✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हिंदुत्व आणि भारतीयत्व

श
शहराजाद यांनी
गुरुवार, 09/09/2010 - 11:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
28717 वाचन

💬 प्रतिसाद (110)

प्रतिक्रिया

उपोषण

इन्द्र्राज पवार
Fri, 09/10/2010 - 10:23 नवीन
"इंद्रदेवांना सुरा, अप्सरा वगैरे बंद करावी म्हणून उपोषणालाही बसावं म्हणतो.." ~ खर्‍या इंद्रदेवांसाठी बसणार असाल तर जरूर बसा (तेही तक्रार करणार नाहीतच...); पण माझ्यासाठी बसणार असाल तर काही उपयोग ईल्ला ! 'सुरे' ची संगत लागलेली नाही, अप्सरांची साथ लाभलेली नाही. त्यामुळे अजूनही गोबीच्या वाळवंटातून 'चल अकेला, चल अकेला...' चालूच आहे. अल्ला भला करे ! इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

ह्या घाग्याची एवढी महती नाही!

यशोधरा
गुरुवार, 09/09/2010 - 15:16 नवीन
ह्या घाग्याची एवढी महती नाही! :D
  • Log in or register to post comments

महती नाही ?!

दिपोटी
गुरुवार, 09/09/2010 - 18:16 नवीन
धागाकर्तीने अतिशय संयतपणे व प्रामाणिक शब्दांत आपला मुद्दा मांडला आहे ... मुद्दा सुध्दा विचार करण्याजोगा निश्चितच आहे. तर आता या धाग्यात 'एवढी' महती नसल्यासारखे आपल्याला काय आढळले ? का आपण पाळता तो हिंदू धर्म न पाळणार्‍या व्यक्तीचा धागा अनुल्लेखाने मारण्यातच आपल्याला धन्यता मानायची आहे ? आपणास इतके असुरक्षित वाटावे असे काही मला तरी या धाग्यात काहीच आढळले नाही ... खरे तर शहराजाद यांचा धागा व त्याला अभिषेक, नगरीनिरंजन, समीरसूर, चिंतातुरजंतू, इन्द्रराज यांचे प्रतिसाद वाचनीय व मननीय आहेत. - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मी हिंदू धर्म पाळते हे

यशोधरा
गुरुवार, 09/09/2010 - 18:41 नवीन
मी हिंदू धर्म पाळते हे कशावरुन? दुसरे असे, की धागाकर्ती मला जेव्हा हा प्रश्न विचारेल तेह्वा मी उत्तर द्यायचे की नाही हे बघेन. आपल्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही. सबब अनुल्लेख. धन्यवाद. :) तिसरे असे की जिथे तिथे प्रत्येक धाग्यावर उपदेशामृत पाजायची व आपण किती ग्रेट आहोत हे दाखवायची गरज मला भासत नसते. माझा प्रतिसाद अवलियांना उत्तर होते. त्यांना समजले, तुम्हांला समजले नाही तरी चालण्याजोगे आहे. चिंजं ह्यांचे प्रतिसाद उत्तम आहेत ह्याबद्दल सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी

पटलं तर बघा

दिपोटी
Fri, 09/10/2010 - 05:50 नवीन
यशोधरातै, १) अर्थातच 'आपण हिंदू आहात' हे माझ्या वरील दुसर्‍या प्रश्नासाठी निव्वळ एक उदाहरण म्हणून गृहित धरले आहे. मात्र माझा हा प्रश्न लागू होण्यासाठी हे गृहितक खरे असायला पाहिजेच असे नाही. आपण हिंदू नसून ज्यू, पारशी, ख्रिश्चन वा अन्यधर्मीय असला तरी माझा प्रश्न लागू होतोच. २)
धागाकर्ती मला जेव्हा हा प्रश्न विचारेल तेह्वा मी उत्तर द्यायचे की नाही हे बघेन. आपल्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही.
बांधील नाही ??! कमाल आहे. आपण सर्व या संस्थळावर येतो व प्रतिसाद देतो ते चर्चेत सहभागी होण्यासाठी येतो. अशा चर्चेत जेव्हा धागाकर्ती/कर्त्याकडून व त्या अनुषंगाने धाग्यातील प्रतिसादकर्ती/कर्त्याकडून सुध्दा प्रश्न विचारला जातो, तेव्हा उत्तराची अपेक्षा ठेवली जाते यात काहीही गैर नाही. चर्चा पुढे नेण्यास याने हातभारच लागतो. हा केवळ बांधिलकीचा प्रश्न नसून औचित्याचा व संस्थळावरील सभ्यतेचा सुध्दा मुद्दा आहे. अर्थात 'फक्त धागाकर्ती/कर्त्यालाच प्रतिसाद देणार, प्रतिसादकर्ती/कर्त्याला नाही' असा आपला संकुचित विचार असता तर हे (पटण्यासारखे नसले तरी) निदान समजण्यासारखे होते. पण अन्य धाग्यांवर आपण दिलेले बरेच प्रतिसाद पाहिले तर असाही आपला विचार नाही हे कळते. (आशा आहे की 'फक्त आपल्या कंपूतील प्रतिसादकर्त्यांनाच उत्तर/प्रतिसाद देणार' असा पर्यायी संकुचित विचार सुध्दा आपण ठेवत नसाल). ३)
त्यांना समजले, तुम्हांला समजले नाही तरी चालण्याजोगे आहे.
माझ्या प्रामाणिक प्रश्नांना असे आक्रमक (अवलियांचा 'उर्मट' शब्द वापरणे मी टाळत आहे) 'उत्तर' आले याचे कारण माझ्या आकलनाबाहेर आहे. वर नमूद केल्याप्रमाणे आपण अवलियांना व्यनि न पाठवता जेव्हा या जाहीर चर्चेतच उत्तर दिले तेव्हाच आपला प्रतिसाद या चर्चेचा एक घटक झाला. ही (व अन्य कोणतीही) जाहीर चर्चा सर्वांसाठी आहे, तेव्हा अशा जाहीर चर्चेत 'तुम्हाला समजले नाही तरी चालेल' हे विधान निश्चितच थोडे पळखाऊ वाटते. तेव्हा उत्तरांची अजूनही अपेक्षा ठेवत आहे. आपल्या सोयीसाठी प्रश्न परत एकदा विचारीत आहे : या धाग्यात 'एवढी' महती नसल्यासारखे आपल्याला काय आढळले ? का आपण पाळता तो हिंदू (वा अन्य कोणताही) धर्म न पाळणार्‍या व्यक्तीचा धागा अनुल्लेखाने मारण्यातच आपल्याला धन्यता मानायची आहे ? धन्यवाद. - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

दिपोटी ह्यांच्याशी पूर्ण सहमत

आमोद शिंदे
Fri, 09/10/2010 - 08:06 नवीन
दिपोटी ह्यांच्याशी पूर्ण सहमत आहे. अकारण द्वेष केला जात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी

वाचतोय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/09/2010 - 18:57 नवीन
परदेशातील अनुभव वाचण्यासारखे आहेत, वाचतोय....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

असाच पण काहिसा उलटा अनुभव मला

प्रशान्त पुरकर
गुरुवार, 09/09/2010 - 19:16 नवीन
असाच पण काहिसा उलटा अनुभव मला द. कोरिया मध्ये नेहमी येतो....बरयाच कोरियन लोकाना द. अशियाइ लोक म्हणजे फक्त पाकिस्तानी / मुस्लिम असतात असा समज आहे... बरयाचदा स्वतःहुन येऊन 'सलम अलेकुम' म्हणतात.... :(
  • Log in or register to post comments

इंग्लंड मधे लोकांना हिंदू

पुष्करिणी
गुरुवार, 09/09/2010 - 19:43 नवीन
इंग्लंड मधे लोकांना हिंदू धर्म बर्‍यापैकी माहिती आहे, कदाचित त्यांची भारत वसाहत होता म्हणूनही असेल. पण टीव्हीवर मात्र कुठलीही धर्मावर आधारित चर्चा फक्त इस्लाम आणि ख्रिश्चन ( क्वचित ज्यूंवर ) असते. हिंदू, बौद्ध, जैन, शीख इ. धर्मांबद्द्ल अगदी रेअरली काहीतरी ऐकायला मिळतं. जर्मनीत माझ्या कंपनीच्या डेटाबेस मध्ये माझा धर्म 'OTHERS' असा लिहिलाय ( कारण हिंदू असा ऑप्शन नाही ) आणि लोकं मला तू 'बुडिस्ट' आहेस ना असं विचारायची ; पण आता त्यांना मी 'हिंडू' आहे असं कळलेलं आहे ...मीही हिंडू धर्मातल्या सगळ्या मज्जा त्यांना चवीनं सांगत असते..:)
  • Log in or register to post comments

हिंडू!

पैसा
गुरुवार, 09/09/2010 - 19:51 नवीन
क्या बात है! "बुडिस्ट" वर आणखी एक "रामायण" चालू आहे, तेही इकडे आणावे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

आणाहो पैसा ताइ, आपल्यालाही

पुष्करिणी
गुरुवार, 09/09/2010 - 19:58 नवीन
आणाहो पैसा ताइ, आपल्यालाही थोडा नवा/जुना इतिहास -भूगोल कळेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हिंडू

विकास
Fri, 09/10/2010 - 00:45 नवीन
मला वाटते "हिंडू" हा मुळचा मराठी शब्द आहे. विशेष करून आयटी क्षेत्रातले पण इतरही भारतीय व्यावसायीक कामानिमित्त/प्रोजेक्टनिमित्त इकडून तिकडे हिंडत असतात त्यांना "हिंडू" असे म्हणतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

शहराजाद

टिउ
गुरुवार, 09/09/2010 - 20:02 नवीन
स्वतःला निधर्मी म्हणवता आणी आयडी मात्र नेमका 'धर्मदर्शक' निवडलात...ईंट्रेस्टींग!
  • Log in or register to post comments

धर्मदर्शक??

शहराजाद
Fri, 09/10/2010 - 01:13 नवीन
स्वतःला निधर्मी म्हणवता आणी आयडी मात्र नेमका 'धर्मदर्शक' निवडलात...ईंट्रेस्टींग!
माझा आयडी तुम्हाला धर्मदर्शक वाटला, हेच 'ईंट्रेस्टींग' वाटते. आता यशोधरा हे बुद्धाच्या पत्नीचे नाव, म्हणून ते बौद्धधर्मदर्शक म्हणाल का? एखाद्याला निव्वळ ते नाव आवडले म्हणूनही घेता येते. शाहरुख हे नाव अर्थ आवडला म्हणून किंवा आवडत्या नटाचे म्हणून देखील कोणी घेऊ शकतोच. जालावरचे आयडी ठरवताना सर्वच बाबतीत तुम्ही जसे आहात तीच व्यक्तीमत्व निवडायची का? निधर्मी म्हणवणाऱ्यांनी चार्वाक वगैरेसारखीच नावं घ्यावीत आणि धर्मश्रद्धांनी आपापल्या धर्माशी संबंधितच नावे घ्यावीत असे थोडेच आहे? एखादे नाव वेगवेगळ्या गोष्टींसाठी आवडू शकते. माझा आयडी म्हणजे 'परीकथेतल्या वजीरकन्ये'चे नाव आहे. मला माहीत असलेली फोड - शहर + आजाद अशी आहे. तो अर्थ आणि वाङमयीन संदर्भ मला आवडला. खलास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ

तसं नाही!

टिउ
Fri, 09/10/2010 - 01:53 नवीन
एखाद्याला निव्वळ ते नाव आवडले म्हणूनही घेता येते.
बरोबर आहे. पण यशोधरा आयडी घेउन 'बुद्धधर्मात काही अर्थ नाही' किंवा शाहरुख आयडी घेउन 'ईंडस्ट्रीतले सगळे खान टुकार आहेत' असं म्हटलं की भुवया उंचावणारच! (यशोधरा किंवा शाहरुख या आयडींचे विचार असे आहेत असं म्हणायचं नाहीये). आयडी निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहेच की. तुम्ही परदेशी लोकांचं धर्माविषयी प्रबोधन करता पण आयडी मात्र असा निवडला म्हणुन मला आश्चर्य वाटलं. बर्याच लोकांचे विचार प्रत्यक्षात 'अनोळखी' लोकांचं प्रबोधन करण्याइतके कट्टर नसतात त्यामुळे त्यांचे आयडी वाचुन आश्चर्य वाटत नाही. जालावर काय, सगळेच प्रबोधनकार असतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शहराजाद

आयडी मात्र असा निवडला'असा '

शहराजाद
Fri, 09/10/2010 - 04:50 नवीन
आयडी मात्र असा निवडला
'असा ' म्हणजे धार्मीक असे तुम्हाला अभिप्रेत आहे असे वाटते. ( तसे नसल्यास असा म्हणजे कसा ते कळवावे) मुळात, हे नाव निधर्मी लोकांना न शोभणारे, धार्मीकांनाच शोभणारे आहे असे मला वाटत नाही. त्याबद्दल मी वरच्या प्रतिसादात लिहिले आहेच. माझी धर्मविषयक वैयक्तिक निवड आणि शहराजाद आयडी यांचा संबंध नाही. तसेच एखादा आयडी निवडण्यामागे वेगवेगळी कारणेही असू शकतात.
पण यशोधरा आयडी घेउन 'बुद्धधर्मात काही अर्थ नाही' किंवा शाहरुख आयडी घेउन 'ईंडस्ट्रीतले सगळे खान टुकार आहेत' असं म्हटलं की भुवया उंचावणारच!
ह्याचा इथे संबंध काय? मी वरील लेखात कुठल्याच धर्माला, व्यक्तींना 'टुकार' , 'अर्थ नाही' असे म्हटलेले नाही. लेखामध्ये, 'मी स्वतः रूढार्थाने कुठलाही धर्म पाळत नाही' एवढेच म्हटलेले आहे, आणि ते पुढील उत्तराच्या संदर्भात आले आहे. शहराजाद आयडीने हे लिहिण्यात मला काही गैर वाटत नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ

हॅहॅहॅहॅहॅहॅ

वेताळ
गुरुवार, 09/09/2010 - 20:07 नवीन
अजुन काय काय शोधता येते का पहा.
  • Log in or register to post comments

च्छ्या:! काय बॉ झोल

धमाल मुलगा
गुरुवार, 09/09/2010 - 20:09 नवीन
च्छ्या:! काय बॉ झोल आहे? सिंधूनदीकाठचा देश तो हिंदूस्थान, त्या हिंदूस्तानात राहणारे ते हिंदू... हा मुलभुत मुद्दाच आपल्याकडच्या मानसिकतेमधून पुरता पुसला गेलाय हेच खरं. मग उडतात तिच्यायला फटाके कुठल्याशा बेकर्‍यांत आणि मॉलमध्ये! पण इतर देशांमध्ये कुठेतरी हे मूळ अजुन ठाऊक दिसते आहे हाच काय तो दिलासा. अवांतरः ३००+ च्या वाटचालीकरिता शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

सिंधूनदीकाठचा देश तो

सुहास..
गुरुवार, 09/09/2010 - 21:00 नवीन
सिंधूनदीकाठचा देश तो हिंदूस्थान, त्या हिंदूस्तानात राहणारे ते हिंदू... हा मुलभुत मुद्दाच आपल्याकडच्या मानसिकतेमधून पुरता पुसला गेलाय हेच खरं. >>>. धम्या !! एक मिनीट ??? सर्वात पहिले आपल्याला 'हिंदु' म्हणुन कोणी,कधी, का आणी कोठे संबोधले गेले याचा अभ्यास कर आधी .. बाकी..आम्ही कुठे-कुठे चपात्या लाटल्याची जाहिरातबाजी करायची म्हणुन नाही ...पण अगदी' डाऊन-टाऊन'ला, मला लुटताना,मार खाणार्‍यांनापासुनही माझ भारतीय-हिंदु-मराठीपण ' लपुन राहिले नाही. असो .नेहमीप्रमाणे 'अर्धवट' माहीती असणारा/घेणारा चुकार धागा...(या वाक्याचा आमचे मित्र'अर्धवट' अथवा समस्त विषयातं पारंगत असलेले 'अर्धवटराव' यांच्याशीही संबध नाही)...त्यामुळे चालु द्या ..वाटल तर लिहील अन्यथा सध्या फाटा मोकळाच आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

>>सर्वात पहिले आपल्याला

धमाल मुलगा
गुरुवार, 09/09/2010 - 21:11 नवीन
>>सर्वात पहिले आपल्याला 'हिंदु' म्हणुन कोणी,कधी, का आणी कोठे संबोधले गेले याचा अभ्यास कर आधी .. नक्कीच सायबा! त्यात तुझी मदत झाली तर आवडेलच. फक्त त्या दस्तऐवजांची विश्वासार्हता पुरेपुर असावी इतकंच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

बरं बरं !!

अर्धवटराव
Fri, 09/10/2010 - 02:51 नवीन
-समस्त विषयातं पारंगत असलेले 'अर्धवटराव'... आम्हि त्या सर्व विषयांच्या शिकवण्या देखील घेतो. सद्ध्या बॅच फुल्ल आहे मात्र !! (मास्तर) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

संस्कृती की धर्म ?

छोटा डॉन
गुरुवार, 09/09/2010 - 21:02 नवीन
बेश्ट, आम्ही अशाच प्रतिसादाची वाट पहात होतो. च्यायला आजकाल काही लेख वाचुन भयंकर वैताग आणि कीव यायला आहे स्वतःचीच, तत्वज्ञान आणि तार्किक क्रिडेलाही एक लिमिट असावे ... असो, जाऊ द्यात ...
सिंधूनदीकाठचा देश तो हिंदूस्थान, त्या हिंदूस्तानात राहणारे ते हिंदू... हा मुलभुत मुद्दाच आपल्याकडच्या मानसिकतेमधून पुरता पुसला गेलाय हेच खरं.
+१, हेच आमचे मत आहे. शहराजाद ह्यांचे अंडरस्टँगिंग नेमके उलटे आहे व त्याणी हटकुन चुकीचा असा मेसेज तिथपर्यंत पोहचवला. "हिंदु" म्हणजे नक्की काय ह्याची परकियांना ( पक्षी : परदेशात राहणार्‍या नॉन्-भारतियांना ) पुरेपुर ओळख करुन देण्याचा चान्स त्यांनी उगाच तात्विक उच्चभ्रुतेच्या नादात फुकट घालवला असे आमचे वैयक्तिक मत आहे. बाकी हिंदु म्हणजे काय हो ? ती आहे एक संस्कृती, कसली ह्याचे उत्तर फार गहन आहे, आम्हाला कळालेले नाही हे स्पष्ट मान्य करतो. पण जे काही लोक सिंधुनदीच्या आसपास रहात होते, ज्यांनी स्वतःची एक संस्कृती विकसिक केली आणि आपल्याबरोबर ते ती ठिकठिकाणी घेऊन गेले आणि त्यांच्यासोबत ज्यांनी ज्यांनी ती संस्कृती, विचारधारा, जीवनपद्धती वगैरे आत्मसात केले ते सर्व हिंदु ... ह्यात मध्येच कुठे धर्म आला ? आजकाल काही हाय प्रोफाईल सेलेब्रिटी "हिंदु" होतात ते काय त्यांनी 'ख्रिश्चन' हे ओळख मिटवायला का ? अहो त्यांना ह्या 'हिंदु संस्कृती'चे तत्वज्ञान भावले असते, त्यांना त्यातुन काहीतरी चांगले हवे असते. "मी हिंदु नाही , भारतीय आहे " हा उगाच तात्विकपणा शुद्ध बिनडोकपणा झाला ( हे शहराजाद ह्यांना उद्देशुन नाही ), भारत हा आजचा ( ऑफिशियली म्हटले त ६० वर्षे, अंदाजे ३०० वर्षे च्या पुढे नाही ), हिंदु संस्कृती हजारो वर्षे जुनी आहे. धर्म आणि राष्ट्र वगैरे व्याख्या नंतर निघाल्या, संस्कृती त्याहुन पुरातन आहे. आपल्या भारतात राहणार्‍यांची हिंदु ही ओळख धर्मामुळे नसुन इथल्या सिंधु नदीच्या प्रदेशात विकसीत झालेल्या आणि नंतर आख्ख्या भारतात फोफावलेल्या 'हिंदु संस्कृती' मुळे आहे, त्यात मग सगळेच धर्म आणि जाती येतात ... जाऊ द्या, बाकी तात्विक चर्चा झान चालु आहेत. वाचताना डोके दुखते आहे तरीही वाचतो आहे, छान छान मजेशीर अतर्क्य तर्क आणि उच्चभ्रु मते वाचायला मज्जा येते आहे. अवांतर : आता महाराष्ट्र सोडुन भारताच्या इतर भागात प्रचलित असलेल्या "मराठे, मरगठ्ठे, मरहट्टे" बद्दल इथल्या थोर तात्विक अभ्यासकांचे आणि चिंतकांचे मत वाचायला आवडेल. उत्तर भारतात "मराठे" जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांना "जात" अपेक्षित असते की विशिष्ठ भागात राहणारा समुदाय ? अतिअवांतर : चर्चा चालु द्यात, अनेक मतेही येऊद्यात पण ही चर्चा नक्की कशासाठी आहे ते आधी ठरवा. म्हणजे कसे "बेटिंग"च्या प्रतिसादांपक्षी आम्हाला इतर 'थोर तात्विक आणि चिंतनीय मते' वाचण्याचा अनुभव मिळेल ( टीप : हे मत 'छोटा डॉन' ह्या सदस्याचे वैयक्तिक असे प्रामाणिक मत समजावे. बाकी सर्व काही उत्तम !!! - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

>>उत्तर भारतात "मराठे" जेव्हा

धमाल मुलगा
गुरुवार, 09/09/2010 - 21:09 नवीन
>>उत्तर भारतात "मराठे" जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांना "जात" अपेक्षित असते की विशिष्ठ भागात राहणारा समुदाय ? क्या बात है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

उत्तर भारतात "मराठे" जेव्हा

सुहास..
गुरुवार, 09/09/2010 - 21:17 नवीन
उत्तर भारतात "मराठे" जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांना "जात" अपेक्षित असते की विशिष्ठ भागात राहणारा समुदाय ? >> आम्हाला एकदा 'मर्द-मराठा' संबोधल्याचे आठवले ...असो ... अवांतर : आजकाल म्हणजे ..'राज ठाकरे-मनसे' आल्यानंतर, तामीळानंतर 'मराठी' हा शब्द बाकी भारतीयांसाठी 'दखल-पात्र' झालाय हे मात्र खरे......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

>>बाकी हिंदु म्हणजे काय हो

पक्या
गुरुवार, 09/09/2010 - 22:37 नवीन
>>बाकी हिंदु म्हणजे काय हो ? >>ती आहे एक संस्कृती, कसली ह्याचे उत्तर फार गहन आहे, आम्हाला कळालेले नाही हे स्पष्ट मान्य करतो. पण जे काही लोक सिंधुनदीच्या आसपास रहात होते, ज्यांनी स्वतःची एक संस्कृती विकसिक केली आणि आपल्याबरोबर ते ती ठिकठिकाणी घेऊन गेले आणि त्यांच्यासोबत ज्यांनी ज्यांनी ती संस्कृती, विचारधारा, जीवनपद्धती वगैरे आत्मसात केले ते सर्व हिंदु ... ह्यात मध्येच कुठे धर्म आला ? हे असे आहे तर मग माझ्या तुमच्या धर्माचे नाव काय? आपल्याला (मला वा तुम्हाला) कोणी विचारले तुमचा धर्म कुठला? तर हिंदू असे उत्तर देणे चूक की बरोबर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

धर्म = वैदिक. कागदोपत्री धर्म

धमाल मुलगा
गुरुवार, 09/09/2010 - 22:41 नवीन
धर्म = वैदिक. कागदोपत्री धर्म = हिंदू द्वेषासाठी धर्म = हिंदू आणि जगात पसरलेल्या इतर बर्‍याच देशांच्या दृष्टीनं देश = हिंदू! काय पक्याभौ, वाचा की राव बाकीचेपण प्रतिसाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

कागदोपत्री धर्म हिंदू ना - मग

पक्या
Fri, 09/10/2010 - 00:45 नवीन
कागदोपत्री धर्म हिंदू ना - मग आपण हिंदूच. (आपण म्हणजे ज्यांच्या कागदोपत्री तशी नोंद आहे किंवा तशी नोंद नसली तरी ज्यांना भविष्यात कधी करावी लागली तर) जर एखाद्याला विचारले तुझा धर्म कुठला आणि त्याच्या कागदोपत्री हिंदू अशी नोंद नसेल तर त्याने म्हटलेले 'मी हिंदू नाही' हे योग्यच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आणि जगात पसरलेल्या इतर

धमाल मुलगा
Fri, 09/10/2010 - 16:16 नवीन
आणि जगात पसरलेल्या इतर बर्‍याच देशांच्या दृष्टीनं देश = हिंदू!
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

परफेक्ट !!

अर्धवटराव
Fri, 09/10/2010 - 02:47 नवीन
संस्कृती आणि रिलीजन (धर्म मुद्दाम म्हणत नाहि... हा एक आणखी अवांतर विषय होईल ;) ) यांची उत्तम उकल करुन दाखवलीत डॉनोबा !! (धर्मी) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

सहमत

Pain
Fri, 09/10/2010 - 14:12 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

आसिंधू सिंधु पर्यंता यस्य

अर्धवट
गुरुवार, 09/09/2010 - 20:38 नवीन
आसिंधू सिंधु पर्यंता यस्य भारतभूमीका. पितृभू पुण्यभुश्चैव स वैर्हिंदुरितीस्मृतः (मिपावरचे संस्कृतपंडीत आमच्या चुका दाखवून सुधारणा करतीलच... नाना, मेव्या.. जरा बघा की रे..)
  • Log in or register to post comments

स वै हिंदुरिति स्मृतः

विकास
गुरुवार, 09/09/2010 - 20:55 नवीन
खालील भाग हा स्वा. सावरकरांच्या "हिंदूत्वाच्या व्याख्येतून" घेतलेला आहे. त्यावर त्यांचा अजून खूप उहापोह आहे. पण सगळा येथे देत नाही... ----------------------------------------
आसिंसिंधुपर्यंता यस्य भारतभुमिका | पित्रूभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृतः || हिंदू हा शब्द हिंदूसंघटनाचा केवळ पायाच होय. त्यामुळे त्या शब्दाचा अर्थ ज्या मानाने व्यापक वा आकुंचित, बळकट अथवा ढिला, चिरंतन वा चंचल त्या प्रमाणातच त्या पायावर उभारलेले हे हिंदुसंघटनाचे प्रचंड बांधकाम व्यापक, भक्क, टिकाऊ ठरणारे आहे. वेद ह्या धर्म ग्रंथापासून त्याचे अनुयायांचे नांव वैदिक हे जसे पडले, बुद्ध या नांवावररून त्या धार्मिक अनुयायांचे नाव जसे बौद्ध, जिनमताच्या अनुयायांचे नाव जैन, नानकाच्या धर्मशिष्या<चे नांव जसे शिख, विष्णू देवतेचे उपासक वैष्णव, लिंगपूजक ते जसे लिंगायत, तसे हिंदू हे नाव कोणत्याही धर्मग्रंथावरून, धर्मसंस्थापकावरून वा धर्ममतावरून मुख्यतः वा मुलतः निघालेले नसून आसिंधुसिंधु विस्तारलेल्या देशास नि त्यात निवसणार्‍या राष्ट्रासच मुख्यतः निर्देशणारे आहे. आणि अनुषंगाने त्याच्या धर्मसंस्कृतींनाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

अर्थात हा श्लोक

अर्धवट
गुरुवार, 09/09/2010 - 21:05 नवीन
अर्थात हा श्लोक तात्यारावांचाच आहे.. फक्त हिंदुत्वाच्या व्याख्येविषयी काही उद्बोधक चर्चा चाललेली दिसलेली म्हणुन इथे दिला.. मुद्दा असा की.. एका विशीष्ठ भूभागावर राहणारे लोक अशी काही व्याख्या नाहिये. इतर दोन पॅरामीटर पण आहेतच.. एका पंडीतांनी लगेच आमचा व्याकरणात बाटलेला श्लोक ठाकठोक करून दिला... हा घ्या शुद्धीकृत श्लोक आसिंधुसिंधूपर्यंता यस्य भारतभूमिका। पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृतः॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

खुलासा

विकास
गुरुवार, 09/09/2010 - 21:18 नवीन
अर्थात हा श्लोक तात्यारावांचाच आहे.. फक्त हिंदुत्वाच्या व्याख्येविषयी काही उद्बोधक चर्चा चाललेली दिसलेली म्हणुन इथे दिला. तुम्ही तुमच्या नावावर दिला वगैरे मी म्हणले नव्हते अथवा तसा उद्देश नव्हता. गैरसमज नसावा... माझ्या प्रतिसादात जे काही श्लोकाखाली दिले आहे, ते सावरकरांचेच शब्द आहेत माझे नाहीत असे म्हणायचा उद्देश होता. एका विशीष्ठ भूभागावर राहणारे लोक अशी काही व्याख्या नाहिये. या संदर्भात थोडे अधिक सावरकर उवाच: या साठीच हिंदु शब्दाची व्याख्या कोणत्याही धर्मग्रंथाशी वा धर्ममताशीच तेवढी बांधून टाकण्याचे प्रयत्न दिशाभूल करणारे ठरतात. हिंदू शब्दाच्या व्याख्येचा मूल ऐतिहासिक पाया आसिंधुसिंधु भारतभुमिका हाच असला पाहिजे. तो देश नि त्यात निपजलेल्या धर्माच्या नि संस्कृतीच्या बंधनांनी अनुप्राणित झालेले राष्ट्र हेच हिंदुत्वाचे दोन प्रमुख घटक होत. म्हणूनच हिंदुत्वाची इतिहासाला शक्यतो धरून असलेली व्याख्या अशीच केली पाहीजे की, आसिंधुसिंधु भारतभुमिका ही ज्याची पितृभू नि पुण्यभू आहे तो हिंदू यातील पितृभू नि पुण्यभू हा शब्दांचा कोणत्याही व्याख्येत योजलेल्या शब्दांना असतो तसा, थोडासा पारिभाषिक अर्थ आहे. "पितृभू" म्हणजे जिथे आपले आईबाप तेव्हढेच निपजले ती, असा अर्थ नव्हे, तर प्राचीन कालापासून ज्या भूमीत परंपरेने आपले जातीय नि राष्ट्रीय पूर्वज निवसत आले ती, असा अर्थ होतो. काही जण पटकन शंका घेतात की, आम्ही दोन पिढ्या आफ्रिकेत आहोत. मग आम्ही हिंदू नाही की काय? ती शंका यामुळेच अगदी उथळ ठरते. आमच्या हिंदूंनी सार्‍या पृथ्वीवर जरी वसाहती स्थापिल्या तरी त्यांची प्राचीन, परंपरागत, जातीय नि राष्ट्रीय पूर्वजांची पितृभू अशी ही भारतभूमीच असणार. "पूण्यभू"चा अर्थ इंग्लिश "होलीलँड" ह्या शब्दातील अर्थ होय. ज्या भूमीत एखाद्या धर्माचा संस्थापक ऋषि, अवतार वा प्रेषित (पैंगंबर) प्रकटला, त्या धर्मास उपदेशिता झाला, त्याच्या निवासाने त्या भूमीस धर्मक्षेत्राचे पुण्यत्व आले, ती त्या धर्माची पुण्यभू. जशी ज्यूंची वा ख्रिश्चनांची पॅलेस्टाइन, मुसलमानांची अरेबिया. अशा अर्थे पुण्यभू शब्द वापरलेला आहे. नुसत्या पवित्रभूमी या अर्थी नव्हे. पितृभू नि पुण्यभू शब्दांच्या ह्या पारिभाषिक अर्थी हि आसिंधुसिंधु भारतभुमिका ज्याची ज्याची पितृभूम्नि आणि पुण्यभूमि आहे तो हिंदू! हिंदूत्वाची ही व्याख्या जितकी ऐतिहासिक तितकीच, आजच्या वस्तुस्थितीला अगदी धरून आहे. ती जितकी सत्य तितकीच इष्ट आहे, जितकी व्यापक तितकीच व्यावर्तकही आहे. संदर्भः सावरकर एक अभिनव दर्शन - स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विविध विषयावरील निवडक लेख. मूळ संदर्भस्त्रोतः सह्याद्री : मे १९३६
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

सुरेख विश्लेषण!

मेघवेडा
गुरुवार, 09/09/2010 - 21:34 नवीन
सुरेख विश्लेषण! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

सहमत

पैसा
गुरुवार, 09/09/2010 - 21:54 नवीन
१००%
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

माझी समजूत

सुनील
गुरुवार, 09/09/2010 - 23:59 नवीन
हिंदू ह्या शब्दाच्या वरील व्याख्येनुसार, मूळ भारतीय वंशाचे हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख हे हिंदू ठरतात. ह्या व्यतिरिक्त अन्य समाज हे अहिंदू ठरतात. अशा अहिंदूंत, जसे बालीतील हिंदू येतात तसेच भारतातील मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू आणि पारशीदेखिल येतात. ही माझी समजूत खरी आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

तसे नाही

विकास
Fri, 09/10/2010 - 00:43 नवीन
हिंदू हे नाव कोणत्याही धर्मग्रंथावरून, धर्मसंस्थापकावरून वा धर्ममतावरून मुख्यतः वा मुलतः निघालेले नसून आसिंधुसिंधु विस्तारलेल्या देशास नि त्यात निवसणार्‍या राष्ट्रासच मुख्यतः निर्देशणारे आहे. आणि अनुषंगाने त्याच्या धर्मसंस्कृतींनाही.
ज्यांची भारताशी जन्माने अथवा वंशाने (अर्थात अनिभांच्या पुढील पिढ्या) अथवा स्वेच्छेने आणि म्हणून पर्यायाने भारतीय संस्कृतीशी नाळ जोडली गेली आहे त्यांना हिंदू म्हणावे असा याचा अर्थ आहे. त्या संदर्भात मी सावरकरांचे इतरत्रही वाचलेले आठवते पण आत्ता माझ्याकडे संदर्भ नाही. वर "हिंडू" (Hindoo) हा शब्द देखील आला आहे. जो आधी वापरला जायचा. त्याचा पहीला अर्थ देखील विकीमधे भारतातून आलेले असाच दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

एक शंका

आमोद शिंदे
Fri, 09/10/2010 - 08:12 नवीन
ज्यांची भारताशी जन्माने अथवा वंशाने (अर्थात अनिभांच्या पुढील पिढ्या) अथवा स्वेच्छेने आणि म्हणून पर्यायाने भारतीय संस्कृतीशी नाळ जोडली गेली आहे अशा मुसलमानांचे काय? तेही हिंदूच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

>>म्हणून पर्यायाने भारतीय

अर्धवट
Fri, 09/10/2010 - 11:46 नवीन
>>म्हणून पर्यायाने भारतीय संस्कृतीशी नाळ जोडली गेली आहे अशा मुसलमानांचे काय? तेही हिंदूच का? अशी नाळ खरोखर जुळली असेल तर नक्कीच.. केवळ मुसलमानच नव्हे तर ख्रिश्चन वगैरेही.. म्हणजे त्यांना काही हरकत नसेल तर.. अर्थात एकदा हिंदू हा शब्द एवढ्या व्यापक अर्थाने घेतल्यावर त्यांची हरकत नसावी असा प्राथमीक अंदाज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

>>म्हणजे त्यांना काही हरकत

आमोद शिंदे
Fri, 09/10/2010 - 17:52 नवीन
>>म्हणजे त्यांना काही हरकत नसेल तर.. इथेच तर गोची आहे ना. त्यांना हरकत का नसावी? हिंदू धर्म हा जिवनपद्धती वगैरे असला तरी ती एक अठरापगड गोष्टींची खिचडी आहे. अनेक देवता त्यांची मुर्तिपूजा इ. गोष्टी हिंदू जिवनपद्धतीच येणार ना? मग ह्या लोकांना हरकत का नसावी? आणि दुसरे म्हणजे ह्या लोकांना हरकत असली तर लगेच वरील व्याख्येचा व्यत्यास करुन त्यांची नाळ भारतीयत्वाशी खरोखर जुळलेली नाही असे म्हणून त्यांच्या देशप्रेमावर शंका उत्पन्न केल्या जाणार. हिंदू हा शब्द एवढ्या व्यापक अर्थाने घेतल्यावर हरकत नसावी असे तुम्ही म्हणता. पण तो इतक्या व्यापक अर्थाने घेतला जातो का? सर्वसाधारण व्यवहारात आपण हिंदूंच्या चालिरीती आणि मुसलमानांच्या/ख्रिश्चनांच्या चालिरीती असा भेद का करतो? चर्च मधे जाणे, कुराण वाचणे, ख्रिसमस साजरा करणे ह्या सगळ्या हे लोक व्यापक अर्थाने हिंदू असल्याने हिंदू चालिरीतीच असे म्हणायची तुमची तयारी आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

व्यापक

विकास
Fri, 09/10/2010 - 19:55 नवीन
हिंदू हा शब्द एवढ्या व्यापक अर्थाने घेतल्यावर हरकत नसावी असे तुम्ही म्हणता. पण तो इतक्या व्यापक अर्थाने घेतला जातो का? सर्वसाधारण व्यवहारात आपण हिंदूंच्या चालिरीती आणि मुसलमानांच्या/ख्रिश्चनांच्या चालिरीती असा भेद का करतो? तसा व्यापक अर्थाने शिकवला जात नाही, म्हणून घेतला जात नाही. आता इथेच साधे उदाहरण बघा, आपल्याच वरील वाक्यात आपण म्हणता: "हिंदू हा शब्द एवढ्या व्यापक अर्थाने घेतल्यावर हरकत नसावी असे तुम्ही म्हणता." आता यात अधोरेखीत केलेला भाग म्हणत माझ्यासारखी व्यक्ती पुढे असे देखील म्हणू शकते की, "मग ह्या हिंदू व्याख्येमधेच काही गैर नाही आणि तशी ती पाळली तर उत्तमच होईल, कारण त्यातून रिलीजन हा भाग निघूनच जाईल." ही चर्चा एका अर्थी सावरकरांनी केलेल्या हिंदू शब्दाच्या व्याख्येवरून चाललेली आहे. वास्तवीक सावरकर हे पूर्ण नास्तिक होते असे म्हणता येईल असे त्यांचे विचार होते. एका लेखात त्यांनी या अर्थाचे स्पष्ट पणे म्हणलेले आहे की (आठवणीतून), "मला हिंदू शब्दाचे पण काही धर्म अर्थाने पडलेले नाही... मात्र जो पर्यंत जगात इतर धर्म आहे आणि त्या धर्मांच्या नावाने राज्यकर्ते आहेत तो पर्यंत हिंदू हा शब्द मला माझ्या ओळखीसाठी महत्वाचा वाटतो." म्हणूनच त्यांनी हिंदू हा शब्द जो खर्‍या अर्थाने जगात तेंव्हा तर जास्तच वापरला जात होता त्या अर्थाने म्हणजे भौगोलीक अर्थाने वापरला आणि प्रचलीत करायचा प्रयत्न केला. चर्च मधे जाणे, कुराण वाचणे, ख्रिसमस साजरा करणे ह्या सगळ्या हे लोक व्यापक अर्थाने हिंदू असल्याने हिंदू चालिरीतीच असे म्हणायची तुमची तयारी आहे का? हा रिलीजनच्या डबक्यात अडकून विचार करणे झाले. अहो कुराण आणि ख्रिसमसचेच काय घेऊन बसलात. येथे आजही दक्षिणेत शैव म्हणजेच काय ते खरे मानणारे आहेत आणि त्यांचे वंशज आता अमेरिकेत देखील भेटतात... "हिंदू" व्याख्येचा आणि रिलीजनचा संबंध नसून जी शतकानुशतके/सहस्त्र वर्षांमध्ये तयार झालेली भारतीय संस्कृती आहे तीला आपले म्हणणे ह्याच्याशी आहे. मी रिलीजनने बुद्ध नसलो तरी मी बुद्धाला आपलाच मानतो आणि जैन नसलो तरी महावीरास... धर्माने वेगळे असून अनेक मुस्लीम, ख्रिश्चन आणि ज्यू हे भारतीय संस्कृतीस आपले मानताना दिसतातच. त्यात माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आहेत आणि अगदी सध्याच्या लोकप्रिय नटांमधील अमीर/शहारूख पण तसे वाटतात. शाहरूख खानची बरखा दत्त ने घेतलेली मुलाखत तर पाहण्यासारखी आहे... त्याच बरोबर तुकारामाच्या रंगात रंगणारे फादर थॉमस डाबरे पहा. विद्यार्थीदशेत बॉस्टनमधे एका भाड्याच्या घरात रहाताना आमचा घरमालक हा केरलाईट ख्रिश्चन होता. पण ख्रिश्चन असून त्याला इतर आजूबाजूचे ख्रिश्चन आवडत नसत.. त्याला भारतीयच जवळ वाटायचे आणि घरातील येशूच्या आरत्या (ज्या आम्ही अनेकदा ऐकल्यात) सोडल्यास मुलींना भारतीय पद्धतीने वाढवणेच करणे चालले होते. तेच एका हैदराबादी मुस्लीम कुटूंबाचे जवळून पाहीलेले आहे. असे अनेक सांगता येईल. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

मी जेव्हा इतर धर्मांचा संदर्भ

आमोद शिंदे
Sat, 09/11/2010 - 03:16 नवीन
मी जेव्हा इतर धर्मांचा संदर्भ दिला तेव्हा तुम्ही लगेच मला रिलीजनच्या डबक्यात अडकून विचार करणे असा शेरा दिलात. पण साक्षात तात्याराव सावरकरही "जो पर्यंत जगात इतर धर्म आहे आणि त्या धर्मांच्या नावाने राज्यकर्ते आहेत तो पर्यंत हिंदू हा शब्द मला माझ्या ओळखीसाठी महत्वाचा वाटतो" असा धर्माचा संदर्भ देतात तेव्हा त्यांनाही तुम्ही रिलीजनच्या डबक्यात अडकून विचार करणे असे म्हणाल का? धर्म आणि राष्ट्रियत्व याची सांगड घातल्याने कसा धोका निर्माण होतो ह्याचा वस्तुपाठ तुम्ही ह्या प्रतिसाद दिला आहे. तुमच्या प्रतिसादातील हे वाक्य पाहा; "त्याला भारतीयच जवळ वाटायचे आणि घरातील येशूच्या आरत्या (ज्या आम्ही अनेकदा ऐकल्यात) सोडल्यास मुलींना भारतीय पद्धतीने वाढवणेच करणे चालले होते."घरात येशूच्या आरत्या म्हणणे हे तुम्हाला भारतीय पद्धतीचेच उदाहरण का वाटत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

वाटते ना

विकास
Sat, 09/11/2010 - 07:52 नवीन
"घरात येशूच्या आरत्या म्हणणे हे तुम्हाला भारतीय पद्धतीचेच उदाहरण का वाटत नाही? वाटते ना! तेच तर मी सांगायचा प्रयत्न करत होतो. ख्रिश्चन असल्याने येशूभक्त पण तरी देखील भारतीय पद्धतीप्रमाणे आरत्या करत असे आणि भारतीय संस्कृतीप्रमाणे मुलींना वाढवायचा प्रयत्न हेच तर सांगत होतो. "जो पर्यंत जगात इतर धर्म आहे आणि त्या धर्मांच्या नावाने राज्यकर्ते आहेत तो पर्यंत हिंदू हा शब्द मला माझ्या ओळखीसाठी महत्वाचा वाटतो" असा धर्माचा संदर्भ देतात तेव्हा त्यांनाही तुम्ही रिलीजनच्या डबक्यात अडकून विचार करणे असे म्हणाल का? नुसते त्यांचे तेव्हढेच विधान माहीत असते तर नक्कीच म्हणले असते. पण त्यांचे इतर आचार-विचारांची त्या विधानाबरोबर सांगड घातल्यावर तसे म्हणणार नाही. त्यासंदर्भात मी वरील प्रतिसादात त्यांची नास्तिकता (आणि त्या प्रतिसादात न लिहीलेली विज्ञाननिष्ठ वृत्ती) पण सांगितली आहे आणि त्यांचा समाजाला कुठली दिशा दाखवण्याचा उद्देश होता हे देखील सांगितले आहे, त्याकडे पण आपले लक्ष गेले अशी आशा करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

तसे असेल तर तुमच्या मूळ

आमोद शिंदे
Sat, 09/11/2010 - 23:56 नवीन
तसे असेल तर तुमच्या मूळ वाक्यात येशूच्या आरत्या 'सोडल्यास' असे लिहिण्याचे कारण काय? सावरकरांचे बाकिचे विचार काहीही असले तरी हिंदू शब्दाची व्याख्या करताना त्यांच्या डोक्यात धर्मच होते असे वरील वाक्यातून स्पष्ट दिसते. (इतर वेळेला ते नास्तिक होते म्हणून त्यांचे हे वाक्य दुर्लक्षीत करावे असे तुमचे मत आहे का?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

>>हिंदू ह्या शब्दाच्या वरील

अर्धवट
Fri, 09/10/2010 - 09:51 नवीन
>>हिंदू ह्या शब्दाच्या वरील व्याख्येनुसार, मूळ भारतीय वंशाचे हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख हे हिंदू ठरतात. अगदी बरोबर आहे.. हे सर्व हिंदु नाहीत असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? >>ह्या व्यतिरिक्त अन्य समाज हे अहिंदू ठरतात. सर्वसाधारण विधान करता येणार नाहीत पण, तुम्ही त्या समाजांची काही वैशिष्ठ्ये सांगितलीत तर याच व्याख्येवर तपासुन बघता येइल. तीन मुख्य अटी आहेत.
  1. वास्तव्य / जन्म
  2. पितृभू
  3. पुण्यभू
तीनही अटी अर्थातच व्यापक अर्थाने घ्यायच्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

माझ अनुभव - इथे अमेरीकेत एका

शुचि
गुरुवार, 09/09/2010 - 20:42 नवीन
माझ अनुभव - इथे अमेरीकेत एका चेनइ मधल्या एका मुस्लीम गॄहस्थांशी आणि त्यांच्या पत्नीशी ओळख झाली. नंतर त्यांच्या घरी "हाऊस वॉर्मींग" करता जाण्याचा योग आला. त्यांच्या तरुण मुलानी मुद्दाम बेडरूम ला हिरवा रंग दिला होता.हिरव्या रंगाला इस्लाम मधे मानाचं स्थान आहे हे नंतर कळलं. इथे परदेशात अनेक बांग्लादेशी, पाकिस्तानी सहकारी भेटतात , मनात काहीही अढी न ठेवता एकमेकांबरोबर जुळवून घेतलं जातं. मला इथे अजून एक जाणवलं ते म्हणजे हिंदू अथवा मुस्लीम धर्मापेक्षा बौद्ध धर्माचा खूsssssपच जास्त प्रसार झालेला आहे. जिकडे तिकडे अमिताभ, तारा, बुद्ध यांच्या मूर्ती, पुस्तकं यांची रेलचेल दिसते.
  • Log in or register to post comments

हिन्दी

प्रभाकर कुळ्कर्णी
गुरुवार, 09/09/2010 - 21:33 नवीन
शहराजाद, मी रशिया पासून १९९१ मधे विभक्त झालेल्या 'अझरबैजान' देशात काही काळ नौकरीला होतो. तीथल्या स्थानिका पैकी एकाने ओळख झाल्यावर मला विचारले की तूझा धर्म कोनता? मी हिन्दू म्हने. तो म्हने हिन्दू ठीक आहे रे पन धर्म कोनता. मी पुन्हा तेच उत्तर दिले. मला समजेना हा असे काय विचारतोय. बर्याचदा असे विचारा विचारी झाल्यावर तो काही आठवून म्हणे 'बुध्द?'. मग त्याचे दोन्ही हात नम्स्कार सारखे जोडुन " क्रष्णा" काय? म्हणुन विचारले. मी पटकन हो म्हणुन सुटका करुन घेतली माझी. मग म्हणे ईथे पन तुमचे 'क्रष्णा' लोक काही आहेत. खरेच होते, आहेत. ईस्कान वाले काही लोक. गम्मत असी आहे. भारत हा जगात फार जुना देश असल्यामुळे जगातल्या बर्याच देशातले लोक भारताला,भारतातील लोकांना फार चांगले ओळखतात. तर अश्या बर्याच देशांत त्यांच्या ईतीहासात भारताचा उल्लेख आजही ' हिन्दीस्तान' आहे. हिन्दीस्तानात रहाणार्या लोकांना ते 'हिन्दी' वा' हिन्दू' म्हणतात आजही. एक थाईल्यांडी क्रेन आपरेटर भेटला तीथेच कामाला असलेला. तो म्हणे " ओ, गब्बर सिन्ग". ईकडचे तीकडचे बोलुन झाल्यावर मी त्याला विचारले त्याचा धर्म कोनता? तो स्वाभीमानाने म्हणे " बुध्दा! बुध्दा फ्राम ईन्डिया" .तर त्या बाईने, " तुम्ही हिन्दू आहात ना?" विचारले. म्हण्जे तिच्या द्र्ष्टी ने " तुम्ही भारतीय आहात ना?". गोरी असेल तर कदाचीत ती रशियन अमेरिकन असेल. एकादा विमानात गोर्या गोर्या एअर होस्टेस होत्या. छान बोलत होत्या. मी काहीतरी विचारावे म्हणून एकीला विचारले," विच कंट्री यु आर फ्राम?" ती म्हणे" आय याम ईन्ग्लीश ". माझ्या पटकन लक्शात आले की ईन्ग्रज आहे ती. ईन्ग्लंड च्या लोकांना ईन्ग्लीश म्हण्तात. त्यांची भाषा पन ईन्ग्लीशच. जे मला कळलं ते लिहिलं . ईतर वाचकांनी पन पटलं तर घेने. नाही तर ईथेच सोडुन देने.
  • Log in or register to post comments

मस्तच प्रभाकरराव.

धमाल मुलगा
गुरुवार, 09/09/2010 - 21:48 नवीन
मस्तच प्रभाकरराव. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर कुळ्कर्णी

>>ईन्ग्लंड च्या लोकांना

आमोद शिंदे
Fri, 09/10/2010 - 18:07 नवीन
>>ईन्ग्लंड च्या लोकांना ईन्ग्लीश म्हण्तात. त्यांची भाषा पन ईन्ग्लीशच. बरोबर. जसे महाराष्ट्रातल्या लोकांना मराठी म्हणतात. कारण त्यांची भाषा पण मराठीच. 'आय अ‍ॅम ख्रिश्चन' असे थोडीच म्हणाली ती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर कुळ्कर्णी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा