कळतं पण वळत नाही
मध्यंतरी नवर्याचा वाढदिवस झाला. नणंद तिच्या मुलीस घेऊन आली होती.
तिची मुलगी आणि माझी मुलगी जवळजवळ सारख्या वयाच्या.
पूर्ण दिवस गप्पा, खेळ, मनोरंजन, खाणंपीणं यात गेला. अर्थात मुलांनी घरातले कपडे घालून धिंगाणा घातला.
संध्याकाळी केक कापायची वेळ झाली.
अर्थात माझ्या मुलीची लगबग सुरू झाली - मेणबत्ती शोध, काँप्युटर वर गाणं लाव, उड्या मार यात त्या चिमुरडीला कुठलं लक्षात की कपडे बदलायचेत, केस व्यवस्थित करायचेत.
पण माझ्या डोक्यात वेगळी चक्रं - ती सुरेखच दिसली पाहीजे, तिने फेस्टीव्ह कपडे घातले पाहीजेत, हे फोटो पुढे सुखद आठवणी रहाणार , कदाचित तिचा नवरा हे फोटो पुढे बघणार : ) वगैरे वगैरे.
खूपदा सांगूनही तिने काही दाद दिली नाही मग माझी चिडचिड, तिची रडारड होऊन एकदाची ती तयार झाली.
पण शेवटी फोटोत ती रडवेली आणि माझा मूड ऑफ आणि गिल्टी .
नंतर आत्मपरीक्षण केलंअसता माझ्या लक्षात आलं -
(१) आपण आपल्या मुलांना अपलं "एक्स्टेन्शन" समजतो.
(२) माझ्याबाबतीत बोलायचं तर - नणदेच्या मुलीवर मी खूप प्रेम करते पण तितकीच मी माझ्या मुलीच्या बाबतीत स्पर्धात्मक आहे. माझ्या मुलीनी इतरांना सर्व बाबतीत "ओऊट्परफॉर्म" करावं, मागे टाकावं असं मला वाटतं. मग भले ते त्या क्षणी फोटोत दिसण्यात का असेना.
मीदेखील हे मान्य करते की "प्रत्येक मूल स्वतःचे गुण्-दोष घेऊन जगात येतं. तुलना करू नये" पण जेव्हा स्वतःवर शेकतं, तेव्हा हे पुस्तकी ज्ञान कुठे बरं चरायला जातं ? असं सर्वांचं होतं का की कळतं पण वळत नाही.
प्रतिक्रिया
पण जेव्हा स्वतःवर शेकतं, तेव्हा .....
कोणाच्या?
हम्म्म!!
हा,हा!
आपला तो
आपला तो
<<<"मग
हा हा हा हा
त्यावर मी
पण कुठेतरी
स्पर्धा असतेच
अरे हे
मुलांकडुन
ही ही
शुचि अस
तुलना
लहान पोरं
शाळेतली
मराठमोळा
तुलना
वरील चर्चा
मस्त!
प्रतिसाद
तुलनेचे
मी ही
कदाचित
प्रामाणिक कथन