ताज्या घडामोडी - ९
In reply to वैतागली लोक by वरुण मोहिते
In reply to मोहितेंचे पण ट्रक फिरायला by मोदक
In reply to कुठल्या बाबतीत म्हणे by वरुण मोहिते
In reply to तुम्हाला अडचण आहे ना by मोदक
In reply to विनंती by गॅरी ट्रुमन
In reply to विनंती by गॅरी ट्रुमन
In reply to वैतागली लोक by वरुण मोहिते
In reply to वरुण जी...!! by विशुमित
In reply to आज मोदी सांगतात कि नव्या प्रॉमिस करू नका by वरुण मोहिते
In reply to महागाई तर कमी झाली ब्वॉ. १.५% by अनुप ढेरे
In reply to आज मोदी सांगतात कि नव्या प्रॉमिस करू नका by वरुण मोहिते
In reply to आजच्या दोन महत्त्वाच्या बातम्या by तुषार काळभोर
In reply to अजून एक बातमी आहे by तुषार काळभोर
In reply to पवार साहेब एन्डिएमध्ये गेले by अनुप ढेरे
In reply to अजून एक बातमी आहे by तुषार काळभोर
युपीए च्या बैठकीला शरद पवार गैरहजर
चर्चेत राहण्यासाठी पवार असे करीत असतात. त्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. पूर्वी ते असेच अचानक बाळ ठाकरेंची भेट घ्यायचे. आता ते अचानक मोदींची भेट घेतात. अचानक ब्राह्मणविरोधी काडी टाकतात. काही तरी करून स्वतःचे महत्व वाढावे व आपण अजून संपलेलो नाही हे दाखविण्यासाठी त्यांना असे करावे लागते. ते बाहेर पडले तरी संपुआला फरक पडणार नाही व रालोआला त्यांची गरज नाही. In reply to युपीए च्या बैठकीला शरद पवार by श्रीगुरुजी
रालोआला त्यांची गरज नाही.महाराष्ट्रातील भाजप सरकार ला सुरवातीला राष्ट्रवादीने इंडिरेक्टली मदत केलेली विसरलात का की गुजरात मध्ये राष्ट्रवादीच्या आमदाराने भाजप ला राज्यसभे ला मदत केली हे विसरलात. पुण्या सारख्या अनेक शहरात राष्ट्रवादी चे बागलबच्चे भाजप घेऊन पोसतोय हे विसरलात. की मोदी जाहीर सभेत येऊन पवार हे माझे राजकीय गुरु आहेत हे म्हणलेलं विसरलात. कदाचित आम्ही काही तरी विसरलोय ते म्हणजे भाजप ही वाल्याला वाल्मिकी बनविण्याची फॅक्टरी आहे.
In reply to रालोआला त्यांची गरज नाही. by अमितदादा
महाराष्ट्रातील भाजप सरकार ला सुरवातीला राष्ट्रवादीने इंडिरेक्टली मदत केलेली विसरलात का की गुजरात मध्ये राष्ट्रवादीच्या आमदाराने भाजप ला राज्यसभे ला मदत केली हे विसरलात. पुण्या सारख्या अनेक शहरात राष्ट्रवादी चे बागलबच्चे भाजप घेऊन पोसतोय हे विसरलात. की मोदी जाहीर सभेत येऊन पवार हे माझे राजकीय गुरु आहेत हे म्हणलेलं विसरलात.
१) भाजपने न मागता राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केला होता. भाजपने तो स्वीकारला नव्हता.
२) गुजरातमध्ये तसेच घडले आहे.
३) पुण्यात राष्ट्रवादीचे कोणते बगलबच्चे भाजप पोसतोय?
४) मोदींच्या पवारस्तुतीमागील उपरोध लक्षात आलेला दिसत नाही. In reply to महाराष्ट्रातील भाजप सरकार ला by श्रीगुरुजी
In reply to 1. म्हणजे यात आतमध्ये काही by अमितदादा
In reply to १) नक्की काय गुप्तगु झाले? by श्रीगुरुजी
In reply to 1. 1. मला नाही माहीत काय झाले by अमितदादा
मला नाही माहीत काय झाले म्हणून, मात्र काहीतरी गुप्तगु झाले असणार हे माझे मत आहे. याचा पुरावा काय तर काही नाही
I rest my case.
लक्ष्मण जगताप तुम्हाला छोटी असामी वाटली काय? राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड मधील कर्तेधरते होते ते, फक्त ते नाहीत आले भाजपात तर त्यांना मानणाऱ्या नगरसेवकांना घेऊन आलेत ते. हे आहेत राष्ट्वडीचे बच्चे. बरं हे एक उदाहरण आहे का तर नाही सांगलीचे खासदार संजय काका पाटील, नंदुरबार चे भ्रष्ट मंत्री विजयसिंह गावित आणि खासदार हिना गावित तसेच यांच्या कार्यकर्त्यांची फळी आहे अशी भाजप मध्ये आलीय। आठवल्यास आणखी उदाहरणे देतो
अशी येजा प्रत्येक पक्षातच सुरू असते. राष्ट्रवादीत तर सेना व भाजपच्या बगलबच्च्यांची भाऊगर्दी आहे.
अचरेकरांची शतके सचिन पेक्षा जास्त आहेत काय? तुमचं अरगुमेन्ट अयोग्य आहे, परंतु मला हे माहीत आहे की पवार हे काय मोदींचे गुरू नाहीत पण यातून सांगायचा मुद्दा असा की मोदी त्यांचा दृष्टीने भ्रष्ट पक्ष किंवा त्यांचे प्रमुख याच्याशी राजकारणासाठी हातमिळवणी करू शकतात. BJP is no more a party with difference.
आचरेकर म्हणजे ईशांत शर्मा! धन्य आहे.
मोदींनी पवारांशी नक्की कोठे व कशी हातमिळवणी केलीये ते सांगता का जरा (स्वत:चे मत नको. प्रत्यक्ष उदाहरणे द्या.).
परंतु मला हे माहीत आहे की पवार हे काय मोदींचे गुरू नाहीत
तेच सांगितले मी. मोदी जे म्हणाले ते उपरोधिक होते. काही भाबडे त्यास सत्य समजून आगपाखड करतात.
In reply to मला नाही माहीत काय झाले by श्रीगुरुजी
अशी येजा प्रत्येक पक्षातच सुरू असते. राष्ट्रवादीत तर सेना व भाजपच्या बगलबच्च्यांची भाऊगर्दी आहे.हे जर तुम्हाला माहित होतं तर पहिल्या प्रतिसादात का विचारलं की कुठे आहेत की बागलबच्चे म्हणून ? याचा अर्थ उघडे पडल्याशिवाय चूक मान्य करायची नाही. तुमचं वाक्य हेच सिद्ध करतंय जे मी म्हणतोय ते की bjp is no more party with difference.
मोदींनी पवारांशी नक्की कोठे व कशी हातमिळवणी केलीये ते सांगता का जरा (स्वत:चे मत नको. प्रत्यक्ष उदाहरणे द्या.)महाराष्ट्रातील आणि गुजरात मधील पाठिंबा अजित पवार यांची चोकशी थंडावणे ही काय माझी उदाहरणे आहेत काय? या गोष्टी का होतायत हे सामान्य लोकांना कळतंय जरी बाहेर पुरावे नसले तरी, तुमच्या सारख्या भाजप समर्थकांना हे दैवी योगायोग वाटणार किंवा राष्ट्वडी स्वतःहून भाजप वर उपकार करतेय असे वाटणार यात काय शंका नाही.
तेच सांगितले मी. मोदी जे म्हणाले ते उपरोधिक होते. काही भाबडे त्यास सत्य समजून आगपाखड करतातयाच थोडं स्पष्टीकरण देतो, मोदी नि पावरबाबत exagration केलं हे मान्य, परंतु पवार हे मोदी ना आदर्श आहेत हे नक्की याच करण जेंव्हा upa च सरकार होत तेंव्हा पवार सोडून सगळ्या केंद्रीय मंत्र्यांनी मोदी शी असहकार पुकारला होता. पवार यांनी मोदींची शेती आणि अन्न प्रशासन विभागाच्या संदर्भातील कामे केली होती, हे मोदी नि मान्य केलंय. तसेच गरज भासल्यास आपण पवारांचा सल्ला घेतो हे ही मान्य केलाय. पवार आणि मोदी यांचा असणार सौख्य चा भाजप आणि राष्ट्रवादी च्या love and hate relationzhip च गुपित आहे. लोक मोदींच स्टेटमेंट आहे असे घेऊन आगपाखड नाही करत तर त्यांचं निवडणुकी आधीच टीका आणि।निवणुकी नन्तर च सौख्य आणि जवळीक पाहून टीका करतायत हे कधी तरी लक्षात घ्या।
In reply to अशी येजा प्रत्येक पक्षातच by अमितदादा
In reply to भाजप राष्ट्रवादी संबंधावर by अभिजीत अवलिया
पण पडद्यामागे गुफ्तगु न होता आणि भाजपाने न मागता देखील राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता ह्या आपल्या भाबड्या मतावर ते ठाम आहेत. आणि जरी त्यांनी न मागता पाठिंबा दिला तरी भाजपाने का घेतला ह्याचे कोणतेही उत्तर त्यांच्याकडे नाही.अगदी अगदी. राजकारणामध्ये मोठी लोक आपल्यासारख्या सामान्य लोकांना फाट्यावर मारून स्वतःचा सोयीनुसार निर्णय घेत असतात हे वेळोवेळी सिद्ध झालाय (ताज उदाहरण नितीश कुमार), भाजप हि राजकारण्यांचे याच माजलेल्या मनोवृत्तीचा प्रतिनिधीत्व करणारा एक पक्ष आहे. नितीश कुमारवर बिहार मध्ये टीका करताना मोदी नि त्यांचा dna मध्ये मिलावट आहे असे काहीतरी म्हंटले होते आणि मते मागितली होती, आता मोदी नि जेनेटिक science वापरून मिलावट दूर केली काय ? शेवटी सत्ता महत्वाची तत्वे आणि विचारसरणी हि बोलायची गोष्ट आहे भाजप साठी सुद्दा हे आता भाजपेयीनी मान्य करावे.
In reply to पण पडद्यामागे गुफ्तगु न होता by अमितदादा
आता मोदी नि जेनेटिक science वापरून मिलावट दूर केली काय ?हो शक्य आहे. तसे पण जेनेटिक science आपल्याकडे पूर्वीपासून होतेच म्हणा. कर्णाचा जन्म किंवा गणपतीला हत्तीचे तोंड बसवले गेले होतेच. http://www.thehindu.com/todays-paper/tp-in-school/genetic-science-existed-in-ancient-times-modi/article6545958.ece त्यामुळे रक्तातील मिलावट दूर करणे म्हणजे किस झाड की पत्ती.
In reply to भाजप राष्ट्रवादी संबंधावर by अभिजीत अवलिया
भाजप राष्ट्रवादी संबंधावर ताज्या घडामोडी ८ ह्या भागात देखील माझी आणि श्रीगुरुजी ह्यांची चर्चा झाली होती. पण पडद्यामागे गुफ्तगु न होता आणि भाजपाने न मागता देखील राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता ह्या आपल्या भाबड्या मतावर ते ठाम आहेत. आणि जरी त्यांनी न मागता पाठिंबा दिला तरी भाजपाने का घेतला ह्याचे कोणतेही उत्तर त्यांच्याकडे नाही.
यात भाबडे काय आहे? जर भाजपने स्वतःहून राष्ट्रवादीचा पाठिंबा मागितला होता अशी खात्रीशीर माहिती असेल तर त्याचे संदर्भ द्यावेत ही विनंती. जर त्यांच्यात काही गुप्तगु झाले असेल तर त्याची माहिती द्यावी ही विनंती. राष्ट्रवादीने स्वतःहून पाठिंबा दिला होता, तरीही भाजपने तो स्वीकारलेला नव्हता ही वस्तुस्थिती आहे. यापेक्षा काही वेगळे झाले असेल तर त्याचे संदर्भ द्यावेत ही विनंती.
कोणतीही चर्चा करताना मी दोनच गोष्टी लक्षात ठेवतो. एक म्हणजे माणसाची मते शक्यतो कधीही बदलत नाहीत आणि दुसरी म्हणजे झोपलेल्या माणसाला उठवता येते झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही.
माझे देखील हेच मत आहे. In reply to अशी येजा प्रत्येक पक्षातच by अमितदादा
In reply to मोदी जेव्हा वाळीत टाकलेले by वरुण मोहिते
In reply to सो पवारांशी संबंध असणे हे by अनुप ढेरे
In reply to मोदी जेव्हा वाळीत टाकलेले by वरुण मोहिते
अमेरिकेने व्हिसा नाकारलेले तेव्हा इस्राईल ला पवार साहेब त्यांना शिष्टमंडळातून घेऊन गेले , अदानी हे १९८८ पासून पवार आणि प्रफुल भाई पटेल ह्यांच्या संपर्कात होते . त्याची मदत मोदी ह्यांना झाली . उगाच नाही आल्या आल्या पदमविभूषण , अगदी बारामती ला जाऊन भेटी , दिल्लीत भेटी , पवार ह्यांचा सल्ला नेहमी घेतो हे जाहीर सांगितले . पवार ह्यांचा काही फायदा आहे का आता मोदींना . तरी सांगत आहेत . भाबड्या आशेवर ,संघ , मोदी कसे स्वच्छ ह्या विश्वासावर असलेल्याना शुभेच्छा .
२००६ मधील त्या भेटीत सर्वपक्षीय शिष्टमंडळ होते. त्यात अनेक राज्यांचे प्रतिनिधी होते. त्यात पवारांबरोबर तत्कालीन राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, मोदी, सिब्बल, कमलनाथ, ओरिसा/नागालँड सह अनेक राज्यांचे मंत्री व वरीष्ठ अधिकारी होते. इस्राईली नेत्यांसमोर वसुंधरा राजेंनी एक पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनसुद्धा केले होते. त्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात पवारांबरोबर मोदी होते म्हणजे त्यांचे साटेलोटे होते असा अर्थ काढायचा असेल तर सिब्बल, कमलनाथ इ. चे सुद्धा मोदींबरोबर व वसुंधरा राजेंसहीत अनेक पक्षांबरोबर साटेलोटे होते असा बादरायण संबंध लावावा लागेल.
बारामतीला भेट दिलेले मोदी हे एकमेव मोठे नाहीत. यापूर्वी माजी पंतप्रधान चंद्रशेखर, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी इ. नी सुद्धा पवारांच्या आमंत्रणावरून बारामतीला भेट दिलेली आहे. राष्ट्रीय नेत्यांना बारामतीला आमंत्रण देऊन त्यांचा पाहुणचार करणे व शिष्टाचार म्हणून ते यजमानाबद्दल ४ शब्द बरे बोलतात ते माध्यमातून छापून आणून आपले महत्त्व वाढविणे हा पवारांचा जुना छंद आहे. मी पवारांचा सल्ला घेतो इ. सांगणे हे उपरोधिक आहे हे लक्षात आलेले दिसत नाही. In reply to अशी येजा प्रत्येक पक्षातच by अमितदादा
हे जर तुम्हाला माहित होतं तर पहिल्या प्रतिसादात का विचारलं की कुठे आहेत की बागलबच्चे म्हणून ? याचा अर्थ उघडे पडल्याशिवाय चूक मान्य करायची नाही.
मुळात तुम्ही लिहिलंत की भाजपने अनेक शहरात राष्ट्रवादीचे अनेकबगलबच्चे घेतलेले आहेत. मी विचारल्यावर फक्त एक बगलबच्चा सांगितलात. पुन्हा विचारल्यावर अजून ३-४ बगलबच्चांची नावे दिलीत. फक्त ३-४ नावे म्हणजे अनेक शहरातील अनेक बगलबच्चे होतात का? असले २-४ चिल्लर बगलबच्चे भाजपमध्ये किंवा इतर कोणत्याही पक्षात गेले तर पक्षाला फारसा फरक पडत नाही. असे चिल्लर नेते इकडून तिकडे ये-जा करीत असतातच.
तुमचं वाक्य हेच सिद्ध करतंय जे मी म्हणतोय ते की bjp is no more party with difference.
बरं नसू देत.
महाराष्ट्रातील आणि गुजरात मधील पाठिंबा अजित पवार यांची चोकशी थंडावणे ही काय माझी उदाहरणे आहेत काय? या गोष्टी का होतायत हे सामान्य लोकांना कळतंय जरी बाहेर पुरावे नसले तरी, तुमच्या सारख्या भाजप समर्थकांना हे दैवी योगायोग वाटणार किंवा राष्ट्वडी स्वतःहून भाजप वर उपकार करतेय असे वाटणार यात काय शंका नाही.
अजून किती वेळा सांगायचं की हा पाठिंबा भाजपने मागितला नव्हता व राष्ट्रवादीने तो स्वतःहून दिला होता व भाजपने तो स्वीकारलेला नव्हता. अजित पवारांची चौकशी अजिबात थंडावलेली नाही. २०१४ पासून राष्ट्रवादीवर भरपूर वेळा कुर्हाड चाललेली आहे. गुगलल्यास त्याविषयी माहिती मिळेल.
याच थोडं स्पष्टीकरण देतो, मोदी नि पावरबाबत exagration केलं हे मान्य, परंतु पवार हे मोदी ना आदर्श आहेत हे नक्की याच करण जेंव्हा upa च सरकार होत तेंव्हा पवार सोडून सगळ्या केंद्रीय मंत्र्यांनी मोदी शी असहकार पुकारला होता. पवार यांनी मोदींची शेती आणि अन्न प्रशासन विभागाच्या संदर्भातील कामे केली होती, हे मोदी नि मान्य केलंय. तसेच गरज भासल्यास आपण पवारांचा सल्ला घेतो हे ही मान्य केलाय. पवार आणि मोदी यांचा असणार सौख्य चा भाजप आणि राष्ट्रवादी च्या love and hate relationzhip च गुपित आहे. लोक मोदींच स्टेटमेंट आहे असे घेऊन आगपाखड नाही करत तर त्यांचं निवडणुकी आधीच टीका आणि।निवणुकी नन्तर च सौख्य आणि जवळीक पाहून टीका करतायत हे कधी तरी लक्षात घ्या।
पवार यांनी मोदींची शेती आणि अन्न प्रशासन विभागाच्या संदर्भातील कामे केली होती, हे मोदींनी कधी मान्य केलंय? पवारांनी मोदींची नक्की कोणती कामे केली?
"गरज भासल्यास आपण पवारांचा सल्ला घेतो" हे सुद्धा उपरोधिक वाक्य आहे. हे खरे समजणे म्हणजे आपण चौथी नापासाची शिकवणी लावलीये असे एखाद्या विद्यावाचस्पतीचे म्हणणे खरे समजण्यासारखे आहे. निवणुकीपूर्वी किंवा नंतर आजतगायत भाजप व राष्ट्रवादीची जवळीक कोठेही दिसलेली नाही. मागील ३ वर्षात झालेल्या सर्व निवडणुकीत राज्यात व राज्याबाहेर दोन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले आहेत. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादीने रालोआच्या उमेदवाराला मत दिलेले नाही. राष्ट्रवादीचे काही नेते तुरूंगात आहेत. लवासाची विशेष परवानगी काढून घेण्यात आली आहे. राज्य सहकारी बँक व इतर सहकारी संस्थावरील राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडून काढण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. In reply to हे जर तुम्हाला माहित होतं तर by श्रीगुरुजी
पवार यांनी मोदींची शेती आणि अन्न प्रशासन विभागाच्या संदर्भातील कामे केली होती, हे मोदींनी कधी मान्य केलंय? पवारांनी मोदींची नक्की कोणती कामे केली?खलील लिंक वाचा बातमी मोदींच्या तोंडून डायरेक्ट "I keep talking with Pawar at least twice or thrice a month and we exchange notes on various issues faced by the country. We need to use Pawar’s more than five decades (of) experience in the public life.” Whenever the UPA (United Progressive Alliance) government used to block schemes and projects related to Gujarat, as the chief minister I used to always seek help from Pawar and...he used to help me sort out my issues with the central government,” आता कृपया मोदींना खोटे ठरवू नाका.
In reply to पवार यांनी मोदींची शेती आणि by अमितदादा
In reply to तुमच्या भाबडेपणाचे कौतुक by श्रीगुरुजी
In reply to अवघड आहे, जेंव्हा आपण कुणाचे by अमितदादा
In reply to अवघड आहे, जेंव्हा आपण कुणाचे by अमितदादा
In reply to ४-५ दिवसांपूर्वी महाराष्ट्र by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी तो एक शिष्टाचार असतो. by थिटे मास्तर
In reply to पवार यांनी मोदींची शेती आणि by अमितदादा
We need to use Pawar’s more than five decades (of) experience in the public life.तरीही हा दोन पक्षांमध्ये डिल होते हे दर्शविणार नाही. अमेरिकेचे माजी अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे १९९४ मध्ये निधन झाले आणि ते तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी व्हाईट हाऊसमध्ये जाहिर केले. त्यावेळी बिल क्लिंटन यांनीही रिचर्ड निक्सन यांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा झाला असे म्हटले होते. या व्हिडिओमध्ये साधारण ३ मिनिटे ४० सेकंदांनंतर बिल क्लिंटन यांचे स्टेटमेन्ट येईल. सत्तापदावर गेलेल्या व्यक्ती इतरांशी सल्लामसलत करत असतात. तोच प्रकार मोदी-पवार यांच्या बाबतीत म्हणता येईल. या दोन पक्षांत डिल झाले नाही असे नाही पण हा त्यासाठी पुरेसा आधार आहे असे वाटत नाही.
In reply to डिल by गॅरी ट्रुमन
In reply to सल्लामसलत करणे म्हणजे डील by श्रीगुरुजी
सल्लामसलत करणे म्हणजे डील झाले असे कसे म्हणता येईल?तेच म्हटले आहे. सत्तेवर जाऊन निर्णय घ्यायची जबाबदारी असलेल्या व्यक्ती सल्लामसलत करतच असतात. याचा अर्थ त्यांच्यात डिल झाले असा नक्कीच काढता येणार नाही.
दुसरं म्हणजे निक्सन आणि क्लिंटन हे एकाच पदावर होते.अशी सल्लामसलत करायला त्याच पदावर असलेल्या व्यक्तीशी करायला पाहिजे असे बंधन नक्कीच नाही. शेतीविषयक प्रश्नांवर पंतप्रधान आणि कृषीमंत्री गेल्या ५०-६० वर्षांपासून एम.एस.स्वामीनाथन यांच्याशी सल्लामसलत करत आलेले आहेत. स्वामीनाथन अर्थातच पंतप्रधान किंवा कृषीमंत्री नव्हते. पण त्यांचा शेतीविषयक प्रश्नांचा दांडगा अभ्यास असल्यामुळे ते चांगला सल्ला देऊ शकतील अशी खात्री वाटल्यामुळे त्यांच्याशी सल्लामसलत करणार्या सत्ताधार्यांना वाटत असल्यामुळेच ते त्यांचा सल्ला घ्यायला जात असतील. १९९८ मध्ये अणुचाचण्या झाल्यानंतर २-३ महिन्यांनंतर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी माजी परराष्ट्रमंत्र्यांना असेच सल्लामसलतीसाठी बोलावले होते. त्यात चरणसिंग सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री असलेले श्यामनंदन मिश्रांपासून प्रणव मुखर्जी, विद्याचरण शुक्ला हे पण माजी परराष्ट्रमंत्री सामील झाले होते. वाजपेयी त्यावेळी पंतप्रधान असल्यामुळे केवळ माजी पंतप्रधानांशीच सल्लामसलत करावी असे नक्कीच नव्हते. त्याचप्रमाणे शरद पवार १० वर्षे कृषीमंत्री असल्यामुळे ते काहीतरी सल्ला देऊ शकतील असे वाटल्यामुळेच मोदींनी तसे म्हटले असावे (हा माझा तर्क).
In reply to डिल by गॅरी ट्रुमन
२०१४ मध्ये राष्ट्रवादीची पडद्याआड मदत घ्यायचा प्रकार तेव्हा आवडला नव्हता आणि आताही आवडलेला नाही. तसेच त्यावेळी कुठलेही डिल न होता (भले ते दिशाभूल करायला केलेले खोटे डिल असले तरी) राष्ट्रवादीने महाराष्ट्रात स्थिर सरकार यावे या 'उदात्त' हेतूने भाजपला पाठिंबा नक्कीच दिला नसणार हे तर नक्कीच कळते. आपल्याला काही मिळाल्याशिवाय राजकारणात कोणीही काहीही दुसर्यासाठी करत नसतो. आणि पवार तर नक्कीच नाही.
बरोबर आहे. भाजपने न मागता पाठिंबा जाहीर करण्यामागे पवारांचा नक्कीच काहीतरी हेतू असणार. परंतु प्रश्न असा आहे की भाजपने त्यांचा पाठिंबा स्वीकारला होता का? आणि ज्या हेतूने पवारांनी स्वतःहून पाठिंबा जाहीर केला ते हेतू साध्य झाले का? पहिल्या प्रश्नाचे उत्तर "नाही" असे आहे. भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा स्वीकारला नव्हता, पण तो नाकारला पण नव्हता. त्यांनी त्यावर फक्त मौन पाळून आपले पत्ते उघडे केले नाहीत. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पाठिंब्यामुळे सेनेची बार्गेनिंग पॉवर एकदम संपुष्टात आली आणि तसे होणार हे ओळखून फडणविसांनी चातुर्याने त्याचा वापर करून शेवटी सेनेला स्वतःच्या अटींवर पाठिंबा देण्यास भाग पाडले. दुसर्या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड आहे, कारण पवारांनी नक्की कोणत्या हेतूने स्वतःहून पाठिंबा जाहीर केला होता हे बाहेर आलेले नाही. सर्वसाधारणपणे असे समजले जाते की आपल्या पक्षाच्या नेत्यांना भ्रष्टाचाराच्या कारवाईपासून वाचविण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला होता. हा हेतू असेल तर तो फारसा साध्य झालेला दिसत नाही. दुसरा हेतू असा असू शकतो की पवारांना रालोआत जाऊन मंत्रीपद मिळवायचे असावे. हा हेतू असेल तर तो अजिबात साध्य झालेला नाही. माझ्या मते मूळ हेतू वेगळाच होता (हे माझे मत आहे. यावर माझ्याकडे कोणताही पुरावा नाही.). तो हेतू म्हणजे निवडणुकपूर्व काळात सेना-भाजप संबंध इतक्या विकोपाला गेले होते की निकालानंतर ते परत एकत्र येतील असे पवारांना वाटले नसावे. अशा परिस्थितीत त्यांना एकत्र येण्याची बारीकशी संधी सुद्धा मिळू नये यासाठी त्यांनी घाईघाईने भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्यांचे गणित असे असावे की आपण पाठिंबा जाहीर केल्यानंतर सेना विरोधात बसेल. आपला पाठिंबा घेतल्याने भाजपची पुरेपूर नाचक्की होईल व पाठिंब्याचा दडपणामुळे आपल्या पक्षाच्या आमदारांवरील भ्रष्टाचाराची कारवाई टाळता येईल. काही महिने पाठिंबा सुरू ठेवून नंतर पाठिंबा काढून घेतल्यावर सरकार पडेल व नंतर नव्याने जुळणी होऊन सत्तेत परतण्याची संधी मिळेल किंवा मुदतपूर्व निवडणुक झाल्यास भाजपला जोरदार फटका बसेल व त्यावेळी आपल्याला संधी निर्माण होईल. परंतु भाजपने पाठिंब्याबाबत मौन पाळून शेवटी सेनेला सत्तेत येण्यास भाग पाडले व पवारांची खेळी अयशस्वी ठरली.
In reply to २०१४ मध्ये राष्ट्रवादीची by श्रीगुरुजी
In reply to २०१४ मध्ये राष्ट्रवादीची by श्रीगुरुजी
In reply to गोरखपुरला 30 निष्पाप लहान by थिटे मास्तर
मोहितेंचे पण ट्रक फिरायला