments
म
मैत्र Fri, 04/25/2008 - 15:33 नवीन

वाडेश्वर मध्ये मिसळ !

माहीत नव्हतं.. कशी होती मिसळ?
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 04/25/2008 - 15:58 नवीन

वाह!!

मिपा झिंदाबाद!! अचानक कट्टा झिंदाबाद!!!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 16:00 नवीन

वा

कट्टावर्णन छान, आम्ही चुकवलेला हा अजुन एक कट्टा :(
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 04/25/2008 - 16:09 नवीन

अरे वा..

अचानक कट्टा मस्त झालेला दिसतो आहे... स्वाती
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 16:09 नवीन

;-)

वाडेश्वरची मिसळ कशी होती ते सांगितलेच नाहीस की!
ते सांगणं मिसळधर्माशी गद्दारी करणं होईल, असं नाही का वाटत? अहो आण्णाचं हाटील ते! आण्णानं बनवूनही चांगली होती एव्हढंच सांगेन मी!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 16:35 नवीन

स्पष्टीकरण हवे आहे.

सपष्ट सांग तुला काय म्हणायचंय.
ते सांगणं मिसळधर्माशी गद्दारी करणं होईल, असं नाही का वाटत?
ते का बरं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
व
विसोबा खेचर Fri, 04/25/2008 - 16:16 नवीन

मस्त! :)

अचानक भरलेल्या मिपाकरांच्या कट्ट्याची कहाणी मस्त रे धमाल्या! संत तात्याबा आता सुखाने समाधी घेतील. मिसळपाव धर्म स्थापन व्हावा ह्याच त्यांचा अट्टाहास होता. तो आता पुरा झाला आहे. खेड्यापाड्यात, गावागावात, शहराशहरात असेच वरचेवर मिसळकट्टे भरावेत हीच संत तात्याबांची मनोकामना आहे! आणि आपल्यासारखे मिपाधर्माचे रसिक अनुयायी हे कट्टे भरवण्याचं काम करताहेत, धमाल, मजा करताहेत, हे पाहून संतोष जाहला! जगातल्या सर्व धर्म, जातीपाती नष्ट व्हाव्यात आणि केवळ प्रेम आणि आपुलकीचा प्रसार करणारी मिसळपाव ही एकच जात राहावी, मिसळधर्म हा एकच धर्म राहावा! अहो मिसळीच्या नावातच तिचा धर्मादेश सांगितला आहे. माणसामाणसांचं एकमेकात 'मिसळ'णंच सर्वात महत्वाच! :) मिसळपाव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा! आपला, संत तात्याबा महाराज, मिसळपाव धर्म संस्थापक.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/25/2008 - 16:18 नवीन

मस्त रे दोस्तांनो :)

अचानक कट्टा घडवणारे मि. धमाल यांना मानलंच पाहिजे....!!! खरे तर कोण कुठ्ले, एकमेकांना भेटतात, गप्पा मारतात बरं वाटतं वाचतांना आणि पाहतांना :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 16:26 नवीन

मि. धमाल

:)))) परका वाटला हो आम्हाला आमचा धम्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मदनबाण Fri, 04/25/2008 - 20:53 नवीन

मस्त !!!!!

अचानक कट्टा घडवणारे मि. धमाल यांना मानलंच पाहिजे....!!! खरे तर कोण कुठ्ले, एकमेकांना भेटतात, गप्पा मारतात बरं वाटतं वाचतांना आणि पाहतांना :) असेच म्हणतो..... (प्रत्येक मि.पा.करास भेटण्यास आतुर असलेला.....) मदनबाण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
वरदा Fri, 04/25/2008 - 17:53 नवीन

वा वा

मस्त व्रुत्तांत आणि मस्तच कट्टा...तो मिसळीचा फोटो सुद्धा झकासच.........कसलं जळायला होतय्.... प्राजुताईच्या प्लेटमधल्या मिसळीवर हे चॉकलेट आपण पसरवू म्हणजे ते छान लागेल.." असं धमाल्या म्हणाल्याबरोबर प्राजुताईला अगदी म्हणजे अगदीच ईईईईईईई...असं झालं.... पेठकरकाकांनीही धम्याला दुजोरा देत "चॉकलेट मिसळ" असं नाव सुचवलं आणि मिपाच्या पा.कृ.मध्ये रेशिपी टाकायची जबाबदारी घेतली! खरच ई ई ई ई..कधी देणार पाक्रु? थंड अमेरिकेतून गरम भारतात आत्ता नाही काही थंड....८० - ८५ आहे टेम्प....
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 04/25/2008 - 18:08 नवीन

:)

मजा आहे बॉ तुमची, छान वाटले वाचुन, एकमेका॑शी प्रत्यक्ष भेटल्यावर तर आणखी आन्॑द.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 04/25/2008 - 18:20 नवीन

सूनबाई?

फोटोतून धम्याची बायको नेमकी अदृश्य झालीयं. नाहीतर मिपाची सून पहायला मिळाली असती सगळ्यांना. काय धम्या.... बरोबर अँगल धरुन फोटो काढलास लेका! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 18:27 नवीन

:-)))) नाही!

:-)))) नाही! तत्व म्हणजे तत्व! फोटोमध्ये मिपाकरच आले पाहिजेत. जे सदस्य नाहीत त्यांचा समावेश का करा? हां, आता आजूबाजूने जाणारे लोक नेमके फोटो काढताना बघून मुद्दाम मधे आले आहेत त्याबद्दल काही करु शकत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
प
प्रभाकर पेठकर Fri, 04/25/2008 - 20:40 नवीन

अपूर्ण....

पुणे मिपा कट्टा परिपूर्ण झाला नाही. नुसत्या ओळखी आणि थोडीफार गंमत जंमत. गोडी अपूर्णतेची लावेल वेड तेंव्हा ..... अशी अवस्था झाली. धमाल मुलाचे मात्र अभिनंदन. (सकाळी उशीरा उठण्याचा गुन्हा माफ करता आला तर...)
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 04/25/2008 - 22:03 नवीन

अवांतर

अवांतरः पण कट्ट्यावर धमुच्या लग्नाविषयी काही चर्चा झाली का नाही? पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 04/25/2008 - 22:45 नवीन

वा! मस्त कट्टा झालेला दिसतोय!!

फोटोही झकास आले आहेत. धमाल्या, आता तू कट्टे भरवायची एजन्सीच घेऊन टाक!! तुझं मेंबरं जमवण्याचं आणि सर्व व्यवस्था बघण्याचं कौशल्य वाखाणण्याजोगं आहे. गुड बॉय! पण धमाल्या एक सांग गुपचुप! आपली प्राजुताई एका डोळ्याने चकणी आहे का रे? नाही म्हणजे फोटोत एकच डोळा दिसतोय, दुसर्‍या डोळ्यावर केस घेतलेत म्हणून विचारतो!!!:)) संत तात्याबांना हल्ली बरेच कट्टे चुकलेले दिसतात. मेंबरांनाही त्यांच्या अपरोक्ष भेटतांना चुकल्या-चुकल्यासारखं होत असेल! तात्याबा, आता तुमचे लाईफ साईझ फोटो काढून ठेवा आणि तुम्ही जर कट्ट्याला जाऊ शकणार नसलांत तर कमीतकमी फोटो तरी पाठवून द्या!! म्हणजे मंडळी त्या फोटोवर चार थेंब (तर्रीचे हो!!!) उडवून मग खाद्यपेयांचा समाचार घ्यायला मोकळी!! कशी आहे आयडिया!!!:))) आणि इनोबा, धमाल्या, शिंच्यानो, मिसळीबरोबर स्लाईस पाव? (फोटो क्र. १) ही पुण्याची पद्धत वाटतं!! अरे मिसळीबरोबर फक्त लादी पाव पाहिजे!! हे म्हणजे कोल्हापूरच्या रम बरोबर गोड शिरा खाण्यापैकी आहे, अरे तिथे कांदा-भजीच पाहिजेत!!:)) आणि धमाल्या फोटोत (क्र. ३) काय आम्हाला फिंगर दाखवतोयस का? साल्या, तिकडे येईन तेंव्हा बघून घेईन तुला!!!! फोटोतून धम्याची बायको नेमकी अदृश्य झालीयं. नाहीतर मिपाची सून पहायला मिळाली असती नाही! तत्व म्हणजे तत्व! फोटोमध्ये मिपाकरच आले पाहिजेत. जे सदस्य नाहीत त्यांचा समावेश का करा? असं काय! बरी सोईस्करपणे तत्वं-बित्वं आठवतात रे तुला!! अरे तुझ्या नाकात वेसण घालणारी सूनबाई आम्हाला बघायला मिळाली नसती का!!!:)) आणि इतकंच असेल तर आम्ही तिला मानद सदस्यत्व देऊ की! काय हो तात्या, करायचा का धमाल्याचा गेम? असो. मित्रांनो, अशीच धमाल करा... आमची आठवण असू द्या... -डांबिसकाका
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 04/25/2008 - 23:02 नवीन

सहमत..

आणि इनोबा, धमाल्या, शिंच्यानो, मिसळीबरोबर स्लाईस पाव? (फोटो क्र. १) ही पुण्याची पद्धत वाटतं!! अरे मिसळीबरोबर फक्त लादी पाव पाहिजे!! हे म्हणजे कोल्हापूरच्या रम बरोबर गोड शिरा खाण्यापैकी आहे, अरे तिथे कांदा-भजीच पाहिजेत!!:)) सहमत आहे रे डांबिसा.. मिसळीसोबत लादीपावच पाहिजे. त्याची चव आणि खुमारी न्यारीच! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
क
कोलबेर Fri, 04/25/2008 - 23:29 नवीन

कोल्हापूरची रम??

हे म्हणजे कोल्हापूरच्या रम बरोबर गोड शिरा खाण्यापैकी आहे, अरे तिथे कांदा-भजीच पाहिजेत!!:))
कोल्हापूरची रम?? ही काय भानगड आहे? गुळ, चप्पल, मिसळ, तांबडा, पांढरा इ. साठी प्रसिद्ध असणार्‍या कोल्हापूरची 'रम'?? आणि पावणं, कोल्हापूरला पण मिसळीबरोबर स्लाईस पावच खातात. 'पाठी कडला पाव आन कट लावुन मिसळ' अशी पेशल आर्डर असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
न
नारदाचार्य Sun, 04/27/2008 - 20:52 नवीन

फोर्ट नॉक्स

ही रम एकदा घेऊन बघा कधी तिकडं गेलात तर (ताजी करवीरकर मंडळी कोणी असतील तर सांगतील काय की ती रम अजूनही मिळते की नाही ते?). सोबत कांदाभजी तर घ्याच, शिवाय पांढरा रस्सा. एका क्वार्टरचे चार पेग करून एखादा शेंगदाणा तोंडात टाकत फौजी स्टाईलनं (म्हणजेच साधारण पंधरा मिनिटाला एक पेग) घेतलीत तर त्यासोबत घोट-घोट पिता-पिता लिटरभर पांढरा रस्सा कधी संपेल हे कळणार नाही. मग पोटात जी आग उसळलेली असेल ती केवळ सुकं, भाकरी, दहीकांदा, तांबडा रस्सा, मधूनच चवीपुरता पांढरा रस्सा यातूनच शमू शकते. आणि जमवताच आलं तर जवळपासच्या एखाद्या खेड्यात जाऊन खऱ्या कोल्हापुरी माणसाच्या घरी बनणारी मुंडी मिळते का पहा (मुंडी म्हणजे काय हे विचारणे म्हणजे तिचा अवमान आहे, असे आम्ही मानतो). मग सुक्याची गरज नाही. दोन्ही रस्से, गूळ, चपला, मिसळ याबरोबरच रम आणि मग तमाशा (आणि साजसुद्धा) ही कोल्हापूरची अनन्यसाधारण वैशिष्ट्ये एकत्र नांदणारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
व
विसोबा खेचर Mon, 04/28/2008 - 06:40 नवीन

वा!

वा! सुंदर प्रतिसाद रे नारदाचार्या! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नारदाचार्य
प
पिवळा डांबिस Sun, 04/27/2008 - 20:28 नवीन

हा, हा, हा!!

वरचा नारदाचार्यांचा प्रतिसाद वाच, कोलबेरसायबा!!:)) मला रमचं नांव आठवत नव्हतं अरे, वुई आर क्लासिक 'ओल्ड स्कूल' सायबा!!!:)) आणि, कोल्हापूरला पण मिसळीबरोबर स्लाईस पावच खातात. खरंच! तसं असेल तर मी एकच म्हणेन, "आरांरां रां रां!:)) -जॉन स्टुअर्टकाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
न
नारदाचार्य Sun, 04/27/2008 - 21:10 नवीन

छ्या...

तुमच्या "क्लासिक 'ओल्ड स्कूल'" या शब्दांनी एकदम जिभेवर फोर्ट नॉक्सची चव आली. मिळते की नाही ती अजून तिथं? कोणी सांगेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
इ
इनोबा म्हणे Sat, 04/26/2008 - 01:09 नवीन

काका

आणि इनोबा, धमाल्या, शिंच्यानो, मिसळीबरोबर स्लाईस पाव? (फोटो क्र. १) ही पुण्याची पद्धत वाटतं!! अरे मिसळीबरोबर फक्त लादी पाव पाहिजे!! हे म्हणजे कोल्हापूरच्या रम बरोबर गोड शिरा खाण्यापैकी आहे, अरे तिथे कांदा-भजीच पाहिजेत!!:)) काका,(फोटू क्र.१)तो फोटू प्राजुताईचा आहे.प्राजुताईनी आंग्लदेशातून आणलेली मिठाई सुद्धा आपून चाखली नाही. आपून फकस्त स्प्राईट (क्लिअर है!) ढोसले. बाकी रमचे म्हणाल तर,आपून ती फकस्त अनंत चतुर्दशीलाच ढोसतो (करंट जास वेळ राहतो,शिवाय त्या दिवशी वासाची फिकीर नसते). त्यामूळे शिराशिरी(मिरवणूकीच्या गर्दीत) आपल्याला माहीत आहे. मात्र खायचा शिरा अजून ट्राय केला नाही. असं काय! बरी सोईस्करपणे तत्वं-बित्वं आठवतात रे तुला!! अरे तुझ्या नाकात वेसण घालणारी सूनबाई आम्हाला बघायला मिळाली नसती का!!!:)) आणि इतकंच असेल तर आम्ही तिला मानद सदस्यत्व देऊ की! काय हो तात्या, करायचा का धमाल्याचा गेम? अगदी बरोबर बोललात काका. एक तर मिपाच्या कट्ट्याला बायकोला घेऊन आला आणि आता आम्हाला तत्व शिकवतोय. द्याच त्याच्या बायकोला सदस्यत्व.'धमाल मुलगा'चा 'हमाल मुलगा' होतो की नाही बघा. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Sat, 04/26/2008 - 09:26 नवीन

असं होय!

काका,(फोटू क्र.१)तो फोटू प्राजुताईचा आहे. मग स्वारी हां! आम्हाला तरी कसं कळणार? आम्हाला वाटलं की तुमच्या पार्टीतलाच आहे!! -डांबिसकाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
इ
इनोबा म्हणे Sat, 04/26/2008 - 10:44 नवीन

काकानू,

मग स्वारी हां! आम्हाला तरी कसं कळणार? आम्हाला वाटलं की तुमच्या पार्टीतलाच आहे!! फोटू पार्टीतलाच हाये,पन प्राजुताईचा आहे. मला येवढंच सांगायचं ह्वतं, की आपून काय तिथली मिसळ खाल्ली नाय. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व
व्यंकट Sat, 04/26/2008 - 01:21 नवीन

मजा

मजा आहे बुवा ! व्यंकट
  • Log in or register to post comments
ब
बगाराम Sat, 04/26/2008 - 01:54 नवीन

वा वा वा

वा वा वा वा!! तोंडाला काय पाणी सुटलं मित्रांनो. पुन्हा एकदा कडकडून भूक लागली मला. मजा आहे!
  • Log in or register to post comments
व
वरदा Sat, 04/26/2008 - 06:06 नवीन

ह्म्म

काका,(फोटू क्र.१)तो फोटू प्राजुताईचा आहे. म्हणजे व्रुत्तांत अर्धवट टाकला म्हणायचा. तिथे काय हादडलं आणि जर मिसळच खाल्ली असेल तर ती कशी दिसत होती ते आम्हाला कोण सांगणार?
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sat, 04/26/2008 - 10:41 नवीन

मिसळ

म्हणजे व्रुत्तांत अर्धवट टाकला म्हणायचा. तिथे काय हादडलं आणि जर मिसळच खाल्ली असेल तर ती कशी दिसत होती ते आम्हाला कोण सांगणार? बाय माझे,तिथं मिसळच हादडली.आणि त्या फोटूतली मिसळ तिथलीच हाये.पर म्या काय खाल्ली नाय ती मिसळ. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
ड
डॉ.प्रसाद दाढे Sat, 04/26/2008 - 16:46 नवीन

चान्स हुकला

ह्या धमाल्याने मला एकदम ऐनवेळी कळविल्यामुळे माझा चान्स हुकला..असो..त्याच॑च आयत्यावेळी ठरल॑..पुन्हा जमणार असाल तेव्हा थोडे आधी कळव बर॑ का रे..म्हणजे मी व भडकमकरसर नक्की येऊ :) आणि तात्या॑नाही यायला जमेल (त्या॑च्या बरोबर एकदा बसायच॑च आहे..;) बाकी पार्टी झक्क जमलेली दिसतेय..आता धमाल्याला मिपाचा अधिकृत राजदूत घोषित करायला हरकत नाही. ह्यावेळेला आमचे 'तवारिखनवीस' विजुभाऊ नव्हते तर मग वाडेश्वराची बखर लिहिण्याची जबाबदारी कोणी घेतली आहे की नाही
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 10:27 नवीन

नक्की नक्की !!!

येत्या रविवारीच पुन्हा एक दुसरा बेत करायचं घाटतं आहे. सांगतो लवकरच :)
आता धमाल्याला मिपाचा अधिकृत राजदूत घोषित करायला हरकत नाही.
:)) :)) :)) आयला, आमचं इंजिन कसंबसं ४५-५० सी.सी. पर्यंत जातं, त्यातून आमच्या सायलेंन्सरच्या नळीत ठासून कार्बन साठलेला....पिकअपच्या नावानं चांगभलं....हां फार तर फार लुना-फिना म्हणा, अगदी वाटलं तर एम५०-एम८० ठीक आहे हो...पण डायरेक्ट "राजदूत"? वाचूनच छातीची धडधड वाढली...आणि हृदयाच्या ठोक्यांतून राजदूतचं फाररिंग ऐकू यायला लागलं ना राव!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
व
विसोबा खेचर Mon, 04/28/2008 - 11:23 नवीन

धमाल्या..

येत्या रविवारीच पुन्हा एक दुसरा बेत करायचं घाटतं आहे. धमाल्या, ४ मे ला येत्या रविवारी पुण्यात अण्णांना भेटायला यायचा विचार करतो आहे रे. संध्याकाळी पुण्यात मस्तपैकी कुठेतरी बसून कट्टा करू.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
प
प्रशांतकवळे Sat, 04/26/2008 - 17:42 नवीन

चालू द्या

चालू द्या! प्रशांत
  • Log in or register to post comments
श
शरद Sat, 04/26/2008 - 19:08 नवीन

मिपा पुणे कट्टा

पुढील वेळे स लादी पाव मा़झ्याकडून.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sat, 04/26/2008 - 21:31 नवीन

मज्जा चालू

मज्जा चालू आहे तुमची... :) तळ्यात मळ्यात चालू आहे तुमचे माझ्यासोबत. मी बंगळुर्/पुण्याला तेव्हा कट्टा मुंबई/ठाण्यात. आता मी ठाण्यात तर कट्टा/ओसरी पुणे/बंगळुर ला... हरकत नाही. एक दिवस गाठतोच तुम्हाला.. ;)
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 04/26/2008 - 22:28 नवीन

मजा करा लेको....

आमच्या गैरहजेरीत कट्टे भरवताय होय. ~X( जुन एंडाला येतोय मी....मग बघुन घेतो एकेकाला. :B असो, फोटो छान आलेत अन् कट्टाही जोरात झालेला दिसतोय..... सर्व कट्टेकर्‍यांचे अभिनंदन! -टिंग्या
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 04/27/2008 - 20:14 नवीन

वा!

फोटो छान आलेत अन् कट्टाही जोरात झालेला दिसतोय..... सर्व कट्टेकर्‍यांचे अभिनंदन!
असेच म्हणतो :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
र
रामदास Sun, 04/27/2008 - 22:43 नवीन

धमूचा फोटो.

मला धमू नी घातलेला शर्ट जाम आवडला.कफ आणि कट टकाटक.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 04/28/2008 - 08:03 नवीन

काय बोलायचे बॉ ???

आमचं आपलं नेहमीप्रमाणे वरातीमागून घोडं .... च्यायला ह्या धम्यानं तिकडं कट्ट्यावर कट्टे भरवून हकडं अमच्या डोक्याला काव आणला आहे ... सालं आमचंच नशिब फुटकं सालं त्याला तो तरी काय करणार ... मस्त रे लेको, लढा ... छान वाटले, मि.पा.चे सदस्य एवढ्या आपुलकीने आणि अगत्याने भेटीगाठी करतात. खरे तर कोण कुठ्ले, एकमेकांना भेटतात, गप्पा मारतात बरं वाटतं वाचतांना आणि पाहतांना O:) आत्तापर्यंत बर्‍याच आंतरजालीय गल्ल्यांमधून हिंडलो पण अशी आपुलकी कुढेच नव्हती आणि नाही ... "तात्याकाम जाबाली " बघतात ना तुम्ही लावलेला वेलू आता कसा गगनावारी चल्ला आहे ... * फोटू पण झक्कास ...* बाकी पेठकर काकांच्या रुपाबद्दल केलीली मनोकल्पना अल्मोस्ट अशीच निघाली. "निलकांत " सामील होताना पाहून आनंद झाला ... बाकी "प्राजूताई " तर उत्सवमुर्ती ; धन्या, इनोबा, विवेक , केसु शेठ आपले नेहमीचे धडाडीचे कार्यकर्ते ... अवांतर : धम्या, मी आता "मे एंन्ड" ला पुन्हा एकदा पुण्याला येणार आहे, तेव्हा बघ जमलं तर ... तुझ्या लग्नाची गडबड आहे पण तरीही प्रयत्न कर ... बाकी तसे आपले आंद्या, इनोबा, विजूभाउ, केसु आहेतच ... अतिअवांतर : "फोटोतून धम्याची बायको नेमकी अदृश्य झालीयं. नाहीतर मिपाची सून पहायला मिळाली असती सगळ्यांना. नाही! तत्व म्हणजे तत्व! फोटोमध्ये मिपाकरच आले पाहिजेत. जे सदस्य नाहीत त्यांचा समावेश का करा?" अरे ऍडजेस्ट माडी, ऍडजेस्ट माडी ... द्यायच काहितरी नाव आणि म्हणायच "आगामी आकर्षण", त्यात काय येवढं ? आम्ही नाय का आगामी आकर्षण"काळोख" म्हणून जाहीर केलं आणि ते बेणं गायब, अगदी तसचं, काय ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा