Skip to main content

साडेसाती

लेखक अविनाश ओगले यांनी सोमवार, 21/09/2009 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
देईल का मज कुणी दिलासा साडेसातीत हवाहवासा म्हणती साडेसातीमध्ये फिरते घर अन् फिरतो वासा नुसती तडफड साडेसाती जळावाचूनी जैसा मासा सहजासहजी होते गोची उच्छ्‌वासांचा होई उसासा साडेसातीनंतर तरी का मनासारखा पडेल फासा? -अविनाश ओगले
लेखनविषय:

वाचने 1840
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

देतील, बरेच जण देतील. इथेच मिळेल दिलासा, काळजी नको. मुख्य - कविता बरी आहे.

बाबा... २५० रूपयान्चा तर प्रश्न आहे.... का फुकाचा त्रास करून घेतोस? आणि साडेसातीचं म्हणशील तर ती जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी तिची सावली मात्र इथे कायम पडीक असते...

साडेसातीत... हवाहवासा दिलासा मिळणे ..अवघड दिसतंय - प्रश्नकुंडलीवरून तरी !!