मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माय.........

उमेश__ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रिय मिपाप्रेमी मात्रुदिना निमित्त ही एक छोटीशी कविता............ माय, माय आतला पदर चार पुडदाच्या पोळीतला भाजलेल्या खोबर्याचा तुकडा गावाच्या होळीतला... तव्यावरची भाकर भाजण्यासाठी माय झाली चुलीतलं सरपण जळत राहिली सतत घराला यावं घरपण... चुलीवर शिजून-शिजून मऊ झालेल पूरण आत्मशांतिसाठी पोळीचा तुकडा आगीत जळावा तसं माईला आलेलं मरण..................

वाचने 2214 वाचनखूण प्रतिक्रिया 8

क्रान्ति 11/05/2009 - 08:39
तव्यावरची भाकर भाजण्यासाठी माय झाली चुलीतलं सरपण जळत राहिली सतत घराला यावं घरपण... शब्द न् शब्द काळजाला भिडणारा! कविता नाही, मायच्या आयुष्याचं चित्र आहे! खूपच खास! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** www.mauntujhe.blogspot.com

जागु 11/05/2009 - 11:12
पुर्ण कविता आवडली. खुप छान वर्णन आहे मातेच.

पर्नल नेने मराठे 11/05/2009 - 17:39
चार पुडदाच्या पोळीतला ह्याचा अर्थ काय? चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

उमेश__ 11/05/2009 - 17:55
पुडदाच्या पोळीतला म्हणजे पोळीतला मधला थर

In reply to by उमेश__

नाटक्या 11/05/2009 - 22:33
'अरसिकेषु कवित्व निवेदनम् शिरसि मा लिख, मा लिख, मा लिख' हेच आठवले.. - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)