वर मोडकसाहेबांनी जरी क्युबेकवर वेगळा लेख लिहायला सुचवलेले असले तरी तेव्हढा मसाला नसल्याने येथे अनुभव देतो:
ऑक्टोबर १९९५ च्या शेवटच्या आठवड्यात मी कर्मधर्मसंयोगाने क्युबेकसिटी मधे होतो. असे म्हणायचे कारण असे की ऑक्टोबर ३० ला तेथे सार्वमत होते की कॅनडा बरोबर रहायचे की नाही या संदर्भात. विकीवरील माहीती प्रमाणे मतदान पेटीत हो अथ्वा नाही हे उत्तर खालील प्रश्नाला द्यावे लागणार होते:
"Do you agree that Québec should become sovereign after having made a formal offer to Canada for a new economic and political partnership within the scope of the bill respecting the future of Québec and of the agreement signed on June 12, 1995?"
मला आश्चर्य असे वाटत होते की तेथे असताना कदाचीत राजकीय वातावरण तापलेले असेल पण एकंदरीत बाकीचे सामाजिक वातावरण आणि व्यवहार "business as usual" प्रमाणे होते. बरं याचा अर्थ लोकांना इंटरेस्ट नव्हता असे म्हणावे तर ४९.४२% मते "हो" च्या बाजूने पडली तर ५०.५८% "नाही"च्या बाजूने...अर्थात त्यामुळे कॅनडा वाचला. पण नंतर काही जाळपोऴ नाही की दंगल नाही की काही नाही.
आता क्युबेकप्रांत (आणि बर्याच अंशी अमेरिकेतील लागून असलेले व्हर्मॉट राज्य) फ्रेंचांच्या ताब्यात होते. तर उर्वरीत कॅनडा हा ब्रिटीशांच्या. फ्रेंच-ब्रिटीश यांच्यात झालेल्या सात वर्षाच्या युद्धानंतर क्युबेक प्रांत हा कॅनडात आला. अर्थात त्यामुळे भाषेच्या बाबतीतील अस्मिता आहे. असेही ऐकून होतो की ते फक्त फ्रेंचच बोलतात म्हणून इंग्रजी बोलल्यावर दुर्लक्ष करतात वगैरे. पण मला वाटते तसा अनुभव गोर्या लोकांना येत असावा, ते ही त्या काळी... आमच्याशी तुटक्यामोडक्या इंग्रजीत सर्वच बोलत होते. समजून घेण्याचा प्रयत्नही करत होते आणि समजावूनही देत होते. तसेच त्यांचा काही असा राग-द्वेष दिसत नव्हता...
नंतरच्या काळात क्युबेकमधील काही उद्योगांशी संबंध आला. कधी कधी त्यांना फोन केल्यावर सुरवातीचे मशिनवरील बोलणे हे फ्रेंच असते पण नंतर इंग्रजीत असते. तसेच इंग्रजीत बोलण्याचा काही प्रश्न येत नाही.
बाकी एक गंमतशीर निरीक्षण त्यावेळेस केले: व्हर्मॉटराज्याच्या बाजूने अमेरिकेतून कॅनडात प्रवेश केल्यावर फ्रेंच आणि इंग्रजीत "क्युबेक मधे स्वागत" या अर्थी पाटी होती. वास्तवीक वेगळा देशचालू झाला होता म्हणजे, "कॅनडातस्वागत" पण म्हणायला हवे असे वाटले. मित्राला म्हणलं खरेच "अलगतावादी" दिसताहेत. येताना पाहीले तर अमेरिकेत आल्यावर इंग्रजीत आणि फ्रेंच मधे परत, "व्हर्माँटमधे स्वागत" (अमेरिकेत नाही!) असेच लिहीलेले होते...
माहिती बद्दल धन्यवाद विकास. अस्मिता वगैरे असली तरी एका चौकटीत राहून कसे व्यक्त होता येते या लोकांना याचे कौतुक / आश्चर्य मात्र वाटते. तसे म्हणायला क्युबेक मधे काही काळ आतंकवादी चळवळ झाली होती पण आपल्या इथल्या मानाने ती काहीच नाही, अगदी मिळमिळीत म्हणावी लागेल.
बिपिन कार्यकर्ते
पुढे काय घडले? क्यूबेक एक राज्य आणि कॅनडा हे राष्ट्र यांच्यात काही करार झाला का? झाला असेल तर त्यातील फ्रेंचविषयक कायदेकानू काय आहेत? प्रश्न थेट आहे - मला उद्या क्यूबेकमध्ये जायचे असेल तर मला लागू होणारे इमिग्रेशनचे नियम क्यूबेक आणि कॅनडा यांच्या संदर्भात वेगळे आहेत का? असतील तर काय आहेत? तिथे भाषेचा प्रश्न काय येतो?
याचसाठी मी वेगळा लेख असे म्हटले होते.
क्युबेक हा आजही कॅनडाचाच प्रांत आहे. कॅनडाचे हे अधिकृत संकेतस्थळ पहा. इमिग्रेशन हे कॅनडाचेच. (मी त्यावेळी जाताना देखील कॅनेडीयन व्हिसाच काढला होता). प्रांताची भाषा मात्र फ्रेंच आहे.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
श्री.विकास,
आपल्या उपरोल्लेखित सविस्तर प्रतिसादाबद्दल आणि मोडकांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराबद्दल मी आपले आभार मानु इच्छितो. ह्या क्युबेक प्रांताच्या विषयातून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे
"क्युबेकने भाषिक अस्मिता जपलेली असुनही तो देशद्रोह वगैरे ठरलेला नाही. इमिग्रेशन, व्हिसा इत्यादी कॅनेडियन सरकारच्याच अखत्यारीत आहेत." ;)
चला, म्हणजे एका प्रश्नाचं तर उत्तर मिळालं.... ते काय मराठी भाषेचा आग्रह, देशद्रोह वगैरे वगैरे....... ;)
स्वगतः मोडक सॉक्रेटिसच्या मार्गानं चालल्यासारखे वाटताहेत का रे धम्या? ;)
प्रतिक्रिया
तुम्हाला,
क्युबेक
छान माहिती...
पुढे...
कॅनडा
धन्यवाद!
Pagination