Skip to main content

तीन वेगळेच अनुभव!!

Published on बुधवार, 10/11/2010
जेव्हा मी घराबाहेर पडले, तेव्हा मला घराचा अर्थ समजला. जेव्हा मी मित्रांबाहेर पडले तेव्हा मला, मैत्रीचा अर्थ समजला. जेव्हा मी शहराबाहेर पडले तेव्हा मला, ओळखीच्या रस्त्यांचा अर्थ समजला. जेव्हा मी राज्याबाहेर पडले तेव्हा मला, भाषेचा अर्थ समजला. जेव्हा मी देशाबाहेर पडले तेव्हा मला, देशप्रेमाचा अर्थ समजला. जेव्हा मी मृत्युबाहेर पडले तेव्हा मला, जीवनाचा अर्थ समजला. पण मी जेव्हा स्वतःच्या बाहेर पडले तेव्हा सुद्धा मला जातीचा अर्थ समजला नाही. - मी एक जात (जात नाही ती जात) ********************************************************************************** मी आयुष्यात खुप वाईट दिवस पाहिले आहेत, जगात असा दुसरा कुणी असुच शकत नाही. मी आयुष्यात एवढे मित्र कमावले आहेत, जगात असा दुसरा कुणी असुच शकत नाही. मी आयुष्यात एवढे धोके खाल्ले आहेत, जगात असा दुसरा कुणी असुच शकत नाही. मी एवढा विचारी माणुस आहे, जगात असा दुसरा कुणी असुच शकत नाही. मी सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळाच माणुस आहे, जगात असा दुसरा कुणी असुच शकत नाही. *********************************************************************************** सगळं नश्वर आहे, माहित आहे, पण तरी एक शाश्वत आधार हवा आहे. मृत्यु हा अटळ आहे, माहित आहे, पण तरी निरंतर जीवनाची एक आशा आहे. उन लागणार आहे, माहित आहे, पण तरी वळवाची सर येईल असा विश्वास आहे. काळोख पसरतोय, माहित आहे, उजेडाचा एक कण चमकेल अशी एक प्रार्थना आहे. शांतता कानाचे पडदे फाडतेय, माहित आहे, पण तरी, प्रेमाची एक हाक येइलच असा पाठीवर एक हात आहे, एक हात आहे. ************************************************************************************* आपला, मराठमोळा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 2881
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

तळ्यावर फिरायला जायची वेळ बदल. प्रो. देसाई तुला भेटतात आणि इथे .....

उन लागणार आहे, माहित आहे, पण तरी वळवाची सर येईल असा विश्वास आहे.
या ओळी सर्वात सुरेख..! (उन्हातान्हातला) तात्या.

एक पहाटेच्या प्रतिक्षेत दुसरा नैराष्य व आशावाद ह्यात गुरफटलेला तिसरा ज्ञानी होऊ पाहाणारा सारे वाटसरु जिवन हा स्मशान येई पर्यंत चालावा लागणारा रस्ता तो किती सखद व अविस्मरणिय करायचा तो स्वतः च्या हातात.

छान. खुपच छान.

म. मो. काय मोळी बांधुन समोर टाकली काय? म्हन्जे आम्ही बसतो रवंथ करत. ऑलरेडी सुरु झालाय्...र वं थ ! डोक्यात.

हा परत गुढघ्यात गेलाय.. अरे कोणी आहे का रे याच्या आसपास तिकडे उसाला.. नाही जरा ४ दिवस ठेवून घ्या आपल्या घरी!! एकटा जीव सदाच शिवशिव!!!! ;) अवांतरः चांगलं लिहिलं आहेस रे! :)

In reply to by राघव

आज सॉल्लीड फटकेबाजी चाललीये रे तुझी! मगाशी किल्लेदाराच्या धाग्यावर आता इथे :) असो. राक्या, फक्त दोन शब्दात सांगू? " सावर रे"