सांडून येतो..
मला यत्ता चौथी पर्यंत हिंदी यायचं नाही..
शाळेत विषयच नव्हता..
यायचं नाही म्हणजे नाही…अजाबात नाय…
म्हणून जे काही दिसेल ते मराठीतच समजून घ्यायचं..
मुकद्दर का सिकंदर हा सिनेमा..
आम्ही चाळकरी पोरं “मुकंदर का सिकंदर” असं म्हणायचो..
आणि त्याचा अर्थ आमच्या दृष्टीनं लिटरली मराठी होता: “मुकंदर ? …का सिकंदर?” म्हणजे “चहा की कॉफी?” ..
“मुकंदर ऑर सिकंदर ?”.. मेक युअर चॉईस…
कुर्बानी “पिच्चर” मध्ये आप जैसा कोई हे मस्त डिस्को गाणं आलं..
मूळ अर्थ कळत नसल्यानं जे ऐकू येईल ते खरं..
“आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये..तो बाप बन जाये..”
सीरीयसली असंच वाटायचं..जोक करायचा म्हणून नव्हे..
मग थोड्या दिवसांनी..
“आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये..तो वापस जाये..”
असं…
“तोहफा तोहफा..लाया लाया..”असं गाणं सुपरहिट्ट एकदम..
मला त्यात (शिवाजी महाराजांची असते तशी) “तोफ” हा शब्द दिसून मनापासून कोणीतरी युद्धासाठी तोफा घेऊन आलाय आणि तसं गाऊन श्रीदेवीला सांगतोय असं वाटायचं..
“तोफा तोफा लाया लाया..” काय चूक आहे त्यात?
पाण्याच्या टाकी विषयी माहिती देणारं “टाकी ओ टाकी ओ टाकी टाकी टाकी रे..” असंही एक सुंदर गीत होतं..
“प्यार करनेवाले प्यार करते है ‘शाम’ से..” असंही ढिंगचॅक गाणं माझं लाडकं..
‘शान’से हे नंतर कळलं..
पण संध्याकाळपासूनच चौपाटीवर जागा पकडून बसलेली गुटर्गू मंडळी बघून हा माझा अजाण वयातला अर्थही आता बरोबरच वाटतो..
माझा चाळीतला चाळूसोबती मला सिनेमाची स्टोरी सांगत होता..
“….अरे तो प्रेम चोप्रा ना मीनाक्षी शेशाद्रीवर बलात्कार करतो..”
“म्हणजे काय करतो नक्की ?” मी ज्ञानलालासेनं विचारता झालो..
तो थोडा विचारात पडला..
मग …”अरे बलात्कार..म्हणजे हिकडे तिकडे हातबीत लावून सतावतो तिला तो..”
हलकेच मला समजावत तो वदला..
दोघेही तिसरीत होतो..असो..
मराठी, संस्कृत वगैरे मध्येही ऐकून अर्थ लावण्याची बोंबच होती..
“सा विद्या या विमुक्तये” हे शाळेचं बोधवाक्य मला “चावी द्याया विमुक्तये” असं ऐकू यायचं..
अर्थ नाहीच कळायचा..पण चावी किंवा किल्लीशी संबंधित..चावी द्यायला हवी आहे..किंवा तत्सम काहीतरी वाटायचं..
“सदाचार हा थोर सांडू नये तो” हे मला “सदाचार हा थोर सांडून येतो” असं ऐकू यायचं..म्हणजे “मी जरा जाऊन सदाचार सांडतो आणि येतोच परत लगेच..”
”आज ये अंगणा पाहुणा गोजिरा..” अशी कविता होती..
त्यात “श्रावणी न्हातसे..अश्विनी गातसे..” अशी ओळ होती..
मला आमच्या वर्गातल्या त्याच नावाच्या मुली अनुक्रमे नहात आणि गाणं गात आहेत असं डोळ्यासमोर यायचं..
“आली आली सर ही ओली..” हे गाणं ऐकलं की आमच्या रत्नागिरीच्या धुवांधार पावसात भिजून ओले झालेले साळवी सर (सर्वात कडक्क सर..!!) वर्गाच्या दारात आलेत असं वाटायचं..
गंजका खिळा,पत्रा वगैरे लागला की धनुर्वात होतो असं ऐकलेलं..आम्ही एकमेकांना सांगायचो..”अरे पत्रा लागलाय ना तुला..आता तुला धनुर्विद्या होणार”.. की बिचारा कापलेला पोरगा गळफटायाचा..
नगरपालिकेच्या व्यायामशाळेत दर शनिवारी शेंदूर लावून आम्ही सगळे हनुमान स्तोत्र म्हणायचो..
तालीम मास्तर खड्या आवाजात “भीमरूपी महारुद्रा” सुरु करायचे..
खोब-याच्या आशेनं आम्ही उभे असायचो..
त्यात एका ठिकाणी “हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी..” अशी ओळ यायची..
मला एकदम वाटायचं की श्लोक संपले आणि मास्तर काहीतरी “हे धर” म्हणून सांगताहेत..म्हणून एकदा मी “धरायला” पुढेही झालो होतो..
पुढे हायस्कूल सुरु झालं..बरंच काही नीट समजायला लागलं..जमिनीवर टाकून बसायची बस्करं गेली आणि लाकडी बेंच आली..
मग चुपचाप समोरच्या डेस्कात कर्कटकानं खोदखोदून आरपार भोकं पाडण्याची वर्षं सुरु झाली..
मज्जा..!!
याद्या
40364
प्रतिक्रिया
145
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही ही मस्त लेख : )फ्रेन्च
मस्तच. खुप असले. अस
In reply to ही ही मस्त लेख : )फ्रेन्च by शुचि
हाहाहा.. मी त्या तोहफा तोहफा
कहर आहे हा ... नशीब मला
In reply to हाहाहा.. मी त्या तोहफा तोहफा by मस्त कलंदर
झेरॉक्स आणि एक्स-रे
>"हा अमुकतमुक हा अमक्या
In reply to झेरॉक्स आणि एक्स-रे by यकु
खूप खूप आहेत माझ्या आशा
खी खी खी....मलाही असे बरेच
स्वकुलतारकसुता
घारेजी, मी आपला ब्लॉग
In reply to स्वकुलतारकसुता by आनंद घारे
आमच्या शाळेत सकाळी सकाळी
आप जैसा कोई मेरी जिंदगी मी
आप जैसा कोई
In reply to आप जैसा कोई मेरी जिंदगी मी by स्पा
.
In reply to आप जैसा कोई मेरी जिंदगी मी by स्पा
हो आम्ही पन 'बाप' च म्हणायचो
गालावरती गुलाब जामुन आई
In reply to हो आम्ही पन 'बाप' च म्हणायचो by स्पंदना
ढासू लेख
हो.. जाम मजा.न.मा.न. या
In reply to ढासू लेख by नंदू
"या गडे हासू या, या गडे
In reply to ढासू लेख by नंदू
बस मे टिसी
अगदी सिमिलर..
In reply to बस मे टिसी by राजा
खी खी..
..."मधुबन में कन्हैया किसी को
In reply to खी खी.. by योगी९००
बापरे...
In reply to ..."मधुबन में कन्हैया किसी को by गवि
उद्रु???? हे काय आहे..?.
In reply to बापरे... by Mrunalini
सुंदर वासिलिस्का
'रिश्ता नहीं है दोनोंमे
In reply to सुंदर वासिलिस्का by मस्त कलंदर
हिवडा म्हणजे
In reply to 'रिश्ता नहीं है दोनोंमे by गवि
कलंदर साहेब...
In reply to सुंदर वासिलिस्का by मस्त कलंदर
आँ???
In reply to कलंदर साहेब... by समीरसूर
बघा!!
In reply to आँ??? by गवि
हे पहा, माझा अंदाज असा आहे,
In reply to बघा!! by समीरसूर
मस्त
अत्तिशय अनपेक्षित पण छान
In reply to मस्त by sneharani
चान चान. कधी कधी मला मिपावर
परिकथेतील राजकुमार
In reply to चान चान. कधी कधी मला मिपावर by परिकथेतील राजकुमार
परासाहेब, मी काहीही लिहिलं
In reply to चान चान. कधी कधी मला मिपावर by परिकथेतील राजकुमार
हे बघा गवि साहेब..... लेख
In reply to परासाहेब, मी काहीही लिहिलं by गवि
तसे नव्हे. इथे खोचकपणा नाही
In reply to हे बघा गवि साहेब..... लेख by सविता
मी हल्ली मिपा वर येतो ते असे
In reply to तसे नव्हे. इथे खोचकपणा नाही by गवि
>>हे एक मित्रमंडळ आहे सहा
In reply to तसे नव्हे. इथे खोचकपणा नाही by गवि
आता तरी
हो! मी पण!
In reply to आता तरी by राजा
हाहाहा..लेख आणि प्रतिक्रिया
मस्तच! सर्वांचे प्रतिसादही
उध्दवा
हाहाहा. बालपणी आमच्या
भारतातल्या सगळ्या चोरांना
In reply to हाहाहा. बालपणी आमच्या by मृत्युन्जय
ठाण्यात पोचल्या पोचल्या २-३
In reply to भारतातल्या सगळ्या चोरांना by ३_१४ विक्षिप्त अदिती
हिंदी चे आणि माझे पण वाकडेच होते..
In reply to हाहाहा. बालपणी आमच्या by मृत्युन्जय
(विषय दिलेला नाही)
In reply to हिंदी चे आणि माझे पण वाकडेच होते.. by योगी९००
हा हा... एकदम निरागस!
In reply to हिंदी चे आणि माझे पण वाकडेच होते.. by योगी९००
मस्तच
In reply to हिंदी चे आणि माझे पण वाकडेच होते.. by योगी९००
लय भारी
मस्त लेख आणि त्यावरील
(विषय दिलेला नाही)
मी पण् किति दिवस् "मति मंद्
पलदेसी पलदेसी असं डोक्यात
In reply to मी पण् किति दिवस् "मति मंद् by अविनाशकुलकर्णी
"मति मंद तारका..!!"
आजोबांना "नाचत ना गगनात नाथा"
मेवे, ते संकटी पावावे असं
In reply to आजोबांना "नाचत ना गगनात नाथा" by मेघवेडा
१) गवि, तुमचे बरोबर आहे. ते
In reply to मेवे, ते संकटी पावावे असं by गवि
चारी श्रमलो परंतु न बोले
In reply to मेवे, ते संकटी पावावे असं by गवि
छान प्रतिसाद रे मेवे!
In reply to चारी श्रमलो परंतु न बोले by मेघवेडा
छान प्रतिसाद रे मेवे!
In reply to छान प्रतिसाद रे मेवे! by रेवती
मेवे ....__/\__
In reply to चारी श्रमलो परंतु न बोले by मेघवेडा
साई विवाद करता पडलो प्रवाही
In reply to मेवे, ते संकटी पावावे असं by गवि
गविसाहेब.............भन्नाट
मस्त लेखन... चाळूसोबती हा
ह. ह. पु.वा!
"ऐरणीच्या देवा" हे गाणे मी
पैरणीच्या देवा.. हे जाम धमाल
In reply to "ऐरणीच्या देवा" हे गाणे मी by विश्वनाथ मेहेंदळे
अजुन...
साबुदाणा.. हेहेहे.. वाट पाहे
In reply to अजुन... by satish kulkarni
वाट पाहे सजणा असंच आहे
In reply to साबुदाणा.. हेहेहे.. वाट पाहे by गवि
मलाही पटकन खरे काय आहे ते
In reply to वाट पाहे सजणा असंच आहे by कानडाऊ योगेशु
वडिलांचा मार खाता खाता वाचलो..
शालेय वयात शब्दाच्या
In reply to वडिलांचा मार खाता खाता वाचलो.. by योगप्रभू
शंकासमाधान..
In reply to शालेय वयात शब्दाच्या by गवि
पुरेवाट
In reply to वडिलांचा मार खाता खाता वाचलो.. by योगप्रभू
तिसरी/चौथीत असताना मराठीच्या
मेरा कुछ सामान.....!!!
जबरदस्त धमाल करायचात
In reply to मेरा कुछ सामान.....!!! by इन्द्र्राज पवार
मस्त लेख.. जुण्या आठवनी
जिवन गाणे गातच र्हावे
पोटभर हसले...................
धमाल
In reply to पोटभर हसले................... by ज्ञानराम
माला डी माला डी
शाळेत असताना गणपतीच्या
मेलो!
In reply to शाळेत असताना गणपतीच्या by भाग्यश्री कुलकर्णी