श्री.छोटा डॉन यानी वरील प्रतिसादात संस्कृतीच्या अनुषंगाने काही विचार मांडले आहेत त्याला प्रत्युत्तर नव्हे तर त्यांचाच मुद्दा पुढे न्यावा म्हणून....
बाकी हिंदु म्हणजे काय हो ? ह्यात मध्येच कुठे धर्म आला ?
ठीक आहे....संशोधनाअंती हे सर्वदूर मान्य झाले आहे की, 'सिंधू' नदीच्या काठी वसलेल्या, फुललेल्या संस्कृतीच्या प्रसाराला (प्रचाराचे रूप देऊन) 'हिंदू कल्चर' हा शेला मिळाला. पण तो काही 'धर्म' नव्हता हे जितके खरे तितकेच हेही खरे की 'मास लेव्हल'चे जीवनशकट निर्धोकरितीने चालविण्यासाठी काहीनी काहीना 'प्रमुख' पदाचे ग्रहण करण्यास भाग पाडले आणि तिथे वर्तनात एकवाक्यता आणण्यासाठी काही 'लॉ' स्थापित केले (अनुभवातून, गरजेतून वा दबाव कायम राखण्यासाठी....जनावरापेक्षा 'माणूस' वेगळा, म्हणून मोठा आहे हा इगो तोपर्यन्त प्रवेश करता झालाच होता). हे 'लॉ' - 'नियम' म्हणजेच एक सुखाने जगण्यासाठी प्रस्थापित केलेली एक जीवनशैली, जिला सर्वमान्यता त्या त्या काळात (बाय हूक ऑर बाय क्रूक) मिळत गेली...मिळविली गेली. टोळीपद्धतीने राहिलेल्यांचे 'नियम' म्हणजे त्यानुसार जगणे आणि जगण्याचे नियम पाळण्याची धारणा म्हणजे धर्मपालन. थोडक्यात एका संस्कृतीने ती जपण्यासाठी केलेले नियम म्हणजेच धर्म. (अर्थात त्याला मग पुढे 'देव' पण आले, भीती आली, त्यामुळे 'देव' नावाच्या अज्ञाताला भजणे आले, त्याची भीती घालून त्याच्या भोवती कुंपण घालणे आले...इ.इ. ~ वेगळा विषय !). व्यापक अर्थाने पारमार्थिक गोष्टींच्या नियमासही धर्मच म्हणण्यात येऊ लागले, मग ते नियम कुणी केले, का केले, कुणाच्या फायद्यासाठी केले, प्रत्यक्ष ते नियम करणारे पाळतात की नाही या बाबी दुय्यम मानल्या गेल्या. चपखलपणे स्वर्ग, नरक, जन्म, पुनर्जन्म, जीव, जगत यांचे परस्परसंबध या सार्यांचा समावेश 'धर्म' या संज्ञेतच केला गेला आणि त्याचे पालन म्हणजेच ईश्वरी आज्ञेचे पालन हे सोयीस्कररित्या त्या संस्कृतीच्या छायेत बसलेल्या सर्वांच्या मनावर बिंबविण्यात आले.
धर्म आणि राष्ट्र वगैरे व्याख्या नंतर निघाल्या, संस्कृती त्याहुन पुरातन आहे.
~~ १००% सहमत....
उत्तर भारतात "मराठे" जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांना "जात" अपेक्षित असते की विशिष्ठ भागात राहणारा समुदाय ?
~~ या ठिकाणी मी 'उत्तर भारतात' याची व्याख्या माझ्यापुरती 'पंजाब, हरियाणा आणि दिल्ली' इतक्या मर्यादित भागापुरती घेतो, कारण याच तीन भागात मी फिरलोय, राहिलोय, अभ्यास केलेला आहे, अगदी देशाच्या राजधानीपासून सिरसा, रोहटक, पंचकुला या ग्रामीण बाज असलेल्या हरियाणाच्या तर गुरदासपूर, संगरूर, कपूरथळा या पंजाबी जिल्ह्यात राहिलो आहे, तेथील लोकात मिसळलो आहे. दिल्लीचा विषय थोडा बाजुला सोडू या, पण या पाचसहा ग्रामीण 'टच' असलेल्या जिल्ह्यात मी पाहिले की, एकतर हे लोक (विशेषतः ज्येष्ठ या व्याख्येत येणारे) समोर दिसणारी व्यक्ती ही आपलीच आहे असे प्रथम मानतात, म्हणजे असे की, मी एका 'अ' चा मित्र किंवा 'ब' चा बिझिनेस पार्टनर म्हणून त्यांच्या घरी गेलो की त्या क्षणापासून मी त्याच घरातील एक सदस्य बनलोच....अगदी आपल्याकडील 'अरेतुरे' या लेव्हलवर....खाण्याचा तर माराच होतो...तब्येतीवर हसतखेळत जोक्स होतात. तो पर्यंत मी एक 'इन्द्रा', त्यांच्या मुलाचा मित्र/सहकारी/भागीदार या नात्याने, आणि दिल्लीतून आलोय एवढेच त्यांच्या गावी असते. मग केव्हातरी सुशेगात तो 'अ' माझ्याविषयी घरातील पुरुष मंडळीना ओळख करून देतो. त्यावेळी ही माहिती येते की आपल्या बलबीरचा 'इन्द्रा' मित्र हा महाराष्ट्रातील आहे. या क्षणाला किमान दोन म्हातारे तरी 'ओये पहले क्यूं बोला नै रे पुत्तर तू ये ! अरे वा भाइ वा ये इन्दर तो अप्ने शिवजी (शिवाजीचा अपभ्रंश...) की मिट्टी का है बोले तो !" असे म्हणत परत पाठीवर हात. अगदी असाच नसला तरी प्रत्येक ठिकाणी प्रथमच जाईन तिथे समकक्ष अनुभव येत होता. थोडक्यात पंजाब आणि हरियाणा या ठिकाणी आलेल्या महाराष्ट्रातील पाहुणा म्हणजे 'शिवजी के गाववाला' हाच तुरा आणि स्वागताची रित तर सर्वत्र एकाच धाटणीची असते....मन:पूर्वक म्हणजे मनःपूर्वक. मग केव्हातरी रात्री अंगणात चारपाईवर पडल्या पडल्या गप्पा रंगताना त्यातील कुणीतरी केव्हातरी महाराष्ट्रात उमेदीची वर्षे घालविलेला निघतोच निघतो. मुंबई तर कॉमन झाली पण पुण्यातील 'खडकी कॅन्टोनमेंट' च्या आठवणी निघत नाहीत अशी एकही रात्र जात नाही.
पण का कोण जाणे....या सहाही जिल्ह्यातील ज्या ज्या घरी मी गेलो (किमान अठरावीस तरी होतीलच) त्यापैकी कुणीही मला 'जात' विचारली नाही. मी हिंदू आहे हे त्यांनी गृहित धरले होतेच...पण ब्राह्मण की मराठा की अन्य बहुजन समाजी...याची विचारपूस एकदाही झाली नाही. अर्थात माझे 'पवार' या आडनावाने त्यांनी काही तर्क बांधले असतील तरी ते त्यांनी कधीही दाखविले नाही. स्वागत आणि पाहुणचार मात्र आजही पहिल्या भेटीसारखाच असतो. (मलाही माझे मित्र बलबीर अरोरा, कृपाल धुपिया, रणधीर धालीवाल, रवी बादल यांची 'जात' काय आहे हे बिलकुल माहिती नाही, मी या सर्वांना शिख असेच समजतो. यांच्यातही सेगमेन्ट असतातच. पण वरकरणी मात्र हे सातत्याने एकजुटीनेच राहात असल्याचे चित्र दिसतेच.)
(या भागातील अन्य कुणाचे असे अनुभव असल्यास वाचायला आनंद होईल.)
इन्द्रा
इंद्रा, तुझ्या उत्तरेतला अनुभव बरोबरच आहे. तुझ्या त्या मित्रांना 'मराठा' ही जात म्हणून माहितच नसेल. माझ्या ओळखीचे दक्षिण -उत्तरेतले लोकं मराठा हा शब्द जातीविषयक नाही तर प्रांत-भाषा विषयक म्हणूनच वापरतात. ते मला मराठा किंवा घाटी म्हणतात. अशावेळेस जर मी त्यांना 'मी जात पात मानत नाही' असं सांगत बसले तर...??
मी बर्याच इराकी, इराणी, तुर्की लोकांबरोबर काम करते, ही लोकं हिंदी, हिंदू ,हिंदीस्तान, इंडीस्तान हे शब्द समानअर्थी शब्द म्हणून वापरतात. एका कुर्दीश पिझेरिया मधे मी पिझा खायला जाते ते लोकही मला हिंदू म्हणतात ( भारतीय या अर्थाने , कारण आमच्यामधे कधीही धर्माबद्दल बोलणं झालेलं नाही ). इथेही मला ते कोणत्या अर्थानं म्हणत आहेत हे माहित असतं .
मी वरील दोन्ही उदाहरणातील बाबी शब्दशः न घेता त्यातलं मर्म जाणून घेते.
इतकच म्हणावस वाटत की Look at the the Spirit, Not just the Letter
श्री. इन्द्रा आणि पुष्करिणी ह्यांचे दोन्ही प्रतिसाद छान आहेत.
मला मांडायचा होता तो मुद्दा ह्या प्रतिसादांतुन पुरेसा स्पष्ट झाला आहे.
भारताबाहेर 'हिंदु' ही अजुनही बर्याच अंशी धर्माची ओळख नसुन एका संस्कृतीची ओळख आहे असे आम्हाला वाटते, आम्हीही ४ देशांच्या लोकांबरोबर राहिलो आहे व धर्म आणि संस्कृतीवर बर्याच लंब्याचौड्या गप्पा मारल्या आहेत.
त्यातल्या अनुभवांचे सार म्हणुन "तु हिंदु का?" ह्या परदेशी प्रश्नाचे उत्तर देताना त्यांना आपला धर्म नको असुन आपला "प्रदेश" महत्वाचा असतो हे जाणण्याइतपत शहाणपण आले आहे.
अजुन एक गंमत सांगतो, आमचा एक मित्र आहे नॉर्थ-ईस्ट मधला, धर्माने ( आणि नावानेही ) ख्रिश्चन आहे व तसाच एक केरळी ख्रिश्चन मित्र आहे, पण त्यांची ओळख बाहेर मात्र 'हिंदु'च आहे बरं का.
इनफॅक्ट 'हिंदु' हा जसा धर्म आहे तशीच ती भारताची संस्कृती आहे हे त्यांना मान्य आहे.
----------------------------------------------------------------
आता जरासा अंमळ विनोद.
कणेकरांच्याच स्टायलीत मी शहराजाद ह्यांचे वाक्य सांगतो.
"मै तुम्हारे सामने हिंदु की हैसियत से नहीं बल्की भारतीय की हैसियत से खडा हुं. म्हणजे काय ? अरे तुच ना तो ? ह्या २-२ हैसियती आल्या म्हणुन काय आतला तु बदलतोस का ? मग कशाला हे सगळे ? "
विनोद ( कळला असल्यास ) संपला.
बाकी चालु द्यात ....
- ( बाहेर एकच हैसियस सांगणारा ) छोटा डॉन
धर्म, जात, देश, प्रांत, एथ्निसिटी, संस्कृती या शब्दांनी दर्शवल्या जाणाऱ्या गोष्टी या म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह असल्याप्रमाणे चर्चा चालू आहे हे पाहून गंमत वाटली. अमुक कपडा शर्ट आहे, जॅकेट आहे की बंडी आहे यावर वाद चालावा त्याप्रमाणे. तसंच या सगळ्या गोष्टी अपरिवर्तनीय आहेत हे गृहीतकही कुठच्या पायावर मांडलं जातं ते कळत नाही. म्हणजे एकेकाळी डुकरासारखा दिसणारा प्राणी हा आता उत्क्रांत होऊन हत्तीसारखा झाला तरी त्याला डुक्करच म्हणण्याचा हट्ट विनोदी वाटतो. एक छत्री तिच्या काड्या, कापडं, मुठी अनेक पिढ्या बदलत राहिली तर ती मूळ छत्री कशी राहील?
काही हजार वर्षांपूर्वी एका विशिष्ट ठिकाणी राहाणारे लोकांची एक विशिष्ट संस्कृती होती, म्हणे. हेसुद्धा गृहीतकच आहे - कारण इतक्या प्रचंड प्रदेशावर पसरलेल्या छोट्या छोट्या टोळ्यांमध्ये संस्कृतीची एकसंधता होती यावर विश्वास बसत नाही - देव एक नाही, पूजापद्धती एक नाही, जीवनपद्धती एक नाही, वर्णव्यवस्था सगळीकडे असेल नसेल, रोटीबेटी व्यवहार फक्त पंचक्रोशीत... म्हणजे फरसाणवाल्याकडच्या शेव, गाठ्या, चणे, दाणे, कुरमुरे असल्या डब्याकडे बघून ते एकच फरसाण आहे असं म्हणायचं. मग हेच फरसाण भारतभर पसरलं. ठिकठिकाणी उत्क्रांत झालं, व त्यातली व्हेरिएबिलिटी वाढली. हजारो वर्षांच्या उलथापालथीनंतर आता प्रत्येकाच्या हातात मूठभर काही तरी खिचडी आहे. ही प्रत्येकाची सारखीच व ती म्हणजे ते हजारो वर्षांपूर्वीचं फरसाण आहे हे म्हणणं अतीव धार्ष्ट्याचं आहे.
सगळे हिंदी भाषिक हिंदू नसतात, सगळे हिंदू हिंदी बोलत नाहीत, आणि सगळे भारतीय हिंदू किंवा हिंदीभाषिक नसतात
या विधानात लेखिकेने सगळा अर्क मांडलेला आहे. हिंदू हा शब्द जर इतका ढिसाळ असेल तर की त्याची व्याख्या म्हणजे अं..भारतात जे राहतात ते.. अशी होत असेल तर तो कितपत उपयुक्त आहे? मुळात जर भारतीय व हिंदू हे एकमेकांना प्रतिशब्द असतील तर ही हिंदूची खिचडी टाळून शुद्ध स्पष्ट भारतीय हा शब्द का वापरू नये? गर्व से कहो हम भारतीय है, हे कमीपणाचं आहे का?
>>त्याची व्याख्या म्हणजे अं..भारतात जे राहतात ते.. अशी होत असेल तर तो कितपत उपयुक्त आहे?
व्याख्येबद्दल उहापोह वरती एका प्रतिसादात केलेला आहेच.
केवळ येथे राहणारे अशी व्याख्या अपुर्ण आहे
>>मुळात जर भारतीय व हिंदू हे एकमेकांना प्रतिशब्द असतील तर ही हिंदूची खिचडी टाळून शुद्ध स्पष्ट भारतीय हा शब्द का वापरू नये?
अगदी असेच म्हणतो..
पण हा वाद जर फक्त शब्दवापरण्या बद्दलच चालू असेल तर मग सगळ्या भारतीय खिचडीऐवजी हिंदू हा शब्दच का वापरू नये..
वरच्या बर्याच अनुभवांवरून हे स्पष्ट होते की हिंदू हा शब्द जगात सर्वत्र माहीतही आहे आणि जगाला भारतीय या अर्थी मान्यही आहे.
* हा प्रतिसाद फक्त गुर्जींच्या मुद्द्यांना उत्तर म्हणुन दिलेला आहे..
हिंदू आणि भारतीय ह्यां दोन कप्प्यांमधे बराच ओवरलॅप असला (बर्याचदा भारतीय हेच हिंदू असल्याने) तरी त्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. हिंदू धर्माच्या एक्स्लुजीव अश्या कितीतरी गोष्टी आहेत ज्या भारतीयतेच्या व्याख्येत येत नाहीत.
मूळात हिंदू धर्म हा अतिशय सैलसर विचारांचा असल्याचा फायदा घेऊन अश्या गोष्टी हिंदू समजण्यासाठी आवश्यक नाहीत म्हणून काही लोक त्या सिलेक्टीवली गाळून टाकून सगळे एकाच भारतीय ह्या कप्प्यात कोंबण्याचे प्रयत्न करतात. त्याची खरंच गरज आहे का?आपण सारे भारतीय आहोत हा एकच कॉम डिनॉमीनेटर पुरेसा नाही का?
प्रतिक्रिया
प्रभाकर , आपला माय-मराठी
उत्तर भारत आणि मराठा
इंद्रा, तुझ्या उत्तरेतला
मस्त ...
>>बाहेर एकच हैसियस सांगणारा )
शब्दांचा घोटाळा
फार छान प्रतिसाद. ह्या
गुर्जी आले.. गुर्जी आले..
>>सगळ्या भारतीय खिचडीऐवजी
हिंदू आणि भारतीय ह्यां दोन