Skip to main content

आता नाही ...!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 18/09/2009 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
आसवांचा जुना आड आता नाही वेदनांचे तसे लाड आता नाही ! मांडला मी असा स्वप्न बाजार पुन्हा वास्तवाच्या भुता 'झाड' आता नाही ! वेदनांची खरी जाहली मज सोबत संकटांना नव्या "हाssssड", आता नाही ! कल्पनांचा मना लाभला आधार नि... जाणिवांची तशी चाड आता नाही ! झेलले घाव सारे सदा सुमनांचे अन नव्याने भ्रमर धाड ....., आता नाही ! विशाल.
लेखनविषय:

वाचने 2309
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

धन्स प्राजु! तुच गो तुच माझी मैत्रीण ! ;-) ६६ मध्ये एकटीच ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"