Skip to main content

|| गीत अभिमानाचे स्फुरु दे ||

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 07/08/2009 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
९ ऑगस्ट -- "क्रांती दिन "
उंच उभारुनी ध्वजा केशरी जयजयकार निनादु दे | पेटलेल्या संगराची ज्योत गगनाला भिडू दे || सामोरी येथ आमुच्या लोहपाशात बद्ध देवता थेंब तिच्या अश्रुचा धगधगती ज्वाला बनू दे || आव्हान असे दश-दिशांना अजिंक्य आमुची विजिगीषा बेभान अनावर आवेगाला साथ धैर्याची मिळू दे || तळपति तेज दामिनी उसळू द्या आवेशाने अर्ध्य उष्ण रुधिराचे तेजाला त्या अर्पू दे || उभा पुढे जरी काळ राही नसे तमा आम्हा जराही मत्त , उन्मत्त अहंकाराला धाक शौर्याचा असू दे || पाप नाचते उन्मादाने धुंद होत आपुल्या बळाने अमानुष त्या क्रौर्याचा नाश पुण्याला करू दे || धुमसत राही आग अशी रण भूमीच्या -हुदयांतरी उधळुनी प्राण पुष्पे ही गीत अभिमानाचे स्फुरु दे ||
लेखनविषय:

वाचने 4706
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

छान ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

कविता चांगली आहे. कडव्याच्या शेवटच्या 'दे' ह्या शब्दामुळे, मला कवी यशवंतांच्या ' वाढु दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती . . . . कवितेची आठवण आली.

पाप नाचते उन्मादाने धुंद होत आपुल्या बळाने अमानुष त्या क्रौर्याचा नाश पुण्याला करू दे || छान कविता. :) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

समयोचित, चांगली कविता. फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

आव्हान असे दश-दिशांना अजिंक्य आमुची विजिगीषा बेभान अनावर आवेगाला साथ धैर्याची मिळू दे || अप्रतिम कविता! क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी