मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डिजिटल

अभ्या.. · · विशेष
डीजीटल ................................................................................. "नीट बे, नीट घे खाल्लाकडली टोकं. झूम करु का अजून नेऊनशानी? शिंगम म्हणजे शिंगम पायजे. जराबी गंगाजल झाला का, मागची उधारी बी इसरायची." पाटलाचा अज्या वारकाच्या दुकानात आईन्यात पाहात बोंबलत होता. अन लक्ष्या वारीक अशा कीती दाढ्या कराव्यात तवा अज्यासारखा ग्यालक्षी घेता येईल हा विचार करत अज्याच्या मिशा कोरत होता. चार चमच्याच्या सल्ल्याने सिंघम स्टाइल मिशा, दाढी मसाज उरकून अज्याने परटाच्या दुकानात मुक्काम हलिवला. "ते बामन आला नाय बे अजून. बोर्डावरला मायना तर त्येच लिव्हतय ना. सच्या लाव बे तेला मिस्कॉल" चार नंबरातला एक नंबर वाजत असतानाच कुलकर्ण्याचा दिप्या पळत आला. "या देवा, कुठं हायेत चरणकमल? ते सोडा, बोर्डाचा मायना कुठं हाय?" "मजकूर होय, असतोय की रेडी त्या डीजीट्ल वाल्याकडं" "यवढं सांगायला चार पुड्या लागत्येत व्हय रं? येकतर ब्ल्याकनं आणताव त्या बी अशा खाऊन थुकताव का बे?" एवढे बोलत अज्यानं खिसं चाचपलं, व्हय तालुक्याला कमी पडायला नको. तितं मिळनार बी नाहीत ओळखीशिवाय. . . यंदाच्या गणपतीत डिजीटल लावायचं आसं ठरल्यापासूनच अज्याची तयारी सुरु होती. तालुक्याचे डिजीटल पाह्यल्यापासून अज्यालापण आपण बी असं नेतेस्टाइल झळकावं अशी लै तमन्ना होती. नशीबानं अज्याचा वाढदिवस बी चतुर्थीचाच. बाकी पोरावांनी पैसे दिले नाही तरी स्वतःचे थोडे पैसे घालून अन वर्गणीचा आधार घेऊन बोर्ड चढवायचाच हे त्याने फिक्स केले. मुख्य उत्सवमूर्ती जरा लहान झाली तरी हरकत नव्हती पण पाठबळ दाखवायसाठी तरी चार कार्यकर्त्याची फौज पायजे होती. फुकटात झळकायला तयार पोरांनी लगेच माना डोलावल्या. मंडप मारला की बोर्ड आणायला तालुक्याला जायचं अन हिकडं नाग्या मंडपवाल्यानं परांचा उभारायचा असा प्लान होता. नान्या, पंक्या, वाश्या असे एकेक नग जमा होत शेवटी बोर्डावर झळकणारी दहा टाळकी अन तीन मोटारसायकलीचं जुगाड जमले. पोटात अन गाड्यात पेट्रोल भरुन तालुक्याला पोचायलाच दुपार झालेली. डिजीटलवाल्याकडं ही गर्दी. कसबसं घुसून अज्यानं मालकाला गाठलं. " मालक डिजीटल छापायचय" "कीती फूट?" "सोयरे, डिजीटल मोठं आन कलर्फुल्ल पायजे एकदम" "फूटात साइज सांगा हो. कीती जण आहेत फोटोत?" "गणपती आन आमी धा जण. अध्यक्षाचा फोटो मोटा पायजे." "बर बर, फोटो आणलेत का?" "मोबाईलात हायेत की, चालतेत का?" "द्या आत ऑपरेटरकडं अन आडव्हान्स माझ्याकडं" ऑपरेटर नशीबानं शेजारच्या गावातला निघाला. एका आरएमडीवर फोटो गोरे करुन घ्यायचे म्हणजे अज्याला लैच स्वस्तात सौदा वाटला. निदान लक्ष्या वारकाच्या उधारीपेक्षा. "सोयरे जरा माजा फोटो वरच्या साईडला घेताव का? मंजे हिक्डं गनपती अन हिक्डं मी." "ह्या नान्याशेजारी मी नगं. आमच्या भैनीमागं लागलय चिनालीचं" "वाश्या तूच माज्या बायकोचा कलवरा रे. लाजू नगस" "ते अजयराजे लिव्हा खाली भगव्या कलरमध्ये" मंडळाच्या चर्चा अन सूचना ऐकून वैतागलेल्या डीटीपी ऑप्रेटरने एका कागदावर सगळा मजकूर अन फोटोचा क्रम लिहून बाहेरचा रस्ता दाखवला. . . चार तासानी बोर्ड हातात पडणार आणि अज्याचा बड्डे शेलेब्रेशन म्हणून मंडळाचा मोर्चा बारकडे वळला. जमा वर्गणीतला अर्धी रक्कम अन चार तास तिथं खर्चून मंडळ उठलं. गठ्ठा बांधलेल्या डिजीटलवर मंडळाचं नाव लिहिलेलं होतं, उरलेली रक्कम अदा झाली की नीट गावाचाकडचा रस्ता दिसू लागला. अज्याकडून व्याजाने पैसे घेतलेले असल्याने मंडपवाला नाग्या इमानदारीनं बांबूचा अन दंट्याचा परांचा बांधून लोडशेडींगला शिव्या देत बोर्डाचीच वाट पाहात होता. पंग झालेलं मंडळ अन बोर्डाचा गठ्ठा नाग्यासमोर एकदमच आदळले. रात्रीच्या अंधारात, मोबाइलच्या उजेडात अन जितंवर पोहोचतेत तितक्या ऊंच गाड्याच्या हेडलाईटात नाग्यानं बोर्ड चढविला. दुसर्‍या दिवशी सक्काळसकाळी तोंडात ब्रश घोळवत बनियन टॉवेल वर अज्या चौकात आला. . . बोर्डावर गणपतीबाप्पा मजेत हाती मोदक घेऊन बसले होते. आणि बाप्पांना तुमच्यासाठी कायपण म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार्‍या कार्यकर्त्यात कोपर्‍यात कुठेतरी अज्या सिंघमकट मिशात हसत होता.

वाचने 42775 वाचनखूण प्रतिक्रिया 59

प्रचेतस Mon, 09/16/2013 - 09:18
हाहाहा. जबरी बे. सोलापुराकडची भाषा लै आवडली. लिहित का नाहीस बे सारखा सारखा?

In reply to by प्रचेतस

अभ्या.. Wed, 09/18/2013 - 14:22
सोलापुराकडची भाषा लै आवडली
वल्ली ही सोलापूरकडची भाषा नाही. हं, थोडा प्रभाव आहे पण ही भाषा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सीमेवरची आहे. जास्त करुन उमरगा, लातूर आणि उस्मानाबाद भागात बोलली जाते. सोलापुरी भाषा मलासुध्दा जमत नाही :(

आदूबाळ Mon, 09/16/2013 - 10:06
एकच लंबर! मिरासदार, शंकर पाटील वगैरेंची आठवण झाली :) अभ्याभाऊ तुम्ही रेग्युलरली लिहीत रहा... . अजयराजेंचा सिंघमकट मिशांमधल्या फटूऐवजी मोबाईलातून चुकून(!) "तोंडात ब्रश घोळवत बनियन टॉवेल" असा फटू आला असता डिजिटलवर तर मज्जा आली असती :))

In reply to by कोमल

पुन्ह्यांदा येकदा धा डाव +१ आम्ची सणमाणणीय नव्लेखक अब्याडब्या सोलापुरकर याश अशी विणंती हाए,की त्यांण्णी या इषयातले लेखण कायम आनी वारंवार करावे!

धण्यवाद!

http://www.pic4ever.com/images/SEVeyesB08_th.gif या विणंतीला माण न दिल्यास सोलापुर फुड नळदुर्गला प्रतेक्ष येऊन हग्या दम भरनेत येइल...! या धम्कीचाही या धाग्यावर येता जाता इचार करावा..! http://www.pic4ever.com/images/155fs853955.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. Wed, 09/18/2013 - 14:25
सोलापुर फुड नळदुर्गला प्रतेक्ष येऊन हग्या दम भरनेत येइल...! या धम्कीचाही या धाग्यावर येता जाता इचार करावा.
धमकी?????? च्यामारी करु काय तुमचे बी डीजीटल? ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. Wed, 09/18/2013 - 16:17
मंजे "नाद केल्यास बाद करण्यात येइल" सारखं व्हय?:-D द्या ज़रा असल्या लैनी. लै उपेग व्हतो :-D

In reply to by अभ्या..

बॅटमॅन Wed, 09/18/2013 - 16:22
१. नाद केलिया बाद केले जाल २. एकच फाईट, वातावरण टाईट. ३. बघतोस काय, मुजरा कर. ४ ओव्हरटेक केलाय वाघानं, नको बघू रागानं.

In reply to by बॅटमॅन

अभ्या.. Wed, 09/18/2013 - 16:40
ब्येस्ट आपी. :-D एकूणच यमक हरामी लोकांना चांगले करीअर आहे ह्यात. एकच घाव दादाचे नाव. आपल्या मिपासाठि ख़ास एक. :-D एकच नीलकांत, बाकी सगळे श्रीशांत ;-) पला पला मालक यायच्या आत पला :P

In reply to by अभ्या..

बॅटमॅन Wed, 09/18/2013 - 16:53
हाहाहा अगदी ;) आम्ही यमक हरामी, येऊ सगळ्यांच्या कामी ;) मिपासाठी कायपण, मधूनमधून हँगले तरीपण... एकच नीलकांत, बाकी नुस्ता आकांत ;) त्या नीलकांत नावावरनं एक अगदीच अवांतर प्रसंग आठवला. कुठे वाचला/ऐकला साफ विसरलो. देवळात कीर्तन चाललं होतं, बुवा म्हणत होते "ऐन समयी रणांत, बाण मारिसी ताकांत". लोकांना कळेना काय भानगड. मग बुवांनी एक्स्प्लेन केलं की रामरावण युद्धात रामाने मारलेले काही बाण रावणाने चुकवले की ते रावणाच्या किचनमधल्या ताकाच्या डेर्‍यांत पडायचे म्हणून =)) नंतर मग कळ्ळे, बुवा पार म्हंजे पारच गंडले होते. "ऐन समयी रणांत, बाण मारी सीताकांत" हा मूळ पाठ होता =))

In reply to by बॅटमॅन

चिगो Wed, 09/18/2013 - 21:49
लोकांना कळेना काय भानगड. मग बुवांनी एक्स्प्लेन केलं की रामरावण युद्धात रामाने मारलेले काही बाण रावणाने चुकवले की ते रावणाच्या किचनमधल्या ताकाच्या डेर्‍यांत पडायचे म्हणून 
हा हा हा .. :-D. =)) =)) एका किर्तनात असाच एका अभंगात 'करंटा' हा शब्द आला. बुवांना ठाऊक नसेल अर्थ, तर म्हणे 'ईश्वरभक्तिने शरीरात कसा करंट मारतो' ह्याचे वर्णन अभंगात केलेले आहे.. :-D

In reply to by बॅटमॅन

मालोजीराव Fri, 09/20/2013 - 18:46
मग बुवांनी एक्स्प्लेन केलं की रामरावण युद्धात रामाने मारलेले काही बाण रावणाने चुकवले की ते रावणाच्या किचनमधल्या ताकाच्या डेर्‍यांत पडायचे म्हणून
एकाच लायनीत बुवा आणि ताक दोन्ही शब्द आल्याने :))

लै भारी ष्टूरी ! कागदावर लायनी तर बेष्ट मारतूयास ;) पर हे पांढ्र्यावर काळं करनंबी झ्याक जमतया की. म्हनून वल्लीसायबाच्या... "लिहित का नाहीस बे सारखा सारखा?" ला अणुमोदण !

चौकटराजा Mon, 09/16/2013 - 17:35
सोलापूरवाले, यकतर काईच समाजकारे केल्यालं नसल्यानं परशीद्दी मिळोन्यासाटी आम्ही ह्यी डीजेटलची आयड्या काडीत आसतो.तुमाला पयशे मिळालेशी कारन ! आमची टिंगल काय करून र्‍हायला भौ ?पर जाउन द्या ते गन्पती पेक्षा बी आमचा फटू म्होटा दावा म्हन्लं ! आनि त्ये आदारस्तंब , शुबेच्चुक ,प्रेर्नास्तान चे रेडीम्याड लेट्रीग आस्त्याल नव्हं?

श्रीरंग_जोशी Mon, 09/16/2013 - 21:41
जिस दिन मैं कलम उठाता हूं, पेंटब्रश को हात नहीं लगाता... असा उसूल आहे का अभ्या तुझा? कारण पोटापाण्याच्या उद्योगामुळे लिहायला वेळ भेटत नसावा असे दिसते, नाहीतर... जाऊद्या ;-).

In reply to by पाषाणभेद

कवितानागेश Tue, 09/17/2013 - 23:55
अहो, पुढचा भाग आहे की अजून... ते अजयराजे जाउन डिजिटलवाल्याची कालर पकडतात नै का?!... तो भाग आहे अजून पुढे ;)

सस्नेह Tue, 09/17/2013 - 21:33
एकदम रियल ष्टोरी सांगिटलास बग अभ्या. डिजिटल बाप्पा मोरया !

चिगो Tue, 09/17/2013 - 23:27
भारी, डिजीटलवाले.. पार लाल झाली की भगव्या रंगातल्या अजयराजेंची.. :-D

विटेकर Wed, 09/18/2013 - 18:01
छान लिहिलयं .. या असल्या प्रकरणात जे काही तयार होतं ते भन्नाट च असलं पाहीजे.. काही वानगीदाखल... fight hmm