Skip to main content

(सहज चोळले..)

लेखक ज्ञानेश... यांनी मंगळवार, 18/08/2009 13:40 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा: प्राजुताईंची सुंदर कविता- "सहज चाळले"

--------------------------------
सहज चोळले मी पाठीला जाता जाता
क्षणात सगळ्या आठवल्या बसलेल्या लाथा.. :(

किती राहिलो अवतीभवती तुझ्या तरीही,
मनासारख्या झाल्या नाही कधीच बाता =((

मच्छर भलते.. म्हणून मी रात्री जागवल्या
अफवा झाल्या जागरणाच्या मला पाहता! (|:

लोकांच्या डोळ्यात कितीदा येत राहिले..
कळवळणे, अवघडणे माझे उठता-बसता :B

'स्पर्श' तुझ्या भावाचा अजुनी दुखतो आहे
अजुनही 'कळ' उठते आहे तो आठवता.. :

डोळ्यांमध्ये दाटून आली अशी आसवे..
लोक टाळती 'डोळे आले' म्हणता म्हणता @)

अधुनमधुन मी सासरकडच्या गावी जातो..
अन वेड्यागत रुसून बसतो 'गाडी'करता! >:)

किती पसारा आवरण्याचा सोस तुला हा?
धांदल माझी होते ना तो करता करता ! ;)

-ज्ञानेश.
-------------------------------------

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3177
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

(सहज चोळले..)
प्रेषक ज्ञानेश... ( मंगळ, 08/18/2009 - 13:40) . कविता | भयानक

खरंच ,.... नाव फक्त भयानक आहे कवितेचं !! आत मधे मात्र बसलेल्या लाथा ? =))
जगदंब ... जगदंब ....

- ( तत्वज्ञानेश..) टारेश्वर


मी बरोब्बर "सहज चोळले" असे वाचले, म्हटले काय तरी इण्टरेष्टिंग आहे.. पण छ्या विडंबण निघालं !

--(आंबट) कढीपत्ता