मन माझं..!!
अलगद दु:ख आज डसतंय गं
मन माझं खुळं मुसमुसतंय गं
रूणझुण पाऊलात रूतलेला काटा
पूर येता मनामध्ये दिसेनाशा वाटा
कुसळ का उरामध्ये सलतंय गं..
मन माझं खुळं मुसमुसतंय गं..
वठलेल्या वेलीवरी चोरून का उभं
खाली काळी माती अन शिरावरी नभ
सुकलेलं पान असं रूसतंय गं..
मन माझं खुळं मुसमुसतंय गं..
दूर दूर कोण तिथं काळोखात फ़िरे
मला पाहूनिया करी कोणते इशारे
सुख तिथे दूर उभं हसतंय गं
मन माझं खुळं मुसमुसतंय गं..
भेगाळली धरा वाहे आसवांचा झरा
आभाळात नुसताच वाजतो नगारा
प्रखर उन्हांत रान भिजतंय गं
मन माझं खुळं मुसमुसतंय गं
कधी कानी येता काही प्रेमभरे बोल
मोह पडे जीवास नि होई घालमेल
भुलव्याला रोज असं फ़सतंय गं
मन माझं खुळं मुसमुसतंय गं..
- प्राजु
वर्गीकरण
कधी कानी
In reply to कधी कानी by अवलिया
मस्तच!
सुंदर
वेगळी पण
सुंदर कविता
झकास
In reply to झकास by क्रान्ति
+१
हुरहुर
खुळं
चांगलंय!
मुसमुसणार
द्वैअर्थी
नाद आहे
ए मस्त
कवितेला
सर्वांचे मनापासून आभार.
नेहमी प्रमाणेच
सुंदर कविता.
सुंदरच
प्राजुताई,
In reply to प्राजुताई, by उदय सप्रे
वा उदयजी..
भोंडल्याचं गाणं असावं तसं वाटतंय!
In reply to भोंडल्याचं गाणं असावं तसं वाटतंय! by चतुरंग
असेच म्हणतो
In reply to भोंडल्याचं गाणं असावं तसं वाटतंय! by चतुरंग
असेच म्हणतो !
अरे वा ! छान
सर्वांचे