Mom, we are not naive
आज राजेश घासकडवी यांचा स्त्री प्रतिमेवरील लेख वाचला आणि गेल्याच आठवड्यात घडलेला किस्सा आठवला.
माझा लेक . टीनएजर. एकिकडे शरीरात हार्मोन्सच थैमान, अपरिपक्व मेंदू, जोडिला मेडिया. दुसरीकडे मध्यमवर्गी संस्कार आणि झेप घ्यायला उत्सुक महत्वाकांक्षेचे पंख. काल परवा पर्यंत असलेली निखळ मैत्रीही काहिशी बदलू लागलेली. याच गोंधळात साधारण १३ व्या वर्षापासून त्याला हळू हळू मुलींना एक 'स्त्री' म्हणून, एक व्यक्ती म्हणून आदराने वागवणे, 'नकार' पचवणे वगैरे धडे देणे सुरु झाले. अधून मधून वाद व्हायचे पण तरी गाडी बर्यापैकी चालली होती.
सेकंड सेमिस्टरला माझ्या मुलाचे शाळेतील टाईमटेबल त्याच्या मित्रांपेक्षा खूपच वेगळे झाले. त्यामुळे लंचला इतर सर्व वरच्या वर्गातील मुले आणि हा एकटा ९ वीतला फ्रेशमन. सुदैवाने मित्राचा मोठा भाऊ त्याच लंच पिरियडला. याने त्याच्या पाया पडून, टेबलवरचे ट्रे उचलायच्या बोलीवर त्या टेबलवर वर्णी लावून घेतली. सगळी ज्युनिअर म्हणजे ११ वीची मुलंमुली. त्यात हे ध्यान. पण १५-२० दिवसात हा त्यांच्यात रुळला. पण हळू हळू त्याची भाषा बदलायला लागली. वाद वाढले. गेल्या आठवड्यात त्याने मलाच बावळटात काढलं.
गेल्या शनिवारी नेहमीप्रमाणे त्याच्या वायप्रेसच्या कामासाठी आम्ही इंडियानापोलिसला चाललो होतो. ही ५० मिनिटांची ड्राईव्ह माझ्यासाठी खूप मोलाची आहे. या ४५-५० मिनिटांमध्ये काय जादू आहे कुणास ठाऊक पण या प्रवासात तो खूप मोकळा, बिधास्त असतो. आम्ही खूप गप्पा मारतो. या गप्पांतून त्याचे जग दिसतं . या वेळीही अशाच गप्पा चालल्या होत्या.
बोलता बोलता तो म्हणाला, ' मॉम सॅली नी गेल्या शनिवारी टीप किती कमावली माहितेय?'
'किती?'
'६० बक्स'
'good for her. कुठे आहे कामाला?'
त्याने एका ब्रेकफास्ट चेनच नाव सांगितलं.
' she is very lucky. she is brunette,' लेकाने माहिती पुरवली.
'म्हणजे?'
'मॉम, ते फक्त brunette hire करतात. सॅलीनेच सांगितलं.'
'सॅली खूप हुषार आहे.' आपला लेक एका मुलीच्या बुद्धीमत्तेचं खुल्या मनाने कौतुक करतोय हे ऐकून मी मनातल्या मनात स्वतःला शाबासकी दिली. त्या आनंदात 'फक्त ब्रुनेट' हे शब्दही विसरले. पण दुसर्या क्षणी लेकाने माझा भ्रम दूर केला.
'सॅली काय करते माहितेय? She always dresses properly and makes sure she bends properly when she brings their order. She said it always works.'
'देवा!' याला माझा लेक हुषार म्हणत होता. माझ्या तोंडाचा पट्टा सुरु झाला. माझे बोलणे तोडत लेक थंडपणे म्हणाला,' Mom, we are not naive. Everybody knows that sex sales.'
याद्या
11876
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिसाद
प्रतिसाद
+१
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
>> १४ -१५
In reply to +१ by विकास
हाहाहा
In reply to >> १४ -१५ by मेघवेडा
बापरे.
गालावर ओठ
In reply to बापरे. by भोचक
छे छे.........अमेरिका सारख्या प्रगत देशात
छे
सेक्स
स्वाती, तू
+१ सहमत
In reply to स्वाती, तू by अरुंधती
मी
वस्तुस्थिती...
+१
In reply to वस्तुस्थिती... by धमाल मुलगा
काय असावं...
In reply to वस्तुस्थिती... by धमाल मुलगा
वेल...
सहमत..
In reply to वेल... by श्रावण मोडक
सहमत
In reply to सहमत.. by भडकमकर मास्तर
मोकळेपणान
In reply to सहमत by धनंजय
अब्ब ब्ब ब !
अरे देवा
इंटरेस्टिंग!
चांगला अनुभव
मला वाटते
सर्व
स्वाती ताई एक प्रश्न...
अमेरिकेत
In reply to स्वाती ताई एक प्रश्न... by वेताळ
मजुरी
In reply to स्वाती ताई एक प्रश्न... by वेताळ
काही
In reply to मजुरी by प्रियाली
प्रियाली
In reply to काही by अप्पा जोगळेकर
कौतुक
In reply to काही by अप्पा जोगळेकर
जे चांगलं
In reply to कौतुक by प्रियाली
सहमत
In reply to जे चांगलं by बिपिन कार्यकर्ते
कोण हुशार
In reply to सहमत by इंटरनेटस्नेही
अमेरिकेत मुलाना काम देणे हि एक चांगली कल्पना आहे.
In reply to मजुरी by प्रियाली
माझ्या
In reply to अमेरिकेत मुलाना काम देणे हि एक चांगली कल्पना आहे. by वेताळ
पद्धत लावावी
In reply to अमेरिकेत मुलाना काम देणे हि एक चांगली कल्पना आहे. by वेताळ
हे देखिल चांगलेच आहे.
In reply to पद्धत लावावी by प्रियाली
खरे आहे...
In reply to हे देखिल चांगलेच आहे. by वेताळ
हाहाहा!
In reply to हे देखिल चांगलेच आहे. by वेताळ
लहानपणी
In reply to हाहाहा! by प्रियाली
प्रियालीत
In reply to हाहाहा! by प्रियाली
१४ ते १८
In reply to स्वाती ताई एक प्रश्न... by वेताळ
एकदा
हम्म
In reply to एकदा by अप्पा जोगळेकर
>>हा वरचा
In reply to हम्म by मुक्तसुनीत
डॉलरमधे
In reply to एकदा by अप्पा जोगळेकर
अजब काय ?
In reply to डॉलरमधे by Pain
>>एकदा
In reply to एकदा by अप्पा जोगळेकर
लेकाला
In reply to >>एकदा by स्वाती२
छान
अनुभव मांडल्याबद्दल धन्यु...!
भारतातही sex