कौलारुच्या लाल घरावर.............. उडून बसले उदी कबुतर
पिंगा घाली जरी तटावर...............व्याकुळ बघते कुठे दूरवर
नयन पिटुकले परी बेरके..............अंग फ़ुगवुनी घेते गीरके
जमिनी टोचा मारी सारखे..............कोणा ठावूक का धुसमुसते
आळवणी नच व्यर्थ जाहली...........साद ऐकूनी सजणी आली
उदी नराच्या जवळ टेकली.............शुभ्र मादी अंगे मोहरली
लाडावुनी तिज अंग घासूनी............फ़िरुनी गर्वित चहुबाजुनी
चोचीमध्ये चोंच मिसळुनी..............गोड आमंत्रण दिले नरानी
खोट्या कोपे ती फ़डफ़डली.............चार पावले दूर बैसली
हळूच बघुनी मागे वळली...............कष्टी तो दिसता हरखली
परंतू नाटक सुरू ठेवूनी................बांधावर जाऊनी थबकुनी
आव्हानच जणु दिले दुरूनी............असेल हिम्मत घे जिंकोनी
घुमून पिंगून ते तरवटले...............छळ पुरे- कदाचित वदले
अचानक आक्रमुनी झेपले..............आव्हानाला उत्तर दिधले
विसरून कधी होती गर्विता.............सुखावली, ती अंग बंधिता
धसमुसळ्या बळे मोहरता..............म्हणे प्रेम कर असे सर्वदा
उदी उन्मादे उंच मान करी.............पंख दोन फ़डफ़डुनी पसरी
विजयोन्मादे उंच भरारी................घेऊन उडले आकाशावरी
प्रियकर जाता ये भानावर..............शुभ्र बघे उदीच्या मार्गावर
एकाकी मळभाचा वावर................कौलारुच्या लाल घरावर
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1570
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर कविता
छान
छान. मस्त कविता
छान वर्णन..