उपप्रतिसाद देण्याची पळवाट वापरते आहे.
स्वयंसंपादन असावं असं वाटतं. पण लेख उडवण्याची अनुमती नसावी. नजरचुकीने व्याकरणाच्या, छोट्या-मोठ्या चुका रहातात. त्या काढण्यासाठी संपादकांना खरडी, व्यनी करायच्या, इ.इ. यात बराच वेळ खर्च होऊ शकतो.
एकूणच मिपावर शक्यतोवर कमीतकमी संपादन असावं अशी अपेक्षा आहे.
प्रतिसादाची खिडकी दिसली नाही म्हणुन उपप्रतिसाद.
अर्थातच असावा. आजवर कुठल्याही फोरमवरती(अपवाद अर्थातच उपक्रम अन आता मिपा) स्वतःचे लेख संपादीत करता न येणे पाहिलेले नाही.
जर शक्य असेल तर लेख उडवता येउ नये, पण संपादित करता यावेत अशी सोय दिल्यास उत्तम.
खाली प्रतिसाद देता येत नाही.
(हा धगा वाचनमात्र ठेवायचा आहे काय? पण प्रतिसादाला उत्तर तर देता येतय. असो माझ काम भागतय ना.)
लेखकाला स्वत:चा लेख संपादित करायचा अधिकार मिळायलाच हवा अस माझ मत आहे.
काहीजण म्हणतायत की तो धागा उडवायचा अधिकार त्या लेखकाला नसावा?
या बाबतीतही असहमत आहे. मिपा प्रशासन लेकखकाने लिहिलेल्या कोणत्याच लेखनाची हमी घेत नाही. उद्या समजा कोणी एखद्या लेखका विरुद्ध कयदेशीर कारवाई केलीच तर त्याला त्या लेखकालच सामोर जाव लागणार अस मिपाच धोरण आहे. (धोरणाशी सहमत.)
मग अस असताना त्या लेखकाला त्याच लेखन ठेवायच की उडवायच याचा ही अधिकार असावा.
जर एखादा लेखक/लेखिका असे वारंवर करत असेल तर त्याच्या लेखनाला प्रतिसाद देउन आपला वेळ आणि कष्ट वाया घालवु नये.
लेखकाला स्वतःचा लेख स्वसंपादन करायचा अधिकार असायलाच हवा.
टाईप करताना काही चूका होतात. पूर्ण माहिती योग्य शब्दात मांडायची राहून जाते.
काही अधिक माहिती/ फोटो टाकता येतील.
लेखकाला स्वसंपादनाचा अधिकार असायलाच हवा. लेखातील मजकूर किमान २४ तास लेखकाला स्वसंपादीत करता यायला हवा. मिपावरील लेखक हौशी आहेत. त्यांच्याकडून काटेकोर लेखनाची अपेक्षा गैरवाजवी आहे. कितीही वाचने केली तरी चूका राहूनच जातात. मात्र लेखकाला संपूर्ण धागा प्रतिसादांसकट उडवण्याचा अधिकार नसावा.
अगदी सहमत आहे.
राजेशच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे व्यावसायिक पातळीवरही शुद्धलेखन इ.च्या चुका दिसतातच, तर मग हौशी लेखकांना स्वतःच्याच चुका निस्तरण्याचे अधिकार का मिळू नयेत.
दहा वेळा तीच-तीच गोष्ट लिहून वाचल्यानंतर शुद्धलेखन, टायपोज या चुका लगेच दिसत नाहीत. तुमच्यापैकी ज्या कोणी कोणत्या-ना-कोणत्या प्रकारचे प्रबंध लिहीले आहेत, आणि चुका सुधारण्यासाठी म्हणून किंवा परीक्षणासाठी वाचले आहेत त्यांनी ही गोष्ट सांगावी. माझ्या स्वतःच्या प्रबंधात एक महिन्यानंतर मला दोन-चार टायपो आढळल्या, ज्या तेव्हाच्यातेव्हा वाचताना दिसल्या नाहीत.
काही लोकं खोडसाळपणा करत असतीलही, पण किती लोक असे आहेत? साधारण ५%?? लेख टाकून नंतर तो उडवून देण्याच्या घटना किती होत्या, आहेत? ५%ही नसतील...
त्यांच्यासाठी सगळ्यांनाच (अपवाद संपादकांचा) शुद्धलेखन, टायपोज इ.साठी स्वसंपादनाची जबाबदारी न देणे कितपत योग्य आहे?
येवढं सगळं टंकूनही अंतिम निर्णय मालकांचा आहे हे मान्य आहे. पण तरीही 'अधिकार नसावा' हा मुद्दा पटत नाही म्हणून एवढे प्रतिसाद!
अदिती
मालकांवर अशा प्रकारे संपादक वा सभासदांनी दबाव टाकावा असं मला वाटत नाही. मालकांनी त्यांना सोयीस्कर काय तो निर्णय घ्यावा. मिपाच्या मालकांवर माझा संपूर्ण विश्वास आहे आणि त्यांना पाठिंबाही आहे.
उद्या इथे काही कायदेशीर वा बेकायदा भानगडी उपटल्या तर त्या निस्तरायला मालकांनाच लागणार ...
दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला नाही. मालकांना पाठींबा आहे. त्यांची मेहनत दिसत आहे. वेळोवेळी सदस्यांनी नवीन रूपाबाबत केलेल्या सूचना लगेच अंमलात आणल्या जात आहेत. दुर्दैवाने धोरणांमध्ये तितक्या सहजपणे बदल घडत नाहीत म्हणून विचारून घेतले.
गुरुबिन कौन बतावे वाट्,बडा बिकट यमघाट ॥
भ्रांतिकी पहाडी नदिया बिच मों। अहंकार की लाट ॥
काम-क्रोध दो पर्वत ठाडे। लोभ चोर संघात ॥
मद-मत्सर का मेहा बर्सत। माया पावन बहे दाट॥
कहत 'कबीर' सुनो साधो। क्यों न तरना यह घाट॥
फरक.
चुकीची तुलना होत आहे असे वाटते.
समाजात नियम हवेत का असे जनतेला विचारले तर तुम्ही म्हणता तसा नको असा बहुसंख्यांचा कल असु शकतो.
पण कुठलाही निर्णय घेताना जनतेची सोय आणि गैरसोय याची तुलना करुन घेतला जातो. जर सोय निर्विवादपणे जास्त असेल तर निर्णयाला हिरवा कंदील मिळाला.
दुर्दैवाने इथे सोय फक्त काही लोकांची बघितली जात आहे का अशी शंका येते. संपादकांनी हा कौल 'संपादकां विरुद्ध कट' आहे वगैरे अश्या मानसिकतेतुन बघु नये ही आशा. (बहुतेकांचा सुर तसा दिसतो आहे.)
मिपा वर सोय द्यायची की नाही असे कौल काही नवे नाहीत. त्याने मिपा सुधारणार असेल उत्तमच. त्यामुळे कौल घेण्यालाही ना असु नये.
शेवटी मिपा खाजगी आहे, '(क्ष कारणांसाठी/ किंवा नुसतेच) ही सोय दिली जाणार नाही(यापुर्वीही असे अनेक निर्णय जाहीर केले गेले आहेतच)' असे मिपाने जाहीर केले तर सदर चर्चेत आम्ही वेळ वाया घालवणार नाही.
'असे होणारच नाही, तुमचे विचार ऐकणारच नाही' अशी भुमिका असेल तर वेळ घालवण्यात प्वॉईंट नाही.
नसावा असे मत दिले आहे.
कारण असे की -
१. शुद्धलेखनाला आपण ** वर मारतो. तेव्हा लेखनात शुद्धलेखनाच्या थोड्या उणीवा राहिल्या तरी त्या खूप कटकटीच्या नाहीत.
पण,
२. लेखकाला स्वसंपादनाचे अधिकार दिल्यास लेखातील ज्या वाक्यामुळे गहजब उडून जातो, अशा वाक्यांना मनात येईल तेव्हा काढून टाकण्याचे अधिकार लेखकाकडे राहतात, काही लेखक प्रतिक्रिया वाईट आल्या की लेख उडवून टाकतात, कधीकधी आक्रस्ताळेपणा करतात अशीही उदाहरणे दोन एक वर्षांपूर्वी पाहिली आहेत ती आठवतात. तेव्हा अशा प्रकारे अधिकच गोंधळ उडू शकतो. त्यापेक्षा एकदा लेख टाकला की परत त्यात बदल करता येऊ नयेत असे मला वाटते.
थोड्या चुका राहिल्यास त्या संपादकांकडून किंवा प्रतिसाद देऊन काढता येऊ शकतात.
जर एखादा लेखक/लेखिका असे वारंवर करत असेल तर त्याच्या लेखनाला प्रतिसाद देउन आपला वेळ आणि कष्ट वाया घालवु नये.
असे वारंवार करणारे लोक कोण हे नवीन सदस्यांना कसे कळावे? नवीन लोक तर देतीलच ना प्रतिसाद? का मग 'तशा' लोकांसाठी काही फ्लॅगिंग वगैरे करावे? ... बापरे!!! गुंतागुंत वाढत चालली आहे. त्यापेक्षा सरळ आपण लिहितानाच का नाही १० वेळा तपासून विचार करून लिहावे?
बिका तुम्ही म्हणताय ते पटतय की नविन सदस्यांना कस कळाव बर एखाद्या लेखकाबद्दल.
बरेच ठिकाणी एखाद्या लेखाला +/- मतं देण्याची सोय असते. तस करावं का?
एका सदस्याला एकदाच मत नोंदवता यावं. आणि ठरावीक - मत (२५-५०) पडली तर मग तो धागा अप्रकाशित करावा. (उडवु नये.)
पण मग - मतं पडली तर लेखक गळा काढेल की माझ्या हितशत्रुंनी माझ्या विरुद्ध एकत्र येउन कट केलाय.
पण चालायचच लोकशाहीत १००% जनता, १००% सुखी होउ शकत नाहीच. नाही का?
लेखकाला स्वत:चा लेख संपादित करायचा अधिकार मिळायलाच हवा अस माझ मत आहे.
काहीजण म्हणतायत की तो धागा उडवायचा अधिकार त्या लेखकाला नसावा?
या बाबतीतही असहमत आहे. मिपा प्रशासन लेकखकाने लिहिलेल्या कोणत्याच लेखनाची हमी घेत नाही. उद्या समजा कोणी एखद्या लेखका विरुद्ध कयदेशीर कारवाई केलीच तर त्याला त्या लेखकालच सामोर जाव लागणार अस मिपाच धोरण आहे. (धोरणाशी सहमत.)
मग अस असताना त्या लेखकाला त्याच लेखन ठेवायच की उडवायच याचा ही अधिकार असावा.
जर एखादा लेखक/लेखिका असे वारंवर करत असेल तर त्याच्या लेखनाला प्रतिसाद देउन आपला वेळ आणि कष्ट वाया घालवु नये.
१००% सहमत...
मला वाटतं लेखाच्या खाली लेखकाच्या "वाटचालः चा दुवा द्यावा आणि वाटचालमधे उडवलेल्या लेखांची संख्या द्यावी. हे सहज शक्य आहे. मग लोकांना ठरवता येईल. प्रतिसाद द्यायचे की नाही अथवा वाचायचे की नाही ते.
जुने वाचक हे आकडे न पहाताच ठरवू शकतात आणि नवीन वाचक/सभासदांना या गोष्टी समजतीलच याची खात्री नाही. तांत्रिक दृष्ट्या हे शक्य आहे का नाही मला माहित नाही, पण वाचकाच्या नजरेतून ही सोय उपयोगशून्य आहे.
ही सुविधा दिली आणि मला याचा उपयोग माहित असेल तरीही मी स्वतः किती वेळ आणखी एक दुवा उघडून या गोष्टी पहात बसेन शंकाच आहे.
समजा तुम्हाला लेख प्रकाशित केल्यावर असे वाटले की हा लेख कुठल्यातरी कारणासाठी बरोबर नाही तर तो ठेवून काय करायचा ? पुरावा म्हणून ? आणि कोणा विरूध्द? त्या virtual आय डी विरूध्द ?
तसेच संपादकाना जर वाटले की हा लेख काही कारणासाठी उडवला पाहिजे तर ते तो उडवतात. तुम्हाला स्वतःलाच जर असे वाटले आणि तो तुम्ही उडवला तर चांगले नाही का ? याचा दुरुपयोग काय होऊ शकतो ते मला कळले नाही. एखाद्याला त्याचे लेखन इथे वाचकांसाठी ठेवायचे नसेल तर ते त्याचेच नुकसान नाही का ?
याचा दुरुपयोग एखाद्याला नावे ठेवून तो लेख लगेचच काढून केला जाऊ शकतो. पण ते लगेचच लक्षात येईलच की. मग त्याचा आय डी बंद करायला कितीसा वेळ ? अर्थात त्याला योग्य समजही देता येईल. त्याच्याकडून स्पष्टिकरणही मागता येईल.
मी एका भाषांतरासाठी रितसर परवानगी घेतली होती. पण त्या साईटच्या घोळात काय झाले माहीत नाही, मला एका वकिलाचा फोन आला होता ते लेख ताबडतोब काढा म्हणून. अर्थात मी नंतर तो त्यांच्याशी भांडून टाकला ते वेगळे. पण परदेशात अशा संधींची वकील लोक आतुरतेने वाट बघत असतात. मी जर त्या रात्रीच ते लेख उडवले नसते तर निलकांतला निश्चितच त्रास झाला असता. असे मला वाटते.
असो अधिकार असावा असे आपले म्हणणे असावे. तो अधिकार योग्य रितीने कसा वापरावा हा प्रश्न सोडवता येईल.
तसेच संपादकाना जर वाटले की हा लेख काही कारणासाठी उडवला पाहिजे तर ते तो उडवतात. तुम्हाला स्वतःलाच जर असे वाटले आणि तो तुम्ही उडवला तर चांगले नाही का ? याचा दुरुपयोग काय होऊ शकतो ते मला कळले नाही. एखाद्याला त्याचे लेखन इथे वाचकांसाठी ठेवायचे नसेल तर ते त्याचेच नुकसान नाही का ?
लेख उडवण्याचा पर्याय नसावाच असे वाटते, यासाठी एक उदाहरण बघुयात उदाहरणात मी जयंत कुलकर्णी यांचेच नाव वापरतोय. तर जयंत कुलकर्णी एक लेख लिहितात त्या लेखाला पाच पॉसिटिव्ह आणि पाच निगेटिव्ह प्रतिसाद येतात. तर अश्या वेळेस जयंत कुलकर्णी माझ्या लेखाला माझ्या अपेक्षे प्रमाणे प्रतिसाद येत नाहीत असे कारण देउन लेख उडवुन टाकतात. तर अशा प्रसंगात त्यांनी केलेले वर्तन योग्य का अयोग्य??? मला तरी या कारणासाठी लेख उडवणे अयोग्य वाटते. कारण या लेखाचे १०० वाचने झालेले असतात म्हणजेच कमीत कमी दहा वीस वाचकांनी हा लेख वाचण्यासाठी वेळ घालवलेला असतो. त्याच सोबत दहा प्रतिसाद दिलेले लोक त्यांचा वेळ साधक बाधक चर्चे साठी घालवतात. मग अशा वेळेस हा या सर्व लोकांसाठी हे अन्यायकारक नाहीए का??? त्यामुळे या कारणासाठी लेख उडवणारे सदस्यांमुळे ही सुविधा नसावीच.
माझ्या मते स्वसंपादनाची सुविधा द्यायचीच झाल्यास त्यामागे रिविजन सारखे काहीतरी करावे म्हणजेच समजा एखादा लेख स्वसंपादित झाल्यास जुनी आवृत्ती संकेतस्थळ व्यवस्थापकांना उपलब्ध असेल. यावर सविस्तर लिहिनच
मी जर त्या रात्रीच ते लेख उडवले नसते तर निलकांतला निश्चितच त्रास झाला असता. असे मला वाटते.
हो त्यासाठी तुम्ही संपादकांची मदत घेउच शकला असता..
त्यामुळे स्वता:चे लेख उडवायचा अधिकार नसावाच
माझेच नाव वापरूयात.
समजा मी एक लेख लिहीला आणि माझ्या मनाप्रमाणे प्रतिसाद नाही आले असे समजूयात. पण समजा श्री. थत्ते यांनी मला हा लेख या काळात कसा चूक आहे हे कळवले आणि मला ते पटले तर मी काय करायचे ? तो तिथेच ठेवायचा आणि मारामारी पहात रहायची ? मी माझ्याच नावाने लेखन करतो म्हणून ती जबाबदारी माझी नव्हे काय ? समजा मी तो लेख तसाच ठेवला असता आणि माझ्यासारखेच समजा एखाद्या संपादकाला वाटले असते तर त्याने तो उडवलाच असता ना ? तर मी उडवला तर काय बिघडले ?
पहिल्यांदा लेख, मग प्रतिसाद.
बघा पटतय का ? लेखकाला वाचकाने पाठ फिरवणे हिच शिक्षा मला वाटते नैसर्गिक आहे. दुसरी कुठलिही नाही.
श्री. थत्ते यांनी मला हा लेख या काळात कसा चूक आहे हे कळवले आणि मला ते पटले तर मी काय करायचे ?
संपादकांना व्यनी़ करा ते लगेचच तुमचा लेख अप्रकाशित करतील...
माझ्या मते तर संकेतस्थळा वरचे कोणतेच लेख उडवण्यात येउ नये...
फार फार तर अप्रकाशित व्हावेत असे वाटते..
दुसर्या कोणी चूक पटवून दिली तर लेख उडवण्यापेक्षा जास्त समजूतदारपणा दाखवून स्वतःच्या आधीच्या विचारांचंच खंडन करणारा प्रतिसादही तिथेच, त्याच धाग्यावर लिहीता येतो.
लेख उडवण्याच्या टोकाच्या कृत्यामुळे आमच्यासारख्या शुद्धलेखनाच्या, आणि नजरचुकीने रहाणार्या चुका दुरूस्त करणार्यांचंही 'स्वातंत्र्य' हिरावलं गेलं आहे.
पेशवे: आगलावी विधानं संपादक नक्कीच उडवू शकतात, उडवतात.
एक लेख उडवल्यामुळे संपादक आणि मालकांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे हा ही एक टोकाचा विचारच! पण काही आयडींनी ही गोष्ट वारंवार केल्यामुळे सगळ्यांनाच या गोष्टीचा त्रास होत आहे.
मला वाटतं धागा उडवणे याला विरोध नसुन. गहजब माजवुन धागा काढुन नामानिराळे होणे याला (काही)संपादक मंडळींचा विरोध असावा. (असे अनेकदा झाल्याने)
हेच कारण असेल तर, (इतर पर्यायात आणि एक भर) सदस्याने धागा डीलीट केल्यावर तो काही काळ अप्रकाशित(किंवा प्रकाशित) रहावा. तितक्या वेळेत संपादक निर्णय घेउ शकतील अन्यथा धागा आपोआप डीलीट होइल.
(इथे अनेक सुचना देतो आहे, अर्थात सुचना अंमलात आणणे तांत्रिक दृष्ट्या दरवेळी शक्य असते असे नाही याचीही कल्पना आहे)
बर्याच डेटाबेस मध्ये उडवलेले लेख असतात(आमच्या डीबी मध्ये आम्ही पाहु शकत होतो) त्यामुळे इथेही व्यवस्थापकांना ते पहाता येत असावेत. डीलीट केल्यानंतरही.
समजा येत नसतील तर लेख डीलीट च्या ऐवजी लेख अप्रकाशित अशी सुविधा दीली तर संपादक/व्यवस्थापक तो लेख पाहु शकतील/लेखक त्याचा निर्णय घेउन संपादकांना कळवु शकेल. आणि योग्य तो निर्णय घेता येईल,
असावा ह्याला मत दिले आहे.
आमची सुचना : लेखकाने प्रथम लेख लिहून प्रकाशीत केल्यानंतर संपादन केल्यास लेख प्रशासकीय अनुमतीसाठी जावा. ही सोय करता येऊ शकेल. सरसकट सर्वांचा स्वसंपादनाचा अधिकार काढून घेणे मला चूक वाटते.
तरी बरं . लेख प्रकाशित करण्या पुर्वी म्हणाला नाहीस...
अर्रर्र.. आम्चं या धाग्यातल मौन व्रत तोडायला लावल या शिंच्या प्रभ्याने.
असो आता मात्र एकदम फेविक्वीक लावल्या गत गप्प. :-|
>>>>आमची सुचना : लेखकाने प्रथम लेख लिहून प्रकाशीत केल्यानंतर संपादन केल्यास लेख प्रशासकीय अनुमतीसाठी जावा. ही सोय करता येऊ शकेल.
हांग आश्शी.... झालं वर्तुळ पूर्ण झालं.
चुकीचा शब्द
नवीन
प्रेषक प्रभाकर नानावटी (शुक्र, 07/30/2010 - 12:04)
दुरुस्ती सुचविल्याबद्दल धन्यवाद!
निर्मिती थांबवतात. या शब्दप्रयोगाऐवजी निरोधक वा प्रतिबंधक म्हणून काम करतात. असे हवे होते.
मूळ लेखाच्या संपादनाची सोय नसल्यामुळे आता काही करता येत नाही. क्षमस्व!
माझे मत हा अधिकार असावा या कडे जास्त झुकणारा आहे. पण प्रत्येक अधिकाराबरोबर काही जबाबदार्याही येतात याचे भान किती लोकांना आणि किती काळ टिकणारे आहे हा एक संशोधनाचा विषय ठरावा. मध्यंतरी काही सदस्यांनी काही क्षुल्लक कारणांवरूनही लेखन उडवण्याचे प्रकार केले. त्यावेळी प्रतिसादकांच्या तक्रारी आल्या. त्यांचे काय करायचे? या बाबत अजूनही संदिग्धता आहे म्हणून कौलात मत देत नाहीये कारण तिथे 'अजून काही' प्रकारचा पर्याय उपलब्ध नाहीये.
बिपिन कार्यकर्ते
'नसावा' असे दिले आहे.
हा प्रतिसाद बिपीन ह्यांच्या प्रतिसादास उत्तर म्हणून देत नाही, पण खाली कुठेच मूळ धाग्यास प्रतिसाद देण्याची सोय दिसलेली नाही. म्हणून येथे देत आहे.
लेखन एकदा कुठल्याही माध्यमातून प्रसिद्धीस दिले गेले, की त्याच्या संपादनाचा हक्क लेखकास नसावा. जे काही लिहावयाचे आहे, ते संपूर्ण जबाबदारीने, सर्व भान ठेऊन लिहावे, नीट तपासावे व मगच ते प्रसिद्धीस द्यावे. प्रिंट मीडियात लेख प्रसिद्धीस देतांना हा हक्कच आपल्याकडे रहात नाही, त्या ठिकाणी जे जबाबदारीचे भान आपणास असते, तेच इथेही असावे असे मानणे गैर नसावे?
बर्याच ठिकाणी मुद्रित माध्यमात आणि फक्त इंटरनेटवर प्रसिद्ध होणार्या लिखाणासाठीही अशा प्रकारच्या चुका राहू नयेत म्हणून संपादक असतात. मिपावरचे संपादक हे या कारणासाठी संपादक केले नसावेत. त्यामुळे तुलना थोडी चुकीची होते आहे असं वाटत आहे.
बिकासाठी उत्तरः जबाबदारीचे भान असावे ही गोष्ट तर आहेच्च आहे.
ही जबाबदारी जशी धागा प्रवर्तकाची आहे तशीच प्रतिसादकांची आहे आणि एखादा प्रतिसाद, एखादी ओळ, इ.इ. गायब करण्याचे अधिकार असणार्या संपादकांचीही!
आपण आपली जबाबदारी निभावतो का, हा प्रश्न स्वतःच स्वतःला विचारलेला उत्तम!
बेजबाबदारीमुळे झालेल्या चुका आणि नजरचुकीने राहिलेल्या चुका यांना एकाच तागडीत तोलणं चुकीचं वाटत आहे.
मिपावरचे संपादक हे या कारणासाठी संपादक केले नसावेत.
हम्म. बरोबर.
बेजबाबदारीमुळे झालेल्या चुका आणि नजरचुकीने राहिलेल्या चुका यांना एकाच तागडीत तोलणं चुकीचं वाटत आहे.
सहमत पण स्वसंपादनाचा अधिकार वापरताना लेखक एखाद्या वेळेस काडी टाकणारे लेखन करून मग नंतर ते संपादित करू शकतो याचीही नोंद घ्यावी.
कटाळा आला राव. शेवटी काही निष्पंन होणार नाहीच.
शेवटचा उपाय सगळ्यांना संपादक करुन टाका.
यापुढे इथे प्रतिसाद नाही. (हे वैतागुन लिहिले नाही. )
(आणि हो तो उपायही हलक्यात घ्यावा.) .
लोक फक्त कटकटच करतात अशी मनोभूमिका बनली की मग अवघड होत असावे.
अर्थात केवळ कोणीतरी अॅग्रेसिव्हली ठासून म्हणते एवढ्या कारणावरून हा निर्णय घेतला नसणार. काहीतरी ठोस पार्श्वभूमी असू शकेल.
म्हणून प्रॉब्लेमचा विदा मिळाला तर स्वसंपादन हवे असे म्हणणारे कदाचित स्वसंपादन नको या मताकडे झुकू शकतील.
त्यामुळे तसा प्रयत्न करायला काय हरकत आहे?
अहो लफडं काय आहे ना.. की प्रत्येक वेळी विदा देता येतोच असे नाही. शिवाय, बरेच वेळा लोक विद्याची वाट वगैरे न बघता (आणि मिळाला तरी) एवढी ठाम मतं बनवतात की विदा देऊनही उपयोग होईल असे वाटत नाही म्हणून जाऊ दे म्हणून गप्प बसतो मी तरी.
त्यांना भागच असते.
बास तर मग!!! ;) तेच म्हणतोय मी पण. गप्पच बसतो मी. अगदी 'बाकी चालु द्या' असं म्हणण्यापुरतं पण तोंड उघडत नाही. ;)
असो. बाकी बोलूच, इकडे तिकडे. इथे नको.
कार्यकर्ते साहेब,
निकालाचे महत्व तसे म्हटले तर काहिच नाही. शेवटी मालक ठरवतील काय योग्य आहे ते. मी हा कौल घेतला तो लोकांचे मत जाणून घ्यायला. जबाबदारीचे म्हणाल तर The owner or We will have to define it and then follow it.
कुलकर्णी साहेब, सहमत आहे. माझे प्रतिसाद केवळ तुम्हालाच उद्देशून लिहिले नव्हते. असे बरेच प्रकार घडले आहेत. आणि संपादक म्हणून ते मला (आणि माझ्या सहकार्यांना) जाणवतं... म्हणून हा आटापिटा. असो. विषय मोठा आहे आणि बरेच पैलू आहेत. म्हणून म्हणलं की जर का काळजी घेतली तर सहसा स्वसंपादनाची वेळ येत नाही. बाकी वैयक्तिक काही नाही हे समजून घ्यावे ही विनंती.
नमस्कार.
आपल्या मताचा मान आहेच.
पण मुद्दा आपण केलेल्या चुका आपणच दुरुस्त करायच्या का नाही? हा आहे.
कदाचीत असे असावे की ज्यांना खोडसाळपणाचा त्रास झालेला आहे त्यांचा या सुविधेला विरोध आहे. पण असे प्रसंग किती ? आणि जे काही चालेलेले असतं ते within their circle चाललेले असते. ते चालू देत. विशेषतः विडंबीत लेखन वा कविता इ.इ. या मधून.
लेखन प्रसिद्धीस देताना जबाबदारीने द्यावे आणि लेखनही जबाबदारीने करावे ही किमान अपेक्षा लेखकाने स्वतःबद्दल ठेवणे आणि वाचकांनी लेखकाबद्दल ठेवणे रास्त वाटते. हे भान मिपावरील अनेक लेखकांना नाही आणि त्यातील एक नाव जयंत कुलकर्णी यांचेच आहे.
असो. याखेरीज स्वसंपादनाने खालील तोटे होतात असे वाट्ते आणि पाहिले आहे.
१. आधी काहीतरी लिहून लोकांनी आक्षेप दाखवल्यावर "मी तो नाहीच" असा स्टँड किंवा मूळ लेखात बदल करून इतरांनाच वेड्यात काढणे.
२. आपल्या अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाले नाहीत तर लेख काढून टाकणे. (हे करणारे लेखक असे फारसे होताना दिसत नाही असे म्हणतात हे दुर्दैव.)
३. संपादनाला "सेन्सिटिव" विषयावरील लेख दाखवून ते प्रशासनाच्या संमतीने टाकून मग टाकताना त्यात बदल करून टाकण्यात आले.
४. लोकांना थोडी शिस्त हवी. घाईत काहीतरी लिहिण्यापेक्षा विचारपूर्वक लिहावे. नसल्यास संपादक मोठ्या चुका सुधारतात आणि लहान चुका प्रतिसादातून किंवा पुढील लेखातून सुधारता येतील. आम्हाला स्वसंपादनाची सुविधा हवी पण आम्ही विचार करून, १० दा वाचून लेख प्रकाशित करणार नाही हा आव येथे दिसतो.
५. गैरसमज - मध्यंतरी लेख/ चर्चा गायब का झाल्या असा प्रश्न लोकांना पडला. संपादकांकडे, मिपाकडे अशी कोणतीही सुविधा नाही की हे नेमके का झाले ते पाहायची. असे छडे लावण्यात संपादकांचा वेळ वाया जातो.
//लेखन प्रसिद्धीस देताना जबाबदारीने द्यावे आणि लेखनही जबाबदारीने करावे ही किमान अपेक्षा लेखकाने स्वतःबद्दल ठेवणे आणि वाचकांनी लेखकाबद्दल ठेवणे रास्त वाटते. हे भान मिपावरील अनेक लेखकांना नाही आणि त्यातील एक नाव जयंत कुलकर्णी यांचेच आहे.//
बरोबर आहे आणि पटले देखील. माझे सर्व लेख आपण बाचुनच हे मत बनवले असेल हे मी गृहीत धरतो.
धन्यवाद !
आपण आपला लेख उडवलात आणि त्याबरोबर आलेले प्रतिसाद उडवलेत हे खोटे का? त्याची विचारणा करता आपल्या शब्दांत खंत दिसली नाही. उलट धोरणे प्रकाशित झाल्यावर आता मी यापुढे लिहिणार नाही असा पावित्रा आपण घेता. त्यानंतर हा कौल टाकता आणि लोकमत जमवता.
येथे लिहिताना आपण फक्त शुद्धलेखनाच्या चुका सुधारण्यासाठी असा सूर काढताना दिसता, कोठेही आपण मीही लेख उडवले आहेत असे लिहित नाही (खाली सदस्यांनी छेडल्यावर आपण आता माफी मागता). जर मिसळपावावर व्याकरण आणि शुद्धलेखनाला फारसे महत्त्व नाही पण तरीही आपला लेख परिपूर्ण असावा अशी कळकळ तुम्हाला आहे तर प्रथम पाऊल आपण न उचलता संपादन आणि संपादकांवर, धोरणांवर शरसंधान कशासाठी?
जबाबदारीने १० वेळा वाचून लेख का टाकत नाही हा प्रश्न आहेच. माझ्यामते हे वागणे बेजबाबदार आहे.
बाकी चालू द्या.
आपण हा सर्व धागा निट वाचलात का ? माझे उदा. जेव्हा देण्यात आले तेव्हा मी माझेच उदा. देऊन उत्तर दिले आहे. याचा अर्थ आपाल्याला कळला की नाही ? माझे मत लेखकाला धागा उडवण्याचा हक्क असावा असे आहे हे मी स्पष्टपणे मांडलेले आहे. याच धाग्यात. माफी बद्दल म्हणाल तर संबंधीत सदस्याने जे म्हटले त्यावर मी काय आनंद व्यक्त करायला पाहिजे होता असे तुमचे म्हणणे आहे का ? तुम्हाला कुठलीही गोष्ट सरळ दिसत नाही असे दिसते. मला तर त्या सदस्याने छेडले असे काहीच वाटले नाही. त्याचे ऊत्तर पण मी दिले आहे.
आपली प्रतिसादाची भाषा अत्यंत उध्दटपणाची असल्यामुळे आपण यावर जो परत उध्दट्पणे प्रतिसाद द्याल त्याला मी उत्तर देणार नाही हे ओघाने आलेच.
खरे बोल आपल्याला उद्धटपणाचे का वाटावे?
मी दोन महिन्यांपूर्वीच्या माफीबद्दल बोलत होते. त्यावेळेस मी विचारणा केली होती पण आपल्या शब्दांत खंत दिसली नाही. तो धागा आपण उडवलात आणि सोबत लोकांचे प्रतिसादही. हे वागणे बेजबाबदार नाही काय? असो.
बाकी, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नसली की माणूस गुद्द्यावर येतो हा जुना अनुभव. आपल्याला आपल्या वागण्यातील उद्धटपणा दिसत नाही हे देखील आहेच.
माझ्यामते धाग प्रकाशित झाल्यावर काहि ठराविक वेळ अथवा कहि ठराविक प्रतिक्रीया येईपर्यंत (जे तांत्रिक दृष्ट्या शक्य आहे) तोपयंत हा अधिकार द्यावा. त्या अवधीत ज्या दुरुस्त्या आवश्यक आहेत त्या लेखकाने कराव्यात. नंतर प्रतिसादात शुद्धीपत्रे द्यावीत.
बाकी या धाग्याच्या खाली प्रतिसादाला सोय नसल्याने प्रदीप यांच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद.. मात्र तो फक्त त्यांना नाहि
मला एक मूलभूत प्रश्न पडला आहे:
एखादा लेख अथवा प्रतिसाद अप्रकाशित करण्याचा हक्क (आणि तशी क्षमता) संपादकांकडे आहे. एखाद्या लेखकानं खोडसाळपणापोटी किंवा पुरेशा सबळ कारणाअभावी आपलं लेखन अप्रकाशित केलं आहे असं वाटलं, तर ते लेखन पुनःप्रकाशित करण्याचा हक्क (आणि तशी क्षमता) संपादकांकडे नाही का? त्यामुळे खोडसाळपणालाही धरबंद बसेल आणि ज्यांना रास्त कारणांसाठी लेखनाचं पुनर्संपादन करायचं आहे त्यांना आता वाटत असणारी अन्यायाची भावनाही नाहीशी होईल.
सारांशः लेखकानं काहीतरी आक्षेपार्ह लिहिलं तर संपादक ते अप्रकाशित करू शकतात. तसंच लेखकानं काहीतरी अप्रकाशित केलं आणि ते वर्तन आक्षेपार्ह वाटलं तर संपादक ते प्रकाशित करू शकतील. यामुळे अगदी शंभर टक्के नाही, पण आताहून अधिक लोक आनंदी होतील. आताहून अधिक आनंदी होणारे लोक हे खोडसाळ नसतील कारण त्यांना जे स्वसंपादन करायचं आहे (आणि जे आज त्यांना करता येत नाही आहे या कारणापोटी ते आनंदी नाहीत), ते खोडसाळपणाचं नाही . म्हणजे एक सुवर्णमध्य गाठता येईल. नाही का?
"अप्रकाशित करणे" आणि "काढून टाकणे" यात फरक आहे , जो सर्वसामान्य सभासदांकरता पारदर्शक आहे. संपादक जेव्हा अप्रकाशित करतात तेव्हा तो नोड अस्तित्त्वात असतो, फक्त तो अप्रकाशित असतो. लेखक जेव्हा आपले लेखन "उडवतो/ते" तेव्हा ते "डिलिट" करतात.
संपादक जेव्हा अप्रकाशित करतात तेव्हा तो नोड अस्तित्त्वात असतो, फक्त तो अप्रकाशित असतो. लेखक जेव्हा आपले लेखन "उडवतो/ते" तेव्हा ते "डिलिट" करतात.
पण मग तांत्रिक बदल करून असं करता येईल का - लेखक आपलं लेखन उडवेल तेव्हाही ते अप्रकाशितच होईल. लेखकानं लेख उडवण्याचं कारण देणं अपेक्षित असेल. त्यानंतर संपादक मंडळ ते रास्त होतं अथवा नाही आणि नसलं तर काय करायचं याचा निर्णय घेईल. म्हणजे स्वसंपादनाचा पर्यायही राहील आणि मनमानीही चालणार नाही.
असावा
In reply to असावा by नितिन थत्ते
+१
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रतिसादाची खिडकी दिसली नाही
In reply to प्रतिसादाची खिडकी दिसली नाही by Nile
माहिती
In reply to माहिती by नितिन थत्ते
खाली प्रतिसाद देता येत
In reply to खाली प्रतिसाद देता येत by गणपा
१००% सहमत.
In reply to १००% सहमत. by मेघवेडा
असावा.
In reply to असावा. by मीनल
सहमत
In reply to सहमत by क्रेमर
+१
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
३६ विरुद्ध ८
In reply to ३६ विरुद्ध ८ by क्रेमर
मालकांवर अशा प्रकारे संपादक
In reply to मालकांवर अशा प्रकारे संपादक by ३_१४ विक्षिप्त अदिती
दबाव?
In reply to दबाव? by क्रेमर
--
In reply to -- by नितिन थत्ते
नाही ना
In reply to नाही ना by क्रेमर
गुरुबिन कौन बतावे वाट्,बडा
In reply to ३६ विरुद्ध ८ by क्रेमर
हम्म!
In reply to हम्म! by प्रियाली
किंचित बदल
In reply to हम्म! by प्रियाली
फरक. चुकीची तुलना होत आहे
In reply to फरक. चुकीची तुलना होत आहे by Nile
उलटपक्षी
In reply to खाली प्रतिसाद देता येत by गणपा
सहमत
In reply to खाली प्रतिसाद देता येत by गणपा
श्री. गणपा, तुम्ही लिहीलेले
In reply to श्री. गणपा, तुम्ही लिहीलेले by जयंत कुलकर्णी
मी माझे वर लिहिलेले मत
In reply to मी माझे वर लिहिलेले मत by गणपा
हाच तो समजूतदारपणा ...
In reply to हाच तो समजूतदारपणा ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
नसावा
In reply to नसावा by चित्रा
तुम्ही दिलेल्या कारणांवर फक्त
In reply to खाली प्रतिसाद देता येत by गणपा
जर एखादा लेखक/लेखिका असे
In reply to जर एखादा लेखक/लेखिका असे by बिपिन कार्यकर्ते
बिका तुम्ही म्हणताय ते पटतय
In reply to बिका तुम्ही म्हणताय ते पटतय by गणपा
गणप्या लेका, तुझ्या
In reply to गणप्या लेका, तुझ्या by बिपिन कार्यकर्ते
गणप्या लेका, तुझ्या
In reply to गणप्या लेका, तुझ्या by गणपा
लेखकाला स्वत:चा लेख संपादित
In reply to गणप्या लेका, तुझ्या by बिपिन कार्यकर्ते
>>>>हेच तर सांगायचा प्रयत्न
In reply to गणप्या लेका, तुझ्या by बिपिन कार्यकर्ते
पण चालायचच लोकशाहीत १००%
In reply to बिका तुम्ही म्हणताय ते पटतय by गणपा
मला वाटतं लेखाच्या खाली
In reply to मला वाटतं लेखाच्या खाली by जयंत कुलकर्णी
जुने वाचक हे आकडे न पहाताच
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
समजा तुम्हाला लेख प्रकाशित
In reply to समजा तुम्हाला लेख प्रकाशित by जयंत कुलकर्णी
तसेच संपादकाना जर वाटले की हा
In reply to तसेच संपादकाना जर वाटले की हा by निखिल देशपांडे
लेख संपादित करण्याची सोय हवी,
In reply to तसेच संपादकाना जर वाटले की हा by निखिल देशपांडे
माझेच नाव वापरूयात. समजा मी
In reply to माझेच नाव वापरूयात. समजा मी by जयंत कुलकर्णी
श्री. थत्ते यांनी मला हा लेख
In reply to माझेच नाव वापरूयात. समजा मी by जयंत कुलकर्णी
दुसर्या कोणी चूक पटवून दिली
In reply to दुसर्या कोणी चूक पटवून दिली by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी जो माझा एक लेख ऊडवला
In reply to मी जो माझा एक लेख ऊडवला by जयंत कुलकर्णी
पुन्हा टोकच
In reply to पुन्हा टोकच by ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो टोक नाही पण त्या निर्णयात
In reply to पुन्हा टोकच by ३_१४ विक्षिप्त अदिती
परत एकदा माफी
In reply to माझेच नाव वापरूयात. समजा मी by जयंत कुलकर्णी
मला वाटतं धागा उडवणे याला
In reply to तसेच संपादकाना जर वाटले की हा by निखिल देशपांडे
बर्याच डेटाबेस मध्ये उडवलेले
In reply to समजा तुम्हाला लेख प्रकाशित by जयंत कुलकर्णी
एकदम पटेश.
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
असावा ह्याला मत दिले आहे.
In reply to असावा ह्याला मत दिले आहे. by प्रभो
तरी बरं . लेख प्रकाशित करण्या
In reply to असावा ह्याला मत दिले आहे. by प्रभो
>>>>आमची सुचना : लेखकाने
अर्थात मी पण !
उदाहरण
In reply to उदाहरण by नितिन थत्ते
याबरोबरच
'असावा'ला मत दिले आहे.
माझे मत हा अधिकार असावा या
In reply to माझे मत हा अधिकार असावा या by बिपिन कार्यकर्ते
माझे मत
In reply to माझे मत by प्रदीप
बर्याच ठिकाणी मुद्रित
In reply to बर्याच ठिकाणी मुद्रित by ३_१४ विक्षिप्त अदिती
मिपावरचे संपादक हे या
In reply to मिपावरचे संपादक हे या by llपुण्याचे पेशवेll
आपण तर इथे लेखकांना लिहायचा
In reply to आपण तर इथे लेखकांना लिहायचा by परिकथेतील राजकुमार
आम्ही तर प्रतिसादाच्या
In reply to आम्ही तर प्रतिसादाच्या by llपुण्याचे पेशवेll
निकाल ठीक आहे हो. पण
In reply to निकाल ठीक आहे हो. पण by बिपिन कार्यकर्ते
पण अधिकाराबरोबर येणार्या
In reply to पण अधिकाराबरोबर येणार्या by llपुण्याचे पेशवेll
कटाळा आला राव. शवटी काही
In reply to कटाळा आला राव. शवटी काही by गणपा
सहमत आहे. मग आम्ही साधे सदस्य
In reply to सहमत आहे. मग आम्ही साधे सदस्य by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to +१ by नितिन थत्ते
अहो लफडं काय आहे ना.. की
In reply to अहो लफडं काय आहे ना.. की by बिपिन कार्यकर्ते
पण मी म्हणतो विद्याची वाट का
In reply to पण मी म्हणतो विद्याची वाट का by अवलिया
आम्ही आमच्या विद्यात खुश आहोत
In reply to अहो लफडं काय आहे ना.. की by बिपिन कार्यकर्ते
तसं नसतं. शासनातली माणसं
In reply to तसं नसतं. शासनातली माणसं by नितिन थत्ते
त्यांना भागच असते. बास तर
In reply to तसं नसतं. शासनातली माणसं by नितिन थत्ते
अण्णा हजारे... आपलं नितीन
In reply to निकाल ठीक आहे हो. पण by बिपिन कार्यकर्ते
कार्यकर्ते साहेब, निकालाचे
In reply to कार्यकर्ते साहेब, निकालाचे by जयंत कुलकर्णी
कुलकर्णी साहेब, सहमत आहे.
In reply to कार्यकर्ते साहेब, निकालाचे by जयंत कुलकर्णी
निकालाचे महत्व तसे म्हटले तर
In reply to निकालाचे महत्व तसे म्हटले तर by परिकथेतील राजकुमार
सहमत
In reply to मिपावरचे संपादक हे या by llपुण्याचे पेशवेll
नमस्कार !
In reply to माझे मत by प्रदीप
नमस्कार. आपल्या मताचा मान
In reply to माझे मत by प्रदीप
प्रदीप यांच्याशी पूर्ण सहमत. शिवाय
In reply to प्रदीप यांच्याशी पूर्ण सहमत. शिवाय by प्रियाली
बरोबर आहे आणि पटले देखील.
In reply to बरोबर आहे आणि पटले देखील. by जयंत कुलकर्णी
आपणही लेख काढलात हे खोटे का?
In reply to आपणही लेख काढलात हे खोटे का? by प्रियाली
नमस्कार !
In reply to नमस्कार ! by जयंत कुलकर्णी
खरे बोल
In reply to माझे मत by प्रदीप
प्रकाशित केल्यावर थोडा वेळ
In reply to प्रकाशित केल्यावर थोडा वेळ by ऋषिकेश
+१०
In reply to माझे मत by प्रदीप
लेखकाला स्वतःचा लेख स्वसंपादन करायचा अधिकार
In reply to माझे मत हा अधिकार असावा या by बिपिन कार्यकर्ते
पर्याय
In reply to माझे मत हा अधिकार असावा या by बिपिन कार्यकर्ते
एक मूलभूत प्रश्न
In reply to एक मूलभूत प्रश्न by चिंतातुर जंतू
एक चांगली कल्पना.
In reply to एक मूलभूत प्रश्न by चिंतातुर जंतू
काही तांत्रिक मुद्दे
In reply to काही तांत्रिक मुद्दे by मुक्तसुनीत
फक्त अप्रकाशित केला तर?