Skip to main content

करुणा कर

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 05/06/2009 18:29 या दिवशी प्रकाशित केले.

सांब सदाशिव शंकर | नीलकंठ गौरीहर
हे उमापती महेश | भूतनाथ गिरिजावर

करि धारी त्रिशुल डमरु | हे नटवर शशिशेखर
अंगि चिताभस्म लेप | सर्पमाळ व्याघ्रांबर

मदन दग्ध करिसी तूच | हे त्रिनेत्र नंदीश्वर
रौद्र तुझे तांडव ते | भीषण अन् प्रलयंकर

शंभो कैलासनाथ | भालचंद्र गंगाधर
तूच सत्य, शिव, सुंदर | करुणाकर, करुणा कर

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1948
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

भावभक्ती, प्रणय , विरह , निसर्गकाव्य, सामाजिक जाणिव सर्वच प्रांतात एकापेक्षाएक सुंदर कविता लिहुन आपण आपल्या प्रतिभेचा अप्रतिम आविष्कार दाखवित आहात ! आपल्याला शुभेच्छा !! आपण आणि प्राजु ग्रेट आहात !!!


नादमय आणि अतिशय सामर्थ्यवान काव्य!
शंकर ह्या दैवताचे सगळे गुणविशेष अगदी चपखलपणे आले आहेत! :)

(भूतनाथ)चतुरंग


क्रांती ताई..
सुरेख अप्रतिम सुंदर...... शब्द सापडत नाहियेत्...सहि आहे कविता.
तुझी फॅन
सायली.


हर हर महादेव.
अप्रतिम वर्णन :)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य