क्रिएटिव्ह डिझाईन - पोर्टेबल मोबाईल ऑफीस - क्रूइकंतूर
काही अभिनव डिझाईन्स व डिझायन्सर यांची माहीती देण्याचा मानस आहे. सुरवात या रचनेने.
डच (डॉलंड देशाचा नागरीक) क्रिएटिव्ह डिझायनर (??) टीम विंके याने बनवलेले हे मोबाईल ऑफीस. एक टेबल, दोन खुर्च्या, शेल्फ, कॉफीमेकरसाठी जागा. या ऑफीसमधे एक दिवा तसेच इलेक्ट्रीकल सॉकेट देखील आहे. एखाद्या जिग सॉ पझल प्रमाणे हे सर्व पीस एकत्र गुंफून दोन चाकाच्या सहाय्याने सहजरित्या एका जागेहुन दुसरीकडे हलवता येते. ईपीएस फोम विथ पॉलीयुरीआ हॉटस्प्रे कोटींग या पासुन बनवलेले हे ऑफीस युनीट अतिशय हलके आहे. साधारण १५० सेंमी बाय ४० सेंमी बाय १२० सेंमी असा आकार आहे. याची किंमत, नेमके वजन आणि ड्युरेबिलीटी याबद्दल अजुन मला माहीती नाही.
पण नव्या उद्योजकाला किंवा फ्लाय बाय नाईट स्मुथ ऑपरेटरसाठी उपयुक्त असे हे मोबाईल ऑफीस. लुटा लुत्फ छायाचित्रांचा!
ह्या उत्पादनाचे नाव आहे "कृईकंतूर"(Kruikantoor). ह्या शब्दाचा अर्थ आहे व्हीलबॅरो व ऑफीस (थोडक्यात मोबाईल ऑफीस)


प्रतिक्रिया
अरे वा खुपच छान कल्पकता आहे ह्या माणसाची...
ठीक पण..
व्वा !! लै
हा हा हा!
मस्त..
इथं
थोडंसं असंच गोदरेज ही IIM च्या सहाय्याने करताहेत..
प्लाणेट
परत लिंक देतोय, बघा दिसतंय का..
काय
फोल्डिंग
अरे वा,
चांगलय... कव
दोन्ही ही
मस्तच!!!
अरे वा, छान आहे डिझाईन!
लै