मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रिएटिव्ह डिझाईन - पोर्टेबल मोबाईल ऑफीस - क्रूइकंतूर

सहज · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
काही अभिनव डिझाईन्स व डिझायन्सर यांची माहीती देण्याचा मानस आहे. सुरवात या रचनेने. डच (डॉलंड देशाचा नागरीक) क्रिएटिव्ह डिझायनर (??) टीम विंके याने बनवलेले हे मोबाईल ऑफीस. एक टेबल, दोन खुर्च्या, शेल्फ, कॉफीमेकरसाठी जागा. या ऑफीसमधे एक दिवा तसेच इलेक्ट्रीकल सॉकेट देखील आहे. एखाद्या जिग सॉ पझल प्रमाणे हे सर्व पीस एकत्र गुंफून दोन चाकाच्या सहाय्याने सहजरित्या एका जागेहुन दुसरीकडे हलवता येते. ईपीएस फोम विथ पॉलीयुरीआ हॉटस्प्रे कोटींग या पासुन बनवलेले हे ऑफीस युनीट अतिशय हलके आहे. साधारण १५० सेंमी बाय ४० सेंमी बाय १२० सेंमी असा आकार आहे. याची किंमत, नेमके वजन आणि ड्युरेबिलीटी याबद्दल अजुन मला माहीती नाही. पण नव्या उद्योजकाला किंवा फ्लाय बाय नाईट स्मुथ ऑपरेटरसाठी उपयुक्त असे हे मोबाईल ऑफीस. लुटा लुत्फ छायाचित्रांचा! ह्या उत्पादनाचे नाव आहे "कृईकंतूर"(Kruikantoor). ह्या शब्दाचा अर्थ आहे व्हीलबॅरो व ऑफीस (थोडक्यात मोबाईल ऑफीस)

वाचने 5774 वाचनखूण प्रतिक्रिया 17

सुनील 04/07/2010 - 18:14
कल्पना चांगली आहे पण अशा स्थिर खुर्चीवर ८ तास सलग बसून काम करता येईल काय? खुर्ची अशी हवी Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

टारझन 04/07/2010 - 18:35
व्वा !! लै भारी ... खुर्चीची चार चाकं आवडली :) बाकी ऑफिस रोचक आहे. :) -(ऑफिसर) टारझन रस्तोगी

In reply to by सुनील

मेघवेडा 04/07/2010 - 18:54
हा हा हा! सलग आठ तास बसून काम करण्यासाठी पोर्टेबल ऑफिस? ही गरज की चंगळवाद? ;)

स्वाती दिनेश 04/07/2010 - 18:38
ऑफिसची कल्पना आवडली, जपानमध्ये चिमुकल्या जागेत केलेल्या सोयी आठवल्या चटकन! स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

शिल्पा ब 04/07/2010 - 19:47
इथं अमेरिकेत ऑफिस मोठे, खुर्चा मोठ्या आणि त्यावर बसणारी मानसं सुद्धा... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
Seasonally टॅक्स भरून घेणारे, डिपार्टमेंटल स्टोअर्स वा मॉल्स मध्ये नव्या उद्योगधंद्याची जाहिरात करणारे, फिरते विक्रेते वगैरेंना असं फर्निचर खासच सोयीचं असेल. आपल्या भारतातही हा कॉन्सेप्ट येतो आहे,गोदरेज चं हे प्लॅनेट ३ डी डिझाईन पहा... फक्त खुर्च्या वेगळ्या आणायला लागतील. आणि कृईकंतूरच्या तुलनेने मटेरियल आणि रचना नक्कीच भक्कम असावी असं वाटतं. त्यामुळे वजन वाढणारच. पण केवळ तात्पुरत्या वापराचं तकलादू फर्निचर न बनता दीर्घायुषी सोय होईल असं वाटतं.

शुचि 05/07/2010 - 00:55
काय अफलातून काँपॅक्ट (घट्ट) डिझाइन आहे : ) मला डिझाइनर लोकांच्या कल्पकतेचं खूप आकर्षण नेहमीच वाटत आलं आहे. सहज खूप सुंदर , रोचक, वेगळीच माहीती दिलीत. पुलेशु. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

पुष्करिणी 05/07/2010 - 01:46
अरे वा, मस्त्च आहे...भेटायला येणार्‍या गेस्ट्ला पण खुर्ची आहे, कॉफी मशिन पण दिसतय्...कॉम्प्क्ट एकद्म. पुष्करिणी

स्पंदना 05/07/2010 - 07:24
दोन्ही ही डिझाइन चांगली आहेत. घरासाठी पण चालतील. भारतात फर्निचर बनवताना मस्त दणकट बनत, तर इतर ठीकाणी दोन वर्षात मोडीत निघाव अस!!