Skip to main content

ए आई, सांग ना, कधी येइल बाबा घरा?

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 27/07/2009 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
ए आई, सांग ना, कधी येइल बाबा घरा? ए आई......,सांग ना SSSSS! आता गोष्ट नको आम्हाला, गाण्यातला रस संपला! लुटुपुटीच्या भातुकलीचा, आला खुप खुप कंटाळा SSSS! ए आई, सांग ना SSSSS, कधी येइल बाबा घरा? नकोच आई मजला, चॉकलेटचा तो बंगला ! अन बर्फीची ती झाडे, इथे आहेत, हवी SSSS कुणाला? ए आई, सांग ना SSSSS, कधी येइल बाबा घरा? राजपुत्र अन परीराणीच्या, गोष्टींचा स्टॉकही संपला ! टॉम अँड जेरी, पापायनेही, बघ जीव; आमचा SSS उबला ! ए आई, सांग नाSSSSS, कधी येइल बाबा घरा? चिवचिव करती चिमणपिले, चोचीतच घास राहीला ! असेल का गं गेला ? त्यांचाही बाबा टूरSSS ला? ए आई, सांग नाSSSSS, कधी येइल बाबा घरा? बघ चांदोबा तो रुसला, चांदण्याही..., बघ धुसफुसल्या ! अंगाई नच रुचे आम्हाला, आम्हा हवाय बाबा......, थोपटायलाSSSSS ! ए आई, सांग नाSSSSS, कधी येइल बाबा घरा? विशाल.
लेखनविषय:

वाचने 3106
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

प्रेरणास्थान "आयुष्यावर बोलु काही" .... पार्श्वभुमी ....? एक माजी पोलीस हे विचारतोय? ;-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

In reply to by विशाल कुलकर्णी

कविता वाचल्यावर मलाही परवा झी मराठीवर पाहिलेल्या "आयुष्यावर बोलु काही" ची आठवण झाली. काय मुळुमुळू रडतात स्त्रीया बाबांच्या आठवणींनी...! (सर्वच स्त्रीयांचा एक वीक प्वॉइंट म्हणजे...'बाबा' ....असे वाटते) -दिलीप बिरुटे

छान कविता. एकच खटकले...घरला हा शब्द. सगळी कविता शहरी बोली भाषेत आहे आणि घरला हा एकच शब्द ग्रामीण वाटतोय.

धन्यवाद, पक्या मलाही ते लक्षात आले होते, पण बदल करायचे काल राहुनच गेले. आज अपेक्षित बदल केला आहे. धन्स ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

In reply to by बेचवसुमार

'ला' नसला तरी 'आ' आहे ना! चालीत गुणगुणता आली म्हणजे झाले. आता तुम्ही "आ" वासु नका म्हणजे झाले. :T ह. घ्या. >:) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

विशाल भाऊ, आपली कविता आवडली ! - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''