Skip to main content

करुणा कर

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 05/06/2009 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
सांब सदाशिव शंकर | नीलकंठ गौरीहर हे उमापती महेश | भूतनाथ गिरिजावर करि धारी त्रिशुल डमरु | हे नटवर शशिशेखर अंगि चिताभस्म लेप | सर्पमाळ व्याघ्रांबर मदन दग्ध करिसी तूच | हे त्रिनेत्र नंदीश्वर रौद्र तुझे तांडव ते | भीषण अन् प्रलयंकर शंभो कैलासनाथ | भालचंद्र गंगाधर तूच सत्य, शिव, सुंदर | करुणाकर, करुणा कर
लेखनविषय:

वाचने 1940
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

भावभक्ती, प्रणय , विरह , निसर्गकाव्य, सामाजिक जाणिव सर्वच प्रांतात एकापेक्षाएक सुंदर कविता लिहुन आपण आपल्या प्रतिभेचा अप्रतिम आविष्कार दाखवित आहात ! आपल्याला शुभेच्छा !! आपण आणि प्राजु ग्रेट आहात !!!

छानच... (जय भोलेनाथ) मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor

अतिशय सुंदर!! कमाल आहे शब्दांची. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

नादमय आणि अतिशय सामर्थ्यवान काव्य! शंकर ह्या दैवताचे सगळे गुणविशेष अगदी चपखलपणे आले आहेत! :) (भूतनाथ)चतुरंग

ए मस्तच गं.....! शंकराचं किती सुरेख वर्णन केलं आहेस :)

क्रांती ताई.. सुरेख अप्रतिम सुंदर...... शब्द सापडत नाहियेत्...सहि आहे कविता. तुझी फॅन सायली.

हर हर महादेव. अप्रतिम वर्णन :) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य