Skip to main content

प्रियेच्या निळ्याशार डोळ्यांत डुंबताना

लेखक सायकलस्वार यांनी रविवार, 06/12/2015 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा प्रियेच्या निळ्याशार डोळ्यांत डुंबताना विसरतो मी तुझ्या पाठीवरच्या वळकट्या पुष्ट तुझ्या सर्व आठवणींची लक्तरे फेकुन द्यावीशी वाटतात पण तुझ्या आठवणीच त्या तुझ्यासारख्याच निर्लज्ज सारख्या येतच राहतात दु:खाच्या डागण्या देतच राहतात जिथे तु अहंकारापायी बाई म्हणुन स्वत:च्या सासूलाही छळू शकतेस तिथे सवतीची काय बिशाद तरीही तुझ्या नि तिच्या सह-वासाची वेडी आशा केलीच होती मी आणि तुझ्या मुळ स्वभावापायी ती पायदळी तुडवलीच तु तरीही जा तुला माफ केले कारण शेवटी गिळायला घरीच यायचे आहे..

वाचने 7562
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

In reply to by जव्हेरगंज

ins>तरीही तुझ्या नि तिच्या सह-वासाची वेडी आशा केलीच होती मी अगागा , इतक सगळ होतय तरी स्वत:ला एव्हढ पायदळी का तुड्वुन घेताय = )))) हौस हौस ....

Sports Tag: बुद्धीबळ कुस्ती एकदिवसीय सामने
लोल!

:):):)

बाबौ, पाठीवरच्या वळकट्या? आणि त्या देखील पुष्ट? सायकलस्वार काका एक तर तुमचा अनुभव कमी पडतो आहे किंवा तुमच्या कवितेमधल्या नायकावर तुम्ही जाणून बुजून भयंकर मोठा अन्याय केला आहे. अनुभव कमी पडत असेल तर अभ्यास वाढवा. तसे नसेल तर .......... जाउदे.....त्याची इथे चर्चा नको. उगाच जगाच भलं करायच्या नादात संमं कडून आम्हाला चपला भेट मिळायच्या. पैजारबुवा,

अवो पैजारबुवा आपले रसघ्राणेंद्रिय हायपर-सेन्सिटिव्ह झाले आहे! साध्यासुध्या प्रतिमांमध्ये काहीतरी भलताच गूढरम्य अर्थ शोधत आहात. ग्रेसच्या कवितांचा नको तितका अभ्यास केला की हे असं होतं!

'शेवटी गिळायला घरीच यायचे आहे' - अंतिम सत्य !

=))

स्वार सायकलीचा लेखणीने झेपावला !! वेग बाईकचा आपसूक मंदावला !! चवथी क "यमक-धमक" जुळारी शाळा जिलबीपुरी,चारोळीगल्ली.. गुर्जी शाळेत न्हाईत चौकशी करू नै..

लौल

सर्व प्रतिसादकांचे आभार. विशेषतः गाभारा-गँगने दाखवलेल्या आपुलकीबद्दल विशेष आभारी आहे ;)