आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती. अन्यथा महिन्याच्या २७ तारखेला नवा भाग काढला नसता पण यावेळी घडामोडी खूप वेगाने होत असल्याने या भागातही १५० प्रतिसाद झाले तर नवल वाटायला नको.
काल लोकसभेच्या ३ जागा आणि विविध राज्यातील विधानसभांच्या ७ जागांच्या पोटनिवडणुकांसाठी मतमोजणी झाली. लोकसभेच्या तीनही जागांचे निकाल धक्कादायक लागले आहेत.
२०१९ मध्ये पंजाबमधील संगरूर लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे भगवंत मान निवडून गेले होते. ते पक्षाचे लोकसभेतील एकमेव खासदार होते. मार्च महिन्यात पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ही पोटनिवडणुक आम आदमी पक्षासाठी प्रतिष्ठेची होती. तिथून माजी आय.पी.एस अधिकारी आणि अकाली दल (अमृतसर) या गटाचे नेते सिमरनजीतसिंग मान यांनी आम आदमी पक्षाचे गुरमेल सिंग यांचा ५८२२ मतांनी पराभव करून खळबळ माजवून दिली. या मतदारसंघातून शिरोमणी अकाली दलाने पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिअंतसिंग यांच्या हत्येसाठी तुरूंगात असलेल्या बलवंतसिंग राजोनाची बहिण कमलजीत कौर राजोनाला उमेदवारी दिली होती तर भाजपने २०१९ मध्ये भगवंत मान यांच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार म्हणून पराभूत झालेल्या केवलसिंग धिल्लो यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसने माजी आमदार दलवीरसिंग खंगुरा (गोल्डी) यांना उमेदवारी दिली होती. इतर तीनही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. सिमरनजीतसिंग मान यांनी १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू स्टारच्या निषेध करण्यासाठी त्यांनी आय.पी.एसचा राजीनामा दिला होता. नंतरच्या काळात ते खलिस्तानचे समर्थक आहेत असे आरोपही झाले होते आणि त्यात तथ्यही होते. २०१८ मध्ये उत्तर प्रदेशात गोरखपूर आणि फुलपूर या अनुक्रमे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी रिकाम्या केलेल्या जागेवर भाजप उमेदवारांचा पराभव झाला त्याच्या आदल्याच वर्षी भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक जवळपास चार-पंचमांश बहुमताने जिंकली होती. तशीच आम आदमी पक्षाने २०२२ ची पंजाब विधानसभा निवडणुक जिंकली आहे. २०१८ मध्ये योगींना दणका, योगींची (आणि मोदींची) लाट ओसरली वगैरे बरेच चर्वितचर्वण झाले होते तसे आम आदमी पक्षाचा तीन महिन्यातच हा पराभव झाल्यानंतर होते का हे बघायचे.
उत्तर प्रदेशात आझमगड आणि रामपूर या दोन लोकसभा जागांचे निकालही असेच खळबळजनक आहेत. २०१९ मध्ये आझमगडमधून अखिलेश यादव अडीच लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकले होते. त्या जागेवर भाजपच्या दिनेशलाल यादव निरहुआ यांनी यादव कुटुंबातील धर्मेंद्र यादव यांचा जवळपास ८ हजार मतांनी पराभव केला. अखिलेशना २०१९ मध्ये मोठे मताधिक्य मिळाले होते त्यात बहुजन समाज पक्षाच्या मतांचा वाटा मोठा होता असे दिसते. या मतदारसंघात बसपाचा जोर आहे. पूर्वी ही जागा बसपाने जिंकली पण आहे. आता पक्षाची बरीच पडझड झाली असली तरी बसपाने आपली मते राखली आहेत. सपा-बसपा मधील मतविभागणीचा फायदा भाजपला मिळाला असे दिसते.
रामपूरमधील निकाल अजून धक्कादायक आहेत. हा लोकसभा मतदारसंघ मुस्लिमबहुल आहे. इथून भाजपने पूर्वी विजय मिळवला आहे पण त्यावेळेस सपा/बसपा/काँग्रेस यांच्यातील मुस्लिम मतदारांमध्ये मते विभागली जाऊन त्याचा फायदा भाजप उमेदवाराला मिळाला आहे. पण यावेळेस तसे झालेले नाही. बसपा आणि काँग्रेसने इथून उमेदवार दिला नव्हता. तसेच तीन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये बघितलेल्या कलाप्रमाणे समाजवादी पक्षामागे मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होणे अपेक्षित होते. तसेच २०१९ मध्ये ही जागा समाजवादी पक्षाच्या आझमखानने जिंकली होती त्याचाही त्या भागात जोर आहे. असे असताना सपाचा उमेदवार आरामात जिंकेल असे वाटत होते. पण भाजपच्या घनश्याम लोधींनी जवळपास ५२% मते मिळवत ही जागा आरामात जिंकली.
विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये त्रिपुरात ४ पैकी ३ जागा सत्ताधारी भाजपने तर एक जागा काँग्रेसने जिंकली. भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री माणिक साहा यांचाही समावेश आहे. काँग्रेसने आगरतळ्याची जागा जिंकली. या जागेवरून २०१८ मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये जिंकलेल्या भाजप उमेदवाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याने ही पोटनिवडणुक जिंकली. उरलेल्या तीन विधानसभा जागा त्या त्या राज्यातील सत्ताधारी पक्षांनी जिंकल्या. आंध्र प्रदेशातील आत्माकूरमधून वाय.एस.आर काँग्रेसने, दिल्लीतील राजिंदर नगरमधून आम आदमी पक्षाने तर झारखंडमधील मंदार या जागेवर काँग्रेसने विजय मिळवला.
वाचने
15820
प्रतिक्रिया
151
मिसळपाव
प्रतिक्रिया
३८ आमदारांनी पाठिंबा काढला
समसनाटी बातमी देण्याच्या
In reply to ३८ आमदारांनी पाठिंबा काढला by क्लिंटन
आमदारांचे मन वळवण्यासाठी
उद्धव ठाकरे हे राऊतांचे तोंड
In reply to आमदारांचे मन वळवण्यासाठी by विजुभाऊ
उद्धव ठाकरे हे राऊतांचे तोंड का बंद करू शकत नाहीत ?का बंद करावे?? रोज भाजपची ना बंडखोरांचा अब्रू बाहेर काढनारा एकमेव नेता आहे.इतरांबाबत बोलताना
In reply to उद्धव ठाकरे हे राऊतांचे तोंड by अमरेंद्र बाहुबली
@संपादक मंडळ.
In reply to इतरांबाबत बोलताना by प्रसाद_१९८२
कशाला?
In reply to आमदारांचे मन वळवण्यासाठी by विजुभाऊ
त्याप्रमाणेच आता संजय राऊतना
In reply to कशाला? by क्लिंटन
त्याप्रमाणेच आता संजय राऊतना भाजप समर्थकांमधून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळेल ही शक्यता आहे :)आज्बात नाही. ऊलट भाजप समर्थक ठाकरे राऊतांना का खपवून घेत आहेत? राऊत सेना संपवतील का?, राऊतांना सेना बाजूला का करत नाही?? असे प्रश्न जे भाजपच्या हिताचे आहेत ते विचारत आहेत. मूळात राऊत सेनोचं नूकसान करत असताल तर भाजप समर्थकानी खुश व्हावे पण होतं ऊलटच आहे. राऊतांनी रोज भाजप वर टिका करून भाजपची बरीच पोलखोल केलीय. ह्यामुळे त्यांची लोकप्रियताहा वाढलीय. ठिकठिकाणी मोळावे घेऊन ना तेयाला लोकांची गर्दी पाहून हे लक्षात ही येतंय. त्यामुळेच राऊत जे बोलतात ते महाराष्ट्रात आवडीने पाहीले जातंय. आधी पर्यंत फक्त मराठी बातमीदार बाईट घ्यायला यायचे आता देशपातळीवरचे येतात. राऊतांनी आपला कार्यक्रम असाच जारी ठेवावा आजिबात खंड पडू देऊ नये. एके काळी राऊत बोलले होते आम्हाला १६० आमदारांचा पाठिंबा आहे. तेव्हा तेयांच्यावर दात काढत होते लोक. पण जेव्हा १६४ आमदाराना शपथ घेतली तेव्हा राऊतांनी त्यांचे वक्तव्य सिध्द केले.ए. शिं. गटाने पाठींबा काढून
संज्याला इडीची नोटीस देखील
नको :)
In reply to संज्याला इडीची नोटीस देखील by प्रसाद_१९८२
संज्याला इडीची नोटीस देखील
In reply to संज्याला इडीची नोटीस देखील by प्रसाद_१९८२
संज्याला इडीची नोटीस देखील आलेयसंजेया वगैरे भाषा मिपावर चालतीय. चांगलंय. बाकी ईडी ह्या सरकारी संस्थेचा गैरवापर होत नाहीये हे मोदी सरकारने पुन्हा सिध्द केलंय. मोदींबद्दलचा आदर वाढला.मुळात
In reply to संज्याला इडीची नोटीस देखील by अमरेंद्र बाहुबली
सेनेच्या बंडखोर आमदारांवर हा
सध्या तरी शिंदेगट मनसे सोबत
ओ
आसाम पुरात ४५ लाख लोक
आसामचे मंत्री बंडखोरांना
एकंदरीत असं दिसतंय की, ११
आता ११ जूलै पर्यंत परत
In reply to एकंदरीत असं दिसतंय की, ११ by शाम भागवत
सेनेने ममता बॅनर्जींचा सपोर्ट
In reply to आता ११ जूलै पर्यंत परत by अमरेंद्र बाहुबली
नाही.
In reply to आता ११ जूलै पर्यंत परत by अमरेंद्र बाहुबली
सेनेने ममता बॅनर्जींचा सपोर्ट
In reply to आता ११ जूलै पर्यंत परत by अमरेंद्र बाहुबली
संजय राऊत व आदित्य ठाकरे
न्यायालयाचा प्रतिबंध
म्हणजे संजय राऊतांचा
In reply to न्यायालयाचा प्रतिबंध by क्लिंटन
म्हणजे संजय राऊतांचा वाचाळवीरपणा परत एकदा भोवलेला दिसतो.परत एकदा?? ह्या आधी कधी झालाय?भुजबळ बुवा
In reply to म्हणजे संजय राऊतांचा by अमरेंद्र बाहुबली
संजय राऊत व आदित्य ठाकरे
अरेच्या खरडफळ्यावर टाकायच्या
In reply to संजय राऊत व आदित्य ठाकरे by शाम भागवत
🤦♂️
सहमत.
In reply to संजय राऊत व आदित्य ठाकरे by शाम भागवत
ह्या व्यतिरीक्त बंडखोरांच्या
११ जुलै पर्यंत तथाकथित बंडखोर
अजित पवारांना कोरोना
हाय काय आणि नाय काय !
"सद्यपरिस्थितीत तुम्ही
In reply to हाय काय आणि नाय काय ! by चौकस२१२
सद्यपरिस्थितीत तुम्ही
In reply to "सद्यपरिस्थितीत तुम्ही by श्रीगुरुजी
बाळ ठाकरेंची मुख्यमंत्री
In reply to सद्यपरिस्थितीत तुम्ही by एकुलता एक डॉन
भारतीय लोकशाहीला बाहेरून कुणी चालवतो.
In reply to हाय काय आणि नाय काय ! by चौकस२१२
?
In reply to भारतीय लोकशाहीला बाहेरून कुणी चालवतो. by कंजूस
तुमच्याच
खिशातले राजीनामे
In reply to तुमच्याच by माईसाहेब कुरसूंदीकर
सुधारणा
In reply to खिशातले राजीनामे by क्लिंटन
ढिसमीस करणं आणि राजीनामा यात
In reply to सुधारणा by क्लिंटन
ठाकरेंना राजीनामा देण्यापासून
In reply to खिशातले राजीनामे by क्लिंटन
सहमत
In reply to ठाकरेंना राजीनामा देण्यापासून by श्रीगुरुजी
सहमत
In reply to ठाकरेंना राजीनामा देण्यापासून by श्रीगुरुजी
मोदी माझ्या डोळ्यात डोळे
'Aditya Thackeray will be
आताची
In reply to 'Aditya Thackeray will be by डँबिस००७
सगळंच विचित्र आणि घाण होऊन
In reply to आताची by माईसाहेब कुरसूंदीकर