काही बाही - २
भाग १
एकदा वाचुन झाल्यावर कधीही कुठुनही वाचता येतो, त्यातील कुठलेही पान काढून वाचता येते, त्यावर मनन वा चिंतन करता येते असा ग्रंथ म्हणजे दासबोध. दासबोधातील मराठी खुपच सुलभ आहे. फार कमी ठिकाणी शब्दकोशाचे सहाय्य घ्यावे लागते. रोजच्या जीवनातील घटनांमधे प्रचिती येणारे रोकडे पुस्तक असं म्हटलं तरी चालेल.
ब्रह्मचारी माणसाने प्रापंचिक माणसाला केलेला उपदेश असला तरी समर्थांच्या तळागाळातील लोकांना असलेल्या समस्यांचे भान थक्क करुन सोडते.
पहिल्याच दशकातील पहिला समास. ग्रंथारंभलक्षण. ग्रंथात काय काय माहिती दिलेली आहे याचे निरुपण करतांना पुर्ण ग्रंथ न वाचताच, त्यातले विचार समजुन न घेताच, अनाठायी त्याज्य कालबाह्य असे प्रतिपादन करुन दुषणे देणा-या आक्षेपकांबद्दल समर्थ म्हणतात....
पूर्णग्रंथ पाहिल्याविण| उगाच ठेवी जो दूषण |
तो दुरात्मा दुराभिमान| मत्सरें करी ||२२||
अभिमानें उठे मत्सर| मत्सरें ये तिरस्कार |
पुढें क्रोधाचा विकार| प्रबळे बळें ||२३||
ऐसा अंतरी नासला| कामक्रोधें खवळला |
अहंभावे पालटला| प्रत्यक्ष दिसे ||२४||
कामक्रोधें लिथाडिला| तो कैसा म्हणावा भला |
अमृत सेवितांच पावला| मृत्य राहो ||२५||
आतां असो हें बोलणें| अधिकारासारिखें घेणें |
परंतु अभिमान त्यागणें| हें उत्तमोत्तम ||२६||
अर्थ सरळ आणि सोपा आहे.
दासबोधातील अजुन काही समास असेच पुढे कधीतरी काही बाही कारणाने...
दासबोध लिंक - http://www.dasbodha.org/main.htm
प्रतिक्रिया
नानबा फारच लवकर आटोपता घेतला
परिकथेतील राजकुमार
चांगला उपक्रम ..
अभिमान
आम्हाला हल्ली कोणत्याच देशाचा
वाचतोय. दासबोध आवडतो.
वाचतेय.
छान आहे , मात्र