बिल्ला आणि नाग हे हिंदी सिनेमातले अवतार झाले.
जसे हिंदी पिच्चर आता सेन्सिबल निघतात, तसेच मराठी "चित्रपटांची" क्वालिटी भलतीच सुधारली आहे. क्वालिटी वॉल्स एकदम.
श्वास्..वळू..नटरंग..काय काय पाहतो आणि ऐकतो. सगळं नवलच..हाय टेक..
माझ्या कोवळ्या मनावर वाईट संस्कार होण्याच्या दिवसांत मराठी सिनेमे कसे झकास होते..
अं..अं..करणारा लक्ष्या..गावरान..
डॅम इट..करणारा महेश कोठारे..शहरी..
अशोक सराफ्..कशातही घाला त्याला व्यंजन म्हणून..अगदी कॉलेज बॉय म्हणूनही..
प्रिया अरुण गावाकडची मैना, म्हणून ती लक्ष्याची.
किशोरी शहाणे, निवेदिता वगैरे महेश कोठारेच्या..
उरेल ती अशोक सराफला..
आपल्या हिरॉईनीला बघितलं की तीन सेकंदात स्वप्न सुरु.
गाणी कध्धी कध्धी न विसरता येणारी..
"खेळ कुणाला दैवाचा कळला..तू असो..मे असो.हा असो.ही असो..कुणी असो.."
"मंगला गं मंगला..गं मंगला गं मंगला..तुझासाठी चंद्रावर मी बांधलाय बंगला.."
....
"साजणा" "दिवाणा" "ये ना" हे सर्वात पेट्ट शब्द..
रुपेरी वाळूत म्हणू नका, माडाच्या बनात म्हणू नका..
मनाच्या धुंदीत.. लहरीत ..मिठीत्..कुशीत..स्वप्नात ..मसणात..
उपरिनिर्दिष्ट सर्व स्थळी "ये ना.."
..अश्विनी ये ना..
..ये ना राणी तू ये ना..
ये ना सजणा ये ना..निशाणा तुला दिसला ना..
आणि हे सर्व कोल्हापूरच्या एखाद्या म्युनिसिपल गार्डन सदृश बागे मधे..
मागे कर्दळीची फुलं..लाल लाल..
हीरो हीरोइनचे ओठ एकामेकांजवळ आले की एकदम ही फुलं एकमेकांना चुंबतात..
घट्ट चटेरी पटेरी टी-शर्ट (जत्रा .आवाज..वगैरे दिवाळी अंकातला गुंड असला टी-शर्ट घालूनच जन्माला येतो.. !!) घातलेला अशोक सराफ आणि निवेदिता (आता ही देखील सराफच..!! व्याडेश्वरा रे.. !!) वगैरे एक हात "हेल मोगेम्बो" केल्याप्रमाणे वर करून एकामेकांपासून दूर दूर तिर तिर तिर तिर करत तिरक्या दिशेत पळत जातात..
असे ....म्हणजेच "नृत्ये : सुबल सरकार.."
वा..मोगेम्बो खुश हुआ..!!
मराठी सिनेमांची नावं आहाहाहा....
चल गम्मत करू..
टोपीवर टोपी..
धमाल बबल्या गणप्याची
थरथराट..
धडाकेबाज..
कमाल माझ्या बायकोची..
हळद रुसली कुंकू हसलं..
खट्याळ सासू नाठाळ सून ..
गंमत जंमत ..
दे दणादण..
हमाल दे धमाल..
....एकूण सगळी धमाल..आणि गोलमाल..!!
वाचने
30440
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यांना खालील गाणी दाखवा …
In reply to अशी ही बनवाबनवी by कांदा लिंबू
त्यांना खालील गाणी दाखवा ...
"हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे"
आणि
"खेळ कुणाला दैवाचा कळला" (तू असो, मी असो, हा असो फेम)
तो लक्ष्मीकांत बेर्डे…
In reply to अशी ही बनवाबनवी by कांदा लिंबू
तो लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांचा गरोदर होऊन डोहाळे जेवणाचा कार्यक्रम तर काय ..... आज सुद्धा कधी कधी बघते.
बनवाबनवी ऑटाफे 😎
In reply to अशी ही बनवाबनवी by कांदा लिंबू
बनवाबनवी ऑटाफे 😎
झेलेअण्णांना कसे विसरलात.
१९६९ मधे अनंत माने दिग्दर्शित एक गाव बारा भानगडी या चित्रपटात निळू फुले या नवोदित कलाकाराला झेले आण्णांची भुमिका दादा साळवी या कसलेल्या मातब्बर कलाकारा च्या आपोझीट करण्याची संधी दिली. निळूभाऊनीं त्या संधीचे सोने केले. आजही झेलम अण्णा लक्षात आहे.
पुढे मुक्काम पोस्ट ढेबेवाडी,सामना,पिंजरा सारख्या अजरामर भुमिका सादर केल्या.
निळूभाऊनी स्टेज ही गाजवले. सखाराम बांईडर आजही लक्षात आहे. लालन सारंग सुलभा देशपांडे व निळूभाऊनीं सखाराम बांईड अजराम केला आहे.
निळू फुले मराठी नाट्य चित्र सृष्टीचा मैलाचा दगड आहे.
त्यांना लेखक, वाचक विसरले किंवा निळूभाऊनां बघीतले नसावे.
निळूभाऊंचे सिनेमे आणि अशोक…
निळूभाऊंचे सिनेमे आणि अशोक लक्ष्या चे सिनेमे यात जमीन अस्मानाचे अंतर आहे.
निळूभाऊ करायचे ते सिनेमे कथानक प्रधान असायचे.
त्यांची तुलना लक्ष्याबेर्डे शी करताच येणार नाही.
मराठी सिनेमावाल्यानी अशोक सराफाना अगदी वाया घालवले. खूप ताकदीचा नट , नाचण्या उड्या मारण्यात आणि फालतू विनोद करनYआत वाया घालवला. अर्थात तो दोष कल्पना दारिद्र्य तसेच आर्थिक दारिद्र्य असणाऱ्या मराठी निर्मात्यांचा आहे.
अशोक सराफ आणि निळुभाऊंचां चोरीचा मामला नावाचा सिनेमा आहे. पहा कधीतरी. अशोक सराफ तेंव्हा नवीन होते.
'चोरीचा मामला' पाहिलाय. खूपच…
In reply to निळूभाऊंचे सिनेमे आणि अशोक… by विजुभाऊ
'चोरीचा मामला' पाहिलाय. खूपच चांगला चित्रपट आहे. त्यात अशोक सराफ असल्याचे स्मरत नाही. हा चित्रपट दूरदर्शनवर प्रदर्शित करण्यास बंदी आहे. यामागील कारण माहिती नाही.
अशोक सराफ त्यावेळेस नवखे…
In reply to 'चोरीचा मामला' पाहिलाय. खूपच… by श्रीगुरुजी
अशोक सराफ त्यावेळेस नवखे होते.
त्यानी त्यात नेपाळी गुरख्याची भुमीका केली आहे.
निळूभाऊंचे सिनेमे,@विजूभाऊंशी सहमत.
In reply to निळूभाऊंचे सिनेमे आणि अशोक… by विजुभाऊ
अशोक सराफ हे खरोखरच ताकदीचे कलाकार. यांचा "चौकट राजा ", दिलीप प्रभावळकर, सविता प्रभुणे आणी सुलभा देशपांडे या ती ताकदीच्या कलाकारांसोबत आशोक मामा सुद्धा तेवढ्याच ताकदीने उभे आहेत.
बाकी, लक्ष्या, कोठारे,सचिन पिळगावकर यांचे सिनेमे वन टायमर ओके. अर्थात मला वाटते. इतरांना वाटावे असे नाही.
जबरा विषय अन् कोझी आठवणी
पहिले पर्व - अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर
अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर या त्रयीने १९८०-९० च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीचा विनोदी सुवर्णकाळ गाजवला. सचिन यांचे कल्पक दिग्दर्शन, अशोक सराफ यांची अचूक संवादफेक आणि 'लक्ष्या'ची अफाट ऊर्जा या तिघांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना भुरळ घातली.
‘अशी ही बनवा बनवा’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘गंमत जंमत’, ‘भुताचा भाऊ’ आणि ‘आयत्या घरात घरोबा’ हे आजही तितकेच लोकप्रिय आहेत. निखळ कौटुंबिक विनोद, दर्जेदार पटकथा आणि श्रवणीय संगीत ही या सिनेमांची मुख्य ताकद होती. या त्रिकुटाने मराठी सिनेसृष्टीला कधीही न विसरता येणारे सदाबहार मनोरंजन दिले.
दुसरे पर्व म्हणजे अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे -
महेश कोठारे, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या त्रिकुटाने मराठी चित्रपटसृष्टीत थरार आणि विनोदाचा एक नवा प्रयोग यशस्वी केला. महेश कोठारे यांचे भव्य दिग्दर्शन व तांत्रिक कौशल्य, अशोक सराफ यांची करारी तरीही विनोदी शैली आणि 'लक्ष्या'ची भन्नाट 'फिजिकल कॉमेडी' यांची केमिस्ट्री अप्रतिम जुळून आली. 'धूमधडाका', 'दे दणा दण', 'थरथराट' आणि 'झपाटलेला' यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांना निखळ मनोरंजना सोबतच उत्कृष्ट ॲक्शन व स्पेशल इफेक्ट्स दिले. महेश यांचा कल्पक दृष्टिकोन आणि दोघांची अचूक विनोदी वेळ यामुळे लक्ष्या महेश ही खास जोडी सुद्धा प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिली.
(सिने रसिक) खोंडे
सचिन पिळगावकर तेच का? जे…
In reply to जबरा विषय अन् कोझी आठवणी by वृषभ खोंडे
सचिन पिळगावकर तेच का? जे अमिताभ बच्चन ह्यांचे सिनियर आहेत? शोलेत गब्बरसिंग ला एक्टिंग शिकवणारे?
महेश कोठारे, अशोक सराफ आणि…
In reply to जबरा विषय अन् कोझी आठवणी by वृषभ खोंडे
महेश कोठारे, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या त्रिकुटाने मराठी चित्रपटसृष्टीत थरार आणि विनोदाचा एक नवा प्रयोग यशस्वी केला.
यात विशेष गोष्ट म्हणजे महेश कोठारे आणि अशोक सराफ यांचा पहिला आणि एकमेव सिनेमा , धूमधडाका. तो सुपरहिट झाला आणि पुढे त्या दोघांच्यात काही गैरसमज किंवा वितुष्ट आल्याने ते कधीही एकत्र आले नाहीत.
कधीही नाही म्हणजे अगदी आजतागायत नाही असं नव्हे, पण ज्या दशकाने मराठी चित्रपटसृष्टी गाजवली, त्या ऐतिहासिक काळात ते पुन्हा कधीच एकत्र पडद्यावर दिसले नाहीत.
बऱ्याच वर्षांनंतर खुद्द महेश कोठारे यांच्याच दिग्दर्शनाखाली शुभमंगल सावधान (साधारण २००५-६ असावे) या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं. मधल्या काळात गैरसमज मिटले असावेत.
पुढे सचिनच्या "आयडियाची कल्पना" मध्ये महेश आणि अशोक एकत्र दिसले होतेच, तरीही तोपर्यंत बरीच पानं रिकामी उलटून गेली होती. नंतर इतर एखाद्या बॅनर खाली अलीकडच्या काळात पुन्हा दिसले असतील देखील एकत्र पडद्यावर. पण कोठारे सराफ (आणि बेर्डे) असं पर्व म्हणावं इतके सिनेमे त्यांचे दुर्दैवाने निघू शकले नाहीत. मोजून एकच धूमधडाका निघाला. अशोक सराफ मुख्यतः सचिन सोबत काम करत राहिले आणि इतर काही बॅनर्स देखील याच टाईपचे कॉमेडी सिनेमे करत होते त्यांच्याही सोबत त्यांनी काम केलं. वाजवा रे वाजवा (बहुधा गिरीश घाणेकर) किंवा इतरही काही.