Skip to main content

ताज्या घडामोडी मे २०२२

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी रविवार, 01/05/2022 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
गुरूग्राममधील आम आदमी पक्षाची माजी नगरसेविका निशा सिंगला न्यायालयाने ७ वर्षांची कारावासाची शिक्षा दिली आहे. मे २०१५ मध्ये हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट ऑथोरीटीचे पथक अतिक्रमण हटवायला गेले असताना त्या पथकावर निशा सिंगसहीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. अतिक्रमणे हटवायच्या कामात पोलिसांचे पथकही बरोबर जातेच. त्या पोलिसांनाही या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते. सुरवातीला दगडफेक आणि नंतर चक्क पेट्रोल बॉम्ब आणि लहान एल.पी.जी सिलेंडर फेकून मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली. या प्रकारात आग लागून अतिक्रमणविरोधी पथक आणि पोलिसांमधील काही जवान तसेच तिथे उपस्थित असलेला मॅजिस्ट्रेट या प्रकरणात जखमी झाले होते. वास्तविकपणे हे अतिक्रमण पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हटविले जात होते. तरीही या चळवळ्या आपच्या लोकांनी त्याला विरोध केला. नुसता विरोधच केला असे नाही तर पेट्रोल बॉम्बचा वापरही केला त्यावरून काहीतरी भयंकर प्रकार त्यादिवशी घडू शकला असता असे दिसते. निशा सिंग चांगली लंडन बिझनेस स्कूलमधून एम.बी.ए झालेली आहे. तिने सिमेन्स आणि गुगल अशा चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीही केली होती पण राजकारणात सुधारणा करायच्या 'उदात्त' उद्देशाने तिने आपमध्ये प्रवेश केला आणि हा भलताच प्रकार करून बसली. आता तिला तुरूंगात जावे लागून सगळ्याच करिअरचा बट्ट्याबोळ झाला आहे. कॉर्पोरेटमध्ये तिला कोणी घेणार नाही आणि राजकारणातही. https://timesofindia.indiatimes.com/city/gurgaon/gurugram-ex-councillor…

वाचने 22574
प्रतिक्रिया 230

प्रतिक्रिया

राजस्थान मध्ये दंगल चालू आहे,महाराष्ट्र मध्ये भोंगे प्रकार चालू आहे.गंभीर विवाद आहे यूपी मध्ये बुलडोझर . दिल्लीत दंगल.पेट्रोल ,डिझेल खाद्य तेल प्रचंड महाग. आणि देशाचे पंतप्रधान विदेशात स्वतःचेच लाल करत आहेत विदेशात असून पण भारतातील विरोधी पक्षावर टीका करत आहेत भारताच्या इतिहासात इतके बालिश पंतप्रधान कधीच होवून गेले नाहीत.

मर्सिडीज बेबी म्हणून भाजप नेते एका मोठ्या नेत्याला टोमणे लगावताहेत. ह्यांच्या आजोंबांकडे आपण युती करा म्हणून जायचो, वडीलांकडेही जायचो. ऊद्या ह्या साहेबांकडे ही आपल्याला युती करा म्हणून जावे लागेल हे भाजप नेते कसे विसरतात?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हायला आजोबांच्या कर्तृत्वावर नातवाला क्रेडिट द्यायचं म्हणजे फार झालं

In reply to by सुबोध खरे

क्रेडीट नाही. पण ऊद्या युती करा म्हणून ह्यांचीच मनधरणी करावी लागनार आहे ना भाजपला?

इथे सत्ता मिळण्याची सुतराम शक्यता नाही.थोडी तरी सत्ता मिळावी म्हणून काका न चे नातू किंवा senior ठाकरेंचे नातू.किंवा इंदिराजी चे नातू. ह्यांचे पाय थरण्याची वेळ कधी ही येवू शकते. हा महाराष्ट्र आहे यूपी नाही. ह्याची जाणीव असावी.

राहुल जी पब मध्ये गेले.ह्याचे व्हिडिओ bjp ची लोक फॉरवर्ड करत आहेत. अतिशय संकुचित,अतिशय नॉनसेन्स प्रकार आहे हा. राहुलजी असतील किंवा कोणताही राजकीय नेता त्यांचे वैयक्तिक आयुष्य विषयी कोणालाच काय देणे घेणे. पब मध्ये जाणे बेकायदेशीर भारतात तरी नाही.. मग आपल्या अल्प बुद्धीचे प्रदर्शन लोक का करत असतील . ते कोणत्या सरकारी पदावर पण नाहीत. Pm,cm, ह्यांनी जरी pub च आस्वाद घेतला तरी ते आक्षेप घेण्यासारखे नाही. मुळात वैयक्तिक आयुष्य जगजाहीर करण्याची वृत्ती वाईट चं. बेकायदेशीर,देशविरोधी काम करत असेल तर आक्षेप घेतलाच पाहिजे

मशीद वर लावलेले भोंगे असतील किंवा मंदिरावर लावलेले भोंगे असतील. त्याचा वापर करून देवाची प्रार्थना केल्या मुळे.त्या आवाजाचा त्रास भारतीय जनतेला होत असेल तर. कायदेशीर मार्गाने जा..लोकसभेत विधेयक मांडा,त्या वर विस्तृत चर्चा करा.तज्ञ लोकांचे सल्ले घ्या,देशातील विविध सामाजिक संघटना शी चर्चा करा . आणि भोंगे नकोच . असा कायदा करा . कोण विरोध करेल आहे कोणाची हिम्मत. प्रचंड राक्षसी ताकत असलेली सुरक्षा दल भारत सरकार कडे आहेत.राज्यांकडे आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणे सहज शक्य आहे. मग वाकडा मार्ग का? प्रश्न चे उत्तर न शोधता लोकांना भडकावून दंगल होण्याचे मार्ग का निवडत असता. मारतात आणि मरतात सामान्य लोक च मग ती कोणत्याही धर्माची असू ध्या. केंद्रीय सरकार म्हणून देशाचे हित ह्याला च सर्वात वरचे स्थान हवं. आणि त्या साठी वैधानिक मार्ग च हवं

राज्यकर्ते,काही मोजकेच चतुर लोक,काही मोजकेच हुशार लोक ,काही मोजकेच सूत्र धार असणारी लोक सोडली तर ९०% लोक जी saman नागरी कायदा हवा म्हणून रस्त्यावर असतात त्यांना नागरी कायदा म्हणजे काय हे माहीतच च नसते. समान नागरी कायदा तर माहीत असण्याची सुतराम शक्यता नसते खरेच असा कायदा झाला तर देशातील प्रतेक धर्मावर त्याचा काय परिणाम होईल ह्याचा विचार करण्याची कुवत नसते..हिंदू धर्मीय लोकांचे पण असा कायदा नुकसान करू शकतो हे कायदा झाल्यावर जेव्हा त्याची अमलबजा वनी होते आणि त्याची धक लागणे चालू होईल तेव्हाच ह्यांचे डोळे उघडतात. मेंदू चा वापर न करणारी करोडो लोक देशात असतील तर . चतुर राजकीय लोकांना,अती हुशार सूत्रधार लोकांना हे मोजकेच दहा एक हजार असतात.त्यांना करोडो लोकांवर राज्य करणे काहीच अवघड नसते .मूठ भर इंग्रज लोकांनी करोडो लोकांवर राज्य करून दाखवले आहे. वेगळा पुरावा नको.

राजिंदर बग्गा प्रकरणात केजरीवाल उघडे पडले !! पतनाची सुरुवात झालेली आहे. दिल्लीतील फुकट वीज योजना दिल्ली सरकारने गुंडाळली आहे .

In reply to by डँबिस००७

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर काहीतरी ट्विट केली म्हणून पंजाब पोलिसांनी दिल्लीत येऊन तेजिंदर बग्गांना अटक करणे कसे काय कायदेशीर आहे? एका राज्यातील पोलिसांनी दुसर्‍या राज्यात जाऊन काही कारवाई करायची असेल तर त्याची एक प्रक्रीया असते- म्हणजे जिथे कारवाई केली जाणार आहे तिथल्या पोलिसांना माहिती देणे वगैरे. ती पूर्ण केली गेली होती का? बग्गांविरोधात पंजाब पोलिसांकडे अटक वॉरंट होते का? ते वॉरंट पंजाबमधील मॅजिस्ट्रेट जारी करू शकतात का? पंजाब पोलिस म्हणत आहेत की केजरीवालांना धमक्या दिल्याप्रकरणी बग्गांना पंजाबमधील न्यायालयाने आधीच समन्स जारी केले होते पण बग्गा त्यावेळी न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत म्हणून त्यांना उचलून न्यावे लागले. पंजाबमधील न्यायालयाने त्यांना समन्स बजावल्याची बातमी आलेली कोणी वाचली/बघितली आहे का? केजरीवालांना धमक्या दिल्या म्हणून कोणाविरोधात समन्स आले ही बातमी दुर्लक्ष होण्याइतकी क्षुल्लक नक्कीच नसावी. मग तेजिंदर बग्गांचे पंजाब पोलिसांनी अपहरण केल्याची तक्रार त्यांच्या वडिलांनी दिल्ली पोलिसांमध्ये दाखल केली. जर न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटशिवाय असे पंजाब पोलिस कोणाला उचलून नेत असतील तर ते अपहरणच म्हणायला हवे. मग बग्गांना पंजाबमध्ये नेले जात असताना मधे हरियाणात राज्य पोलिसांनी पंजाब पोलिसांना अडवले आणि त्यांना दिल्लीला परत आणले. तसेच दिल्ली पोलिसात अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर हरियाणा पोलिसांनी पंजाब पोलिसांच्या त्या पथकाला रोखून धरले आहे. कसला सावळागोंधळ चालू आहे? आप चे सरकार म्हटल्यावर असले काहीतरी प्रकार केलेच पाहिजेत का? तेजिंदर बग्गांना दिल्लीतून उचलून आणायचा आदेश कोणी दिला होता? पंजाबच्या गृहमंत्र्यांनी का? तसे असेल तर मग त्यांच्यावरही अपहरणाचा गुन्हा का दाखल केला जाऊ नये?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

काही प्रश्नांची उत्तरे प्रॅक्टिकल अन थेरोटीकल दोन्ही टर्म्स वर देऊ शकतो, अन काहींची उत्तरे द्यायला डेटा पॉईंट्स कमी आहेत.... आणि लीगल बाबतीत मी स्पेक्युलेशन करणार नाही बुआ किमान. उरता उरला प्रश्न पंजाब गृहमंत्र्याचा तर त्याचा अर्थाअर्थी ह्यात काही संबंध (प्रॅक्टिकली) असेल असे वाटत नाही कारण ही शुद्ध कोर्ट अँड ज्यूडीशल प्रोसिजर आहे, बग्गाजींवर केस टाकणारच गृहमंत्री, पंजाब असले तर पदाचा गैरवापर केल्यासंबंधी काही आरोप होऊ शकेल, पण जर मूळ जुनी केसच एखाद कार्यकर्त्याने दाखल केली असेल तर मात्र त्यात फिर्यादी अन आरोपी ह्या साखळीत गृहमंत्री फिट करून त्यावर गुन्हा दाखल करायला खूप सज्जड पुरावे लागणार, ते मिळणे कितपत सोपे कठीण आहे ह्यावर मला वाटतं मी तुम्हाला काहीच सांगणे बरे नाही. अश्या केसेसमध्ये गुन्हा हद्दीतून अटक हद्दीत येऊन अटक वॉरंट आरोपीवर बजावणाऱ्या तपास अधिकाऱ्याला सहाय्यक असा एक सेक्शन कलम ७९ सीआरपीसी मध्ये आहे, तो म्हणजे सेक्शन ३ जो स्पष्ट म्हणतो की Whenever there is reason to believe that the delay occasioned by obtaining the endorsement of the Magistrate or police officer within whose local jurisdiction the warrant is to be executed will prevent such execution, the police officer to whom it is directed may execute the same without such endorsement in any place beyond the local jurisdiction of the Court which issued it. एकंदरीत ह्या कलमात कायदा स्पष्ट म्हणतो की फक्त गुन्हा नोंद झालेल्या हद्दीत असणाऱ्या कोर्टातून वॉरंट मिळाले आणि तपास अधिकाऱ्यास असे वाटले की अटक होणाऱ्या हद्दीत त्या वॉरंट वर स्थानिक अधिकारी/ न्यायालयाचे एन्डोर्समेंट व्हायला अवाजवी वेळ लागतोय तर अश्या परिस्थितीत अशी कुठलीही एन्डोर्समेंट न घेता तो तपास अधिकारी गुन्हा नोंद झालेल्या हद्दीतील कोर्टाने दिलेले अटक वॉरंट गुन्हेगारास अटक करतेवेळी अटक हद्दीत बजावू शकतो. अर्थात हे कायदेशीर झाले, ह्याला गुन्हे हद्द, गुन्हे स्वरूप, गुन्ह्यात लावलेली कलमे, त्यात बेलचा स्कोप, आरोपीची असल्यास हिस्टरी शीट असे कैक सप्लिमेंटरी डेटा सेट हाताशी उपलब्ध असले तरच पंजाब पोलीस चूक का बरोबर ह्यावर ठाम मत देता येईल, तूर्तास त्यांना ह्यातून कायदेशीर मार्ग असणारे वरील एकच कलम मांडून खाली बसतो

मोदीजींच्या युरोपात झालेल्या भव्य स्वागता मुळे काही लोकांना "सहन होत नाही सांगताही येत नाही" अश्या प्रकारच्या अपरीमीत पीडा झालेल्या आहेत असे कळलेले आहे.

मोदीजींच्या युरोपात झालेल्या भव्य स्वागता मुळे काही लोकांना "सहन होत नाही सांगताही येत नाही" अश्या प्रकारच्या अपरीमीत पीडा झालेल्या आहेत असे कळलेले आहे.

मोदीजींच्या युरोपात झालेल्या भव्य स्वागता मुळे काही लोकांना "सहन होत नाही सांगताही येत नाही" अश्या प्रकारच्या अपरीमीत पीडा झालेल्या आहेत असे कळलेले आहे.

मोदीजींच्या युरोपात झालेल्या भव्य स्वागता मुळे काही लोकांना "सहन होत नाही सांगताही येत नाही" अश्या प्रकारच्या अपरीमीत पीडा झालेल्या आहेत असे कळलेले आहे.

In reply to by डँबिस००७

या पीडांचे चीत्कार पुढील काही तासातच या धाग्यावर दिसतील.

मविआ दोन प्रकरणात पुन्हा तोंडावर आपटले .. . १. राणा दांपत्यावर लावलेला राजद्रोहाचा आरोप. २. पवई तलावाच्या बाजुने बनवलेला सायकल रस्ता बेकायदेशीर ... खरे तर अत्यंत घिसाडघाई करुन घेतलेले निर्णय होते. दुसर्‍या प्रकरणात तर न्यायालयाने झालेले बांधकाम तोडुन तिथली जागा पुर्ववत करण्याचा आदेश दिला आहे. म्हनजे जनतेचा पैसा आधी खर्च केला .. त्यावर आता पुन्हा ते बांधकाम तोडायचा खर्च. कुठेतरी जबाबदारी दाखवायला हवी . .

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नवनीत राणा वडनगर ला जाऊन कधी मोदींच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणतात हे पहावे लागेल.

विदेशात जावून इव्हेंट मॅनेजमेंट छान वाटलं बघायला.कोणत्या करमणुकीच्या कार्यक्रम पेक्षा जोरात कार्यक्रम झाला चाहते खुश. पेट्रोल,,डिझेल,गॅस महाग झाला तरी आता काही फरक पडणार नाही एकदाच 1000 रुपये ltr petrol आणि गॅस5000 रुपये सिलिंडर कराच. जो पर्यंत चाहत्यांच दिवाळे वाजणार नाही.तो पर्यंत मज्जा पण येणार नाही.

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा केंद्राचा डाव आहे आता या डावाची गरज नाही. महाराष्ट्रातल्या लोकांचे कान पिळून हवी ती कामे दिल्लीवाले करून घेत होते.

५ मे २०२२ बि नागराजु नावाच्या दलित युवकाला सूलताना नावाच्या एका मुसलमान युवतीशी लग्न केल्याबद्दल मारुन टाकण्यात आलेल आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच सुलतानाच्या दोन भावांनी लोखंडी रॉड ने मारुन चाकुने भोसकुन मारुन टाकल. मोबिन अहमद व मसुद अहमद अशी आरोपींची नावे आहेत. हिंदु दलिताची ही स्टोरी आहे. ह्या स्टॉरीला मेन मिडीया मध्ये , ट्वीतरवर कोणीही उचलले नाही. " जय भिम जम मिम " वाल्यांना तर अश्या अनेक प्रकरणात मुग गिळुन गप्प झालेल बघितल आहे.

In reply to by डँबिस००७

वाम पंथीय लोकांनी आंबेडकरी चळवळ हॅक केली आहे. वाम पंथीय लोकांचा पूर्ण ताबा ह्या चळवळी वर आता तरी आहे. आंबेडकरांनी हिंदू शिव्या ध्या ,त्यांच्या धर्माचा अपमान करा,स्वतचं सोडून फक्त हिंदी वर च बोला असा काही संदेश दिला नव्हता. पण आता चे जयभीम वाल्यांच्या पोस्ट समाज मध्यम वर बघितल्या तर फक्त हिंदू द्वेष ह्याच्या व्यतिरिक्त काही दिसणार नाही. स्वतःच समाज सुधारावा,शिकवा,प्रगत व्हावा असा कोणताच कार्यक्रम ह्यांच्या कडे नसतो.

https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://fortune… Semiconductor चे उत्पादन भारतात चालू होणार .अतिशय briliant अशा मोदी सरकार ने हा निर्णय घेतला होता. इथे अनेक लोकांनी टाळ्या पण वाजवल्या. पण ह्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पाणी लागत.तैवान मध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाली .ह्या सेमी कंडक्टर मुळे. कर्नाटक मध्ये पहिला प्रोजेक्ट चालू होणार आहे. महाराष्ट्र ने असल्या प्रोजेक्ट पासून लांबच राहावे.

Smart City Nashik : नाशिकमधून वादग्रस्त स्मार्ट सिटी प्रकल्प गाशा गुंडाळणार; 6 वर्षांत कामे 8, नसत्या उठाठेवी जास्त. https://www.google.com/amp/s/www.tv9marathi.com/maharashtra/nashik/nash… स्मार्टसिटी प्रकल्पाची फूसकेपणा नाशिकमध्ये ऊघड झाला. हळूहळू मोदी सरकरचे सगळे फुसके विकास बाहेर येतील, पण तोपर्यंत देशाची वाट लागली असेल.

राज ठाकरे साहेबांनी bjp ल अनुकूल भूमिका घेतली .मराठी पना सोडून हिंदुत्व घेतले. Bjp नी पाळलेल्या न्यूज चॅनेल नी त्यांना डोक्यावर घेतले. हेच न्यूज चॅनल राज ठाकरे वर टीका करण्यात सर्वात पुढे असायचे. त्यांनी आयोद्या मध्ये जाणार असे जाहीर केले आणि bjp चाचा एक किरकोळ आमदार ब्रीज भूषण ह्यांनी राज ठाकरे ना धमकी दिली पहिली उत्तर भारतीय लोकांची माफी मागा. कारण राज ठाकरे नी उत्तर भारतीय लोकांच्या अतिक्रमणावर टीका केली होती. ब्रीज भूषण. योगी नी पाठिंबा देवू किंवा आर्मी नी सुरक्षा पुरवू राज ठाकरे माफी मागत नसतील तर ते aayodhya मध्ये येवू शकणार नाही. यूपी पोलिस आणि भारतीय आर्मी इतकी कमजोर आहे का जी अतिशय किरकोळ आमदार खासदार जो काही असेल तो . त्यांना चॅलेंज करू शकतो योगी,मोदी,अमित जी ह्यांना चॅलेंज करू शकतो. Ed,Nia,Cbi, सर्व पाठी लागतील पूर्ण आयुष्य तुरुंगात जाईल. म्हणजे हा brijbhushan जो काही फेकत आहे ते bjp च्या इशाऱ्यावर च.

एक किरकोळ आमदार,खासदार नी दिलेल्या धमकी मुळे राज ठाकरे aayodhya दौरा रद्द करतील ? राज ठाकरे माफी मागतील? राज ठाकरे माफी वैगेरे काही मागणार नाहीत ते aayodhya मध्ये जातील? माझा अंदाज आहे .राज ठाकरे माफी पण स्पष्ट मागणार नाहीत,शब्द फिरवून थोडी भूमिका बदलतील आणि aayodhya मध्ये जातील. तो किरकोळ,आमदार,खासदार त्या वर च खुश होईल आणि विरोध करणारं नाही . राज ठाकरे ना इजा होणे म्हणजे काय ह्याचा अर्थ नक्कीच त्यांना माहीत आहे.. इथे तत्वाची लढाई मुळात च नाही. राजकीय खेळी आहेत सर्व प्यादे आहेत. किंग वेगळाच आहे.

सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंडविधानातील कलम १२४(अ) म्हणजे देशद्रोहाचे कलम स्थगित केले आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत या कलमांतर्गत कोणताही गुन्हा नोंदवता येणार नाही असा आदेश दिला आहे. मला वाटते की हे एक चांगले पाऊल आहे. कारण देशद्रोह या गुन्ह्याचा आरोप कोणावरही हवेत ठेवता येणार नाही. म्हणजे त्या व्यक्तीवर दुसरा कोणतातरी आरोप असेलच. उदाहरणार्थ दहशतवादी संघटनांशी संबंध असणे, अशा हिंसक कारवायांमध्ये भाग घेणे वगैरे. असा आरोप ठेवला म्हणजे तो देशद्रोहाचाच आरोप आहे हे सामान्यांनाही समजेल. पण असा कोणताही आरोप नसेल तर मग नुसता हवेतला देशद्रोहाचा आरोप कसा ठेवणार? तसा आरोप ठेवल्यास तो राणा दांपत्याविरोधात 'मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणू असे म्हटले' (प्रत्यक्ष हनुमान चालिसा म्हटलीच नाही) म्हणजे देशद्रोह झाला असा हास्यास्पद प्रकार होईल. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की कलम १२४(अ) बरोबर दुसर्‍या कोणत्या गंभीर गुन्ह्याचा आरोप असेल तर मग कलम १२४(अ) ची गरज नाही. आणि तसा नसेल तर मग महाविकास आघाडी सरकारने राणा दांपत्यावर ते १२४(अ) कलम लावले तसा हास्यास्पद प्रकार होईल. तेव्हा ते कलम भारतीय दंडविधानातून काढून टाकले तरी काही हरकत नसावी. यासाठी संदर्भ म्हणून भारतीय दंडविधानातील कलमे बघत होतो. १२४ च्या पुढचेच कलम १२५ आहे "Waging war against any Asiatic Power in alliance with the Government of India". म्हणजे भारताचा मित्रदेश असलेल्या कोणत्याही आशियाई देशाविरोधात कारवाई करणे हा भारतात गुन्हा आहे. म्हणजे भारताचा मित्रदेश असलेल्या कोणा आफ्रिकन किंवा इतर खंडातील देशाविरोधात कारवाई केली तर चालणार का? दुसरे म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध काळानुरूप बदलत असतात. १९५० च्या दशकाच्या मध्यापर्यंत भारत आणि चीनचे वरकरणी गळ्यात गळे होते पण नंतर, विशेषतः १९६२ नंतर चीन आपला शत्रू झाला. तसे समजा भारताचे कोणत्या देशाबरोबर झाले आणि समजा पूर्वी मित्र असलेला देश आता शत्रू झाला. तसे असेल तर समजा पूर्वी त्या देशाविरोधात कारवाया केला म्हणून दाखल झालेला गुन्हा कोर्टात जाईपर्यंत तो देश शत्रू झाला असेल तर मग संबंधित व्यक्तीला निर्दोष सोडणार का? भारतीय दंडविधान १८६० मध्ये म्हणजे तत्कालीन गरजांना अनुसरून केले आहे. त्यात अशी काही कलमे असतील तर ती बदलायला हरकत नसावी.

जग जवळ आले आहे.हे जग म्हणजे एक कुटुंब झाले आहे.असे आपण म्हणतो. तेव्हा देश निष्ठा ह्या प्रकार ला पण काहीच किंमत नसते..चीन मध्ये covid च्या नावाखाली अनंत अत्याचार जनतेवर केंद्र सरकार करत आहे,उत्तर कोरिया तेच करत आहे. त्यांनी देशाविरुद्ध का बोलू नये. आणि तो गुन्हा कसा काय?

जग जवळ आले आहे.हे जग म्हणजे एक कुटुंब झाले आहे.असे आपण म्हणतो. तेव्हा देश निष्ठा ह्या प्रकार ला पण काहीच किंमत नसते..चीन मध्ये covid च्या नावाखाली अनंत अत्याचार जनतेवर चीन सरकार करत आहे,उत्तर कोरिया तेच करत आहे. त्यांनी देशाविरुद्ध का बोलू नये. आणि तो गुन्हा कसा काय?

राज्य द्रोह आणि देशद्रोह ह्याची. १) जे राज्याच्या हीता विरुद्ध वर्तन करतात,कृत्य करतात ते राज्य द्रोही. ह्या मध्ये राज्यसरकार पण येते. राज्याच्या हिता विरुद्ध राज्य सरकार निर्णय घेत असेल तर ते राज्य द्रोही च . पूर्ण साकार वर गुन्हा दाखल झाला पाहिजे. २)राष्ट्र द्रोही. राष्ट्राचे हीत धोक्यात येईल असे विचार व्यक्त करणे,संघटना बनवणे तशी कृती करणे हा राष्ट्र द्रोह च. ह्या मध्ये केंद्र सरकार पण दोषी मध्ये असू शकत. ४)राज्य असू किंवा केंद्र सरकार विरोधी बोलणे हा कोणताच द्रोह नाही तो हक्क आहे.पण मर्यादित.खोटे आरोप नाहीत. केंद्र सरकार देशविरोधी वागत असेल आणि जनता सशस्त्र किंवा शांत पने विरोध करत असेल तर तो राष्ट्र द्रोह असूच शकत नाही.

मोहालीच्या पोलिस मुख्यालयावर खालिस्तानी अतिरेक्यांनी चालच्या वहानातुन रॉकेट प्रॉपेल्ड बॉंबचा मारा केला. तो बाँब काचा फुटुन ऑफिस मध्ये पडला पण त्याचा सुदैवाने स्फोट झाला नाही. ह्या प्रकरणात कोणतीही जिवित हानी झालेली नाही अस कळलय ! मोहालीच्या पोलिसांना ह्या घटनेचा पत्ताच नव्हता. मोहालीच्या नगर पालिकेच्या महीला स्वच्छता कर्मचार्याने खालिस्तानी अतिरेक्यांनी रत्यात टाकुन दिलेला बाँब रॉकेट प्रॉपेलर निदर्शनास आणुन दिला. इतके प्रकरण होत असताना मोहालीचे पोलिस तजिंदर बग्गाला पकडायला दिल्लीत गेलेले होते. ह्याच्या आदल्या दिवशीच हरियाणाच्या विधान सभेच्या ईमारतीच्या संरक्षक भींतीवर खालिस्तानच्या अतिरेक्यांनी रात्री येऊन खालिस्तानचे झेंडे लावलेले होते जे दुसर्या दिवशी सकाळी लोकांना आढलेले होते. पंजाब मध्ये गेल्या काही दिवसात बरेच टिफीन बाँब आढ ळुन आलेले आहेत. त्यातले बरेचसे पाकिस्तानातुन ड्रोनच्या मदतीने सिमेपार पोहोचवलेले होते. त्यातले काही टीफीन बाँब सध्या बेपत्ता आहेत. एकंदरीत देशात खालिस्तानच्या अतिरेक्यांचा उपद्रव वाढु लागलेला आहे.

In reply to by डँबिस००७

एकुण पंजाब मध्ये येत्या काळात या बाँब वगैरे प्रकरण आणि त्यात अडकलेले या सर्वांकडे कानाडोळा केला जाईल असे दिसते. आपचे खलिस्तान प्रेम सर्वाना माहित आहे. केजु त्यांच्या घरी रहायला जायचा तर अजून काय पुरावे हवेत? आणि त्यात त्यांना निवडणुकीचा पैसा पुरवणारे तेच होते हे पण उघड गुपित आहे. मग त्यांच्यासाठी काम करणारे सरकार आले आहे तर ते फायदा घेणारच!

‘दम असेल तर ताजमहलचं मंदिर बनवून दाखवा’, मेहबूबा मुफ्ती यांचं भाजपाला आव्हान देशातील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणानंतर आता ताजमहालबाबत वाद सुरू झाला आहे. भाजपा नेते रजनीश यांनी अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल करून ताजमहाल प्रत्यक्षात तेजो महाल असल्याचा दावा केल्याने वाद वाढत आहे. त्यांनी ताजमहालच्या तळघरातील २२ खोल्या उघडण्याची मागणी केली आहे. या वादात आता जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी उडी घेतली आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी ताजमहालबाबत भाजपला आव्हान दिलं आहे. --- अर्थात, सध्याचे केंद्रीय राज्यकर्ते ताजमहालाची घरवापसी, काशी-मथुरेचा जीर्णोद्धार वगैरे काही करणार नाहीत याची खात्री आहे. --- आठ वर्षांत ज्यांना पाठ्यपुस्तकांतील धडे सुधारता आले नाहीत ते ताजमहालला तेजोमहालय काय करणार? --- नुसती सत्ता मिळून भागत नाही, त्या सत्तेचा आपले व्यक्त-अव्यक्त हेतू सध्या करण्यासाठी योग्य तो वापर करण्याची हिम्मत असावी लागते.

ओमिड्यार नेटवर्क हे भारतातील अनेक प्रकाशनांना निधी पुरवण्यासाठी ओळखले जाते. गृह मंत्रालयाच्या (MHA) FCRA विभागात काम करणार्‍या ६ सरकारी अधिकार्‍यांसह ३६ व्यक्ती/संस्था आणि NIC च्या एका अधिकाऱ्याला या प्रकरणाच्या संदर्भात ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंतच्या झडतीदरम्यान, हवाला चॅनेलद्वारे सुमारे २ कोटी रुपयांचे व्यवहार आढळले आहेत. ओमिड्यार नेटवर्क हे भारतातील अनेक प्रकाशनांना निधी पुरवण्यासाठी ओळखले जाते. हे न्युज लोंड्री Newslaundry, स्क्रोल डॉट इन हे यांच्या पैसे पुरवण्याचा यादीत आहेत. यावरून समजून जावे की हे लोक काय आहेत. यांना Governance and Citizen Engagement मध्ये फार रस आहे. त्यातही यांचे टारगेट हे लहान शहरातील लोक हे आहे. यांच्या वर बेकायदेशीर पद्धतीने काम करण्यासाठी लाच दिल्याच आरोप आहे. मंत्रालयाने FCRA तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल आणि लाचेच्या बदल्यात परवाने वाटप केल्याबद्दल त्यांचे अधिकारी आणि NGO विरुद्ध तक्रार दाखल केली होती. गृह मंत्रालयाच्या (MHA) FCRA विभागात काम करणार्‍या ६ सरकारी अधिकार्‍यांसह ३६ व्यक्ती/संस्था आणि NIC च्या एका अधिकाऱ्याला या प्रकरणाच्या संदर्भात ताब्यात घेण्यात आले आहे. ओमिड्यार नेटवर्क हे डाव्या संस्थांना पैसे पुरवणारी संस्था आहे. म्हणजे उद्या भानगड झाली की हे नामानिराळे राहू शकतात. पण हा डाव भारतात फसला असावा. पुर्वी हे उघड झाले आहे की ओमिड्यार ग्रुप हाच फॉरबिडन स्टोरीज (FS) ला देणगी देणाऱ्यांपैकी एक आहे. ही एक संशयास्पद संस्था आहे. यांचा मूळ उद्देश शासनात बदल करणे आणि जगभरातील देशांमध्ये डावी सरकारे स्थापित करणे आहे. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (RSF) आणि फ्रीडम व्हॉइसेस नेटवर्क द्वारे FS लाँच केले गेले. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स ही तीच संघटना आहे जिने भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी करण्यासाठी खोटा 'प्रेस फ्रीडम इंडेक्स' आणला होता. भारताला यात प्रामुख्याने असे चित्रित केले की जेथे पत्रकारांना लक्ष्य केले जाते आणि त्यांचा छळ केला जातो. मग यावर एक मोठे कँपेन चालवले गेले होते. पण घोळ असा झाला की यात असलेले पत्रकार हे नेमके काँग्रेस प्रणित राज्यातले निघाले. उरलेले आणि जम्मू आणि काश्मीरचे दहशतवाद्यांसाठी काम करत होते असे पत्रकार निघाले. त्यामुले मग घाई घाईने हे प्रकरण आवरते घेण्यात आले होते.

राज ठाकरे ह्यांनी मराठी पना सोडून हिंदुत्व घेतलें त्यांची मर्जी. अयोध्या मध्ये ५ तारखेला जाणार असे जाहीर केले. Bjp शासित जंगल राज म्हणून प्रसिद्ध असलेल्या यूपी मधील एक बाहुबली bjp आमदार. "राज ठाकरे ना यूपी पोलिस नी security देवू ध्या किंवा भारताच्या लष्करी security देवू ध्या त्यांना अयोध्या मध्ये येवू देणार नाही" भारताच्या लष्कर लं एक किरकोळ लोक प्रतिनिधी आव्हान देत असेल तर भारतीय लष्कर कमजोर असले पाहिजे... एक किरकोळ लोकप्रतिनिधी आव्हान देण्याचे daring करतो मग आपण. चीन ,पाकिस्तान बरोबर तरी लढू का? नेपाल पण भारी पडेल. यूपी पोलिस इतकी नालायक आहे का? महाराष्ट्र मध्ये अनेक अर्धवट यूपी,बिहारी नेते आले राज्याची बदनामी केली तर महारष्ट्र पोलिस नी त्यांना सुरक्षा दिली.

In reply to by sunil kachure

भारतीय लष्कर आमच्यासमोर टिकणार नाही असा त्यांचा दावा नसून, भारतीय लष्कर जरी आले तरी आम्ही हलणार नाही- असे त्यांचे म्हणणे आहे. गेले तर आमच्या प्रेतांवरून जावे लागेल असे ते अनेकवेळेस म्हणले आहेत. माझे मत- भारतीय नागरिक भारतात कुठेही जाऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरेला थांबवायचा हक्क त्या व्यक्तीस नाही. मात्र, भारतीय नागरिक भारतात कोठेही नोकरी धंदा सुद्धा करू शकतो. उत्तर भारतीयांना, खास करून युपी बिहार मधल्या लोकांना मारहाण करणे, त्यांना भय्या भय्या म्हणून हिणवणे- हे ज्या माणसाला मान्य असेल, तो आज कोणत्या तोंडाने बोलू शकतो ? श्री ब्रिजभूषण ह्यांच्या भावनांना तरी आपला फुल सपोट आहे. त्यांनी माफी मागण्याची अपेक्षा केली आहे त्यात काहीच गैर नाहीये. बरं ते म्हणतायत- "मनसे पक्षाने उत्तर भारतीय लोकांना चुकीची वागणूक कधीच दिली नाही, आणि यापुढेही देणार नाही" इतके म्हणायची त्यांची अपेक्षा आहे. माझ्या दृष्टीने रास्तच आहे बुवा. पण त्यासाठी अयोध्येत राडा व्हावा, लोकं मरावीत असे वाटत नाही. त्यांनी त्यांचा निषेध सर्वांना गोळा करून सिम्बॉलीकली दाखवावा.

In reply to by कॉमी

ब्रिजभूषण यांच्या भूमिकेमुळे राज ठाकरेंची पंचाईत झाली आहे. अयोध्येत गेले तर प्रचंड विरोध होणार व तेथील पोलिस महाराष्ट्रातील नसल्याने धुडगूस घालता येणार नाही आणि दौरा रद्द केला किंवा उत्तर भारतीयांची माफी मागितली तर नाचक्की होणार . त्यामुळे गुपचुप फडणवीसांमार्फत योगींना गळ घालून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न होईल. लग्न समारंभ असलेल्या एखाद्या कार्यालयाच्या बाहेर घोळके जमा होतात किंवा गुरूवारी दत्ताच्या मंदिराबाहेर जसे घोळके उभे असतात, तसेच अयोध्येत श्रीराममंदीराचे काम पूर्ण होत असताना भोंदू श्रीरामभक्तांची गर्दी वाढायला लागली आहे. यातील काही जण तर या मंदिराच्या विरोधात होते तर काही जणांचा मंदिरनिर्माणात शून्य सहभाग होता तर काही जण यापूर्वी उभ्या आयुष्यात कधीही अयोध्येत गेले नव्हते. पण आता मात्र आपण श्रीरामभक्त आहोत याचे प्रदर्शन करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे व त्यामुळेच जो तो अयोध्येत जात आहे.

In reply to by श्रीगुरुजी

उद्धव ठाकरे व रोहीत पवार अयोध्येत जाऊन आले. आता राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि नाना पटोले अयोध्येला निघालेत. यातल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा श्रीराममंदीराला विरोध होता तर शिवसेनेचा विरोध नव्हता पण श्रीराममंदीर आंदोलनात शून्य सहभाग होता. पण आता हे सर्वजण अयोध्येत जाण्यासाठी कासावीस झालेत.

In reply to by श्रीगुरुजी

शिवसेनेचा विरोध नव्हता पण श्रीराममंदीर आंदोलनात शून्य सहभाग होता. :) ह्याला विनोद म्हणून घ्यावे का? शिवसेना आणी राममंदिर ह्यांचा संबंध युपीवालेही सांगतील. द्वेषात तुम्ही काहीही ठोकत असतात गुरूजी.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ब्लॅक मनी नष्ट करण्यासाठी नोट बंदी. असे दावे केले होते ना?, ब्लॅक मनी बंद झाला का,नाही ना. सर्वांची साथ ,सर्वांचा विकास. झाला का सर्वांचा विकास. कोर्टात तर आम्ही बाबरी मशीद पाडण्यात सहभागी च नव्हतो असा युक्तिवाद झाला म्हणून तर निर्दोष सोडले ना कोर्टाने.

In reply to by श्रीगुरुजी

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द https://www.lokmat.com/maharashtra/mns-chief-raj-thackeray-visit-likely… उत्तर प्रदेश म्हणजे महाराष्ट्र नाही, तेथे आपली दादागिरी चालणार नाही हे लक्षात आलेलं दिसतंय.

In reply to by कॉमी

राज ठाकरे अयोध्येत गेले तरी काहीही फरक पडनार नाही. तिथे राज ठाकरेंना विरोध करण्याचे “परिणाम” ऊत्तर भारतीय चांगलेच जाणून आहेत. त्यामुळे ब्रिदभूषण सारखे किरकोळ लोक फार तर बोंबलतील. जोरदार हल्ला वगैरे केला तर परत मुंबईतून गाड्या भरून भरून पळावे लागेल ऊभांना.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

राज ठाकरे 5 तारखेला अयोध्येत गेले .तर काय होईल त्यांच्यावर हल्ला होईल .ब्रीज भूषण ह्या bjp आमदार कडून.त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे पूर्ण भारताला माहीत आहे. पण bjp मध्ये प्रवेश केला जी वाल्याचा वाल्मिकी होतो. ही जादू आता कली युगात पण होत आहे. राज ठाकरे गेले आणि त्यांच्यावर हल्ला झाला तर त्याचे परिणाम दोन्ही राज्यांना भोगावे लागतील आणि ते देश सहन करू शकणार नाही त्या पेक्षा केंद्र सरकार नी खास सुरक्षा राज ठाकरे यांना यूपी दौऱ्यात पुरवावी. हे शहान पणाचे असेल.

महाराष्ट्रात श्री रामाची किती मंदिर असतील.खूप कमी असतील.महाराष्ट्र मध्ये बाकी देव देवतांची मंदिर जास्त आहेत .हिंदुत्व दाखवण्यासाठी अयोध्येत जाण्याची काहीच गरज नाही.पंढरपूर ल किंवा तुळजापूर ला किंवा कोल्हापूर ल गेले तरी चालते.आणि लोक तिथेच जातात .

दक्षिण भारतातील राज्य प्रमाणे महाराष्ट्र वागत नाही तो पर्यंत महाराष्ट्र बलाढ्य होणार नाही. १)हिंदी भाषेचा पूर्ण त्याग २)राम मंदिर,अयोध्या, काशी अशा कोणत्याच उत्तर भारतातील समस्येत सहभागी न होणे. ३)कश्मिर,चीन,पाकिस्तान ह्यांचा आणि महाराष्ट्र चा काही संबंध नाही.त्यांच्या सीमा खूप लांब आहेत.

In reply to by sunil kachure

कश्मिर,चीन,पाकिस्तान ह्यांचा आणि महाराष्ट्र चा काही संबंध नाही.त्यांच्या सीमा खूप लांब आहेत.
अरे देवा! मिपानं अधोगतीचा रसातळ गाठलाय.

In reply to by वामन देशमुख

ते मिपा चे अर्धे राऊत आहेत, त्यामुळे ते अस बोलू शकतात.

In reply to by वामन देशमुख

या राऊत-पटोले जोडीकडे दुर्लक्ष करा. मी तर त्यांचा एकही प्रतिसाद वाचत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

त्यामुळे, वेगळी विचारसरणी असलेल्या लोकां बरोबर वाद घालण्यात अर्थ नाही ....

In reply to by कॉमी

काही लोचट माणसे, हाकलले तरी परत येताततच... आणि अशा वेळी, आपली भुमिका परत परत मांडणे, भाग पडते.... अर्थात, आपल्या सारख्या सुज्ञ माणसांची गोष्ट वेगळी आहे कारण, जेंव्हा दोन व्यक्ती आपापसात काही चर्चा करत असतील तर, आपण चोंबडेपणा करायला जाऊ नये, इतपत तारतम्यता तरी तुम्हाला नक्कीच आहे....

In reply to by मुक्त विहारि

विहारी जी, वामन जी को उपप्रतिसाद दे, तो वह चर्चा होती है। मैं विहारी जी को उपप्रतिसाद दू तो साला, वह चोंबडेपणा होता है ।

https://www.aajtak.in/crime/big-crime/story/up-banda-bikru-attack-on-po… यूपी सारख्या जंगल राज असलेल्या राज्याची तुलना आपलेच अती शाहणें अती उत्तम राज्य महारष्ट्र शी करतात. योगी सारख्या fail मुख्य मंत्री ची तुलना ठाकरे शी करतात. वरील बातमी वाचा. अशा घटना तिथे सर्रास घडतात .माझ्या महाराष्ट्रात असले प्रकार घडत नाहीत.

https://auto.economictimes.indiatimes.com/news/passenger-vehicle/cars/t… मागे या बाबतीत थोडी चर्चा झाली होती. आयात शुल्कात सवलत मागण्याच्या टेस्ला (पर्यायाने मस्क) च्या दबावाला बळी न पडता, "भारतात विकला जाणारा माल भारतातच बनायला हवा" या मताशी ठाम राहणार्‍या भारत सरकारचे आभार मानायला हवेत. भारत इतर देशांचे डंपिंग ग्राउंड नाही हे ठणकाउण सांगितल्याबद्दल अभिनंदन. टेस्ला या घडीला आघाडीची ईलेक्ट्रिक कार बनवणारी कंपणी असली तरी ती एकच कंपनी नाही. टेस्लाला भारतात पर्यायी कंपणी येउ शकते. पण गमावलेला रोजगार परय यायला खुप वेळ लागेल ...

In reply to by डँबिस००७

टेस्ला भारतात आली नाही तर भारताला शष्प फरक पडणार नाही. सत्तर च्या दशकात मारुतीला तंत्रज्ञानासाठी जगातील कंपन्यांशी संपर्क चालू असताना फॉक्स वागेन या कंपनीने भारत आमचे तंत्रज्ञान वापरण्याइतका परीपक्व (MATURE ) झालेला नाही अशी दर्पोक्ती केली होती आणि हि त्यांना किती प्रचंड महाग पडली हे काही काळाने सिद्ध झाले. याउलट सुझुकी हि इतर कंपन्यांच्या तूलनेत खूप छोटी असलेली कंपनी भारतात अद्ययावत तंत्रज्ञान घेऊन आली आणि भारतात गाड्या उत्पादन करून जगभरातील मोठ्या कंपन्यांना निर्यात करण्याइतकी मोठी झाली.