Skip to main content

मॅनेजर्स

लेखक शुचि यांनी बुधवार, 16/06/2010 01:21 या दिवशी प्रकाशित केले.

डिसक्लेमर - खालील व्यक्ती पूर्ण धवल अथवा कृष्ण नव्हत्या अर्थात खूप चांगल्या जमेच्या बाजूदेखील दिसल्या. माणूसकी, कामावरील निष्ठा, व्यावसायीकता, सचोटी हेदेखील गुण काहींच्यात होतेच. पण आपल्या बॉसवर टीका हा सदाबहार विषय आहे म्हणून हा लेख ...

मान्य की मॅनेजर्स ना काम करवून घ्यायचं असतं पण कधीकधी त्याकरता ज्या उपायांची अंमलबजावणी ते करतात ते मला तरी विनोदी वाटतात. पुढे देतेय मी अनुभवलेल्या , मॅनेजर्सच्या स्वतःचं वजन (मूल्य) वाढवायच्या काही ट्रीक्स (उपाय) -

(१) हाताखालच्या लोकांची मीटींग बोलावून त्याला उशीरा जाणं (जसं काही भेंडी यांनाच काम असतं बाकी सगळे गोट्या खेळत असतात ऑफीसात.)
(२) सुतकी (बाप मेल्यासारख्या) चेहेर्‍याने मीटींगमधे वावर ठेवणे.
(३) वरचेवर हे आश्वासन देणं की आपण हा माइलस्टोन नक्की साजरा करू (मॉरल बूस्टर म्हणे). अनुभव हा की "गर्जेल तो पडेल काय?". (आणि कधी षठीसामासी साजारा केलाच तर काहीतरी पिझ्झा वगैरे चीप पडेल असं पहात करायचं.)
(४) टीम मधील लोकांमधे पंक्तीप्रपंच अर्थात डिस्क्रिमिनेशन करणे.
(५) एका सुरळीत रांगेत ("प्रोसेस" मधे) काम चालू असताना मधेच येऊन विनाकारण (ऑन द फ्लाय) सूचनावजा आणि कामं देऊन जायचं.
(६) मी एका कंपनीत होते तिथे आम्हाला दरमहा पुस्तक-भत्ता मिळायचा. तो सर्वात भयानक विनोदी प्रकार होता. त्यात महीना अखेरीला मॅनेजरच्या दाराशी जाऊन त्याच्या शुभ हस्ते चेक घ्यावा लागत असे.

आपण काही मनुष्यस्वभावातील विसंगतींचं नीरीक्षण केलं असेल काम करत असताना विशेषतः बॉसच्या संदर्भात तर जरूर इथे सांगा.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5689
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

हा धागा टाकलात ते खरं पण काढून कधी टाकणार? एका प्रतिसादानंतर की ५० प्रतिसादांनंतर?

धाग्यांच्या अशाप्रकारच्या "मॅनेजिंगचा" कंटाळा येतो.


In reply to by प्रियाली

ठेवणारे.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||


In reply to by शुचि

(१) हाताखालच्या लोकांची मीटींग बोलावून त्याला उशीरा जाणं (जसं काही भेंडी यांनाच काम असतं बाकी सगळे गोट्या खेळत असतात ऑफीसात.)

बाकी सगळे "गोट्या" खेळत नसतील पण मिपा किंवा त्यासारख्या सायटींवर चर्चा टाकण्यात व्यग्र असतील. कमीतकमी, एकमेकांना खरडी आणि व्य. नि. लिहिण्यात तर असतीलच असतील. :)

(२) सुतकी (बाप मेल्यासारख्या) चेहेर्‍याने मीटींगमधे वावर ठेवणे.

नेमका कोणाचा बाप? तसा चेहरा ठेवला नाही तर बाकीचे म्यानेजरचेच श्राद्ध घालून मोकळे होतील असा त्याचा अनुभव असावा.

(३) वरचेवर हे आश्वासन देणं की आपण हा माइलस्टोन नक्की साजरा करू (मॉरल बूस्टर म्हणे). अनुभव हा की "गर्जेल तो पडेल काय?". (आणि कधी षठीसामासी साजारा केलाच तर काहीतरी पिझ्झा वगैरे चीप पडेल असं पहात करायचं.)

त्याच्या खिशातून साजरा होत असेल तर त्याने पिझ्झा देणे म्हणजे कर्णाचा उदारपणाच. त्याने कँडीवर बोळवण केली तरी तो आदरास पात्र आहे. त्याच्या खिशातून जात नसेल तर तुमच्या मॅनेजरचा सुपरवायजर त्यालाही माइलस्टोन साजरा करण्याचे अमिष दाखवत असावा आणि तो तुम्हाला. याला "वॉटरफॉल" मेथडही म्हणता येईल. ;)

(४) टीम मधील लोकांमधे पंक्तीप्रपंच अर्थात डिस्क्रिमिनेशन करणे.

त्यासाठी मॅनेजरची गरज कोणती? बरेचजण हे कार्य आपापसात उत्तम करतात.

(५) एका सुरळीत रांगेत ("प्रोसेस" मधे) काम चालू असताना मधेच येऊन विनाकारण (ऑन द फ्लाय) सूचनावजा आणि कामं देऊन जायचं

नेमक्या कोणत्या सॉफ्टवेअर प्रोजेक्टमध्ये सुरळीत रांगेत "प्रोसेस"मध्ये काम होते ते कळले तर बरे होईल. मी माझी नोकरी सोडून तिथे जॉईन करते.

मॅनेजरची वेकन्सी असेल तर अवश्य कळवा. :)


अजून लेख वाचला नाही; पण एक प्रश्न :
हा लेख ठेवणार का काढणार ? :-)


धागा वाचला , छाण आहे , पण एक शंका :
हा धागा तु काढणार की विकासराव काढणार ? :)

- मस्तिकुस्तीत


In reply to by शुचि

हत्तेरेकी !!! मग काय मजा? आता समजा तू नाही काढलास तर दुरेच कोणीतरी काढेल म्हणून माझी प्रतिक्रिया धरून ठेवते आहे...

बाकी मी लेख वाचला हो!!

***********************************************************
https://shilpasview.blogspot.com/


मॅनेजर्सचा नाही पण ऑनसाईट कोऑर्डीनेटर्सचा वाईट अनुभव आहे...इथे सांगण्यासारखा नाही! बर्याचदा एखाद्या व्यक्तीची (चांगली किंवा वाईट) प्रतिमा आपल्या मनात ठसलेली असते. कुणी त्या व्यक्तीबद्दल काहीही सांगितलं तरी आपण त्यावेळी विश्वास ठेवत नाही. उलट त्या व्यक्तीची बाजु घेउन भांडतो..नंतर सत्य समजल्यावर त्रास होतो...

बाकी, मॅनेजर पंक्तीप्रपंच करतो, चांगल्या (आपल्या मते) चालु असलेल्या कामात ढवळाढवळ करतो वगैरे बर्याच लोकांना वाटत असतं...त्यात फार काही तथ्य नाही. व्यवस्थापन सोप्पी गोष्ट नाही. अनेक लोकांचे शिव्याशाप खावे लागतात.

अवांतरः
१. मी मॅनेजर नाही!
२. वरचं काही लोकांना अवांतर वाटेल पण जिच्यासाठी लिहिलं त्या व्यक्तीला मेसेज पोहोचला असावा असं वाटतं...


In reply to by टिउ

हा मेसेज मला पोचावा अशी तुमची इच्छा असेल तर ती निष्फळ आहे. मला काही कळलं नाही. व्य. नि केला आहे. व्य. नि त बोलू.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||


लेख रोचक आहे. त्यात एका विशिष्ट भूमिकेतून पाहाताना काही गोष्टी जाणवतात त्यांचे वर्णन रंजक शैलीत केले आहे. मात्र जवळजवळ प्रत्येक निरीक्षणामागे ज्या गोष्टी अध्याहृत धरल्या आहेत , व्यक्तींच्या कृतीमागे जे हेतू असतील - नव्हे आहेतच - अशी गृहितके योजिली आहेत त्यांच्या वस्तुनिष्ठतेबद्दल शंका वाटते. "मला जग हे असे दिसते" येथवर सारे वाचनीय आहे. परंतु "हे असे आहे कारण अमुक गोष्टी आहेत" हा (अलिखित) कार्यकारणभाव ओपन-एंडेड हवा असे वाटले.


In reply to by मुक्तसुनीत

गंमत म्हणून लिहीला आहे. माझा बॉसेस चा अनुभव बरा आहे अगदीच वाईट नाही. मुद्दाम इथे अतिशयोक्तीपूर्ण वर्णन केलं आहे.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||


जसं काही भेंडी यांनाच काम असतं

"भेंडी" हा शब्द काळजाला भिडला. या शब्दाचा अर्थ, उगम वगैरेंबद्दल कुतूहल आहे. कृपया स्पष्ट करू शकाल काय?

(मॅनेजराचे काम ऑफिसात भेंडी चिरणे किंवा तत्सम असते काय?)

बाकी सगळे गोट्या खेळत असतात ऑफीसात.

या शब्दप्रयोगाचे एकाहून अधिक अर्थ होऊ शकतात याची कल्पना देणे येथे उचित वाटते.

शब्दांच्या वापरास आक्षेप नाही. केवळ ते अर्थ समजूनउमजून वापरावेत एवढीच माफक अपेक्षा आहे.

बाकी चालू द्या.

- पंडित गागाभट्ट.


In reply to by पंगा

तुम्ही कोणता अर्थ घेतला हे सांगितले तर लेखिकेला सोपे जाईलसे वाटते...

***********************************************************
https://shilpasview.blogspot.com/


फारंच साधक बाधक चर्चा ;)
तसा माझ्या बॉस विषयीचा एक अनुभव मी मागे माझ्या एका लेखात लिहीला होता :)

(चर्चेशीर) बेचवलाडू


तुमचा मॅनेजर असेच कोठे लेख लिहीत असेल तर पहा, बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळतील. असो.

>>विशेषतः बॉसच्या संदर्भात तर जरूर इथे सांगा.
आम्ही आमच्या बौंस मध्ये खुश आहोत, हा बौंस मिपावर नाही.


टीम मधील लोकांमधे पंक्तीप्रपंच अर्थात डिस्क्रिमिनेशन करणे.

तुम्ही सर्वांशी समान वागत नाही मग मॅनेजरला का नावे ठेवता ?


'मॅनेजर' हा शब्द 'म्यानेजर' असा लिहितात.

शिर्षकानंतर पुढचे काहीच वाचवले गेले नाही, त्यामुळे प्रतिक्रीया देणे जमले नाही. क्षमस्व.

कॅफे म्यानेजर
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य


In reply to by परिकथेतील राजकुमार

म्यानेजर नाही मैनेजर असं लिहितात...कसं बै व्हायचं तुमचं !!
(चिंताळू ) करा

***********************************************************
https://shilpasview.blogspot.com/


In reply to by शिल्पा ब

>>म्यानेजर नाही मैनेजर असं लिहितात...कसं बै व्हायचं तुमचं !!
ब बाई
तुमचा इतिहास कच्चा आहे.,


म्यानेजर नाही मैनेजर असं लिहितात...कसं बै व्हायचं तुमचं !!

बघु जमेल तसे होईल काहितरी. नहिच झाले तर तुम्ही आहातच की मदत करायला. :)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य


In reply to by परिकथेतील राजकुमार

आमची व्याकरणाची / भाषेची शिकवणी पूर्ण झाल्याने मदत जरूर करू...हाय काय नि नै काय..

(व्याकरणी) भुंगा

***********************************************************
https://shilpasview.blogspot.com/


व्यवस्थापन सोप्पी गोष्ट नाही. अनेक लोकांचे शिव्याशाप खावे लागतात.

हे पटले.
मला चांगला अनुभव आला आहे आत्तापर्यंत.