मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रियेच्या निळ्याशार डोळ्यांत डुंबताना

सायकलस्वार · · क्रिडा जगत
प्रेरणा प्रियेच्या निळ्याशार डोळ्यांत डुंबताना विसरतो मी तुझ्या पाठीवरच्या वळकट्या पुष्ट तुझ्या सर्व आठवणींची लक्तरे फेकुन द्यावीशी वाटतात पण तुझ्या आठवणीच त्या तुझ्यासारख्याच निर्लज्ज सारख्या येतच राहतात दु:खाच्या डागण्या देतच राहतात जिथे तु अहंकारापायी बाई म्हणुन स्वत:च्या सासूलाही छळू शकतेस तिथे सवतीची काय बिशाद तरीही तुझ्या नि तिच्या सह-वासाची वेडी आशा केलीच होती मी आणि तुझ्या मुळ स्वभावापायी ती पायदळी तुडवलीच तु तरीही जा तुला माफ केले कारण शेवटी गिळायला घरीच यायचे आहे..

वाचने 7528 वाचनखूण प्रतिक्रिया 20

In reply to by जव्हेरगंज

पियुशा Mon, 12/07/2015 - 13:21
ins>तरीही तुझ्या नि तिच्या सह-वासाची वेडी आशा केलीच होती मी अगागा , इतक सगळ होतय तरी स्वत:ला एव्हढ पायदळी का तुड्वुन घेताय = )))) हौस हौस ....

बाबौ, पाठीवरच्या वळकट्या? आणि त्या देखील पुष्ट? सायकलस्वार काका एक तर तुमचा अनुभव कमी पडतो आहे किंवा तुमच्या कवितेमधल्या नायकावर तुम्ही जाणून बुजून भयंकर मोठा अन्याय केला आहे. अनुभव कमी पडत असेल तर अभ्यास वाढवा. तसे नसेल तर .......... जाउदे.....त्याची इथे चर्चा नको. उगाच जगाच भलं करायच्या नादात संमं कडून आम्हाला चपला भेट मिळायच्या. पैजारबुवा,

सायकलस्वार Mon, 12/07/2015 - 10:49
अवो पैजारबुवा आपले रसघ्राणेंद्रिय हायपर-सेन्सिटिव्ह झाले आहे! साध्यासुध्या प्रतिमांमध्ये काहीतरी भलताच गूढरम्य अर्थ शोधत आहात. ग्रेसच्या कवितांचा नको तितका अभ्यास केला की हे असं होतं!

नीलमोहर Mon, 12/07/2015 - 12:15
'शेवटी गिळायला घरीच यायचे आहे' - अंतिम सत्य !

नाखु Mon, 12/07/2015 - 12:53
स्वार सायकलीचा लेखणीने झेपावला !! वेग बाईकचा आपसूक मंदावला !! चवथी क "यमक-धमक" जुळारी शाळा जिलबीपुरी,चारोळीगल्ली.. गुर्जी शाळेत न्हाईत चौकशी करू नै..