आता सरला काळोख
उजाडला दिवस
सूर्यकिरणांची नक्षी
खेळेल दारात
नाही वळून पहायचे
सखे मागे आता
तुझ्यासाठी आहेत
चहुदिशांनी वाटा
चाललीस वाट तू
खाचाखळग्यांची
विसर सर्व सारे
आणि झेप घे गरुडाची
झाले मोकळे आकाश
आज तुझ्या माझ्यासाठी
स्वप्न पाखरांचा थवा
घाले गगना गवसणी
- विभावरी
विशेष
वाचने
5405
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त !! कविता आवडली ....
विभाताई खूपच आवड्ली ग कविता.
छान आहे कविता!
अगदी महिलादिनाला समर्पक कविता
सुंदर
खूप छान गं विभाताई!
फारच छान विभावरी!!
छान कविता.
खूप छान कविता.
सुंदर कविता!!
मस्त
छान..
मस्त !
कविता छान आहे.
छान कविता.
छान आहे कविता. मस्त जमलीये.
छान कविता
छान कविता
मस्त!
कविता आवडली.